वंदे मातरम्

वंदे मातरम्!

भारताच्या स्वातंत्र्याला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
लवकरच भारत हा एक जागतिक शक्ती म्हणून प्रस्थापित होवो आणि त्याद्वारे विश्वबंधुत्वाची भावना सर्व जगभर पसरो हीच प्रार्थना!

लेखनविषय: दुवे:

Comments

आज

आज पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन त्यांना पण शुभेच्छा! :-)

हे पण विसरू नका...

अनेक लोकांचे संसार उध्द्वस्त झाले, बायकांवर अत्याचार झाले, घरे दारे सोडून नव्याने तयार झालेल्या पाकीस्तानातून केवळ हिंदू - अल्पसंख्यांक म्हणून हाकलले गेले. एक धर्माधिष्ठीत मूलत्तववादी राष्ट्र तयार झाले. कालपर्यंत आपला हिस्सा असलेले, चार राजकारण्यांच्या हट्टामुळे आणि स्वार्थामुळे, केवळ द्वेष आणि दहशतवाद आपले शेजारी झाले...- आज या दुर्दैवाने या घटनेला ही ६० वर्षे झाली - हे पण विसरू नका

आजपण अनेक सैनीक आपली घरेदारे, भाषाप्रांत, त्यात चाललेले वादविवाद आणि सार्वत्रीक घसरण विसरून देशाच्या सीमेवर लढत आहेत आणि प्रसंगी प्राण देत आहेत, त्यामुळे सुखासुखी आपण आपली घरेदारे चालवत किबोर्ड बडवत बसू शकतोय - हे ही विसरू नका.

गरजू आहे आणि पाकीस्तानीच काय पण भारतीय मुसलमान विद्यार्थी पण मदत करत नसताना मानवता पाळून नव्याने आलेल्या तरूण पाकीस्तानी विद्यार्थ्याला स्वतःच्या अपार्टमेंट मधे राहायला घेऊन जाणारा विकास.

1947 में विभाजन के समय भारत से पाकिस्तान जाते लोग - BBC Hindi.com
Partition - Ref: BBC
Partition...: www.indhistory.com
Partition...: www.indhistory.com
This what we were - http://www.mapsofindia.com
This what we remained...www.maps-india.com

इतिहास

हिंदुस्थानच्या इतिहासातले हे एक काळे पर्व होते, यात संदेह नाही.

हे आपल्याला मान्य आहे बघून बरे वाटले. चित्रातील चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद. हा वाद व्यक्तीगत नाही हे कृपया समजून घ्या. मी तसा कुणाशीच व्यक्तीगत वाद करत नाही. आपल्या सदिच्छा वाचताना आपल्याबद्दल मला संशय नाही आला पण त्या सदीच्छा बाळबोध आणि व्यावहारीक असल्याचे जाणवले.

कोणी अधिक केले आणि कोणी सुरुवात केली, हा प्रश्न येथे गौण आहे.
अरे वा, हे बरे आहे. म्हणजे आपण आपल्यावर अत्याचार झाले तर गप्प बसणार की काय? मागे मनोगतावर सांगीतलेली आठवण इथे परत देतो. अशीच आपल्यासारखी स्वतःस "लिबरल" समजणारी मुलगी बॉस्टन/केंब्रीज मधे हाच वाद घालत होती. तीला जेंव्हा "जोशात" विचारले की बाईग, तुझ्याजर मी आत्ता कानाखाली वाजवले (जाळ काढला म्हणायचे होते पण तीला कळले नसते), तर तू काय करशील, तीने ताबडतोब तेव्ह्ढयाच जोशात उत्तर दिले की "तुझा खून करीन". म्हणले चांगले आहे स्वतःच्या रक्षणार्थ जागृक असायला हवे आणि तशी तू आहेस. पण मग जेंव्हा काश्मीरमधे (तेंव्हा काश्मीरशी संबधीतच वाद चालू होता) जेंव्हा बायकांवर अत्याचार होतात तेंव्हा काय त्यांनी "भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना" असे गाणे म्हणत बसायचे का? तोच प्रश्न आपण आपल्याला विचारून बघा आणि स्वतःकडून स्वतःला काय प्रामाणीक उत्तर येते ते बघा.

काय गंमत असते बघा: मी काही दंगलीचे समर्थन करत नाही. पण दंगलीत जेंव्हा अल्पसंख्यांकांवर हल्ले झाले तेंव्हाआरडाओरड झाली. ती योग्य पण होती. पण तीच आरडा ओरड करणारे, जेंव्हा बॉम्ब स्फोट होतात, दंगलींना सुरवात कोणी केली हे बघण्याचे प्रश्न पडतात, आपल्या सैनीकांना (कार्गीलच्या वेळीस) हालहाल करून आंतरराष्ट्रीय मानवाधीकारांचे (युद्धसमयीचे) नियम पायदळी तुडवत मारले जाते, त्यावर मात्र काही बोलत नाहीत. तेंव्हा मात्र "जगाला प्रेम अर्पावे.." त्या सैनीकांना, त्यांच्या कुटुंबीयांना कोणी विचारत नाही की मदत करत नाही, जणू काही त्यात काय विशेष, त्यांचे ते कामच होते...असे इतर अनेक बाबतीत लिहीता येईल...

पाकपुरस्कृत दहशतवाद हाही राजकीय कारणांसाठी राजकारण्यांनी - अर्थात पाकिस्तानी राजकारण्यांनी / राज्यकर्त्यांनी - सुरू केलेला आणि पाठिंबा दिलेला राजकीय प्रश्नच आहे. त्याचा बीमोड करणे ही एक गोष्ट झाली - पण म्हणून पाकिस्तानचा द्वेष करण्यात अर्थ नाही

ज्या देशाचा जन्मच धर्माधारीत आहे, ज्याचे नाव "इस्लामीक रिपब्लीक ऑफ पाकीस्तान" आहे त्याचा दहशतवाद हा राजकीय कारणासाठी होतो असे म्हणणे म्हणजे काय म्हणावे - बालीशपणा की स्वतःला आणि इतरांना फसवून सारे कसे छान छान म्हणण्याचे उद्योग? राहता राहीला पाकीस्तानचा द्वेष करणे. इथे कुणाला वेळ आहे त्याचा द्वेष करायला... द्वेष करणे चूकच, (म्हणूनच माझे व्यक्तिगत उदाहरणही शेवटी दिले) पण करायचा असेल तर स्वतःच्या बरोबरीच्या अथवा स्वतःहून मोठ्या व्यक्तीचा/राष्ट्राचा करू. जे तळागाळाला गेले आहे आणि शेवतच्या घटका मोजत आहेअशा राष्ट्राचा आणि त्यातील माणसांचा आम्ही द्वेष नाही करत पण त्यातून आपल्या साठी निर्माण होणार्‍या समस्यांची काळजी घेऊ. त्यात काळजी वाटते ते आपण जे येथे विचार म्हणून लिहीले त्याची . "हम नही सुधरेंगे," अशी प्रतिज्ञा घेऊ नका हो!

माझे म्हणणे आहे जवळाजवळच करायची आहे ना, मग आधी सुरवात आपल्या माणसांपासून करू. त्यांची काळजी करू आणि घेऊ. मग ते तुम्हा-आम्हाला जितके जमेल तितके करू : जातीचा विचारही नको, रिलीजन ज्याला जो पाळायचा असेल त्याला पाळूदेत अथवा न पाळूदेत, पण देशापुढे सर्व समान ठरवू, प्रांतीक मतभेद घालवून सर्वांशी समान वागू. स्वतःच्या देशात जी विषमता वाढत आहे, त्याचा उपाय म्हणून यथाशक्ती काम करू म्हणजे कामगार झाले काय किंवा शेतकरी झाला काय सुखाने जगू शकेल, शिक्षकाकडे सेवक म्हणून न पाहता गुरू म्हणून पहायला लागू (आणि तसे त्याच्याकडून वागायची अपेक्षा करू). मुख्यम्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार नाही . थोडक्यात भारतातल्या भारतात "मिले सूर मेरा तुम्हारा" होऊ देत मग आजूबाजूला बघू.

आणि ६० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचा - मग त्या कितीही वाईट असोत - उगाळून उगाळून आठवून सदैव ढोल वाजवत बसण्यापेक्षा यापुढे आपण काय करायचे, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

आम्ही उगाळत नाही, वंदे मातरम् जवळ (माफ करा अशा शब्दांसाठी पण), दाढ्या कुरवाळल्या गेलेल्या दिसल्या आणि तेही "हे लक्षात ठेवा" असे म्हणून , त्यामुळे अजून काय काय लक्षात ठेवायला आहे ते सांगीतले. बरं शेजार्‍याचे स्वातंत्र्यदिनच लक्षात ठेवायची हौस असेल तर श्रीलंकेचा ठेवाता का? का बांग्लादेशाचा? मग येथेच का ही स्पेशल ट्रिटमेंट? "हसके लिया पाकीस्तान, लढके लेंगे हिंदूस्तान" की "काश्मीरवीना पाकीस्तान अधूरा है" असे आम्ही नाही म्हणालो .

बाकी योग्य वाटेल तो विचार आपला आपणच करू शकतो, तसा तुम्ही आणि तुमच्या सारखे बाळबोध विचार करणारे इतरही करतील अशी आशा आपल्या स्वातंत्र्यदिनी करतो...

टग्या यांच्याशी सहमत/ एक महत्त्वाचा मुद्दा

टग्या यांच्याशी सहमत.

उपक्रमासारख्या संकेतस्थळावर जेथे अनेक देशांमधील सदस्य सुखाने नांदत आहेत तेथे सलोख्याने राहणे हिताचे आहे. उद्या काही कारणास्तव आजानुकर्ण यांनी पाकिस्तानात स्थलांतर केले व तिथले नागरिक झाले तर चांदतार्‍याला(ही) आपली निष्ठा वाहणे त्यांचे कर्तव्य ठरेल. मात्र मराठी लेखन वाचन आनंदासाठी (!) ते उपक्रमावरही येत राहतील.

--(भारतीय) आजानुकर्ण ______


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

उगाच शानपन्.

मह्या भारतमातेला काय काय भोगावं लागत हाय त्या पाकड्यामुळं त्याचं गुनगान गायची आज बिल्कूल कायबी गरज नाय.
माजी जान म्हंजी माहा देस्, माह्या देसाचं सोडून् पाकड्याच्या गाण्याचे ध्यान येतं म्हंजी काय हो : (
सलोख्यानं राह्यला काय मी नाय नाही म्हणते,आजच्या दीशी चांदची ध्यान करायची म्हंजी खोटारड्यापणा आन मला मही XX जाळायचा उद्योग वाटुन् राह्यला.

पाकडे

भारतमातेला पाकड्यांपेक्षा तिच्या दिव्य सुपुत्रांमुळेच अधिक भोगावे लागले आहे, भोगावे लागत आहे. शिवाय पाकड्यांचे गुणगान येथे कोणीही गायलेले नाही. (त्यांचे गुणगान गाण्यात काही वाईटही नाही.)

आजच्या दिशी एका पाकड्याने लिव्हलेले "सारे जहाँसे अच्छा" हे गानं तुमाला चालतं भाऊ. मंग कालच्या १४ तारखेला पाकडयांना बी शुभेच्छा दिल्या तर काय बिगाडलं?

______

पाकड्या

आजच्या दिशी एका पाकड्याने लिव्हलेले "सारे जहाँसे अच्छा" हे गानं तुमाला चालतं भाऊ. मंग कालच्या १४ तारखेला पाकडयांना बी शुभेच्छा दिल्या तर काय बिगाडलं?

"सारे जहाँसे अच्छा" वाला मोहम्मद इकबाल ह्योच खरा पाकीस्तानचा निरमाता हाये,
त्यानं गाणं द्येलं, अन देस नेला पक्की बातमी हाये.जीना च्या डोक्यात यानीच भूत घुसीलं म्हणते.

बाबूराव येथे पाहा !

टग्यांशी सहमत

>>समाजकंटक ही काही एका गटाची मक्तेदारी नव्हे. तेव्हा सामान्य लोकांबद्दल किंवा एखाद्या संपूर्ण राष्ट्राबद्दल वैरभाव राखण्यात काहीही अर्थ नाही, आणि त्यातून कोणाचाही काहीही फायदाही नाही.

या वाक्याशी पूर्ण सहमत. सलोखा राखणे म्हणजे अन्याय सहन करणे नाही आणि अन्यायाला वाचा फोडणे म्हणजे साप साप म्हणून दोरी धोपटत बसणे नाही. साठ वर्षांपूर्वी जे झाले किंवा आता अशिक्षित, बेकार जनता जे करू इच्छिते त्याच्याकडे नको तेवढे लक्ष पुरवून आपल्या भावना चिथवणे हे देखील तितकेच वाईट.

दोन्ही देशांत सलोखा निर्माण झालाच पाहिजे.

पाकिस्तानी झेंड्याला दंडवत का बरं? ही बहुधा उग्गीच टग्गेगिरी असावी.

-राजीव.

हा जगातून जाईल तर बरे!

टग्या,
फालतूचे प्रेम दाखवू नका!!!
काही आठवण काढण्या सारखे नि दंडवतं घालण्या इतके यांनी आपल्यासाठी केलेले नाहीये.
या हिरव्या झेंड्याने जे काही भोग भारताला भोगायला लावले आहेत ते पाहून हा जगातून जाईल ते बरे असेच मी म्हणेन!
एका टाईपरायटर वरच्या एका पत्रावर बनलेले स्वार्थी नि रानटी राज्यकर्त्यांचे राष्ट्र!!!
ज्या दिवशी भारताला त्याचे हे राज्य परत मिळेल तो बनेल तो सुदिन!

आपला
गुंडोपंत
(स्वार्थी राज्यकर्त्यांच्या फालतू झेंड्यांपेक्षा सामान्य माणसे मोठी असतात नि ती वेळोवेळी दिसूनही जातात)

झेंडा

स्वार्थी राज्यकर्त्यांच्या फालतू झेंड्यांपेक्षा सामान्य माणसे मोठी असतात नि ती वेळोवेळी दिसूनही जातात

हे विधान तिरंग्यालाही लागु होते का?

होते ना!

अर्थातच होते ना!

आपला
गुंडोपंत
"गुंडोपंत महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र असावे नि त्याचा ध्वज शिवरायांचा भगवा असावा याचे समर्थन करतात"

ह्म्मम...

स्वार्थी राजकारण्यांचा फालतु झेंडा? अहो मग ह्याचे काय?

"तिरंग्याला माझे लाख दंडवत! तो आहे म्हणून मी आहे, तो आहे म्हणून माझं अस्तित्व आहे!"

मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

दंडवत नाही..

तिरंग्याबरोबरच) चांदतार्‍याला(ही) माझे दंडवत! ;-)

इतर देशांच्या राष्ट्रध्वजाबद्दल मला आदर आहे, मात्र दंडवत मात्र त्यापैकी कुणालाही नाही! दंडवत मात्र
फक्त अन् फक्त तिरंग्यालाच. इतर देशांच्या राष्ट्रध्वजाला दंडवत वगैरे घालणे हे मला लाचारीचे वाटते!

तात्या.

माझेही दंडवत

(तिरंग्याबरोबरच) चांदतार्‍याला(ही) माझे दंडवत! ;-)
टग्यांच्या जोडीने माझेही दोन्ही ध्वजांना दंडवत. ;-)

अवांतर:
गांधीवध, सावरकर, फाळणी, राष्ट्राभिमान, देशभक्ती वगैरे गोष्टींवर लगेच टाळ्या घेता येतात. आधी पाकिस्तानला शिव्या घालाव्यात. मग भारतातल्या मुसलमानांना. मग भैय्या आहेत, मद्रासी आहेत. ह्या सर्वांना शिव्या घालून झाल्या की माझी जातच कशी श्रेष्ठ दाखवावे. असो. वेळ मिळालाच भारतीय संस्कृती किती महान हे दाखविण्यासाठी पाश्चिमात्यांना संस्कृतीच नाही असे दाखण्याचा प्रयत्न करावा.

अथवा (अवांतर)

गांधीवध, सावरकर, फाळणी, राष्ट्राभिमान, देशभक्ती वगैरे गोष्टींवर लगेच टाळ्या घेता येतात. आधी पाकिस्तानला शिव्या घालाव्यात. मग भारतातल्या मुसलमानांना. मग भैय्या आहेत, मद्रासी आहेत. ह्या सर्वांना शिव्या घालून झाल्या की माझी जातच कशी श्रेष्ठ दाखवावे. असो. वेळ मिळालाच भारतीय संस्कृती किती महान हे दाखविण्यासाठी पाश्चिमात्यांना संस्कृतीच नाही असे दाखण्याचा प्रयत्न करावा.

अथवा स्वतः किती शहाणे / विचारवंत आहोत हे दाखवण्यासाठी आपल्याच गोष्टींना कुठेही संबंध असो अथवा नसो, झोडपत राहावे. असे बुद्धीचातुर्य दाखवल्यास कोणी बुद्धीवादावर शंका घेत नाही! - त्याला म्हणतात येन केन प्रकारेण...

सहमत!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
गांधीवध, सावरकर, फाळणी, राष्ट्राभिमान, देशभक्ती वगैरे गोष्टींवर लगेच टाळ्या घेता येतात. आधी पाकिस्तानला शिव्या घालाव्यात. मग भारतातल्या मुसलमानांना. मग भैय्या आहेत, मद्रासी आहेत. ह्या सर्वांना शिव्या घालून झाल्या की माझी जातच कशी श्रेष्ठ दाखवावे. असो. वेळ मिळालाच भारतीय संस्कृती किती महान हे दाखविण्यासाठी पाश्चिमात्यांना संस्कृतीच नाही असे दाखण्याचा प्रयत्न करावा.

अथवा स्वतः किती शहाणे / विचारवंत आहोत हे दाखवण्यासाठी आपल्याच गोष्टींना कुठेही संबंध असो अथवा नसो, झोडपत राहावे. असे बुद्धीचातुर्य दाखवल्यास कोणी बुद्धीवादावर शंका घेत नाही! - त्याला म्हणतात येन केन प्रकारेण...

ह्या बाबतीत सहमत आहे.
पुलंच्या मुंबईकर,पुणेकर की नागपुरकर ह्या लेखातील अस्सल पुणेकरच अशा तर्‍हेचे उद्गार काढू शकतो.प्रत्येक गोष्टीत आपला वेगळेपणा(मतभिन्नता व्यक्त करणे) सिद्ध करणे आणि कसला तरी जाज्वल्य अभिमान असणे हे अस्सल पुणेकराचे लक्षण आहे.मग तुमचा तिरंगा तर आमचा चांदतारा!(तुमचे क्रिकेट तर आमच्या आट्यापाट्या च्या चालीवर)

आलेले अशा तर्‍हेचे बहुतेक प्रतिसाद हेच अधोरेखित करतात!

अथवा (अतिशय अवांतर)

अथवा स्वतः किती शहाणे / विचारवंत आहोत हे दाखवण्यासाठी आपल्याच गोष्टींना कुठेही संबंध असो अथवा नसो, झोडपत राहावे. असे बुद्धीचातुर्य दाखवल्यास कोणी बुद्धीवादावर शंका घेत नाही! - त्याला म्हणतात येन केन प्रकारेण...

ह्या लोकांनी एवढा त्रास करून घ्यायला नको. "आपल्याच गोष्टी" :):) बुद्धिवादी ह्यांना झोडपतात तेव्हा हे हे लोक का बरे भडकून भावनेच्या आहारी जातात ;) ? ही भावना फार चालू चीज आहे.

भावनेच्या आहारी...

अहो असे पहा "वंदे मातरम्" चर्चेत पाकीस्तानला का त्यांच्या झेंड्याला दंडवत घालून विषयांतर झाले. भावना आमच्या नाही दुखावत आम्हाला ते असंबद्ध वाटले आणि वाद घातला. पण पाकीस्तानच्या भावनांची मात्र आपण कदर केली नाहीत कारण "वंदे मातरम्" हे त्यांना "काफीराचे गाणे वाटते". आम्हाला त्यांच्या भावना दुखावलेल्या नको होत्या. चर्चेचे नावा "सारे जहाँसे अच्छा.." असते तर गोष्ट वेगळी होती. म्हणून "आपण आपल्याच गोष्टींना (आपल्या बाबतीत कदाचीत पाकीस्तान असावे असे वाटते) झोडपले" या अर्थी लिहीले!:-)

सहमत

गांधीवध, सावरकर, फाळणी, राष्ट्राभिमान, देशभक्ती वगैरे गोष्टींवर लगेच टाळ्या घेता येतात. आधी पाकिस्तानला शिव्या घालाव्यात. मग भारतातल्या मुसलमानांना. मग भैय्या आहेत, मद्रासी आहेत. ह्या सर्वांना शिव्या घालून झाल्या की माझी जातच कशी श्रेष्ठ दाखवावे. असो. वेळ मिळालाच भारतीय संस्कृती किती महान हे दाखविण्यासाठी पाश्चिमात्यांना संस्कृतीच नाही असे दाखण्याचा प्रयत्न करावा.

१००% सहमत!! नेमक्या शब्दात दुखरी नस पकडली आहे.. आरडा ओरडा होणारच!!

-कोलबेर

देखणा तिरंगा!

आपल्या तिरंग्याइतकं देखणं या जगात दुसरं काहीही नाही!

सारे जहा से अच्छा हिंदोस्तान हमारा..

पण, परंतु, लेकीन,

गरिबी, भ्रष्टाचार, बेकारी, अशिक्षितता, यासारखे अनेक प्रश्न सध्या (किंबहुना गेली ६० वर्ष) आपल्या तिरंग्याला एखाद्या जळवेसारखे चिकटलेले आहेत. परंतु या सर्वांवर कडी केली आहे ती बेसुमार लोकसंख्यावाढीने! प्रचंड लोकसंख्या हा आपल्या देशाला झालेला कॅन्सर आहे.

वरील सर्वांतून आपला तिरंगा लवकरात लवकर मुक्त होवो हीच प्रार्थना!

१९४७ साली आपण तो ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त करून घेतला खरा, परंतु वरील सर्व शत्रू हे इतर कोणत्याही परकीय शत्रुपेक्षा अधिक बलवान आहेत, भारताला पार पोखरून काढणारे आहेत/काढत आहेत!

असो, १५ ऑगस्टच्या निमित्ताने तिरंग्याला माझे लाख दंडवत! तो आहे म्हणून मी आहे, तो आहे म्हणून माझं अस्तित्व आहे!

तात्या.

अगदी बरोबर बोललात...

१५ ऑगस्टच्या निमित्ताने तिरंग्याला माझे लाख दंडवत! तो आहे म्हणून मी आहे, तो आहे म्हणून माझं अस्तित्व आहे!

अगदी मनातले बोललात.

प्रणाम.

हमे देखना है ! कुछ करना है ! कभी तो करना है !
सुनते,सुनते,हमरी उमर साठ साल की हो गयी.

भारत के इस तिरंगेको मेरा भी प्रणाम.

आपला स्वातंत्र्यदिन

! "भारताच्या स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा" !
! जय हिंद ! जय महाराष्ट्र !
आपला
कॉ.विकि

तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्यही तूचि

वंदे त्वामहम्, यशोयुताम् वंदे, यशोयुताम् वंदे!

-- आजानुकर्ण ______


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

सुरेखच!

कर्णा, तुझा तिरंगा सुरेखच आहे. देवकाकांचा फडफडता तिरंगाही आवडला, तुझ्या तिरंग्यातली किंचित ऍब्स्ट्रॅक किंवा फ्री हॅन्ड काढलेली रंगसंगतीही आवडली!

आपला,
(तिरंगाप्रेमी) तात्या.

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व उपक्रमींना हार्दिक शुभेच्छा.

जयहिंद! भारतमाता की जय! वंदेमातरम्!

वंदेमातरम्!

वन्दे मातरम्

सुजलां सुफलां मलयजशीतलाम्

शस्य श्यामलां मातरम् ।

शुभ्र ज्योत्स्न पुलकित यामिनीम

फुल्ल कुसुमित द्रुमदलशोभिनीम्,

सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् ।

सुखदां वरदां मातरम् ॥ वन्दे मातरम्…

सप्त कोटि कन्ठ कलकल निनाद कराले

निसप्त कोटि भुजैब्रुत खरकरवाले

के बोले मा तुमी अबले

बहुबल धारिणीं नमामि तारिणीम्

रिपुदलवारिणीं मातरम् ॥ वन्दे मातरम्…

तुमि विद्या तुमि धर्मं, तुमि ह्रदि तुमि मर्मं

त्वं हि प्राणाः शरीरे

बाहुते तुमि मा शक्ति,

ह्रदये तुमि मा भक्ति,

तोमारे प्रतिमा गडि मंदिरे मंदिरे ॥ वन्दे मातरम्…

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी

कमला कमलदल विहारिणी

वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्

नमामि कमलां अमलां अतुलाम्

सुजलां सुफलां मातरम् ॥ वन्दे मातरम्…

श्यामलां सरलां सुस्मितां भुषिताम्

धरणीं भरणीं मातरम् ॥

वन्दे मातरम्

कृपया ह्यांना विसरु नका.

जालियनवाला बाग हत्याकांड स्मारक

जालियनवाला बाग हत्याकांड स्मारक

जय हिंद !

राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.

अपेक्षीत !

विनोद आहे असेच समजत आहे ( जर नसेल तर तुम्ही माझ्या भावनेचा अपमान करत आहात असे समजत आहे)

मी वरील छायाचित्र हे एका महान स्मारकाचे "जालियनवाला बाग हत्याकांड स्मारक " दिले आहे ज्या साठी हे स्मारक तयार केले गेले त्याची माहीती खालील प्रमाणे :-
अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. एप्रिल १० १९१९, रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. कारण होते दोन प्रसिध्द स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणी, सत्यपाल आणी सैफुद्दीन किचलु, असे २ वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. ह्या घोळ्क्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्त्वाची जाणीव करुन देण्यार्‍या ईमारतींना आग लावण्यात आली. टाउन हॉल, दोन बँकाच्या ईमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. गुरखा रेजीमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाचा एक युरोपीयन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बँक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपीयन नागरीकाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात ८-२० स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. ह्या नंतररचे दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी ईमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ युरोपीयन नागरीक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पन्जाब मध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला.

योगायोग असा की १३ एप्रीला पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणी शीख बान्धव सण साजरा करण्यास एकत्र जमले. प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबन्दी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता.
****

एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,००० हून अधिक आहे.
संदर्भ व अतिरिक्त माहीती साठी हा दुवा

जर जागा माहित नसेल तर कमीत कमी जागेचे नाव तरी कोठेतरी वाचलेच असेल अशी अपेक्षा.
मित्रवर्य,
तुम्ही वाचले नसेल अथवा तुम्हाला जालियनवाला बाग हत्याकांड माहीत नाही असे समजून मी वरील माहीती दिली आहे.

(* वरील माहीती विकी वरुन घेतली आहे / लेखन माझे नाही.)
राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.

अस्थाई विनोद

टग्या,
तुम्ही अस्थाई विनोद करत अहात!

आपला
गुंडोपंत
"गुंडोपंत महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र असावे नि त्याचा ध्वज शिवरायांचा भगवा असावा याचे समर्थन करतात"

हे वाक्य...

गुंडोपंत महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र असावे नि त्याचा ध्वज शिवरायांचा भगवा असावा याचे समर्थन करतात

टग्या यांच्या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताच्या प्रतिसादावर धुळवड व्हावी व हे वाक्य दुर्लक्षिले जावे याला काय म्हणावे?

-- (मराठी) आजानुकर्ण ______

महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र होण्याऐवजी भारतीय घटनेच्या चौकटीत राहूनच महाराष्ट्राला आर्थिक व राजकीय स्वायत्तता मिळावी आणि केंद्र सरकारच्या तुकड्यांसाठी शेपटी हलवावी लागू नये याचे आजानुकर्ण समर्थन करतात. मराठेशाहीचा भगवा व भारतीयांचा तिरंगा दोन्हींबाबत आजानुकर्णाला आदर आहे.

- जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पुणे, जय पिंपरी चिंचवड, जय चिंचवड स्टेशन


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

हा हा हा!!

जय पिंपरी चिंचवड, जय चिंचवड स्टेशन

हा हा हा!!!
हे अगदी सही बरका!!!

आपला
जय गुंडोपंत

"गुंडोपंत महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र असावे नि त्याचा ध्वज शिवरायांचा भगवा असावा याचे समर्थन करतात"

जय मंचर

जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पुणे, जय पिंपरी चिंचवड, जय चिंचवड स्टेशन

आणि मंचर?

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

मंचर

व्हेन इन रोम डू ऍज रोमन्स डू!

-(पोटार्थी) आजानुकर्ण मंचरकर

वंदे मातरम्

भारताला स्वातंत्र्य व लोकसत्ताक गणराज्य मिळवून देणार्‍या सर्व (विशेषता उपेक्षीत) स्वातंत्र्यसैनीकांना ल़क्ष लक्ष प्रणाम!

आजच्या व येणार्‍या पिढीला त्यांच्या त्यागाचे, बलीदानाचे मोल कळो तसेच खर्‍या अर्थाने भारताला सुखी व समृध्द करायची प्रेरणा, बुध्दी मिळो.

भारतमाता की जय!

चेहऱ्यावर कृतार्थ भाव, डोळ्यांत क्रांतीची चमक!

चेहऱ्यावर कृतार्थ भाव, डोळ्यांत क्रांतीची चमक!

अमित गोळवलकर - सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १४ - स्वातंत्र्यलढ्यातील एक पर्व असलेल्या देहूरोड बॉंब खटल्यातील एक वीर उद्या स्वातंत्र्याचा हीरकमहोत्सव कृतार्थपणे अनुभवणार आहे. ....
अनंत विठ्ठल आगाशे (वय ९४) हे त्यांचे नाव. १९४२ मधील देहूरोड बॉंब खटल्यात शिक्षा झालेल्यांपैकी हयात असलेले ते एकमेव. त्यांना या खटल्यात मदत करणारे त्यांचे मित्र रामभाऊ जोशीही त्यांच्या आनंदात सहभागी आहेत.

स्मृती आणि दृष्टी दोन्ही वयोपरत्वे क्षीण झाल्या असल्या, तरीही त्यांच्या डोळ्यांतील क्रांतीची चमक कायम आहे. वनाजसमोर पुष्कर अपार्टमेंट येथे ते चिरंजीव गुणवंत व चंद्रशेखर यांच्याबरोबर राहतात. पुण्याच्या इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांच्याकडून त्यांच्याबाबत माहिती मिळाली. छायाचित्रण हा आगाशे यांचा व्यवसाय होता. प्रख्यात नवयुग फिल्म कंपनीसाठी त्यांनी "वंदेमातरम', "लाखाची गोष्ट', "थोरातांची कमळा', "पेडगावचे शहाणे' आदी चित्रपटांचे छायाचित्रण केले. याचवेळी ते क्रांतिकार्यातही सहभागी होते. कॅमेऱ्याशी निगडित तांत्रिक ज्ञानाचा त्यांना बॉंबची रचना बदलण्यासाठी उपयोग झाला. क्रांतिकारक भास्कर कर्णिक, नारायण विष्णू आठवले यांनी देहूरोडच्या दारूगोळा कारखान्यातून जे बॉंब बाहेर आणले, त्यावरील सील बदलण्याचे काम आगाशे यांनी बेमालूमपणे केले. याच बॉंबचा पुढे कॅपिटॉल चित्रपटगृहात स्फोट करण्यात आला. ३१ जानेवारी १९४३ रोजी पहाटे त्यांना अटक करण्यात आली. क्रांतिकारकांच्या गटाने कारखान्यातून एवढे साहित्य लंपास केले, की तिचा वापर करून त्यांना लहानशी फॅक्‍टरी उभी करता आली असती, असे त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटले होते. बॉंब व त्यासाठीची सामग्री तांबडी जोगेश्‍वरीचे मंदिर, तसेच अन्य काही ठिकाणी लपविण्यात आली होते. मंदिराचे तेव्हाचे पुजारी भालचंद्र बेंद्रेही उत्तम छायाचित्रकार. त्यांच्याच "डार्करूम'मध्ये बॉंब आणि अन्य साहित्य लपविले जाई. पुढे बेंद्रेही पकडले गेले. रामचंद्र तेलंग, वामन कुलकर्णी यांनाही अटक झाली. भास्कर कर्णिक यांनी फरासखान्यातच विष पिऊन आपले जीवन संपवले. त्यामुळे या खटल्यातील इतरांची मान फासातून वाचली.

अनंत आगाशे पूर्वी शिवाजी रस्त्यावर राजा परांजपे राहत असलेल्या इमारतीत राहत असत. त्यांचे मित्र रामभाऊ जोशी (वय ९२) ब्रिटिश पोलिस दलात होते. आगाशे यांना पकडल्यानंतर सुदैवाने त्यांच्या घराची झडती पोलिसांनी घेतली नाही. त्याच काळात जोशी ठाण्यात नेमणुकीला होते. आगाशे व इतरांच्या अटकेची बातमी "सकाळ'मध्ये वाचल्यानंतर त्यांना धक्का बसला. ते आगाशे यांना भेटण्यासाठी फरासखान्यात आले. आगाशे यांनी त्यांच्याकडील एक पेटी उघडून दाखविण्यास नकार दिला होता. फरासखान्यात भेट झाल्यानंतर जोशी यांना या पेटीचे रहस्य उलगडले. पेटीतील कॉफीच्या बाटलीत स्फोटक द्रव्ये असल्याची माहिती आगाशे यांनी दिली आणि हा पुरावा नष्ट करण्याची विनंतीही केली. बाहेर येऊन जोशी यांनी तातडीने ती बाटली नष्ट केली. वास्तविक पाहता या बाटलीची माहिती जोशी यांनी आपल्या वरिष्ठांना दिली असती, तर त्यांना बढती मिळाली असती. पण, जे काही चालले आहे ते चांगलेच आहे, ही भावना बाळगणारे जोशी यांनी तो विचारही मनात येऊ दिला नाही. आगाशे आणि जोशी यांच्यातली मैत्री आजही टिकून आहे. जोशी १९७५ मध्ये निवृत्त झाले.

सुमारे दोन वर्षे ब्रिटिशांच्या तुरुंगात काढल्यानंतर आगाशे यांच्यासह काही जण सुटले. त्यानंतर आगाशे यांनी पुन्हा छायाचित्रणाच्या कारकिर्दीला प्रारंभ केला. स्वातंत्र्यसैनिकांसाठीचे पेन्शन आगाशे यांनी नाकारले. एका जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः फॉर्म भरून त्यांचे पेन्शन सुरू केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आगाशे यांचा ताम्रपट देऊन सत्कार केला. ते वगळता स्थानिक पातळीवर मात्र त्यांचे कार्य अद्यापही इतिहासाच्या पानांतच दडलेले आहे.

पहिल्या राष्ट्रध्वजांची आज पुण्यात ऐतिहासिक भेट!

भारताचा पहिला राष्ट्रध्वज मादाम कामा यांनी स्टुटगार्टमध्ये (जर्मनी) भरलेल्या आंतरराष्ट्रीय सोशॅलिस्ट कॉंग्रेसच्या अधिवेशनात फडकावल्याच्या घटनेला आज (बुधवारी) शंभर वर्षे होत आहेत.

.....

पहिल्या राष्ट्रध्वजांची आज पुण्यात ऐतिहासिक भेट!

श्रीपाद ब्रह्मे / सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २१ -
मादाम कामांचे सहकारी बॅ. सरदारसिंह राणा यांच्याकडेही त्याच काळात तयार केलेला, पण काहीसा वेगळा राष्ट्रध्वज होता. त्यांचे नातू खासदार राजेंद्रसिंह राणा उद्या पुण्यात होणाऱ्या खास कार्यक्रमात हा ध्वज घेऊन येणार आहेत. मादाम कामा यांनी फडकविलेला ध्वज पुण्यातच लोकमान्य टिळक संग्रहालयात आहे. हाही ध्वज उद्याच्या कार्यक्रमात मिरवणुकीने आणण्यात येणार आहे. एका अर्थाने मादाम कामा आणि बॅ. राणा यांच्या अतुलनीय पराक्रमाची प्रतीके असणारे दोन ध्वज शंभर वर्षांनी पुन्हा एकमेकांना भेटणार आहेत.

जन्मदा प्रतिष्ठानने या ध्वजप्रदर्शनाच्या शताब्दीनिमित्त उद्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात "राष्ट्रध्वज - प्राचीन ते अर्वाचीन' या मिलिंद सबनीस लिखित पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे.

"जन्मदा'चे मकरंद केळकर व सचिन जोशी यांनी या ध्वजांच्या भेटीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. पहिल्या राष्ट्रध्वजाच्या प्रदर्शनाच्या शताब्दीनिमित्त त्यांनी १५ ऑगस्टपासून "ध्वजसप्ताह' साजरा केला, त्याचीही सांगता उद्याच्या समारंभात होते आहे. या ध्वजसप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे तो १५ ऑगस्टला स्टुटगार्ट येथून सुरू करण्यात आला. तेथील विद्यापीठात खास आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शंभर ते दोनशे भारतीयांच्या उपस्थितीत हा ध्वज पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. त्यासाठी "जन्मदा'तर्फे "अभिजित एअर सेफ्टी फाउंडेशन'च्या सौ. कविता गाडगीळ खास दूत म्हणून तेथे उपस्थित राहिल्या होत्या. तेथील कार्यक्रमासाठी सौ. प्राची नवघणे, शशांक घाणेगावकर व परीक्षित खोपडे यांनी साह्य केले.

--------------------------------------------------------------
कॅप्टन लक्ष्मींचा संदेश
उद्याच्या कार्यक्रमासाठी "जन्मदा'ने आझाद हिंद सेनेच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल व लेफ्टनंट मानवती पांड्ये (आर्या) यांचे खास संदेश कानपूरला जाऊन आणले आहेत. पुण्यातील ध्वजाची प्रतिकृती तेथे कॅप्टन लक्ष्मी यांच्या हस्ते फडकविण्यात आली. त्यांचा संदेश आणि स्टुटगार्टमधील कार्यक्रमाची क्षणचित्रे उद्याच्या कार्यक्रमात दाखविण्यात येणार आहेत.
--------------------------------------------------------------

"वंदे मातरम्‌'वरून "झी' कार्यालयावर भाविसेचा मोर्चा

"वंदे मातरम्‌'वरून "झी' कार्यालयावर भाविसेचा मोर्चा

मुंबई, ता. २२ - "सारेगामापा'च्या पाकिस्तानी स्पर्धकांनी भारतीय देशभक्तीपर गीते गाण्यास दिलेल्या नकाराच्या मुद्द्यावरून आज "झी'च्या वरळीतील कार्यालयाबाहेर रणकंदन माजले. मात्र या आंदोलनाची दखल घेऊन पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त "झी'वर प्रसारित झालेल्या "सारेगामापा' कार्यक्रमात पाकिस्तानी गायकांनी भारतीय देशभक्तीपर गीते गाण्यात नकार दिल्याचे प्रसिद्ध झाल्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या होत्या. वाहिनीतर्फे ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी त्यावर कोणाचाही विश्‍वास बसणे कठीण झाले होते. ही "झी'चीच चाल असल्याचे बोलले जात होते आणि या रागाचे पर्यवसान आज "भाविसेने'तर्फे एका मोर्चात झाले. या मोर्चेकऱ्यांत कारगिल युद्धातील शहीद जवान मनीष पितांबरे यांचा भाऊ गिरीश पितांबरे आणि रेल्वे बॉम्बस्फोटांत डावा हात गमावलेल्या महेंद्र पितळे यांचा समावेश होता.
या वेळी भाविसेचे अध्यक्ष अभिजित पानसे आणि मोर्चेकऱ्यांनी "सारेगामापा'चे प्रोजेक्‍ट हेड संतोष शेंडे यांना एक निवेदन दिले. "काश्‍मीर हा भारताचा भाग आहे का?' आणि "मुंबईतील बॉम्बस्फोटांत सहभागी असलेल्या "आयएसआय' संघटनेचा आपण निषेध करता का?' असे प्रश्‍न पाकिस्तानी स्पर्धकांना विचारावेत. मग ते काय उत्तर देतात ते पाहू, असे आवाहन पानसे यांनी शेंडे यांना केले. ""कला आणि क्रीडेला प्रांतांच्या सीमा नसाव्यात, असे बाळासाहेब ठाकरे यांचे म्हणणे आहे; मात्र पाकिस्तानी स्पर्धक भारताची सुंदर गीते गाण्यास नकार देऊन एक वेगळीच भिंत उभारत आहेत, याला आमचा आक्षेप आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो. "झी'ने या स्पर्धकांची त्वरित या कार्यक्रमातून हकालपट्टी करावी,' असे पानसे यांनी नमूद केले. "झी'ने याबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास "झी'ला आमच्या भाषेत समजवावे लागेल, असा इशाराही पानसे यांनी दिला आहे.
"झी नेटवर्क'चे उपाध्यक्ष आशीष कौल या प्रकरणी म्हणाले, "भारतीय देशभक्तीपर गीते पाकिस्तानी स्पर्धकांनी गायली नाहीत ही निव्वळ एक अफवा होती. ती कोणी पसरवली, याबाबत आम्हाला काहीच कल्पना नाही. आम्हाला आमच्या देशाचा अभिमान आहे. दोन्ही देशांत शांतता नांदावी आणि मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत हाच आमचा उद्देश आहे.'

प्रकाटाअ

हा प्रतिसाद विषयांतराच्या भितीने काढून टाकला आहे.

 
^ वर