बोधकथा

म्हसोबाचे डोळे

क्रांतिसिंह नाना पाटील आपल्या भाषणातून समाजातील अंधश्रद्धेवर मार्मिक प्रहार करीत असत. विसाव्या शतकातील ग्रामिण महाराष्ट्राचे ते सर्वाधिक लोकप्रिय वक्ते होते. त्यांच्या जीवनातील त्यांनीच भाषणात सांगितलेली ही एक कथा.

नाना एकदा अंकलखोपला गेले होते.अंकलखोपचा म्हसोबा जागृत व जहाल देव मानला जात असे. नानांनी एक गंमत करायचे ठरवले.त्यांनी म्हसोबाचे चांदीचे डोळे काढून आणले. त्याबद्दल म्हसोबा त्यांना काय शिक्षा करतो ते पहायचे होते. पण चार महीने झाले तरी नानांना काहीच होईना. ते पुन्हा एकदा अंकलखोपला गेले. मंदिराच्या पुजार्‍याला म्हणाले," म्हसोबाचे डोळे चोरणार्‍यास काय होईल हो दादा ?" पुजारी म्हणाला,'जुलाब ,रक्तशेंबीची हगवण लागून तो आतापर्यंत मेला देखील असेल. नानांनी खिशातले डोळे काढले व ते पुजार्‍याला दिले आणि म्हणाले ,"मीच डोळे नेले होते ,मला काहीच कसे झाले ना।ही?" पुजारी महाहुशार . तो म्हणाला ,मग बरोबर आहे . त्याला डोळेच नाही ,तर तो तुमच्याकडे कसे बघणार?

तात्पर्य : अंधश्रध्देमुळे ज्यांचा फायदा होतो असे लोक चलाख युक्तीवाद करून अंधश्रध्देचे समर्थन करीत असतात.त्यांच्यापासून सावध रहायला हवे.

(कथा दै. संध्याकाळमधून)

लेखनविषय: दुवे:

Comments

म्हसोबा!

आपल्यालाम्हसोबाहादेवआवडतोब्ऑ!%%%&आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र म्हणे!)

ऑपेरा

अरे! हे काय? मला त्या म्हसोबा वर लिहायचे होते हो...
ऑपेरा मध्ये उपक्रमा वर लिहिणे शक्य होत नाहीये. स्पेस दिली की काहीच होत नाही... कर्सर ऍरो नी तिकडे नेला तर % उमटते.
आणी मोझिला मध्ये अक्षरे कायच्या काहीच जाड दिसतायेत...

(मी फार जवळ आलोय वाटतं पडद्याच्या..?)
(हे खरंच असं आहे की, मलाच आज जरा जास्त...?)

नि आता काय प्रतिसाद लिहायचा होता तेच विसरलोय...

आपला
(म्हसोबाच्या जत्रेत हरवलेला!)
म्हसोपंत

म्हणूनच म्हणतो...

कम्युनिस्टांना सांगा की अंधश्रद्धा सोडा आणि चीनच्या मागे (तो कम्यूनिस्ट आहे म्हणून जास्त जवळ आहे) जाणे सोडा, कारण ते चलाखीने संपत्ती निर्माण करत आहेत आणि आपण मात्र बंगालमधे आपल्याच माणसांना मारत आणि त्यांचे दारीद्रय राखत फक्त बांगलादेशींच्या आयातीला आणि चीनच्या जवळील आपल्याच राज्यांना अस्थीर ठेवण्यास मदत करत आहोत.

तात्पर्यः एका व्यक्तीच्या अंधश्रद्धेने त्या व्यक्तीलाच जर झाला तर तोटा होतो, पण एखादी परकी (राजकीय) विचारसरणी पाळणार्‍या (देशी) संप्रदायाच्या अंधश्रद्धेमुळे एतद्देशीयांना आणि पर्यायाने सार्‍या देशालाच तोटा होऊ शकतो.

कृपया गैरसमज नसावा यात आपण मांडलेल्या अंधश्रद्धेचे समर्थन केलेले नाही, पण अंधश्रद्धेची व्यापक व्याख्या मांडली आहे.

बोधकथा

बोधकथा आवडली की नाही ते लिहीले असते तर बरे वाटले असते.
आपला
कॉ.विकि

आवडली, आवडली!

बोधकथा आवडली की नाही ते लिहीले असते तर बरे वाटले असते.

अहो बोधकथा नक्कीच आवडली आणि समर्पकही आहे. मला व्यंकटेश माडगूळकरांच्या "एका जागृक देवस्थानाचा जन्म" या कथेची आठवण झाली. ती वाचण्यासारखी आणि त्याची कॅसेट मिळाली तर (त्यांच्या खास शैलीत) ऐकण्यासारखी आहे कृपया आधीच्या माझ्या प्रतिक्रीयेवरून गैरसमज करून घेऊ नये.

फक्त अशा बोधकथांमधे फक्त "म्हसोबा", "पुजारी", "देव", "हिंदू" वगैरेच असल्या मुळे आणि असा गैरसमज होतो की "अंधश्रद्धा" ही फक्त हिंदूंचीच "मक्तेदारी" आहे. योग्य ठीकाणी त्यावर (हिंदू अंधश्रद्धेवर) टिका पण होणे महत्वाचे आहे आणि तशी मी ही करीन. पण मलातरी या उपक्रम सदस्यात कोणी अंधश्रद्धाळू असेल की त्याचे समर्थन करणारे असेल असे वाटत नाही. कोणी कौतूक करा असे म्हणत नाही पण उगाच स्वतःला झोडपून न्यूनगंड कशाला तयार करता? त्यात आपण हा लेख "राजकारण-समाजकारण" समुदाय मधे लिहीलात म्हणून मी त्याला अनुसरून उत्तर दिले.

त्याचा अर्थ इतकाच होता की जशी श्रद्धा ही फक्त देवाधर्मापुरती मर्यादीत नसून एखाद्या कार्यावरपण नितांत असू शकते (आणि तशी असावी ही) तसेच अंधश्रद्धा पण फक्त देव-धर्मवालचे एखादी मानसीक भिती तयार करून करतात असे नाही तर एखादी (कोणतीही) विचारधारा मानणारे त्यातील म्होरकेपण त्यांच्यातल्या भाबड्या अनुयायांचा उपयोग करून स्वतःच्या स्वार्थासाठी भिती तयार करून करतात. अंधश्रद्धेवर टिका करताना समाजातील सर्व थरातील सर्व धर्म, सर्व विचारधारा यांचा समावेश असावा इतकेच काय ते आमचे म्हणणे. कारण म्हसोबाचे डोळे काढले जातात पण स्वर्गसुखासाठी आत्मघात करणारे ज्या समाजात असतात त्यांना मात्र कोणी सुनावत नाही की आधी म्हणले त्याप्रमाणे राष्ट्रापेक्षा मृत झालेली अथवा समाजहितासाठी अयोग्य ठरलेल्या विचारधारांना मात्र बुद्धीवादी समजले जाते.

म्हणून, परत, थोडक्यात अंधश्रद्धा मग ती धार्मिक असो अथवा अधार्मिक तीचे परीणाम व्यक्तीगत जीवनावर अथवा संपूर्ण समाजावर होतात असे म्हणणे होते. कृपया यात व्यक्तीगत आरोप/हल्ला समजू नये, झालेच तर आपल्या "डोळस बुद्धीवादी विचारांना" चालना देण्याचा प्रयत्न समजावा.

धन्यवाद.

आवडली बोधकथा.

आवडली ना सेठ बोधकथा.आम्हाला वाटले त्या तात्पर्या वर चर्चा करायची आहे . ; )

अवांतर :-) शनिवार,रविवारी ,सर्वच उपक्रमी विकेंड साजरा करत असतील यावर आता आमचा विश्वास नाही,
कार्यालयातील कामकाज करताना, माहितीची देवाणघेवाण उत्तम करता येते,असे काही उपक्रमींचे मत असावे. ; )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
 
^ वर