विलक्षण लक्ष्या

चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची क्षमा मागून. )
***काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक मालिका प्रसृत होत असे. त्यातील प्रसंग एका हॉटेलात घडत. त्यात लक्ष्मीकांत बेर्डे ,मधु आपटे इ.च्या भूमिका होत्या.(शीर्षक आठवत नाही.) त्या मालिकेची पार्श्वभूमी या लेखनाला आहे.****
.....एकदा हॉटेल गीताली मधे एकदम बाराजण आले.
...."अरे,तुमी इतके लोग म्हणजे क्रिकेट टीम हाय काय? "मालकांनी विचारले.
....."बरोबर ओळखलेत बाबाजी,मी कॅप्टन.हा बारावा खेळाडू.आम्हांला स्वतंत्र बारा खोल्या हव्यात."
..."अरे मधू, तू तिकडे काय बघते?ते रजिश्टर देनी बाबा लोक्कर."
बाबाजीनी रजिस्टर बघितले.
....."बारा नाय. आमची कडे अकरा खोली खाली हायेत."
..."खाली नाहीत मालक, वर आहेत वर ! वरच्या मजल्यावर."
..."लक्षा, तू मदी मदी बोलून माजा डोसका खाऊ नकोस.कॅप्टन,अकरा खोली आहेत.एके मदी कोणी दोगे रहा. म्हणजे जमून जाईन."
..."नको नको. प्रत्येकाला स्वतंत्र खोलीच हवी.आम्ही दुसर्‍या हॉटेलात जातो." कॅप्टनने बॅग उचलली.
..."कशाला,कशाला ? मी देतो ना प्रत्येकाला स्वतंत्र खोली.चला, क्रिकेटवीर. वर चला.मी घेतो तुमचे सामान."
लक्ष्या त्या बाराजणांना घेऊन वर गेला.खोली क्र. १ ते ११ रिकाम्या होत्या.
लक्ष्याने खोली नं.१ मधे कॅप्टन आणि बारावा खेळाडू या दोघांना बसवले.
..."पण आम्हाला स्वतंत्र खोल्या? "

..."देतो ना, देतो.जरा वेळ दोघे या खोलीत थांबा आणि कॅच कॅच ची प्रॅक्टिस करा."
खोली नंबर १ मधे ते दोघेजण राहिले.(तात्पुरते.)

लक्ष्याने तिसर्‍याला खोली नं.२ दिली.चौथ्या खेळाडूला खोली नं.३ दिली. पाचवा खोली नं.४ मधे राहिला.खेळाडू क्र.सहा पाच नंबरच्या खोलीत,सातवा खोली नं.६ मधे,आठवा खोली नं. सातमधे, असे करीत लक्ष्याने अकराव्या खेळाडूला खोली नं.दहा दिली. खोली क्र.११ अजून रिकामी होती.
...लक्ष्या खोली नं. १ मधे गेला.तिथे कॅप्टन आणि बारावा खेळाडू यांची कॅच कॅच प्रॅक्टिस चालू होती. लक्ष्या तिथून बाराव्या खेळाडूला घेऊन आला आणि त्याला खोली नं.११ दिली. या प्रमाणे लक्ष्याने बारा खेळाडूंतील प्रत्येकाला स्वतंत्र खोली दिली ,असे दिसते.
हे कसे शक्य झाले? या वर्णनात चूक नेमकी कोठे आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

दुसरा कुठे?

दुसरी व्यक्ती कुठे आहे?
नंबर एक मध्ये दोघेजण - यात पहिली व्यक्ती म्हणजे क्याप्टन आणि क्याच घ्यायला बारावी व्यक्ती आहे.

नंतर थेट तिसरी व्यक्ती दुसर्‍या खोलीत व तसेच पुढे चालू

सहमत!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
आजानुकर्णांशी सहमत!
तो उल्लेख(दुसर्‍याचा) जाणीवपूर्वक टाळलाय की अनवधानाने?

हेच

अहो हेच उत्तर आहे वाटते! एकदा अनवधानाने "उत्तर व्यनिने" असं नाही लिहिलं तर केलात ना घोटाळा !!

हे कोडे नसावे

कारण तर्कक्रीडा असे म्हटले नाही आणि वर्गीकरण विरंगुळा/स्फुट असे केले आहे. ;)

अरेच्या

हो का?

आम्ही आपले यनावाला म्हटले की मेंदूला धार बिर काढून तयार होतो ना, त्यामुळे .....

विलक्षण लक्ष्या

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
वस्तुतः हे कोडे नव्हेच. उत्ताराचीही अपेक्षा नाही. अकराच खोल्या असताना ,बारा जणांना प्रत्येकी एक स्वतंत्र खोली दिली असे वर्णन आहे,त्यात चूक असलीच पाहिजे. काही जणाना पहिल्याच वाचनात ती चूक उमगेल. तर काही जणाना ३/४ वाचने करावी लागतील. "अरेच्च्या! असं कसं ? हं,हं असं आहे होय! " एवढे जरी काही जणांना वाटले तरी लिहिण्याचा हेतू साध्य झाला.
...काहींनी व्यनि. ने उत्तरे पाठविली आहेत. त्या सर्वांनी नेमकी चूक कुठे ते ओळखले आहे.

जीतम जीतम जीतम

हे कोडे नव्हतेच... त्यामुळे व्य.नि. न पाठवता येथे चूक शोधणारेच बरोबर. ;)

दहा बोटे

अशाच तर्‍हेने आपण लहान मुलांना हताना आकरा बोटे असल्याचे भासवतो.
दहा... नउ..आठ..सात .. सहा असे एका हाताच्या बोटांना मोजून मग दुसर्या हाताची पाच बोटे त्यात मिळवतो आणि आकरा उत्तर काढतो. शाब्दिक चलाखी.
माझी गणितातील प्रगती त्याकाळी जी थांबली ती थांबलीच :(
-- (ढ) लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

मौखिक कोडे

हे लिखित कोडे असण्यापेक्षा मौखिक कोडे म्हणून जास्त प्रभावी आहे. यनावालांनी ठळक केलेले शब्द ठासून उच्चारले असता - 'दोघेजण' सांगून झाल्यावर 'तिसरा' हा शब्द ऐकताना योग्यच वाटतो. त्यामुळे कोडे ऐकणार्‍याचा गोंधळ उडतो.
अशा प्रकारची आणखी कोडी आहेत -
उदा. अमावस्येचा दिवस. आकाशात चंद्र नाही. त्या दिवशी रात्री यल्लम्माची जत्रा होती. त्यामुळे रस्त्यावर एकच गर्दी उसळली होती. तितक्यात लाईट गेली. शिवाजी पुतळ्याकडून एक ट्रक हेड-लाईट न लावता भरधाव आला. रस्त्यावर दिवे लागलेले नसूनही ड्रायव्हरने शिताफीने ट्रक चालवला आणि बघता-बघता तो गर्दीतून कोणताही अपघात न करता पार झाला.... हे कसे शक्य झाले?

ट्रक दिवसा आला असणार!

ट्रक नक्कीच दिवसा आला असणार! ;)

आपला
गुंडोपंत

अमावस्येचा दिवस.

अमावस्येचा दिवस.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

 
^ वर