मराठी अनुदिनी लेखकांस सूचना

प्रिय मायबोलीत लिहिणारे लेखक हो,
मराठी भाषे साठी आणखी एक ब्लाग् "एग्रीगेटर" आला आहे, तो म्हणजे www.blogwani.com
तेव्हां मराठी लेखकांनी आपल्या अनुदिनिंचे "रजिस्ट्रेशन" त्या साईट वर करावे, त्यांचे कोड आपल्या अनुदिनी वर चिकटवावे, त्यामुळे मराठी चा पाठक वर्ग तर वाढेलच, नवीन लेखकांना प्रेरणा ही मिळेल, व मराठी भाषा आणखीन समृद्ध होईल अशी आशा आहे. हे फक्त सूचने साठीच...

लेखनविषय: दुवे:

Comments

म्हणजे काय?

मराठी भाषे साठी आणखी एक ब्लाग् "एग्रीगेटर" आला आहे,

ब्लाग् एग्रीगेटर म्हणजे काय?

त्यामुळे मराठी चा पाठक वर्ग तर वाढेलच,

तो कसा काय?

विस्तृत खुलासा केलात तर बरे होईल..

तात्या.

--
विशाल सागरतीर आहे, नारळीची बनं आहेत, पोफळीच्या बागा आहेत, साऽऽरं काही आहे. पण त्या उदात्ततेला दारिद्र्य असं विलक्षण छेद देऊन जातं, आणि मग उरतं काय, एक भयाण विनोदाचं अभेद्य असं कवच! - गुरुवर्य भाईकाका, अंतुबर्वा!

ब्लॉग अग्रीगेटर

अहो आपलं मराठीब्लॉग्सं.नेट आहे ना. अगदी तसंच . ह्या अग्रीगेटर साईटवर वेगवेगळ्या ब्लॉग्स वर लिहीलेलं ताजं साहित्य सारांश स्वरूपात लिहीलं जातं. एकाच जागेहून अनेक ब्लॉग्जवर लक्ष ठेवण्यासाठी चांगले आहे.

सुरेशजी, ब्लॉगवानीची ही मराठी आवृत्ती तुम्ही सुरू केली आहे का?

नीलकांत

नाही

मी हा "एग्रीगेटर" सुरु केला नाही (अर्थात माझ्याकडे़ एवढे़ संसाधन ही नाहीत), पण "तात्यांना" मात्र एवढे सांगू इच्छितो कि मराठी ब्लाग्स साठी कुणी हिन्दीभाषी मनुष्य काही करत आहे, त्याला पाठिंबा द्यावा, त्यात त्याचा काय फ़ायदा आहे (अजून तरी कळले नाही), पण मराठी अनुदिनी वाचणार्यांची संख्या वाढत असली तर बिघड़ले कुठे? अर्थात ज्यांना आपले लिहीलेले ब्लाग्स जास्तीत जास्त लोकांनी वाचावेसे वाटते, त्यांनी अवश्य तिथे रजिस्ट्रेशन करावे (मोफ़त आहे)...

भाजप सारखा नुसता विरोधासाठी विरोध न करणारा
सुरेश चिपळूणकर
http://sureshchiplunkar.blogspot.com

 
^ वर