वडापाव दिनाच्या शुभेच्छा

वडापाव

आताच हाती आलेल्या बातमीनुसार २३ ऑगस्ट हा दिवस वडापाव दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. गरीबाचे पोटभर जेवण असलेला आणि चिंचेची लालभडक चटणी, पिवळाधमक वडा, हिरवीगार मिरची आणि पांढराशुभ्र मऊ पाव यामुळे रंगीबेरंगी झालेला वडापाव अजरामर राहो हीच सदिच्छा.

वडापाव खाणार्‍या तरुणी
लेखनविषय: दुवे:

Comments

शाब्बास !

'मिसळपाव' ची वाट पाह्तो म्हणलं की तुम्ही लोक मुद्दाम वडापावचा इषय काढता
या दिसाची ध्यान करु दिल्याबद्दल आजानुकर्ण यास एक वडापाव दे रे भो ;)
दोन्हीबी फोटू लयी भारी.

बाबूराव

वडापाव दिन

आजचा दिवस वडापाव दिन म्हणून कोणी आणि का ठरवला बरे? टाइम्स ऑफ इंडिया वाल्यांनी काय? उत्सुकता म्हणून विचारले.
आपला
(प्रश्नग्रस्त) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

खाणे से मतलब

तीरसट प्रश्न विचारणे सोडून् द्या बॉ वासूदेवा त्यांनी तब्येतीवर परिणाम होतो:)
तुम् सिर्फ खाने से मतलब रखो कैसा! दे रे भो यानला बी एक वडा पाव :०)

बाबूराव येथे पाहा !

उत्सुकता

तीरसट प्रश्न विचारणे सोडून् द्या बॉ वासूदेवा त्यांनी तब्येतीवर परिणाम होतो

उत्सुकतेला 'तीरसटपणा' (तुम्हाला 'तिरसटपणा' असा शब्द अपेक्षित आहे काय?) म्हणतात हे माहीत नव्हते. 'सदभावना' (सद्भावना) इतक्या लवकर संपेल असेही वाटले नव्हते. असो. प्रश्न विचारल्यावर तब्येतीवर परिणाम होतो या आपल्या सिद्धांताविषयीही काही औत्सुक्यपूर्ण प्रश्न आहेत पण विषयांतर नको म्हणून विचारत नाही.

वडापाव दिन हे प्रस्थ कोणी सुरू केले आणि आजचा दिवस का निवडला याविषयी अधिक माहिती मिळावी या उद्देशाने तसे विचारले.

आपला
(जिज्ञासू) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

वडापाव दिनाचे प्रयोजन

मोठ्या साखळी दुकानांमधून वडापाव विक्री सुरु करणार्‍या जंबो किंग यांची सुरुवात सहा वर्षांपूर्वी २३ ऑगस्ट रोजी झाली. आता मुंबईमध्ये व इतरत्र त्यांच्या अनेक शाखा सुरु झाल्या आहेत. वडापावाचा प्रसार करण्यासाठी व त्याला अधिक लोकप्रिय बनवण्यासाठी २३ ऑगस्ट हा दिवस वडापाव दिन म्हणून साजरा करण्यास त्यांनीच सुरुवात केली.

येथे अधिक माहिती पहा.

जंबो किंगच्या दुकानात वडापाव खाणारी सोनाली कुलकर्णी.

नैतिक अधःपात

बर्गर सारखा दिसणारा वडापाव आणि तोकड्या कपड्यातील (तेही कपाळावर कुंकु/टिकली न लावलेली) मराठी मुलगी.. अरे कुठे गेले आमचे संस्कृती रक्षक?? :-)

पत्की आणि वकील

या दोन पोरीही मराठीच असणार.

'मराठी माणूस की दौड वडापावतक' असं तर म्हणायचं नाही. कुठे गेले आमचे राजकारणी?

- राजीव

अन्याय

वडापावचे चित्र लेखात दाखवणे म्हणजे परदेशातील भारतीयांचा मानसिक छळ आहे :) (हघ्या.)
सर्व वडापावप्रेमींना वडापावदिनाच्या शुभेच्छा.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

दुहेरी छळ

१) वडापावचे चित्र लेखात दाखवणे म्हणजे परदेशातील सर्व भारतीयांचा मानसिक छळ आहे
२) अन दुसरा फोटो लेखात दाखवणे म्हणजे परदेशातील (लग्न न झालेल्या) पुरुष भारतीयांचा मानसिक छळ आहे .

अवांतर - श्री. टग्या यांचा प्रतीसाद चोरला किंवा ढापला असे का बरे वाटत आहे....

का बरं?

येथे ह.घ्या. लिहिले नसल्याने ही उठाठेव

सदर प्रतिसाद 'टग्या रावांनी दिल्या सारखो वाटतो' असे सहज रावांना 'वाटते' आणि त्यांनी तसे जाहिरपणे व्यक्त केले एवढेच!!
त्यात स्वतःचा चावटपणा दुसर्‍याच्या नावावर खपवण्याचा प्रश्न कोठे आला? प्रतिसादाखाली सहजरावांनी '-टग्या ' अशी सही केली आहे का??

अवांतर - आमच्या गल्लीतल्या बंड्याला तो 'शाहरुख खान' सारखा दिसतो असे वाटायचे

आणि जाहिरातीनंतर....

वडापाव दिवस वा! वा!
मिसळपाव दिवसही ठरवून टाका. असो.

त्या चित्रातील सुंदरी रस्त्यावरचा वडापाव खातात का हो कधी? असे वाह्यात प्रश्न कोणी विचारू नयेत म्हणून....

ह. घ्या. नाहीतर "आम्ही न्याचरली ब्युटीफूल हो! काहीही गिळतो तरी हाडं मोजून घेता येतात." असे सांगायच्या.

उपक्रमावर

स्माईलींची सोय करून द्या बॉ!!!!

मला कपाळावर हात मारून घ्यावासा वाटत आहे. :(

(त्रासलेली) प्रियाली.

जय् वडापाव

हा पहा

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

बटाटावडा?

आमच्या अल्पमतीनुसार बटाटावडा हा शब्द चुकीचा आहे. योग्य शब्द बटाटवडा असा आहे. ;)

दादर स्टेशनाबाहेरचा

हा दादर स्टेशनाबाहेरचा श्रीकृष्ण वडापाववाला ना!!!

ऑफिस सुटल्यावर दादरहून घरी जाईपर्यंत हे स्टेशन हमखास मध्ये लागायचे आणि आमची गाडी जरा जास्तच रेंगाळायची बॉ! येथे.

आता मजा नाही.

दादरच्या श्रीकृष्ण वड्याची (मंजुचा वडा) चव आता पूर्वीची राहिली नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. आतील भाजीपेक्षा बाहेरचे आवरणच हल्ली जास्त असते, त्यामुळे बटाटेवड्याऐवजी नुसतंच डाळीचं तळलेलं पीठ खावं लागतं असा माझा अलिकडील अनुभव आहे. लहानपणी मात्र हा वडा खरोखरंच फार चवदार असायचा.

--ईश्वरी.

मिसळ पाव दिन..

उद्या मिसळपाव दिन सुरू होण्याआधिच आम्ही म्हणून घेतो. जय मिसळपाव....
हा पहा- कोल्हापुरच्या फडतरेंचा मिसळपाव....

मराठीत लिहा. वापरा.

स्स्स

पण मिसळबरोबर ब्रेडचे स्लाईस काही बरोबर लागत नाही. फडतरे पण स्लाईस देतात असे दिसते.
पण मिसळीबरोबर पावच चांगला लागतो. दुर्दैवाने पुण्यातले बरेच लोकप्रिय मिसळवाले आता स्लाईस देऊ लागले आहेत. चिंचवडचा मोरया मिसळवाला अजून पाव देतो.

स्लाइस

कोल्हापूरात सगळीकडे स्लाइसच देतात. वडा असो वा मिसळ.

मराठीत लिहा. वापरा.

वड्याबरोबर स्लाईस?

अरे अरे. :( मग चिंचवड आणि निगडीचा वासू वडेवाला बरा. :D

पावाचा नैसर्गिक फायदा म्हणजे वडा खाली पडत नाही. बेचकीमध्ये फिट्ट अडकून बसतो.
दोन स्लाईसमध्ये वडा व्यवस्थित धरुन ठेवणे ही कसरत करण्यासाठी कोल्हापुरी पैलवानच हवेत.

(ह.घ्या.)

गैर समज नसावा

प्रत्येक ठिकाणच्या खाण्याचा प्रथा वेगळ्या असतात.

  1. पुण्यातला जोशींचा वडापाव - एक पातळवडा (बटाट्याच्या भाजीचा चपटा गोळा डाळीच्या पिठात घालुन मग तळून, आधीच्याच उरलेल्या चुर्‍याला काहि बाही करून चटणी म्हणून देउन) आणि पावभाजीचा पाव.
  2. पुण्यातला श्रीकृष्णचा वडापावः यांचा पाव मोठा असतो, पावभाजीच्या पावा सारखा नाही. येथे २ वडे १ पाव असे समीकरण असते. वडे व्यवस्थित गोल आणि अत्यंत चविष्ट. मिळण्याचे ठिकाण - सहकार नगर २ आणि बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर गंगाधाम जवळ.
  3. कोल्हापुरी वडा - स्लाइस: कोल्हापुरी वड्याचा आकार मोठा असतो. तो पावभाजीच्या पावात मावत नाही. कदाचित म्हणूनच स्लाइस देत असावेत. खाण्याची पद्धतः एका हातात वडा आणि दुसर्‍या हातात स्लाइस.

तसेच मिसळ सुद्धा प्रत्येक गावची वेगळी आहे.

मराठीत लिहा. वापरा.

धन्यवाद.

कोल्हापूरची पद्धत माहिती नव्हती. पोळीभाजीसारखा ताटलीत वडा ठेवून पावाने तोडून खायलाही आवडते.

पण दोन्ही हात असे गुंतलेले असताना कोल्हापूरकर चहाचा एक गरम घोट मध्येच कसे घेतात?

हे असे

पण दोन्ही हात असे गुंतलेले असताना कोल्हापूरकर चहाचा एक गरम घोट मध्येच कसे घेतात?

सकाळी सातच्या आत

या मिसळीची चित्रे पाहिली आणि तोंडाला चळाचळा पाणी सुटले. आर्य, कुठे फेडाल ही पापे?
सन्जोप राव

काही ठिकाणे

दादरचा - श्रीकृष्ण वडापाव (प्रियालींनी वर उल्लेखलेला)
ठाण्याचा - जिजामाता आणि तसेच श्रद्धा फरसाण मार्टचा (घंटाळीजवळ हे दुकान असायचे, आता माहीत नाही)
आणि अर्थातच गाडी फलाटाला लागली रे लागली की भूक असो नसो, एखादे कर्मकांड असावे अशा पद्धतीने पळत जाऊन (निदान काही वर्षांपूर्वी) घेतला जाणारा कर्जतचा दिवाडकरांचा नुसताच वडा.

बाकी ही वडापाव दिनाची कल्पना मात्र मस्त आहे. येथे माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

वडा सांबार

कुठे ते आठवत नाही, पण काही वर्षांपूर्वी , एके ठिकाणि जेंव्हा वडासांबार मागीतला तेंव्हा "बटाटावडा - सांबार" मिळाले. नंतर कळले की दाक्षीणात्य हवे असले तर मेदूवडा सांबार सांगावे लागते.

मिसळ व वडापाव !

मिसळ खा अथवा वडापाव जा कोल्हापूरलाच ! जशी मजा कोल्हापूरात आहे मिसळ खाण्य़ाची जुन्या राजवाड्याजवळची ती कुठेच नाही !

राज जैन
*********
स्वाक्षरी लिहण्यात काही मजा नाई बा !

मामलेदार कचेरी

मिसळ खा अथवा वडापाव जा कोल्हापूरलाच ! जशी मजा कोल्हापूरात आहे मिसळ खाण्य़ाची जुन्या राजवाड्याजवळची ती कुठेच नाही !

ठाण्याला राजवाडा नाही पण मामलेदार कचेरी आहे ;) . त्याच्या कँटीनमधील मिसळीला "मामलेदार कचेरीची" मिसळ म्हणतात आणि प्रसिद्ध आहे. सरकारी कचेरीला संलग्न असल्याने त्यांना सार्वजानीक आरोग्य खात्याच्या उपहार्गृहाच्या नियमातून शिथिलता देण्यात आली आहे असे वाटते. टपरीत बसल्या बसल्या एक पोर्‍या प्रत्येकी पाच ग्लासात बोटे बूडवून पाणी आणून ठेवायचा आणि पाठोपाठ मिसळ व लाल रंगाचे पाणी (ज्याला मला वाटते रस्सा म्हणायचे)!

हा हा म्हणत खायची हौस असायची आणि मजा येयची... अर्थात हे सर्व कॉलेजात असतानाच्या गोष्टी... नंतर कधी (तब्यत्तीच्या काळजीने) कधी खायची हिंमत केली नाही!

मोरया पेक्षाही

सांगण्यास आनंद वाटतो की चिंचवडच्या मोरया मिसळीपेक्षा १० पटींनी चांगली अशी अगदी अप्रतिम मिसळ वेल्हे गावात तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी पोलीस स्टेशनाशेजारी व पुणे नाशिक रस्त्यावरील मंचर गावात हनुमान मंदिराशेजारी साई मिसळ या नावाने मिळते. या दोन्ही मिसळींमध्ये डावेउजवे करणे शक्य नाही.

पुणे नाशिक रस्त्यावर नारायणगावाच्या थोडं अलीकडे कळंब शेजारी गोकुळ मिसळ हे मिसळ स्पेशालिष्ट हॉटेल होते. मात्र दर्जामध्ये तडजोड न करणे व मिसळीची किंमतही न वाढवणे या अव्यावसायिक मराठी वृत्तीमुळे ते हॉटेल काही दिवसांपूर्वी बंद पडले.

या मिसळींना हरवणारी मिसळ कुठे असेल असे वाटत नाही.
मात्र पुणे व पिंचिं परिसरात मोरयाच बेष्ट. नंतर श्री.

मामि

चिंचवडची मोरया मिसळ ह्या सर्वांत फस्क्लास, हा माझा अनुभव आहे.

आमच्या ठाण्याची मामि एकदा खाऊन पहा हो युयुत्सु ..(पुढच्या भारतवारीत..)
स्वाती

मामि

विकास,
मामि,श्रध्दाचा वडा ..असल्या आठवणी काढल्यास..दुर्गाचा आणि आपटेचा वडा विसरलास?
आत्ता ठाण्याला जावंसं वाटत आहे,पण नाही ना इतक्यात शक्य :(
स्वाती

कांदे पोहे

अवांतरः

बटाटा वड्याचे मार्केटींग झाले...

आता सुभाष घै हे "महाराष्ट्राशी कृतज्ञता ठेवण्यासाठी" म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश करत आहेत (आनंद करायचा की काळजी हा ज्याचा त्याचा प्रश्न!) पहील्या चित्रपटाचे नाव आहे कांदेपोहे !

 
^ वर