भारतीय भाषा उत्थानात आयटी उद्योगाचे योगदान किती?

"बरहा.कॉम" चे वासु, "अक्षरमाला" चे श्रीनिवास अन्नम, "गमभन" चे ओंकार जोशी, "कैफ़े हिन्दी" चे मैथिली गुप्त, असे बरेच लोकं आहेत जे भारतीय भाषांसाठी आपापल्या परी ने भारतीय भाषांना संगणकाच्या उपयोगी करण्याच्या कामात गुंतले आहेत। खरं तर हे लोक साधक आहेत, मौन साधक...। आज भारतीय भाषा संगणका मधे पसरत चालली आहे आणि यूनिकोड चे वापर वाढत चालले आहे, त्या मागे अशा लोकांच भरघोस योगदान आहे। दुसरी कड़े आपण स्वतः ला (भारताला) आयटी महाप्रभू म्हणवून घेतो, इन्फ़ोसिस, टीसीएस, विप्रो आणि सत्यम ह्यांचा नुसता फ़ायदाच बरेच आफ़्रिकी देशांच्या बजट पेक्षा जास्ती असेल (बहुधा)... पण ह्या महाकाय कम्पन्यांनी भारतीय भाषे साठी काय केले आहे? अजून पर्यन्त ह्या कम्प्न्यांनी एक ही असा मोफ़त सॉफ़्टवेयर दिला आहे कि जेणेकरून एक भारतीय व्यक्ति आपल्या निजभाषेत स्वतः चे काम संगणका वर करू शकेल? आठवत नाही। पण वरती जी नावं दिली आहेत आणि असे बरेच जण आहेत जे स्वखर्चा ने कोणते ही स्वार्थ न बाळगता मोफ़त सॉफ़्टवेयर वितरित करीत आहेत, कशाला? कारण ज्ञानाचा फ़ायदा स्वतः ला आणी त्याच बरोबर समाजाला पण व्हायला हवा। इन्फ़ोसिस वगैरेंचे कोटि-कोटि डॉलर च्या फ़ायद्याचा एक सामान्य भारतीय माणसांला का उपयोग? असे ऐकिवात आहे आणि बरेच मुलं-मुली सांगतात कि इन्फ़ोसिस मधे १५ टक्के सॉफ़्टवेयर इंजीनियर "बेंच स्ट्रेन्ग्थ" म्हणून ठेवली जाते, हे लोकं सकाळी येतात, कोक-पेप्सी पितात, गेम खेळतात आणि भला-मोठा पगार घेवून संध्याकाळी घरी जातात, कारण त्यांना काम करायला प्रोजेक्टच मिळत नाही... मग अशा "ह्यूमन रिसोर्स" चा उपयोग ह्या कम्पन्या भारतीय भाषांचे सॉफ़्टवेयर बनवायला कां करत नाही? प्रत्येक काम "कमाई", "डॉलर", "पेटेंट" ह्यासाठी करायच नसतं... अब्दुल कलाम ह्यांनी "जयपुर फ़ुट" मधे टायटेनियम चा उपयोग करून त्याला संशोधित केले, त्यामुळे त्याचे वजन कमी झाले आणि विकलांग बन्धुंना ते आणखी उपयोगी ठरले, हे काम त्यांनी पेटेंट किंवा डालर साठी नाही केले। पण ह्या "महान" कम्पन्यांनी सरकार कडून, कमी भावात किंवा जवळ-जवळ फ़ुकटच जमिनी घेतल्या, वीज-पाण्या मधे सबसिडी घेतली, हार्डवेयर मागवण्यासाठी विभिन्न सुटी घेतल्या, हल्ली भारतीय रुपया बळकट व्हायला लागला तेव्हां हल्ला करून वित्तमंत्र्यांकडून नुकसानी (?) भरपाई साठी धाव घेतली, अशा "समाजसेवी" कम्पन्या भारतीय भाषे साठी काहीच करत नाही, मग त्यांच्या एवढ्या मोठ्या मानव आणि आर्थिक संसाधनाचा उपयोग काय? फ़क्त परदेशात दुसरया कम्पन्या अधिग्रहण साठी? प्रत्येक वेळा एका भारतीया ने मायबोली साठी, माइक्रोसॉफ़्ट किंवा गूगल चे तोंड कशाला बघायचे? कि आम्ही बिल गेट्स च्या मेहेरबानी वर आहोत? जेव्हां माइक्रोसॉफ़्ट काही करेल तेव्हां ते आम्हाला मिळणार, ते ही "पायरेटेड", कारण अजून ही एक सामान्य भारतीय एक साधासुदा सॉफ़्टवेयर विकत घेवू शकत नाही। मग आम्ही कसं मानायचं कि विश्वातली सर्वात मोठी सॉफ़्टवेयर इंडस्ट्री भारतात आहे.... भारतीय सॉफ़्टवेयर इंजीनियर जगभर गाजवत आहेत....वगैरे-वगैरे-वगैरे...

लेखनविषय: दुवे:

Comments

वाह ! झकास

छान लिहीलं आहे सुरेशजी. आवडलं आपल्याला.

आयटीचे योगदान

आपण उल्लेखलेल्या कंपन्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावाखाली तोंडदेखले समाजकार्य करतात, काही कंपन्या केवळ प्रसिद्धीसाठी. पण या पब्लिक लिमिटेड कंपन्या असल्याने त्यांनी आपल्या फायद्यातून असे काही करण्याचे ठरवले तर आपले शेअरधारक देशबांधव स्वतःचा फायदा कमी होण्याच्या भीतीने विरोधच करतील. असो.

कंपन्यानी काही करण्याची वाट पाहण्याची आवश्यकता काय? या कंपन्या इतक्या मोठ्या संख्येने तंत्रज्ञ, कुशल लोकांना पगार देतात, बर्‍यापैकी आरामदायक जीवनशैली देतात त्याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीय भाषांच्या तांत्रिक प्रगतीसाठी होऊ शकतो. "कामात बदल हाच विरंगुळा" या सुत्रानुसार कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त इतर वेळ ते अश्या कामांसाठी देऊ शकतात. मुक्त आणि मुक्त-स्रोत चळवळीमुळे जाळ्यावर समविचारी तंत्रज्ञांच्या सहकार्याने मोठे प्रकल्प चालवणे सहज झाले आहे.

चांगले पर्याय

"कामात बदल हाच विरंगुळा" या सुत्रानुसार कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त इतर वेळ ते अश्या कामांसाठी देऊ शकतात.

उपलब्ध पर्यायातून काम पुढे चालू ठेवणे हे मह्त्वाचे.

प्रकाश घाटपांडे

दुर्दैवाने

कामात बदल हाच विरंगुळा

दुर्दैवाने आयटीच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रातील खूप कमी भारतीय माणसे "कामात बदल हाच विरंगुळा" हे सूत्र मान्य करतील.

कामात बदल

दुर्दैवाने आयटीच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रातील खूप कमी भारतीय माणसे "कामात बदल हाच विरंगुळा" हे सूत्र मान्य करतील.

काही अंशी खरे आहे. पण "वेळ जात नाही", "तेच तेच काम करून कंटाळा आला", "काही तरी एक्साइटिंग करायचे आहे पण.." ह्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आयटी वर्तुळात नेहमी ऐकू येतात. त्यामुळे फक्त प्रेरणा मिळण्याची आवश्यकता आहे असे वाटते.

अरे वा

वाचुन मजा वाटली. असे का घडावे बरं? कार्यालयीन कामाव्यतिरिक्त काही करण्या बद्दल एवढी उदासिनता? कि काम हे फक्त मोबदल्या करताच केले पाहिजे हि मानसिकता?

मराठीत लिहा. वापरा.

हुहूचीपूपू

कार्यालयीन कामाव्यतिरीक्त आणखी काही करतो असे वरिष्ठाला कळले, तर कार्यालयात आणखी जास्त काम त्या व्यक्तीकडून करून घेता येऊ शकते, असा विचारही येऊ शकतो

म्हणुनच सरकारी खात्यात
१)एल बी डी एन् ( looking busy doing nothing) हे तत्व जोपासले जाते.
२) यड बनून पेढं खा
३)न्हाई म्हनायच नाही आणी करायचही नाही.

अस केलं की हूहूचीपूपू होते ( हुजूर हुकुमाची पूर्ण पूर्तता) होते.
प्रकाश घाटपांडे

ह्म्म्म

मला वाटतं चतुर लोक सुद्धा असतात. अर्थात मोबदला मिळत असेल तरच काम करेन हे तात्पुरता स्वार्थ साधणार्‍यांसाठी ठिक असले तरी स्वतःची शिकण्याची मानसिकता खुटवण्यासारखे आहे. तोटा त्या उमेदवारांचाच जास्त आहे असे वाटते. अर्थात आपण जे लिहिले आहे त्या नुसार वरिष्ठ खाष्ट असलाच पाहिजे असे नाही. चांगला मित्रवत वरिष्ठ असेल तर जास्त फायदा होतो. मला वाटते गुगलमध्ये या प्रकाराला जास्त महत्व देतात. अर्थात हि ऐकिव माहिती...

मराठीत लिहा. वापरा.

वाचण्यात गफलत

नुकताच मी बंगलोरला आमच्या संस्थेसाठी मनुष्यबळ जमा करायला गेलो होतो.

मी चुकून मनुष्यबळ कमी करायला गेलो होतो असे वाचले. एखाद्या गोष्टीचा आजुबाजुला प्रभाव असला कि वाचण्यात, ऐकण्यात अशा चुका होतात. एच आर डी वाले हाच उद्योग करतात ना?

प्रकाश घाटपांडे

विरोध का करू नये?

पण या पब्लिक लिमिटेड कंपन्या असल्याने त्यांनी आपल्या फायद्यातून असे काही करण्याचे ठरवले तर आपले शेअरधारक देशबांधव स्वतःचा फायदा कमी होण्याच्या भीतीने विरोधच करतील. असो.

अर्थातच करतील! आणि का करू नये सांगा बरं शशांकराव? अहो शेवटी त्यांनी स्वतःच्या कष्टाचा पैसा या समभागात लावलेला असतो..

असो,

आपला,
(Earning per Share, अर्थात EPS कडे बारकाईने लक्ष ठेवणारा एक भारतीय गुंतवणूकदार!) तात्या.

माझे मत..

सुरेशराव,

आपला चर्चाप्रस्ताव इंटरेस्टींग वाटतो आहे. सदर प्रस्तावावर माझे मत खालीलप्रमाणे -

खरं तर हे लोक साधक आहेत, मौन साधक...।

क्या बात है! मौन साधक हा शब्द आवडला. या मंडळींचे काम निश्चितच उत्तम आणि कौतुकास्पद आहे.. परंतु सदर कामाचे त्यांनी योग्य ते पैसेही घ्यायला पाहिजेत असे माझे व्यक्तिगत मत आहे!

पण ह्या महाकाय कम्पन्यांनी भारतीय भाषे साठी काय केले आहे? अजून पर्यन्त ह्या कम्प्न्यांनी एक ही असा मोफ़त सॉफ़्टवेयर दिला आहे कि जेणेकरून एक भारतीय व्यक्ति आपल्या निजभाषेत स्वतः चे काम संगणका वर करू शकेल?

अहो पण असा एखादा सॉफ्टवेअर मोफत देणे हे त्या कंपन्यांचे आद्य कर्तव्यच आहे असा आपला सूर दिसतो आहे. त्यांनी असे एखादे चॅरिटेबल काम करावे हा आग्रह का? ती धंदेवाईक मंडळी आहेत, आणि विनमोबदला एखादं काम त्यांनी का करावं?

पण वरती जी नावं दिली आहेत आणि असे बरेच जण आहेत जे स्वखर्चा ने कोणते ही स्वार्थ न बाळगता मोफ़त सॉफ़्टवेयर वितरित करीत आहेत, कशाला? कारण ज्ञानाचा फ़ायदा स्वतः ला आणी त्याच बरोबर समाजाला पण व्हायला हवा।

मान्य! अगदी १०० % मान्य! आणि त्याकरता त्यांना आमचा सलामच आहे. अहो पण प्रत्येकानेच, किंवा प्रत्येक कंपनीनेच तसं वागायला पाहिजे असं थोडंच आहे?

इन्फ़ोसिस वगैरेंचे कोटि-कोटि डॉलर च्या फ़ायद्याचा एक सामान्य भारतीय माणसांला का उपयोग?

काय उपयोग?? इन्फोसिस कंपनीच्या समभागाने आजपर्यंत एका सामान्य भारतीय माणसाला किती पटीत (! ) परतावा दिला आहे याबद्दल आपल्याला कल्पना दिसत नाही! नाहीतर आपण असे विधान केले नसते!

असे ऐकिवात आहे आणि बरेच मुलं-मुली सांगतात कि इन्फ़ोसिस मधे १५ टक्के सॉफ़्टवेयर इंजीनियर "बेंच स्ट्रेन्ग्थ" म्हणून ठेवली जाते, हे लोकं सकाळी येतात, कोक-पेप्सी पितात, गेम खेळतात आणि भला-मोठा पगार घेवून संध्याकाळी घरी जातात, कारण त्यांना काम करायला प्रोजेक्टच मिळत नाही... मग अशा "ह्यूमन रिसोर्स" चा उपयोग ह्या कम्पन्या भारतीय भाषांचे सॉफ़्टवेयर बनवायला कां करत नाही?

माझ्या माहितीप्रमाणे इन्फोसिस, विप्रो, सत्यम इत्यादी कंपन्या या प्रोफेशनली मॅनेज्ड कंपन्या आहेत आणि त्यांच्या मनुष्यबळाचा उपयोग त्यांनी कसा करावा याबाबत I think, they know better..! :)

प्रत्येक काम "कमाई", "डॉलर", "पेटेंट" ह्यासाठी करायच नसतं...

का बरं? अहो जी मंडळी धंद्याला उतरली आहेत ती पैसे कमावणारच ना? आणि त्यात वावगं काय आहे? उदाहरणार्थ, आजमितीस इन्फीचे बाजारमूल्य १०६२८२ करोड रुपये आहे, ज्यामध्ये अनेकांची लाखो-करोडो रुपायांची संपत्ती इन्फीच्या समभागात गुंतलेली आहे! त्यामुळे या मंडळींचे भागमूल्य सुरक्षित राहील याच दृष्टीने इन्फी पाउले उचलणार ना?

अब्दुल कलाम ह्यांनी "जयपुर फ़ुट" मधे टायटेनियम चा उपयोग करून त्याला संशोधित केले, त्यामुळे त्याचे वजन कमी झाले आणि विकलांग बन्धुंना ते आणखी उपयोगी ठरले, हे काम त्यांनी पेटेंट किंवा डालर साठी नाही केले।

चांगलंच आहे की! त्याकरता कलामसाहेबांचे आभार...

ह्या "महान" कम्पन्यांनी सरकार कडून, कमी भावात किंवा जवळ-जवळ फ़ुकटच जमिनी घेतल्या, वीज-पाण्या मधे सबसिडी घेतली, हार्डवेयर मागवण्यासाठी विभिन्न सुटी घेतल्या, हल्ली भारतीय रुपया बळकट व्हायला लागला तेव्हां हल्ला करून वित्तमंत्र्यांकडून नुकसानी (?) भरपाई साठी धाव घेतली, अशा "समाजसेवी" कम्पन्या भारतीय भाषे साठी काहीच करत नाही, मग त्यांच्या एवढ्या मोठ्या मानव आणि आर्थिक संसाधनाचा उपयोग काय? फ़क्त परदेशात दुसरया कम्पन्या अधिग्रहण साठी? प्रत्येक वेळा एका भारतीया ने मायबोली साठी, माइक्रोसॉफ़्ट किंवा गूगल चे तोंड कशाला बघायचे? कि आम्ही बिल गेट्स च्या मेहेरबानी वर आहोत? जेव्हां माइक्रोसॉफ़्ट काही करेल तेव्हां ते आम्हाला मिळणार, ते ही "पायरेटेड", कारण अजून ही एक सामान्य भारतीय एक साधासुदा सॉफ़्टवेयर विकत घेवू शकत नाही। मग आम्ही कसं मानायचं कि विश्वातली सर्वात मोठी सॉफ़्टवेयर इंडस्ट्री भारतात आहे.... भारतीय सॉफ़्टवेयर इंजीनियर जगभर गाजवत आहेत....वगैरे-वगैरे-वगैरे...

हम्म आपली कळकळ समजण्यासारखी आहे, पण सबसे बडा रुपैय्या ही वस्तुस्थिती आहे!

असो..

आपला,
(धंदेवाईक) तात्या.

--

मराठी माणसांनी, भारतीय माणसांनी आपल्यामध्ये असलेल्या स्किल्स् चा फायदा करून घेत अगदी रग्गड पैका कमवावा असे संत तात्याबांना वाटते!

तात्या

सहमत आहे.

आपण दोघांनी एकाच वेळी एकाच आशयाचा प्रतिसाद दिलेला दिसतोय.

;)

अवांतर..

आपण दोघांनी एकाच वेळी एकाच आशयाचा प्रतिसाद दिलेला दिसतोय.

अरे बाबा शेवटी आपण दोघेही 'मार्केटची' माणसं ना! :)

ऐशीच्या दशकात अवघ्या हजार रुपायात इन्फीचे १०० समभाग खरेदी केलेल्या माणसाकडचे इन्फीचे बाजारी समभागमूल्य आज अक्षरशः करोड रुपायात आहे. आता इन्फीने यापेक्षा अधिक काय करायला हवं हे काय आपल्याला समजत नाय बा! :)

आपला,
(इन्फीचा एक समभागधारक!) तात्या.

खरे आहे.

इन्फोसिस, विप्रो सारख्या कंपन्यांनी योग्य मार्गाने व्यवहार करुनही भरपूर पैसा कमावता येतो हे सिद्ध केले आहे. कॉर्पोरेट यश मिळवण्यासाठी "अंबानी मॉडेल" वापरण्याची प्रत्येकवेळी गरज नसते.

दुर्दैवाने बहुसंख्य भारतीयांमध्ये आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्याने अशा चांगल्या गोष्टी चटकन लक्षात येत नाहीत.

'आर्थिक साक्षरता'

दुर्दैवाने बहुसंख्य भारतीयांमध्ये आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्याने अशा चांगल्या गोष्टी चटकन लक्षात येत नाहीत.

क्या बात है, 'आर्थिक साक्षरता' हा शब्द मला खूपच आशयपूर्ण वाटला...

या चर्चेच्या संदर्भात हा शब्द खूपच महत्वाचा वाटला/वाटतो!

अभिनंदन कर्णा!

आपला,
(शेअरदलाल) तात्या.

पटले नाही

कोणतीही कंपनी स्वतःच्या फायद्यातोट्याचाच विचार करणार. आणि त्यांनी तसेच वागावे! जोपर्यंत ते योग्य मार्गाने पैसा कमवत आहेत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीत त्यांचा वाटा आहेच.

भारतीय भाषांचे मार्केट आता आकर्षक वाटू लागत असल्याने मायक्रोसॉफ्ट व गूगल सारख्या कंपन्या येथे उतरत आहेत. यात काही मेहेरबानी आहे असे मला वाटत नाही. विप्रो/इन्फोसिस या कंपन्या मुख्यत्वे सर्व्हिस बेस्ड - सेवा क्षेत्रातील आहेत. नवीन प्रणाली-प्रॉडक्ट- बनवणे हा त्यांच्या कामाचा भाग नाही. मात्र त्यांनी अशा संधी लवकर ओळखणे आवश्यक आहे असे वाटते.

जेव्हा एखादी मोठी कंपनी एका माणसाला प्रत्यक्ष नोकरी देते तेव्हा अप्रत्यक्षपणे २० लोकांना रोजगार मिळतो असे साधे सूत्र आहे. (बजाज कंपनीच्या आकुर्डी प्रकल्प बंद करण्यामुळे त्यांचे प्रत्यक्ष कामगार असलेल्या सुमारे अडीच हजार लोकांबरोबर त्यावर अवलंबून असलेल्या सुमारे दोन लाख जणांच्या रोजगारावर टाच येणार आहे.) त्यामुळे कंपन्यांनी आपला कारभार भरपूर पैसा कमावत योग्य मार्गाने यशस्वीरीत्या चालवणे यातच सर्वांचे हित नाही का?

विप्रो किंवा इन्फोसिस यांची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी परफेक्ट नसली तरी अझिम प्रेमजी फाऊंडेशन, सुधा मूर्ती फाउंडेशन द्वारे या कंपन्यांचे संचालक थोडा खारीचा वाटा उचलत आहेतच.

सविस्तर उत्तर नंतर.

उचल

विप्रो किंवा इन्फोसिस यांची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी परफेक्ट नसली तरी अझिम प्रेमजी फाऊंडेशन, सुधा मूर्ती फाउंडेशन द्वारे या कंपन्यांचे संचालक थोडा खारीचा वाटा उचलत आहेतच.

सविस्तर उत्तर नंतर.

सविस्तर उचल नंतर घेतली तरी स्वागतार्ह आहे.

प्रकाश घाटपांडे

गरज!

वा सुरेशराव,
चांगला विषय घेतलात चर्चेला.
या कंपन्या समाजासाठे देणं लागतात हे खरं आहे. ते त्यांनी कधी मान्य केले आहे असेही दिसत नाही हे ही खरं आहे.
मात्र समाज त्यांच्या वाचून अडून मागे राहिला नाही. काही योग्य विचार करणारांनी त्यावर मार्ग शोधलाच!
मला हे वेगळा विचार करणारे लोकच महत्वाचे वाटतात. त्यांनी जे काही भारतीय भाषांसाठी केले आहे ते निश्चितच खास आहे. त्यांना त्यात मानाचे स्थान आहे ते कधीच पुसले जाणार नाही. किंवा कोणत्याही कंपनीची माझ्या भाषेवर त्या साधनांवर मक्तेदारी नाही याचा आनंदच आहे!
एक अर्थाने बरेच झाले या कंपन्या लांब राहिल्या यापासून.

आता या कंपन्या व त्यात कामे करणारे 'हा निर्णय घेऊ शकणारे' लोक. ते तर या कंपन्या नफ्यामध्ये आहेत म्हणून ते तेथे आहेत्. जरा या कंपन्या बुडायला लागल्या तर हे बुडणार्‍या बोटीतून पळणार्‍या उंदरांसारखे आधी पळून जातील याची खात्री बाळगा. यांच्या कडून समाजासाठी काही होण्याची अपेक्षा कुठे ठेवता?
त्यात त्यांचा ही दोष नाही. ते बिचारे त्यांच्या डेडलाईन्स कशा मॅनॅज करायच्या यातच गुंतलेले आहेत. व्यवस्थापनच तसे असेल तर् ते तरी काय करतील बरं? मला माहित असलेले बहुतेक सर्व सॉफ्ट्वेअर मधले लोक भारतात असले तर त्यांची मुले घरी झोपी गेल्यावरच घरी येतात. नाहीतर दौर्‍यावर तरी असतात.

शिवाय ही गरज कोणी एखाद्या कंपनीला पटवून दिली आहे का?
अशी परिस्थिती समजावून सांगितली तर नक्कीच या कंपन्याही पुढे येतीलच अशी मला आशा आहे.

आपला
गुंडोपंत

पटले

... कोणत्याही कंपनीची माझ्या भाषेवर त्या साधनांवर मक्तेदारी नाही याचा आनंदच आहे!
एक अर्थाने बरेच झाले या कंपन्या लांब राहिल्या यापासून.

पटले. मलाही असेच वाटते.

मुळ मुद्दा

चिपलूनकरसाहेब आपला मुळ मुद्दा की ह्या कंपन्यांनी भारतीय भाषा विकसीत करायला काही तरी केले पाहीजे मान्य. बाकी ते जरी केले नाही तरीपण भारताच्या व बर्‍याच भारतीयांच्यासाठी ह्या कंपन्यांनी बरेच काही चांगले केले आहे ते विसरुन चालणार नाही. ('आर्थिक साक्षरता' सही शब्द शोधलास कर्णा!)

एनीवे माझे असे मत आहे कि तुम्ही मुर्तीसाहेब किंवा प्रेमजी यांना असे एक् विनंतीवजा पत्रतर टाकून बघा काय जाणो कदाचीत तुमची इच्छा पूर्ण होईल, बघा काय म्हणताय?

बरं वाटलं

चर्चे वर प्रतिसाद वाचून बरं वाटलं, कि कमीतकमी आता तरी मराठी माणूस पैश्या कडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागलाय (मस्करी करतोय), तात्यांना आणि त्यांचया समविचारी ह्यांना मात्र एक विचारायचं आहे कि शेयर बाजारात किती टक्के सामान्य भारतीय आहेत आणि त्यातून "इन्फी" चे शेयरधारक किती आहेत, ज्यांचे भले झाले आहे... त्याने नक्की आकडेवारी कळेल

http://sureshchiplunkar.blogspot.com

 
^ वर