चातुर्मास

नमस्कार मंडळी,
दिनांक २६.७.२००७ ते २१.११.२००७ म्हणजेच आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या चार महिन्यांच्या काळास 'चातुर्मास' असे म्हटले जाते.या काळात व्रत करुन पुण्यसंचय करण्याचा काळ.या चार महिन्यांच्या काळात शेषशायी भगवान विष्णू जलाशयात निद्रा घेतात असा समज आहे. या काळात हिंदू महिला-पुरुष अनेक व्रत-उपासना करतात. परंतु काळ बदलला आणि चातुर्मासाचे महत्वही कमी होत चालले . तथापि, अजुनही बरेच भाविक हिंदू या काळात शक्य तेवढी व्रत -उपासना करतात.
या विषयी 'संपूर्ण चातुर्मास ' वि.के.फडके याचा ग्रंथ वाचावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

चार महिन्यांची झोप? मजा आहे! :)

या काळात व्रत करुन पुण्यसंचय करण्याचा काळ.

अशो पण हल्ली पापं एवढी वाढली आहेत की व्रतं करून पुण्यसंचय करायला आमच्यासारख्यांना चार महिने पुरत नाहीत! चार महिन्यात साठवलेलं पुण्य पुढे लगेचंच खर्च होतं बघा! :)

या चार महिन्यांच्या काळात शेषशायी भगवान विष्णू जलाशयात निद्रा घेतात असा समज आहे.

आं? हा विष्ण्या लेकाचा चार महिने झोपा काढतो? मजा आहे बेट्याची! :)

आपला,
(चार महिने काहीही कामधंदा न करता मस्तपैकी झोपा कढणार्‍या विष्ण्याचा हेवा करणारा!) तात्या.

पण चातुर्मासात झोपेची मजाच वेगळी! :)

पण भगवान विष्णुशेठचं काही चूक नाही बघा!

एकतर चातुर्मासात छान पावसाळी हवा असते. वातावरणात सुखद गारवा असतो. सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं! सुंदर पावसाळी हवा, त्यात चातुर्मासात येणारे अनेक उपासतापास! विष्णूला मस्तपैकी बायकोच्या हातचं गरमागरम साबुदाण्याचं थालीपीठ, खिचडी, झकासशी दाण्याचं कुट घालून केलेले काकडीची कोशिंबीर, दाण्याची आमटी चापायला मिळत असेल :) ओहोहो.. काय विचारता मंडळी!

मस्तपैकी उपासतापास करायचे, उपासच्या पदार्थांवर ताव मारायचा, त्यात पुन्हा त्याची बायको वर छानसं केशर, बदामपिस्ते, चारोळी घालून केलेलं मसाला दूध विष्णूला देत असेल! :)

अहो अश्या सुंदर माहोलमध्ये विष्णूलाच काय, आम्हालाही छानशी झोप लागेल! :)

आपला,
(चातुर्मासप्रेमी!) तात्या.

एरिक व्हॉन डॅनिकेन

हे आमचे बाबा आहेत. (बाबा म्हणजे बुवाबाजीवाले बाबा! प. पू. तीर्थरुप नाहीत.)

बाकी, टग्यादादांचा आणि तुमचा येथील अवतारही सही आहे. :)))))) ह. ह.पु.वा.

रामभाऊ,

आपल्याला चर्चेतून नेमके काय अपेक्षित आहे ते खुलासेवार लिहा, म्हणजे इतरांनाही कळेल की काय अपेक्षित आहे. चू. भू. द्या. घ्या.


या प्रतिसादापुढील, सर्व प्रतिसादकर्त्यांचे विषयाशी संबंधीत नसलेले, संपादन मंडळाला अनावश्यक वाटणारे आणि कोणतीही अतिरिक्त माहिती न पुरवणारे प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत. सदस्यांना विनंती की त्यांनी विषयाला धरून प्रतिसाद द्यावेत आणि नवीन सदस्यांचा विरस होणार नाही हे पाहावे.

एरिक् व्हॉन डॅनिकेन

मी तुमच्याशी १०० टक्के सहमत. खरोखरीच अस्सल बाबा!
--वाचक्‍नवी

ब्रम्हदेवाची एक रात्र..

ब्रम्हदेवाच्या एक दिवसावरून नारळीकरांची मध्यंतरी म.टा. मधे वाचलेली मुलाखत आठवली. त्यातील खालील प्रश्नोत्तर पहा:

संशोधन करत असताना संतवाङ्मयात असे विज्ञानाशी संबंधित किंवा विज्ञानाला पूरक असे काही संदर्भ मिळाल्याचं आढळलं का ?

- हो! विश्वाचं वय किती याचा हिशोब लावताना ' ब्रह्मादेवाची एक रात्र ' या कोष्टकाचा संदर्भ उपयोगी पडला. त्यात सांगितलेला हिशोब तंतोतंत जुळतो. आपल्याकडच्या वाङ्मयात असे काही काही संदर्भ लागत जातात. म्हणूनच मी भागवत , विष्णूपुराणातील संदर्भ चाळत असतो.

अरे..रे...रे

हा उपक्रम या साठी आहे का?

चातुर्मास

प्रियाली
चर्चेतून चातुर्मास बद्दल नवीन माहिती मिळावी, ज्यांना चातुर्मास बद्दल माहिती नाही त्यांना माहिती मिळावी हि अपेक्षा.

रामभाऊ !

चातुर्मास चे काय झाले ? तुम्ही माहीती देणार होता का येथे ? नाही काहीच प्रगती झाली नाही त्यामुळे विचारत आहे !

राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.

चातुर्मास

राज ,
आपणास चातुर्मास बद्दल कोणती माहिती हवी आहे. वर दिलेली माहिती या मध्ये चातुर्मास बद्दल माहिती दिलेली आहे.

 
^ वर