तर्कक्रीडा:४७ :नातेसंबंध

'शिरीष' हे नाव स्त्रीचे (लेखिका शिरीष पै) असते तसेच पुरुषाचेही ( लेखक शिरीष कणेकर ) असते. कांचन,मुकुल,किरण ही नावेही अशीच आहेत. असे नाव धारण करणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष याचा बोध केवळ त्या नावावरून होत नाही. या कोड्यातील चार नावे अशीच आहेत.
कांचन,किरण, मुकुल आणि शिरीष या चार व्यक्तींचे परस्परांशी नाते संबंध आहेत.सर्व नाती खरी आणि सख्खी आहेत.या संदर्भात खालील चारही विधाने सत्य आहेत. "एक नाव एक व्यक्ती." हेही खरे आहे.

१) किरणच्या एकुलत्या एका मुलाचे (पुत्राचे ) नाव शिरीष आहे अथवा मुकुल आहे.
२) 'कांचन' हे नाव शिरीषच्या एकुलत्या एका कन्येचे आहे अथवा शिरीषच्या भावाचे आहे.
३)कांचनच्या बहिणीचे नाव 'मुकुल' आहे अथवा 'किरण' आहे.
४) या चार जणांत स्त्री-पुरुषांची संख्या समान आहे. (दोन पुरुष, दोन स्त्रिया )
तर ही चार नावे धारण करणार्‍या व्यक्ती आणि त्यांचे परस्परांशी नातेसंबंध यांची योग्य संगती लावा.
******************************************************************
असे एक कोडे पूर्वी एका इंग्र्जी पुस्तकात वाचले होते. त्यावरून हे घेतले आहे......यनावाला.
******************************************************************८
लेखनविषय: दुवे:

Comments

नातेसंबंध

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वाचक्नवी तसेच श्री. अभिजित यांनी नातेसंबंध अचूक हुडकून काढले आहेत.मात्र दोघांनीही कारणमीमांसा दिलेली नाही.

अरेच्च्या देतो देतो

हुडकून काढा म्हटलं की काढलं..कसं काढलं ते पण सांगतो..

अभिजित...
जे (फाजील) बोललेले व (फाजील) लिहिलेले 'कळते' तो भाषेचा (फाजील) प्रकार शुद्धच असतो(?!?!?!).
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.(!?!?!?!)

नातेसंबंध

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हे कोडे श्री. सहज यांनी बरोबर सोडवले आहे. त्यांनी योग्य तो युक्तिवाद पण लिहिला आहे.

अरेच्च्या देतो देतो

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
तुम्ही अचूक उत्तर शोधले त्या अर्थी तुम्ही युक्तिवाद लढवलाच आहे. तो लिहायलाच पाहिजे असे नाही.

नातेसंबंध

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय यांनी कोड्याचे सविस्तर लिहून पाठविले आहे. तसेच कोड्यात एक सुधारणाही सुचविली आहे.

नातेसंबंध

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.बोका यांनी चारही नावे धारण करणार्‍या व्यक्ती आणि त्यांचे परस्पर नातेसंबंध यांची योग्य संगती लावली आहे. अभिनंदन!

नातेसंबंध

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आवडाबाई यांनी पर्याप्त युक्तिवादासह पाठविलेले उत्तर अचूक आणि परिपूर्ण आहे.

 
^ वर