एकीचे बळ मिळते फळ.

आजकाल खेडेगावात,ग्रामपंचायतीविषयी उसासीनतेचे सूर ऐकायला मिळतात,अल्पभुधारक,आणि भूमिहीन शेतक-यांचे प्रश्नाबाबत,शासन स्तरावर फारसे काही प्रयत्न होतांना दिसत नाही.त्यातल्या त्यात शहराकडे रोजीरोटीसाठी माणसांचे लोंढे वाढत आहेत,गांधीजींच्या खेड्याकडे चला,ही हाक स्वप्नच ठरले, तरिही,काही गावांनी मात्र व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला,त्या पैकी एक चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड या गावातल्या ग्रामपंचायतीने समुहशेतीचा माध्यमातुन रोजगार देण्याचा प्रयत्न केला.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामधे भाग घेतल्यानंतर या गावाचे रुप बदलले,या गावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच चंदू पाटील यांनी पुढाकार घेऊन एक समुहशेतीचा प्रयोग घेतला, या गावात शेती नसणा-या अंदाजे चाळीस कुटुंबांना रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशाने या ग्रामपंचायतीने येथील शेती करारावर घेतली आणि गावात ज्यांना शेती नाही अशा लोकांना बटाईने जशी शेती देतो त्याप्रमाणे गावातल्या लोकांना शेती कसायला दिली.या शेतीतील उत्पन्न जे येईल त्यातला काही वाटा ग्रामपंचायतीला द्यायचा आणि काही कुटुंबांना द्यायचा असे ठरले,या प्रयोगातुन गावातल्या भुमिहीनांना या निमित्ताने रोजगार मिळाला. आणि त्या गावाच्या ग्रामपंचायतीला फायदाही झाला.
समूहशेतीबरोबर या गावात,चराईबंदी,कु-हाडबंदी,नशाबंदी,( नशाबंदीवर,जे मत असेल ते कृपया खरडवहीत लिहीणे) गुटकासेवन बंदी,नसबंदी,असे ठराव केले आहेत.पडिक जमिनीत बांबूची लागवड करुन त्याच्या विक्रीतून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. महिन्यातुन एकदा श्रमदानातुन वृक्षसंवर्धनाचा विडा उचलला आहे. गावाच्या सांघीक निर्णयातुन गावाचा विकास कसा होऊ शकतो,या गावाने दाखवून दिले आहे, असाच जर विचार अनेक गावांनी केला आणि तो बक्षीसानंतरही त्या गावात हाच कायापालट राहिला तर खेड्याकडे चला ही हाक देण्याची गरज राहाणार नाही असे वाटते.

सूचना:- सदरील बातमी एका मासिकात आलेली होती.त्या बातमीवरुन हा लेख.(सापडले तर मासिकाचे नाव सांगतो)

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

मस्तच. गावानेच गावाची काळजी घेतली. सगळ्यांचे भले झाले. आख्या भारताला (सर्व गावे, खेडी) हे जमले तर काय बहार येईल.

असेच यश सर्व खेड्यांना लाभो हीच ईश्वराकडे प्रार्थना.

सहमत !

१००% सहमत !

राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.

एकीचे बळ अन छातीत कळ :)

माहिती आवडली,शासनाचे धोरणच आहे,पडिक जमिनीतून समुहशेतीचा प्रयोग करणे,आपण म्हणता तसे केवळ गावाचा विकास बक्षिसापूर्ते न राहता,विकासाचा कायापालट कायम राहिला पाहिजे.

अवांतर ;) आपला नाममहिमा अगाध आहे,खरे तर अशा बातम्या वाचल्या की आमच्या छातीत कळच येते ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद

मोजक्या प्रतिक्रियेबद्दल .(कळ येऊनही वाचल्याबद्दल )सर्वांचे धन्यवाद् व्यक्त करतो

हे अवश्य पहा - म्हैस विरुद्ध सिंह!

एकीचे बळ मिळते फळ.

वॉव

काय जबरा व्हिडिओ आहे!! सही!!!!

धक्का

ही बातमी म्हणून टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर (सर्वात वर) झळकणे हा त्याला बसलेला जबरा धक्का होता.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

टाइम्स ऑफ इंडिया..

ही बातमी म्हणून टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर (सर्वात वर) झळकणे हा त्याला बसलेला जबरा धक्का होता.

ही (यू-ट्यूब व्हिडीओ) बातमी म्हणून आली होती? मला असेच कोणीतरी विरोपाने पाठवले होते...

 
^ वर