माघार घेतल्या नंतर

अमेरिका इराकमधून माघार घेणार हे तर आता जवळजवळ नक्कीच आहे. तर इराक मधील दहशतखोरांना आणि पर्यायानी जगात सर्वत्र असलेल्या इस्लामी दहशतखोरांना यश मिळाल्यासारखं वाटेल हे ही प्राप्त आहे. हे खरंच यश आहे का, ही अमेरिकेची शरणागति आहे का हा एक (वेगळा) चर्चेचा विषय आहे. इथे मात्र मला चर्चा करायची आहे ती या माघारीच्या भारतावरच्या परिणामांबद्दल. ह्या माघारीमुळे दहशतखोरांची बाजू जास्त प्रबळ होणार हे ही जवळजवळ नक्कीच. ह्या दहशतखोरांचं मुर्तिमंत स्वरूप म्हणजे अल् कायदा. इराक काय, भारत काय किंवा जगात इतरत्र् जिथे जिथे इस्लामी दहशतखोरी माजते आहे ती सर्व अल् कायदाच्याच सभासदांनी केलेली आहे की नाही हे सांगणं कठीण आहे, पण जर कुणाकडे सुसूत्रता असेल तर ती ह्याच गटाकडे आणि त्यांचा प्रभाव ह्यातील बहुतांशी कृत्यात असणार हे गृहित धरता येईल.

ह्या शत्रूचं उद्दिष्ट काय आहे? अमेरिकेसारखं मोठं ऐतं 'टार्गेट्' त्यांच्या परिसरातून नाहिसं झाल्यावर त्यांचं पुढचं लक्ष काय असेल? ह्याबद्दल ही चर्चा.

त्यांनी प्रचार केलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला तर त्यांना जगात जिथे जिथे मुसलमान राहतात तिथे तिथे त्यांना इस्लामी (म्हणजे त्यांची) राजवट आणायची आहे. अर्थातच कित्येक कोटी मुसलमान स्वतःचा देश मानणारा व लोकशाही तत्वांवर इस्लामला इतर धर्मांच्या समान वागवणारा भारतीय प्रजासत्ताक हा त्यांचा शत्रूच ठरतो आणि अमेरिकेसारख्या प्रबळ शत्रूच्या अभावी भारतावर त्यांचं लक्ष येण्याची शक्यता मला दाट वाटते. गेल्या बारा - चौदा महिन्यात झालेल्या वाढत्या दहशतखोरीचे हेच कारण असू शकेल. काश्मिर वगैरे त्यामुळे मला दुय्यम कारणं वाटतात आणि सूक्त हेतू भारतात दहशत माजवून तिथे अल् कायदाचे 'डी फॅक्टो' राज्य आणायचे असा वाटतो. मक्का मश्जिदीवर झालेला स्फोटकहल्ला, व हैदराबादमध्येच झालेले नंतरचे स्फोट त्यांच्या काव्याचे द्योतक आहे. एक एका शहरांत हिंदू व मुसलमानांना एकमेकांविरुद्ध पेटवायचं आणि भारतीय लोकशाही राजवट निकामी करुन सोडायची हा त्यांचा डाव असणं सहज शक्य आहे. इराकमध्ये त्यांनी हाच कावा वापरला होता - इराकी शिया व सुन्नींना एकमेकांविरुद्ध लढवून बघदादमध्ये अराजक माजवलं की त्यांची फत्ते झाली असं समजायचं (हा कावा पुराव्यासह सिद्ध झालेला आहे).

इतर उपक्रमींना काय वाटतं?

लेखनविषय: दुवे:

Comments

इस्लाम आणि भारत

एक मुद्दा म्हणून आपले म्हणणे पटते. पण अमेरिकेच्या जागेवर भारताला उभे करण्याचा प्रयत्न थोडा केविलवाणा वाटतो. पटत नाही.
अमेरिकेची इराक मधुन माघार हे चित्र माझ्यासारख्या अनेकांसाठी (धर्म कोणताही असो) कार्पोरेट स्टाइल मधल्या दहशतवादाची कट्टर इस्लामिक दहशतवादा समोर माघार असे आहे. या पुढे जाउन मी असे ही म्हणेन कि अमेरिकेला खरा दहशतवाद आणि दहशत वादाच्या खर्‍या झळा अजुन बसल्याच नाहियेत. त्यांनी रणांगण सुरू होण्यापुर्वीच माघार घेतली आहे. खरतर काही प्रमाणात शहाणपणा दाखवला आहे.

आता भारता बद्दल बोलु. भारताने इस्लामिक राजवट आणि दहशतवाद हा अनेक शतकांपासून सोसला आहे आणि पोसला सुद्धा आहे. म्होरके बदलत आले आहेत. पुर्वी हे इस्लामि म्होरके भारतावर येउन हल्ले करायचे आणि राज्य करायचे. आता कोणालाच भारतात येउन असे करण्यात शक्ति वाया घालवायची नसते. आपल्या इतिहासानुसार, आपलेच लोक त्याला यथाशक्ति मदत करत असतात. तरी सुद्धा, आज वर संपूर्ण भारतावर राज्य करायची किमया फक्त ब्रिटिशांनाच जमली आहे. भारतातला आज कालचा (गेल्या ५० वर्षातला) दहशतवाद हा सुद्धा कॉंग्रेसने जपलेला दहशतवाद आहे. दहशतवाद हे के विषारी रोप आहे जे मुळापासून उखडून फेकायला हवे. पण काँग्रेसच्या सरकारांनी ते कधीच केले नाही. मतपेटीच्या राजकारणात्, निधर्मवादाचे नाव पुढे करून योग्य प्रकारे धार्मिक तेढ वाढवण्यात ते यशस्वी ठरले. एवढ्यावरच न थांबता, जातीयवाद सुद्धा पेरला. जेणे करून समजा उद्या आम्ही इस्लाम हुसकून लावला तरी भारतात जातीय अतिरेकी असतील. दहशतवादाच्या विषारी रोपट्याचा काँग्रेसने खतपाणी घालून चांगला वटवृक्ष बनवला आहे.

तसे पाहायला गेले तर इस्लामी आणि ख्रिश्वन लोकांनी भारतीयांवर राज्य करून आज सुद्धा असंघटीत हिंदु भारतात काहि प्रमाणात का होइना आनंदाने जगत आहेत. भारतीयांचा इतिहास हे सुद्धा सांगतो कि आम्ही एखादे संकट अगदी स्वतः पर्यंत येई पर्यंत झोपुन रहातो. जेव्हा अगदी स्वतःच्या घरातच शत्रू येतो तेंव्हा आम्ही संघटीत होतो आणि यशस्वीरित्या हुसकावून लावण्यात यशस्वी होतो. त्यावर आमचीच पाठ थोपटून घेतो. हे सगळे करताना हे लक्षात नाही घेत की आम्ही जी शक्ति वापरून प्रगती करून हे टाळू शकलो असतो ते सगळे यात खर्च करून टाकतो आणि परत नव्याने सुरूवात करतो. हेच खरतर आम्हा भारतीयांच भारतीय असण्याचं लक्षण आहे.

अलिकडच्या काही घटना पहिल्यास लक्षात येइल की सामान्य भारतीत हल्ली धार्मिक कारणांवरून अराजक खपवून घेत नाही. उगाच दंगली घडत नाहित. मला तरी वाटत कि जागतिक इस्लामिक राज्याचे स्वप्न भारतावर लादणे हे लादेनला इतके सुद्धा सोपे नाही. समजा जर असे झालेच तर कदाचित इस्लामच्या अंताची सुरूवात भारतातून सुरू होइल.





मराठीत लिहा. वापरा.

शिबीरात

अहा!
संघाच्या बैद्धिक शिबीरात जाऊन बसल्या सारखे वाटले!

आपला
एके काळचा संघाचा कार्यकर्ता
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

बैद्धिक ??

गुंडोपंत, बैद्धिक म्हणजे कोणते शिबीर?

येथे लिहिलेले 'कळले' नाही म्हणून विचारले.

(राष्ट्र सेवा दल स्वयंसेवक) आजानुकर्ण

हा हा!!

कर्ण्या खेचतो आहेस का माझी?
खेच बाबा खेच माझेही कान खेच!

संघाची बौद्धीक शिबीरं होत असतात. त्यात अनेकदा अशा चर्चा होतात.
तु कधी 'विवेक' मासिक(?) वाचले आहे का?

आपला
गुंडोपंत
~ येथे कोणताही भलत्या सलत्या शुद्धीचा आग्रह धरलेला नाही!!

दंगलींबद्दल सहमत

आजकाल भारतात संयम वाढला आहे हे पटतं. निदान हैदराबादमधील लोकांनीतरी खूप संयम दाखवला आहे हे खरं - जरा भिवंडी वगैरे भागातील लोकांनी तसंच वागलं तर बर होईल!

दुसर्‍या क्रमांकावर

आतंकवादाची झळ सोसणार्‍या देशात इराक नंतर भारताचाच नंबर लागतो (दुवा). भारताला आपली सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याशिवाय इतर पर्याय नाही.

इराण?

काल जॉर्ज बुश यांनी डाकोटा येथे केलेल्या भाषणात इराण इराकमध्ये विघातक कारवाया करत आहे असे म्हटले. याशिवाय इराणने अणूशक्ती संशोधन बंद करण्यास नकार दिल्याचाही उल्लेख केला. यानंतर लगोलग सीआयएने इराकमध्ये सहा इराणी नागरिकांना विघातक कारवायांच्या आरोपावरून अटक केली. (आज सकाळी त्यांना सोडूनही दिले.) बुश यांच्या भाषणाचा रोख सरळसरळ इराणवर होता. प्रश्न असा आहे की हे फक्त भाषण होते की याबरोबर तशीच कृतीही होइल? जर हो तर मग पुढचा क्रमांक इराणचा म्हणायचा का? आणि हे थांबणार कुठे आणि कसे?

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

ह्म्म्!

हम्म्म्!
चांगला विषय आहे!

राजकीय घडामोडींवर आधारित गृहितक

पुढच्या निवडणूकीत ओबामा किंवा क्लिंटन निवडून येतील असं वाटतय, व ह्या दोन्ही व्यक्तिंनी माघार घ्यायचं कबूल केलं आहे.

शिवाय जनमत इराकमध्ये अमेरिकन् सैनिक ठेवण्याविरुद्ध आहे. त्यामुळे आता बुशच्या पक्षातील लोक सुद्धा असं काहितरी बोलू लागले आहेत.

खिरे.

माघार

शिवाय जनमत इराकमध्ये अमेरिकन् सैनिक ठेवण्याविरुद्ध आहे

जनमत काय आहे ह्याने काहीही फरक पडत नाही हे बुश सहेबांच्या वागण्यातून कधीच सिद्ध झाले आहे. (२८% अप्रुव्हल रेटींग) तसेच ओबामा किंवा हिलरी निवडून यायला अजुन बराच कालावधी आहे.. (साधारण २००९ च्या पुढेच)

बरोबर - माघार दोन वर्षांनीच

मी म्हणतोय ती माघार दोन वर्षांनी होण्याची शक्यता दाट आहे - हेच गृहित धरुन चाललं पाहिजे. एक शक्यता अशी आहे की सप्टेंबरमध्ये अमेरिकन् काँग्रेस युद्धासाठी लागणारा पैसा बंद करेल व माघार घ्यावी लागेल - तसं झालं तर माघार अजून एक वर्षानी होईल. पण तरीही माघार होणार हे जवळजवळ निश्चितच आहे. आणि हे अल् कायदाला माहित असेल तर ते पुढच्या प्रयत्नांची पायाभरणी अत्ताच करत असू शकतील.

माघार

वर इतरांनी म्हणल्याप्रमाणे आपण "माघार घेणार" हे गृहीत धरून लिहीले आहे. अमेरिकेने "माघार" जरी घेतली तरी ती व्हिएटनामसारखी ठरण्याची शक्यता नाही. कारण प्रगत जग एकमेकांवर कितीही कुरघोडी करत असले तरी दहशतवादाच्या विरुद्ध एक आहे. (कारण त्यांना त्यांचा सामुहीक आणि राष्ट्रीय स्वार्थ चांगला कळत आहे). हा भांडवलशाही देश विरुद्ध कम्यूनिस्ट असा लढा नाही. तर दहशतवादी विरुद्ध दहशतवादविरोधकदासे रुप जास्त आहे. (अर्थात यात साम्राज्यवाद चालू शकतो, तेलाची भूक चालू शकते...!). आपण जर वाचले असेल तर गेल्या आठवड्यातच, मला वाटते, संयुक्त राष्ट्रसंघाने इराकमधे लष्करी सहभाग वाढवायचा निर्णय घेतला आहे, अर्थात अमेरि़ने जरी काढता पाय घेतला तरी त्यात आंतर्राष्ट्रीय सैन्य जागा घेण्यास येऊ शकेल.

इथे मात्र मला चर्चा करायची आहे ती या माघारीच्या भारतावरच्या परिणामांबद्दल.

अमेरिकेने हल्ला करताना भारताचा किंवा इतर कुणाचाच विचार केला नाही (अर्थात त्यांनी काही अंशी काहीच विचार केला नाही असे म्हणावेसे वाटते!), फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला. भारतात जे परीणाम होवू शकतात ते इराक-अमेरिकेमुळे नव्हे तर आपल्या राजकीय निर्णयशक्ती आणि या बाबतीत "भारतीय मुस्लीम समुदायाला" त्यांचा सामाजीक स्वार्थपण भारतात शांतता राहाण्यात आहे हे समजण्यात आहे. मला वाटते, मी, बी. रामन (रॉ चे माजी संचालक) यांचा यावर लेख वाचला होता दुवा मिळाल्यास नंतर देईन, पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, हैद्राबादमधे मुसलमान समाजाचा बर्‍यापैकी हा अतिरेक्यांना मदत करत आहे असे त्यांचे माहीतीवर आधारीत म्हणणे आहे आणि राजकीय निर्णयशक्ती ही अल्पसंख्यांकांना गोंजारणे आणि दहशतवादाला गोंजारणे यातील फरक समजत नसल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेस दिशा ठरवताना त्रास होतो. त्यावर त्यांनी पंजाबचे उदाहरण दिले की जेंव्हा स्थानीक (शिख) समाजाची दहशतवादास होणारी मदत थांबली तेंव्हा तेथील दहशतवाद उपटून काढता आला. थोडक्यात आपण समर्थ असणे हे महत्वाचे. या बाबतीत उपक्रमवरील चाणक्यांनी लिहीलेले विचार पटणारे आहेत.

जो पर्यंत आपल्याला आपली देश म्हणून (धर्म, भाषा, जाती, पंथ वगैरे आड न येता) काळजी घेता येत नाही तो पर्यंत जगात नंदनवन असले तरी भारताला त्याचा फायदा नाही. शेवटी माणसाला आणि राष्ट्राला त्याच्या सामर्थ्याच्या तुलनेतच मित्र अथवा शत्रू मिळतात. त्यावरचे खालील सुभाषीत लक्षात ठेवण्यासारखे आहे:

वनानी दहतो वन्ही, सखा भवती मारूतः स एव दिपनाशाय कृशे कश्चास्ती सौर्‍हदम्

(जंगलात पेटलेल्या वणव्यास आग वाढवण्यास मदत करणारा वारा, हा दिव्याची वात विझवायला कारण होतो. तात्पर्यः दुर्बळाला कोणी मित्र नसतो).

अवांतर

> उपक्रमवरील चाणक्यांनी लिहीलेले विचार ...
उपक्रमवरील चाणक्य = उपचाणक्य ? :)

ह. घ्या.

खिरे

दहशती कृत्यांना पाठपुरावा

दहशती कृत्य तेथिल स्थनिक नागरिकांनी पाठपुरावाकेल्याशिवाय शक्य होणार नाहित हे खरं आहे. माझं म्हणणं असं आहे, की अल् कायदा इराकमध्ये स्वतःला विजयी जाहिर करणार आणि त्यातुन अधिकाधिक लोकांना त्यांच्यात सामिल होण्याची स्फृर्ति मिळणार. अल् कायदानी 'पी .आर्.' युद्ध जिंकलं आहेच असं मला वाटत

 
^ वर