उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
महाराष्ट्राचे दैवत कोणते
विकि
August 19, 2007 - 1:14 pm
महाराष्ट्राचे दैवत नक्की कोणते? आपण आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो,त्याचबरोबर पंढरपुरचा विठ्ठलाला तर संपुर्ण महाराष्ट्र दैवत मानतो. विठ्ठलाची महती तर थोर संतांनी आपल्या वाडमयतुन सांगितली आहे.येत्या काही दिवसात गणपतीचे आगमन होईल तेव्हा संपुर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव जोशात साजरा करेल. त्याचबरोबरोबर ज्योतिबा,काळूबाई या दैवतांच्या जत्रा होतात त्यांनाही मानणारा एक वर्ग महाराष्ट्रात आहे. शिवाय आणखी बरीच दैवते आहेत पण संपुर्ण महाराष्ट्र ज्याला मानतो असे दैवत कोणते. राम,हनुमान,कृष्ण, यांना महाराष्ट्रात दैवत मानले जाते का? याचा जाणकारांनि खुलासा करावा.
आपला
कॉ.विकि
दुवे:
Comments
तुळजा आई
इकीराव,
तुळजापूरची तुळजाआई खरी आरध्य दैवत हाय !
हुशार लोकं यायचं आधी घेतलं बोलून ! हा हा हा !
बाबूराव येथे पाहा !
संपुर्ण महाराष्ट्र ज्याला मानतो
संपुर्ण महाराष्ट्र ज्याला मानतो
तुम्ही महाराष्ट्रात नवीन आहात काय? येथे एकमत नसते, एकमत इज् सो बोअरींग...
तसेही म्हणा तुमच्या नावावरुन तुम्ही बंगाल किंवा केरळाहून आल्यासारखे वाटता. :-) ह.घ्या. एनीवे तिकडे बरे असते एक काली (दुर्गा) माता सर्वमान्य...
टोटली ह. घ्या ह कारण मी जाणकार नसताना बडबडलो.
दोन उत्तरे:
महाराष्ट्राचे दैवत नक्की कोणते?...
उत्तर १ : (Politically Correct)
हा प्रश्न जर एखाद्या राजकीय पदावरील व्यक्तीस विचारला तर तो १००% खोडसाळपणाचा ठरेल. कारण साधे आहे, महाराष्ट्र आणि तो ज्याचा एक राज्य म्हणून भाग आहे तो "अधुनिक" भारत हा - (माझ्यामते) सर्वधर्मसमभाव या अर्थाने "सेक्यूलर" (निधर्मी या अर्थाने नाही) आहे. त्यामुळे आपण म्हणत असल्याप्रमाणे "दैवत" असायचा प्रश्नच उद्भवत नाही.
उत्तर २: (just correct or realistic)
आपणास (अथवा कोणासही) आवडो-न आवडो, पण अजून भारतात हिंदू संस्कृती आहे. त्यातल्या अनेक ऐतिहासीक चुकांबरोबर एक कालातीत सत्य ही संस्कृती पाळत आली आहे, ती म्हणजे ईश्वर सर्वत्र आहे आणि तो प्रत्येकाचा आपापल्यातल्या गुणावगुणाप्रमाणे ठरत असतो. गीतेत म्हणल्या प्रमाणे विचार करायचा झाला, तर सत्व, रज आणि तम या तीन मूलभूत वृत्तींप्रमाणे प्रत्येकाची दैवते ठरतातः
प्रेते आणि भुते-खेते पूजिती लोक तामस
थोडक्यात महाराष्ट्रात "सरकारमान्य देव" नाहीत पण "लोकमान्य देव" हे त्यांच्या त्यांच्या श्रद्धे (रोल मॉडेल/आदर्श म्हणून)-अंधश्रद्धेप्रमाणे (फक्त सोयीस्कररीत्या टाळ कुटायला) बरेच आहेत:
(आपण विसरलात, पण) आंबेडकर, अर्थातच शिवाजी, गणपती आणि इतर अनेक आपण उल्लेखलेले देव आणि अर्थातच तुळजाभवानी. हे सर्व हिंदूंबद्दल आणि ऐतिहासीक व्यक्तींबद्दल (शिवाजी, आंबेडकर ) बोलताना जे महाराष्ट्र आपला समजतात अशांबद्दल झाले. इतर धर्मीयांचे देवापेक्षा प्रेषीत ठरले आहेत तर आपल्यासारख्यांच्या बाबतीत कदाचीत मार्क्स दैवत ठरत असेल.
काहीही..
दैवत म्हणजे काय प्राणी, पक्षी कींवा फुल आहे? प्रत्येक राज्याला असायला?
भारताचे दैवत कुठले ते सांगा आधी मग सांगतो तुम्हाला महाराष्ट्राचे दैवत.
मोरया गोसावी
मोरया गोसावी हेच सगळ्या महाराष्ट्राचे एकमेव ओरिजिनल दैवत आहे.
बाकीचे सगळे डुप्लिकेट.
- आजानुकर्ण चिंचवडे
तुमची बिरुदे
"तुमची बिरुदे आम्हाला द्या आणि आमची बिरुदे तुम्ही सांभाळा." असा दम भरला होता महाराजांनी असे आठवते.
अजिंक्य देव?
मग अजिंक्य देव चालेल का?
रमेश देव, यशवंत देव, सीमा देव यांच्यापेक्षा हा जास्त बरा वाटतो.
- आजानुकर्ण देव
कपिल देव
देव आनंद ऐवजी कपिल देव चालेल ;)
नाहीतरी आयसीएलने त्याला देव्हार्यात बसवलाच आहे.
देव आनंद म्हातारा झालाय ... आणि म्हातारा देव कोणी बघितलाय का?
देव तारी त्याला
अत्ताच कपिल देव ला नॅशनल क्रिकेट लिग च्या चेअरमन पदावरून काढल्याचे रिडीफवर वाचले.
नॅशनल क्रिकेट लिग
लिग नव्हे ऍकेडमी जी बी सी सी आय च्या म्हणजे पवार साहेबांच्या अंडर आहे :-)
धन्यवाद
लिग नव्हे ऍकेडमी जी बी सी सी आय च्या म्हणजे पवार साहेबांच्या अंडर आहे :-)
चुकून लिग लिहीले.
या देवांचे वाहन
या सर्व देवांना हे वाहन देवू. ;-)
देवू
देवू कारस् जनरल मोटर्सने विकत घेतली आणि ट्रक्स टाटाने. म्हणजे देवांच्या वाहनांचे ब्रँड्सच विकले गेले आहेत की :)
मराठीत लिहा. वापरा.
मारुती
एक ब्र्यांड आहे की.
मारुती - सुझुकी.
वा!
वा काय मस्त माहिती पूर्ण प्रतिसाद होते... खुप मजा आली... खुप दिवसांनी काहिइतरी चांगले वाचले.
नुसती माहिती चावून चावून पार पोट फुगले होते हो. (आमच्या नव्या फोटोत दिसतही असेल.)
आपला
गुंडोपंत
हो
गुंडोपंत तोंडपण सुजल्यासारखे दिसत आहे.
मजा आली या चर्चेत.
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.
दैवत
शिवाजीराजे..
पुराणातले देव नसले तरी कर्तृत्वाने देवासमान आहेत..
हे नसते तर ही चर्चा आपण कदाचित मुंबई प्रांताचे दैवत किंवा गुजरात किंवा आंध्रचे दैवत अशी केली असती.
महाराष्ट्र होण्यामागील प्रेरणा ठरलेले, स्वाभिमानाचे स्पुल्लिंग चेतवणारे राजे शिवाजी हेच खरे दैवत आहे असे आम्ही(म्हणजे मी) मानतो.
बाकी देव म्हणाल तर देव एकच आहे रुपं वेगळी आहेत.
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.
सहमत !
शिवाजीराजे ह्यांच्या शिवाय महाराष्ट्राचा ईतिहास पुर्ण होऊच शकत नाही !
राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.
बरेच आहेत
शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपिनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, आबा पाटील, राज ठाकरे....बरेच आहेत.
तुम्ही ठरवा तुम्हाला कोण हवे आहे? :)
हेमंत
यातले म्हणाल तर
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचे नेतृत्व मान्य आहे.
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.
शरद पवार
दिलेल्या पर्यायांपैकी हेच. नंतर बाळासाहेब.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे/गोपीनाथ मुंडे यांना एका लायनीत बसवणे म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती आणि आमच्या चिंचवड स्टेशनच्या काळूराम पवार मित्र मंडळाचा गणपती यांना एका लायनीत बसवण्यासारखे आहे.
काहीही
शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपिनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, आबा पाटील, राज ठाकरे....बरेच आहेत.
तुम्ही ठरवा तुम्हाला कोण हवे आहे? :)
शक्य आहे का ? याचा काही ताळमेळ आहे का ? काय संबंध उगाच काही लिहायचं म्हणून लिहू नका ?
गणपत पाटील? :)
आय थिंक, कोल्हापूरचा गणपत पाटील इज द राईट चॉईस बेबी! :)
आपला,
(तमाश्यातला नाच्या) तात्या.
हा हा हा!!!
आय थिंक, कोल्हापूरचा गणपत पाटील इज द राईट चॉईस बेबी! :)
हा हा!!! (मला इथे माझ्या हसण्याचे ध्वनीमुद्रण ठेवता येत नाही आहे!)
आत्ता ग बया! मलासनी दैवत करतोयं.. तात्या, मेल्या ,कुठं फेडशीला ह्यो पाप!
माझ्या मते
महाराष्ट्राचे दैवत पुराणकथेतील कोणतेही दैवत नसून जे(जिवंत) होऊन(इतिहासात) गेलेले थोर पुरूष, समाजसुधारक,नेते होय आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्मे होय. ही फक्त दैवते नसून स्फ़ुर्तीस्थानेही आहेत.तरीही जाणकारांनी खुलासा करावा.
आपला
कॉ.विकि
दैवत
माझ्यामते दैवत म्हणजे काय? यावर थोडी चर्चा होणे गरजेचे होते. मुळात दैवत म्हणजे काय हेच जर डिफाइन केले नाही, तर महाराष्ट्राचे/ भारताचे दैवत हुडकणे मूर्खपणा ठरेल.
आपला,
(श्रीगणेशास स्वतःचे दैवत मानणारा)
अनिरुद्ध दातार