तीन देवियॉं...

खालील फोटो पाहून एक विचार आला की आत्ताच्या किती नट-नट्या इतक्या सहज हसत त्यांच्या उतारवयात त्यांच्या कला जीवनाबद्दल कृतार्थ दिसतील...

तीन देवियॉं... हेलन, वहिदा रेहमान आणि शर्मिला टागोर बुधवारी रात्री नवी दिल्लीत "विमेन इन इंडियन सिनेमा' या "कॉफी टेबल' पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त एकत्र आल्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाला उजाळा मिळाला.
लेखनविषय: दुवे:

Comments

त्रिमूर्ती

हेलनः गम छोड के मनाओ रंगरेली..और मान लो जो कहे किटी केली..
वहीदा: कोई न रोको दिल की उडान को..ये तो चला..
शर्मिली: गुन गुना रहे है भंवरे खिल रही है कली कली..

यांच नाव काढलं की ही गाणी लगेच आठवतात..

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

वहिदा

वहिदा रहमान अजूनही छान दिसते हो!

(वहिदा फ्यान) आजानुकर्ण

योग

आजच पेपर वाचताना हा फोटो क्लिक झाला होता.
प्रकाश घाटपांडे

शर्मिला टागोर

शर्मिला टागोर सुंदरच होती. (भूतकाळ) विशेषतः शर्मिलाकाकुंच्या गालावरची खळी लक्ष वेधून घेते ;) (चालू वर्तमानकाळ)

अवांतर ;) विकासराव, तुमच्या रसिकतेला दाद दिलीच पाहिजे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे सगळे सापेक्ष आहे

खालील फोटो पाहून एक विचार आला की आत्ताच्या किती नट-नट्या इतक्या सहज हसत त्यांच्या उतारवयात त्यांच्या कला जीवनाबद्दल कृतार्थ दिसतील...

वेल, उतारवयापर्यंत टीकतील ते सर्व.... :-)

एके काळी लोकांना सैगल, अशोक कुमार मंडळी आवडायची "बॉक्स ऑफीस कमांड" ह्यांच्या नावावर चित्रपट चालायचे, मग देव, राज दिलीप, ...धर्मेंद्र, राजेश, अमीताभ.... .. आमीर,शाहरुख, अक्षय... र्‍हृतीक... .

नूतन, मधुबाला, मीनाकुमारी ....श्रीदेवी, माधुरी...काजोल, रानी, झींटा.....

हे चालूच रहाणार... कुठेना कूठे ह्यांचे फॅन क्लबस् , मंदीरे बनणारच.

"बॉक्स ऑफीस कमांड" ज्यांचा असेल ते सगळे अजरामर

ह्म्म् कल्पना करा पुढे अजुन ३०, ४० वर्षानी मल्लीकाबाई,सावंतबाई,यानाबाई या तिघी अश्याच एका "आम्ही खल्लास् फटाकड्या" ह्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त एकत्र आल्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या "सुवर्णकाळाला" उजाळा मिळाला. व "आत्ताच्या" (त्यावेळच्या भविष्यातील्) अश्या कृतार्थ उत्कृष्ठ खल्लास् फटाकड्या कोणी होऊ शकेल का अशी बातमी कोणीतरी उपक्रमावर लिहीली आहे.....:-)

ह. घ्या. फ्रायडे इव्हीनींग पोस्ट रिप्लाय आहे. :-)

पुस्तकाचे नाव...

ह्म्म् कल्पना करा पुढे अजुन ३०, ४० वर्षानी मल्लीकाबाई,सावंतबाई,यानाबाई या तिघी अश्याच एका "आम्ही खल्लास् फटाकड्या" ह्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त एकत्र आल्या....

पुस्तकाचे नाव एकदम व्यक्तीउचीत चपखल सुचले!

एलिगन्स

काय योगायोग (!) आहे. आजच संभाषणकला हा विषय शिकवत असताना एलिगन्स म्हणजे काय हे कळायचे असेल तर हा फोटो पहा असे मी म्हटले होते!
सन्जोप राव

अचूक शब्द..

आजच संभाषणकला हा विषय शिकवत असताना एलिगन्स म्हणजे काय हे कळायचे असेल तर हा फोटो पहा असे मी म्हटले होते!

एकदम अचूक शब्द.. मला शब्द सुचला नव्हता, पण तो फोटो पाहील्यावर तसेच वाटले म्हणून तो येथे टाकला.

सरकारी बक्षीस मिळू शकेल

गावागावतल्या भिंतीवर वाचले असेल तर लक्षात येईलः

देवीचा रोगी कळवा १००० रुपये मिळवा!

सरकारी बक्षीस

देवीचा रोगी कळवा १००० रुपये मिळवा!

सुरुवातीच्या काळात हे बक्षीस शंभर् रुपये होते. चुन्यावर विटकरी रंगाच्या अक्षरात ह्या घोषणा भितींवर रंगवल्या जायच्या.
पोलिस खात्यात कर्मचार्‍यांना खूष करण्यासाठी अशी बक्षीसे अधूनमधून दिली जातात. एक हजार रुपयांचे बक्षीस देण्या ऐवजी दहा वर्षात शंभर रुपयांची दहा बक्षीसे देणे हे देणार्‍याच्या आणि घेणार्‍याच्या दृष्टिने सोयी चे असते, कुत्र्याला बिस्कीट देताना त्याचे चार तुकडे करुन चार वेळा दिले तर त्याला चार बिस्कीटे दिल्यासारखं वाटतं.
प्रकाश घाटपांडे

यात माहितीपुर्ण काय आहे बरं?

मोकळ्यापणाने विचारतो,

या चर्चेत माहितीपुर्ण काय आहे बरं?

आपला
गुंडोपंत

माहितीपूर्ण

हे माहिती पुर्ण नसून भावपूर्ण आहे. माहितीचे अजीर्ण झाल्यावर भावपूर्ण गोष्टी चघळायला बर्‍या वाटतात. "शुक्रतारा मंद वारा' या अरुण दातेंनी गायलेल्या भावपुर्ण गाण्याचा माहितीपुर्ण विचार करायला गेलो तर पहिला प्रश्न हा पडेल् कि ' अहो शुक्र काय तारा आहे का? " माहिती पुर्ण उत्तर "तो ग्रह आहे."
प्रकाश घाटपांडे

भावपूर्ण

माहिती पुर्ण नसून भावपूर्ण आहे. माहितीचे अजीर्ण झाल्यावर भावपूर्ण गोष्टी चघळायला बर्‍या वाटतात

पण तुमचे हे चघळणे इथल्या ध्येय धोरणात बसत नाही ना!!
बसत असल्यास तसे संपादक मंडळाने जाहिर कळवावे आम्ही समर्थ भोजनालयात पार्टी ठेवू :-)

सहभाग

'तीन नट्यांचा फोटो आणि एका ओळीचे लेखन' हे चर्चा म्हणून जिथल्या ध्येय धोरणांमध्ये खपत असेल तिथे तात्याला इतका मोठा डिस्क्लेमर का लिहावा लागतो? (दुवा)
पण तुमचे हे चघळणे इथल्या ध्येय धोरणात बसत नाही ना!!

चर्चा चालू करायला एक वाक्यपण पुरेसे असते हे आपण जर ग्रूप डिस्कशन मधे अथवा वादविवाद स्पर्धांमधे भाग घेतला असला तर समजेल. अर्थात कदाचीत आपल्याला तो अनुभव नसावा त्यामुळे चर्चेत भाग घेत असताना चर्चेतील मूळ विषयावर लिहीण्याऐवजी एकदा आम्हाला आणि एकदा उपक्रमकर्त्यांना शब्दांनी ठोकणार आणि पर्यायाने अवांतर चर्चा घडवून आणणार.

माफ करा, पण सतत जाणवल्यामुळे हे लिहीतोय की, एकतर सुविधा वापरायची, नंतर ती देणारा बरोबर देतो आहे की नाही ह्यावर जाहीर सतत चर्चा करायची आणि मग उद्या असे प्रकार वाढल्यावर जर उपक्रमासारखे उपक्रम वैतागून बंद पडले तर परत मराठी माणसाला कसे एकत्र काम करता येत नाही यावर भाषणे ठोकायची, असा आपला उपक्रम होणार असे दिसतयं.

जरा सकारत्मक सहभाग ठेवा की. वाद अवश्य घाला पण तिरकसपणा कशासाठी इतकेच वाटते...

मला पण माफ करा ;-)

चर्चा चालू करायला एक वाक्यपण पुरेसे असते हे आपण जर ग्रूप डिस्कशन मधे अथवा वादविवाद स्पर्धांमधे भाग घेतला असला तर समजेल. अर्थात कदाचीत आपल्याला तो अनुभव नसावा

'चर्चा सुरू करणे 'आणि ती 'ध्येय धोरणात बसणे' ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. थोडा विचार करता येत असेल तर आपल्याला देखिल समजेल. अर्थात कदाचित तो अनुभव आपल्याला नसावा

---
एकतर रात्र रात्र जागुन क्रिकेटची म्याच बघुन आपली करमणूक करुन घ्यायची आणि वर काय भिक्कार खेळले म्हणून भारतीय टीमला शब्दांनी ठोकायचे हे आम्हाला मनापासुन आवडते.

खल्लास..

वा विकासराव, फोटो छान आहे. शर्मिला टागोर या बाईवर आपण साला मोहोब्बत करतो! काय खल्लास दिसायची यार!

आपला,
तात्या पतौडी!

माहितीपूर्ण प्रतिसाद!!

गुंड्याभाऊ हा घ्या माहितीपूर्ण प्रतिसाद!!
काय काय माहिती मिळाली आम्हाला ह्यातुन??... शर्मिला टागोर ही बाई असुन तात्या तिच्यावर 'साला मोहोब्बत' करतो तसेच ती दिसायला खल्लास असुन पतौडी हे देखिल एक कोकणातले आडनाव आहे. वा वा!!

(माहिती पिपासू) कोलबेर

ह ह पु वा...:)

शर्मिला टागोर ही बाई असुन तात्या तिच्यावर 'साला मोहोब्बत' करतो तसेच ती दिसायला खल्लास असुन पतौडी हे देखिल एक कोकणातले आडनाव आहे. वा वा!!

ह ह पु वा...:)

मी आणि पतौडी देवगडातील आमच्या दहिबावेच्या अंगण्यात सकाळी नवाच्या सुमारास उन्हं अंगावर घेत बसलेलो आहोत आणि शर्मिला आमच्याकरता केळीच्या पानावर चुलीवरचा गरम गरम मऊभात-तूप-मेतकूट, सोबत पोह्याचा भाजलेला पापड अन् तळलेली सांडगी मिरची वाढत आहे असा शीन डोळ्यासमोर तरळून गेला! :)

संध्याकाळी मला अन् शर्मिलेला, दोघांनाच समुद्रावर फिरायला जायचे आहे आणि त्याकरता आंब्याच्या बागेत संध्याकाळचं शिपणं करायच्या कामावर पतौडीचीच कशी काय नेमणूक करावी याबाबतच्या खाणाखुणा तात्या आणि शर्मिला मध्ये चालल्या आहेत, आणि आमचं हे आखोही आखोमे चाललेलं मेतकूट पतौडीला समजत नाहीये आणि तो बिचारा मऊभात खाण्यात मग्न आहे असाही एक शीन डोळ्यासमोर तरळून गेला! :)

असो,

आपला,
(पटकथालेखक) तात्या.

--
तात्या मनोगताच्या अन् उपक्रमावरच्या भांडणांत गुंतला आणि मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी एका महान पटकथालेखकाला मुकली असे खेदाने म्हणावेसे वाटते! :)

 
^ वर