तर्कक्रीडा:४६: क्रीडास्पर्धा

(|) टेनीस स्पर्धा
......एकेरी टेनीसचे नॉकआऊट पद्धतीचे सामने कसे होतात ते तुम्हाला ठाऊक आहेच.समजा ४८ स्पर्धक असतील तर प्रथम फेरीचे २४ सामने, दुसरीचे १२,तिसर्‍या फेरीचे ६...असे सामने होतात. शेवटी अंतिम सामना होतो.
....नवोदितांसाठी आयोजित केलेल्या अशा एका स्पर्धेसाठी १२६ (एकशे सव्वीस) खेळाडू पात्र ठरले.सर्व सामने वेळापत्रकानुसार पार पडले.कोणीही पुढे चाल दिली नाही.
....तर अंतिम विजेता ठरे पर्यंत एकूण किती सामने झाले? तोंडी उत्तरा साठी युक्तिवाद कोणता?
***********************************************************************
(||)हॉकीस्पर्धा
.....गेल्या वर्षीच्या आंतरविभागीय हॉकी स्पर्धेतील एकूण सहाही समने तसे अटीतटीवे झाले. या सामन्यांच्या दर्जावरून आपण पुन्हा हॉकीचे विश्वविजेते पद मिळवू शकू असे वाटू लागले आहे.
...उत्तरविभागाचा बलाढ्य समजला जाणारा संघ या स्पर्धेत एकच सामना जिंकू शकला. दोन सामन्यांत त्या संघाला हार पत्करावी लागली.या स्प्रर्धेचा गोल तक्ता पुढील प्रमाणे:

.........संघ..........................गोल बाजूने.....................गोल विरुद्ध
पूर्व विभाग............................ २ .......................... १
पश्चिम विभाग........................ ६ ............................ ५
उत्तर विभाग........................... ७ ........................... ६
दक्षिण विभाग........................ ० ............................ ३

तर या स्पर्धेतील सर्व सहा सामन्यांचे गोलफलक लिहा.

लेखनविषय: दुवे:

Comments

वालावलकरशेठ,

छ्या बुवा! अहो वालावलकरशेठ, तुम्ही खूपच कठीण कठीण कोडी घालता! :)

आपल्याला काय तुमचं हे कोडं सुटत नाय बाबा! :)

आपला,
(बाद झालेला) तात्या.

हेच म्हणतो :)

यनावाला साहेब,
आम्हाला जे काही बिजगणित येते त्यात हे कोडे काही सुटत नाही बॊ !

आपला
स्पर्धेत क्वॉलीफाय होत नसलेला
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरंय

प्रश्नांची अर्धवट उत्तरे येतायत, त्यामुळे पाठवावेसे वाटत नाही. सर्व सुटल्यावर व्यनिने ....
(काही दिवस इथे न आल्याने गाडी रुळावर यायला वेळ लागणार असं दिसतंय)

क्रीडास्पर्धा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांनी दोन्ही कोड्यांची उत्तरे अचूक शोधली आहेत. विशेषतः टेनिस सामन्यांची संख्या तोंडी काढण्यावा युक्तिवाद त्यांनी थोड्या प्रयत्नांती शोधून काढलाच.
हॉकीच्या गोलफलकांसाठी त्यांनी लांबची रीत वापरली. खरेतर समीकरणांचा विचार आवश्यक नाही. थोडा तर्क चालवल्यास उत्तर सहज येऊ शकते.
...........................
खेळाडूंची संख्या विषम असताना काय करावे अशी थोडीशी अडचण श्री, वाचक्नवी यांना वाटते.समजा १९ जण आहेत . तर पहिल्या फेरीचे ९ सामने होतील. एका खेळाडूला 'बाय' मिळेल. नंतर ९ विजेते आणि 'बाय' खेळाडू मिळून दहात दुसर्‍या फेरीचे ५ सामने. नंतर ३र्‍या फेरीचे २ सामने, एकाला बाय. अशा प्रकारे सामने होतात.
या प्रकाराला नॉक औट स्पर्धा म्हणतात कारण खेळाडू एकदा पराभूत झाला की तो स्पर्धेबाहेर फेकला जातो. किंबहुना एक सामना झाला की एक (आणि एकच) खेळाडू स्पर्धेतून बाद बाद होतो.

विषम खेळाडू संख्या.

१९ चे उदाहरण सोपे होते. पण मुळात ६५ खेळाडू असतील तर काय? पहिल्या फेरीपूर्वीच एक खेळाडू बाय(बाहेर). ६४ खेळाडू नॉक औट पद्धतीने खेळत राहतील , मग या बाहेर पडलेल्याने कुणाशी खेळायचे?--वाचक्‍नवी

६५ खेळाडू

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
'बाय' देण्यासाठी निश्चित निकष काय असतात ते मला ठाऊक नाही.पण ६५ स्पर्धक असले तर पहिल्या फेरीच्या ३२ विजेत्यांतील एकाला बाय देऊन ६५ वा खेळेल . मग १६ विजेत्यांतील एक खाली राहून बाय क्र. २ खेळेल.असे होत राहील.शेवटचा बाय हा उपान्त्य सामन्यातील विजेत्याशी अंतिम सामना खेळेल . मात्र प्रत्येक वेळी कुणाला खाली बसवायचे ते खेळाच्या पूर्वनियोजित नियमांनुसार ठरेल.काही असले तरी एकूण सामन्यांची संख्य बदलणार नाही.

पहिला भाग

जर पहिल्या भागात असेही उपप्रश्न असला तर कसे सोडवाल?
(१अ) ...
(१ब) सामन्यांमध्ये कोण्याही एकास कमीत कमी "बाय" मिळतील अशा रीतीने क्रीडास्पर्धेचे आयोजन केले आहे. (याचा अर्थ, जिंकावयास प्रत्येकास जमेल तितके जास्तीतजास्त सामने खेळावे लागतील असे आयोजन केले आहे. विषम आकडा आलाच तर नाइलाजाने बाय दिला जाईल, त्याचे कमीत कमी प्रमाण ठेवले असे आयोजन केले आहे.)
विजेत्याला कमीतकमी किती सामने खेळावे लागतील? जास्तीत जास्त किती?

(१ क) समजा "बाय" कमीतकमी ठेवायचा काहीएक प्रयत्न केलेला नाही. विजेत्याला कमीतकमी किती सामने खेळावे लागतील? जास्तीत जास्त किती?

१ अ. ब. क.

असो. मीच देतो तर उत्तरे.
१ अ. हा मुळातला प्रश्न आहे. त्याचे उत्तर यनावालांनी दिलेले आहे.

१ ब. सामन्यांमध्ये कोण्याही एकास कमीत कमी "बाय" मिळतील अशा रीतीने क्रीडास्पर्धेचे आयोजन केले आहे. (याचा अर्थ, जिंकावयास प्रत्येकास जमेल तितके जास्तीतजास्त सामने खेळावे लागतील असे आयोजन केले आहे. विषम आकडा आलाच तर नाइलाजाने बाय दिला जाईल, त्याचे कमीत कमी प्रमाण ठेवले असे आयोजन केले आहे.) विजेत्याला कमीतकमी किती सामने खेळावे लागतील? जास्तीत जास्त किती?

जर सुरुवातीला क्ष स्पर्धक असतील तर
य = लॉग(क्ष)/लॉग(२) काढावा.
जर य पूर्णांक असला तर विजेत्याला य सामने खेळावे लागतील (कमीत कमी = जास्तीत जास्त).
जर य पूर्णांक नसला तर विजेत्याला य च्या लगेच खालचा पूर्णांक (कमीत कमी), किंवा य च्या लगेच वरचा जो पूर्णांक (जास्तीत जास्त), तितके सामने खेळावे लागतील.

(१ क) समजा "बाय" कमीतकमी ठेवायचा काहीएक प्रयत्न केलेला नाही. विजेत्याला कमीतकमी किती सामने खेळावे लागतील? जास्तीत जास्त किती?

जर सुरुवातीला क्ष स्पर्धक असतील तर :
कमीत कमी एक सामना, जास्तीत जास्त क्ष-१ सामने.

टेनीसस्पर्धा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
टेनीस सामन्यांची नेमकी संख्या किती ते शोधण्यात श्री. वाचक्नवी यशस्वी ठरले आहेत्.

टेनीस स्पर्धा: उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"तो टेनीस सामन्यांचा प्रश्न जरा अवघड वाटतोय."
"बरं. आपण पाहूया. १२६ स्पर्धक आहेत्.अंतिम विजेता कोण हे ठरण्यासाठी किती स्पर्धक पराभूत व्हायला हवेत.?"
"१२५ जण हरायला हवेत. अंतिम विजेता हा एकमेव अपराजित खेळाडू असतो."
"अगदी बरोबर! १२५ जणांचे आव्हान संपुष्टात आले की उरेल तो अंतिम विजेता. आता एक सामना झाला की एक खेळाडू बाद होतो. म्हणून १२५ स्पर्धकांचे आव्हान संपुष्टात येण्यासठी १२५ सामने होतील हेच उत्तर."
"आं. इतके सोपे? अ.टे. स्पर्धेत सानिया मिर्झा तिसर्‍या फेरीत हरली.म्हणजे तिचे आव्हान तीन सामन्यांनंतर संपले."
"हो. पण पहिल्या सामन्यात सानियाशी जी खेळली ती हरली. दुसर्‍यात दुसरी मुलगी हरली. तिसर्‍या सामन्यात सानिया स्वतः हरली. म्हणजे तीन सामन्यांत तीन मुली हरल्या.एक सामना झाला की एकजण हरणारच."
"हो. १२६ स्पर्धक. १२५ जणांचे आव्हान संपण्यासाठी १२५ सामने होतील हे अगदी स्पष्ट आहे. त्यावर तुम्ही एवढे कशाला सांगता आहात? आहे काय त्यात?"

हॉकी सामने

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विसुनाना यांनी सहाही सामन्यांचे गोलफलक अचूक लिहिले आहेत. मात्र त्यांनी युक्तिवाद लिहिला नाही.

हॉकीस्पर्धा: उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
असे दिले आहे की " उत्तरविभाग संघ या स्पर्धेत एकच सामना जिंकू शकला. दोन सामन्यांत त्या संघाला हार पत्करावी लागली."
उ.विभागाला हरवणारे दोन संघ कोणते? अर्थात पू. आणि प. कारण द.चे गोल शून्य.म्ह. उ.वर लागलेले ६ ही गोल पू. आणि प. चे . उ.हे २ सामने हरला. म्हणजे त्याने या दोन संघांवर मिळून (६-२= ४) पेक्षा अधिक गोल केले नाहीत.(विजयासाठी न्यूनतम गोलाधिक्य एक.) उ. ने केलेली गोलसंख्या ७ असल्याने त्या संघाने द्. विरुद्ध तीन गोल केले हेच खरे.यावरून सामन्यांचे गोलफलकः
उ. वि.द...........३-०
पू.वि द...........०-०
प. वि. द..........०-०
प.वि उ............५-४
पू.वि प............१-१
पू.वि.उ.............१-०

 
^ वर