सार्वजनिक/राष्ट्रीय जीवित-वित्त हानीचे रक्षण

अलिकडल्या काळात कोणत्याही कारणांसाठी देशभर आंदोलने केली जातात‍. यामध्ये लोक म्हणजे आंदोलन-कर्ते रस्ते बंद करतात,सर्व प्रकारच्या वाहनांची मोडतोड ,जाळपोळ करतात.सरकारी इमारतींची नासधूस करून आगी लावतात. अशा आंदोलकांना पोलिसांचा धाक वाटत नाही.प्रसिधी माध्यमांच्या पुढ्यांत बिनधास्त हातातील दगड,काठ्या नाचवत असतात.पोलिसांच्या दिशेने दगड फ़ेकताना दिसतात. नंतर पोलिस आपल्याला शोधून काढून शिक्षा करतील,अशी भीति हिंसक गुंडाना मुळीच वाटत नाही.यशस्वी आंदोलन म्हणजे जाळपोळ,निरपराध लोकांचे मृत्यू,कांही दिवसांचा कर्फ़्यू व सरकारकडून मृत-जखमी व्यक्तींसाठी आर्थिक मदतीची घोषणा असा अर्थ रूढझाला आहे.यावर शासन,लोकनेते,सामाजिक विचारवंत व उच्च-उच्चतम न्यायांलयातील न्यायाधिश यापैकी कोणीही गांभीर्यपूर्वक विचार करत आहेत,असे दिसत नाही.

आंदोलनाचे विषय नेहमीच महत्त्वाचे असतात ,असे नाही.पुतळ्यांची अवहेलना,जगातील काना-कोपऱ्यात एकाद्या व्यक्तीने काढलेले उदगार,स्थानिकमागण्या ,दोन गटातील वैयक्तिक आकस-मतभेद इ.पैकी कोणतेही कारण आंदोलकां पुरेसे होते.

यावरून दोन निष्कर्ष निघतात, ते असे:१)या आंदोलनांत गुंड सहभागी होऊन प्रचंड जिवित-वित्तहानी करतात.

२)पोलिस अशा गुंडांना परिणामकारक हाताळू शकत नाहीत.

सबब अशी हिंसक आंदोलने होऊ नयेत म्हणून संपूर्णपणे नवीन धोरणात्मक विचार करायला हवा.तो असा,पोलिसांवर याबाबत अवलंबून न रहाता,ही जबाबदारीराज्य-राखीव पोलिस दल आणि सीआरपी किंवा सरळ सैन्य.दलांवर सोपविण्यात यावी.त्यामुळे गुंड-प्रवृतीच्या व बेजबाबदार आंदोलकांवर वचक बसून अशी आंदोलने होणार नाहीत.

तसेच वैयक्तिक किंवा पक्षीय बलाचे प्रदर्शन करण्यासाठी उठ-सूठ आंदोलने करणाऱ्या नेत्यांवर ,आंदोलनांत होणाऱ्या जीवित-वित्त हानीची जबाबदारी निश्चित करण्याचे धोरण स्विकारले तर ते या देशासाठी योग्य होईल. असे केले तर पोलिसांवरील ताण कमी होऊन ,त्यांच्या दैनंदिन कर्तव्यामध्ये ते कमी पडणार नाहीत.

अंतत: या देशांत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहिल.

या चर्चा-प्रस्तावावर गांभीर्यपूर्वक मते व्यक्त व्हावीत ,अशी नम्र अपेक्षा.

चर्चाप्रस्ताव निवडताना योग्य विषयाची निवड करावी तसेच लिहिलेला मजकूर कृपया पडताळून पाहावा. चर्चाप्रस्तावातील त्रुटी येथे सुधारुन दिल्या आहेत. - संपादन मंडळ.

लेखनविषय: दुवे:

Comments

अच्छा!

चर्चाप्रस्ताव निवडताना योग्य विषयाची निवड करावी तसेच लिहिलेला मजकूर कृपया पडताळून पाहावा. चर्चाप्रस्तावातील त्रुटी येथे सुधारुन दिल्या आहेत. - संपादन मंडळ.

पहा! आधीच प्रस्तावातच गोंधळ? हस्तक्षेपा बद्दल मोर्चा काढायचा का? ;)
असो
बाळकृष्णा, प्रस्ताव चांगला आहे. चर्चा व्हायला हरकत नाही.
मला तर वाटतं की असे गोंधळ घालणे हाच एक धंदा आहे.

आपला
गुंडोपंत

राष्ट्रीय /सार्वजणिक जीवित्-वित्त हानीचे रक्षण

चर्चा-प्रस्तावात योग्य ती दुरुस्ती केल्याबद्दल संपादन मंडलाला धन्यवाद.चर्चेमधून चांगला विचार पुढे यावा,हीच अपेक्षा आहे.

राष्ट्रीय /सार्वजणिक जीवित्-वित्त हानीचे रक्षण

हा लेख मुखपृष्टावर दिसेल तर त्यावर अधिक प्रतिक्रिया व्यक्त होतील,असे वाटते.हा विषय खूप महत्वाचा आहे,असे मला वाटते.

नुकसान

आनंद पटवर्धनांची ' पिता पुत्र और धर्मयुद्ध" तसेच "राम के नाम" या डॉक्युमेंट्रीज या विषयाच्या अनुषंगाने आवर्जून पहाण्यासारख्या आहेत.
प्रकाश घाटपांडे

फक्त

आनंद पटवर्धनांची ' पिता पुत्र और धर्मयुद्ध" तसेच "राम के नाम" या डॉक्युमेंट्रीज या विषयाच्या अनुषंगाने आवर्जून पहाण्यासारख्या आहेत.

पटवर्धन साहेबांना इतक्यावर्षात झालेल्या अतिरेकी हल्ल्यांवर, काश्मिरी पंडीतांवर झालेल्या भिषण कारवायांवर आणि नक्षलवाद्यांच्या कायदा हातात घेऊन अमानूष मारण्यावर मात्र कधी माहीतीपट काढता आला नाही इतके लक्षात असू देत. हे म्हणताना मी कुठल्याही हिंसेचे समर्थन करत नाही आहे इतके "रेकॉर्ड" म्हणून सांगतो...

का बरं?

पटवर्धन साहेबांनी वरिल विषयांवर देखिल माहितीपट काढावेत हा आग्रह का? हे म्हणजे एखाद्याच्या गायनाचे कौतुक करताना "त्याला पोहायला येत नाही आणि तो चांगले क्रिकेटही खेळू शकत नाही, हे लक्षात असु देत" असे म्हणण्यासारखेच आहे.

कारण की...

एखाद्याच घटनेवरून एखाद्याच विचारसरणीला "देशाची /समाजाची" काळजी करत धोपटायचे पण तशाचा काळजी करण्यासारख्या त्याहूनही सतत घडणार्‍या घटनांकडे मात्र दुर्लक्ष करायचे याला पत्रकारीता म्हणायची आणि याची तुलना आपण पोहणे आणि क्रिकेट जसे वेगळे आहेत याच्याशी करायची. - हे असले आपणच म्हणू जाणे!

मी वर म्हणल्याप्रमाणे, कोणीही केलेल्या हिंसेला विरोधकरतो. तेच माझे इतरांना म्हणणे असते. जर एखाद्याला हिंसेचाच विरोध करायचा असेल आणि समाजाची काळजीच वाटत असेल तर त्याने सर्वच समान घटनात दाखवायला हवी. अर्थात कम्यूनिस्टांना आणि त्यांच्यात बसलेल्या सुडोसेक्युलर्स ना (खरे म्हणजे ते सेक्यूलर फंडामेंटॅलिस्ट असतात) ते जमत नाही.

पटवर्धन गुरूजींना असले माहीतीपट काढून ते जगभर दाखवायला पैसे कोण आणि किती पुरवते हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. स्वतःला "The Messengers of Bad News" असे म्हणणार्‍यांना भारतात फक्त हिंदू /हिंदूत्ववादी चूक दिसतात, इस्रायल मधे इस्रायली (ज्यूज्) चुकीचे, इराक मधली अमेरिका दाखवतात, पण या सर्वाची सुरवात कशी होते हे बोलायची वेळ आली की गप्प.

"राम के नाम" काढता येतो, पण अक्षरधाम, काशी विश्वेवरावर, काश्मीरमधील रघुनाथ मंदीरावर हल्ला होतो तेंव्हा कोठे जातो यांचा निधर्मी बाणा.

मला आक्षेप आहे तो या असल्या ढोंगी आणि देशविघातक वृत्तीचा...

वरील प्रतिक्रीया जरी मला आलेल्या प्रतिक्रीयेसंदर्भात असली आणि म्हणून थोडी अवांतर झाली असली, तरी गाडी मूळ पदावर आणण्यासाठी इतकेच म्हणीन "सार्वजनिक/राष्ट्रीय जीवित-वित्त हानीचे रक्षण" जर खरेच करायचे असेल तर असल्या एकेरी पत्रकारीतेला (पटवर्धन, केतकर इत्यादी) आळा बसणे पण गरजेचे आहे - कारण ही असली माणसे स्वतःच्या न्यूनगंडात्मक अहंकारापोटी समाजामधे असली, "सदगुण विकृती" तयार करत असतात...

सवय

सबब अशी हिंसक आंदोलने होऊ नयेत म्हणून संपूर्णपणे नवीन धोरणात्मक विचार करायला हवा.

हे विधान मान्य आहे.परंतू केवळ कायदा-सुव्यवस्थेचा हा विषय न बनवता नागरी कर्तव्याचा पण विषय बनवला पाहीजे. ते करताना असे वागायची "सवय" आपल्याला कधी लागली आणि ती वेळीच न मोडल्याने घडलेले हे परीणाम आहेत असे सांगावेसे वाटते.

बंद, मोर्चे, हरताळ, आणि हिंसा या स्वातंत्र्यपूर्व समाजातील केवळ परकीय राज्यात काय्देशीर पर्याय नसल्यामुळे चालू झालेल्या प्रतिक्रीया होत्या हे आधी ध्यानात ठेवले पाहीजे.

या बाबतीत मी दोन उदाहरणे देतो: प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकरांचे. १९५० च्या दशकाच्या सुरवातीस त्यांनी स्वतः चालू केलेली "अभिनव भारत" ह्या सशस्त्र क्रांतीची संघटनेची समारंभपूर्वक सांगता केली. कारण असे सांगीतले की आता भारत स्वतंत्र आहे आणि स्वतःच्या सरकारविरुद्ध सशस्त्र क्रांती करणे अयोग्य आहे जे लढे देयचे ते कायद्यानेच देयला हवेत.

दुसरे उदाहरण म. गांधींचे: काँग्रेस हा स्वातंत्र्यापूर्वी राजकीय पक्ष नसून एक (शक्य तितकी) सर्वसमावेषक राजकीय चळवळ होती. गांधीजींच्या नेतृत्वाखाली ती (करा अथवा मरा चा काळ सोडल्यास) - अहींसात्मक, सत्याग्रह आणि सविनय कायदेभंगाच्या मार्गाने झाली. पण भारत स्वतंत्र झाल्यावर ही चळवळ चालू ठेवणे योग्य नाही हे गांधीजींनी ओळखले होते. त्यांनी पण सावरकरांसारखेच त्यांच्या आधी तीच गोष्ट बोलली की "काँग्रेस विसर्जीत करा". अर्थातच सत्ता मिळवण्याच्या नादात हा "ट्रेड मार्क" शब्द काँग्रेसमधील नेहेरूंसकट कुणालाच दुरावून देयचा नव्हता. परीणामी गांधीजींकडे दुर्लक्ष झाले आणि काँग्रेसमधील स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळिचे रूप त्यातील नेत्यांनी विसर्जीत केले नाही.

यापुढे आता कम्यूनिस्टांबद्दल बोलू: त्याम्चे तर काय मूळच सश्त्र क्रांतीवर अवलंबून आहे...

मला वाटते की या समस्येचे मूळ हे एकतर स्वातंत्र्यपूर्व काळात लागलेल्या आणि स्वातंत्र्यानंतर न सोडलेल्या सवयीत आहे किंवा जी काही वैअचारीक घडण आहे त्यात आहे. बरं अस असते की या एका अर्थाने वाईट सवयी आहेत आणि त्याप्रमाणे वागताना शिस्त लागत नाही, त्यामुळे त्यांची लागण इतरत्र होणे पण सोपे जाते. म्हणून या बाबतीत एक गोष्ट म्हणजे सर्व राजकीय पक्षांनी आम्ही कुठल्याही पद्धतीची हिंसा करणे, बंद करणे, हरताळ करणे हे वागणार नाही असे म्हणणे महत्वाचे आहे.

प्रामाणीकपणे मला जेंव्हा जेंव्हा मी या समस्या वाचत असतो अथवा जवळून पाहातो तेंव्हा राहून राहून एकच गोष्ट वाटते - नुसतेच सरकारकडून अपेक्षा न करता आणि कायदा-सुव्यवस्था ही पोलीसांच्याच (कुठल्याही) न देता - आपण आपले नागरी कर्तव्य पाळायला शिकले पाहीजे - व्यक्तीगत आणि सामाजीक. तरच सर्व चांगले बदल घडून येतील. यावर अधीक लिहीता येईल पण ते विषयांतर होईल म्हणून येथेच थांबवतो...

सुव्यवस्था


प्रामाणीकपणे मला जेंव्हा जेंव्हा मी या समस्या वाचत असतो अथवा जवळून पाहातो तेंव्हा राहून राहून एकच गोष्ट वाटते - नुसतेच सरकारकडून अपेक्षा न करता आणि कायदा-सुव्यवस्था ही पोलीसांच्याच (कुठल्याही) न देता - आपण आपले नागरी कर्तव्य पाळायला शिकले पाहीजे - व्यक्तीगत आणि सामाजीक. तरच सर्व चांगले बदल घडून येतील

.
समाजात समाज कंटक म्हणता येईल असे लोक जास्तीत जास्त दोन टक्केच असतात. पण त्यांच्यात उरलेल्या अठ्याण्ण्व टक्के लोकांना वेठीस धरण्यची उपद्रवक्षमता असते. त्यासाठीच तर पोलिस खात्याची निर्मिती झाली. 'दुर्दैवाने ज्यांनी पोलिसांना घाबरायला पाहिजे ते लोक पोलिसांना घाबरतच नाहीत आणि सर्वसामान्य पापभीरु नागरिक ज्यांनी पोलिसांना घाबरायचे काहीच कारण नाही असे लोकच पोलिसांना घाबरतात'. हे मत वरिष्ठ सेवानिवृत्त आयपीस अधिकारी व मना सज्जना या पुस्तकाचे लेखक तसेच क्रिडा समुपदेशक श्री भिष्मराज बाम यांनी एका ठिकाणि व्यक्त केले आहे.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर