तर्कक्रीडा :४०: पंपुशेटचे औदार्य

पैसा ही काही प्रेक्षणीय वस्तू नाही.पण काही जणांना पैसे पाहून आनंद होतो.काही जण बँकबुके आणि एफ्.डी. पावत्यांवरील आकडे पाहूनही सुखावतात.तर काही नोटा मोजताना हर्षभरित होतात. पण पंपुशेटची गोष्ट वेगली आहे.
...पंपुशेट जवळ तीन थैल्या आहेत. एका थैलीत त्याने एक रुपयाची नाणी साठवली आहेत.दुसरीत दोन रुपयांची. तर तिसरीते पाच रुपयांची.प्रतिदिनी तो एका थैलीतील नाणी मोजतो.तेव्हा होणारा छन् छन् आवाज ऐकून तो आनंदित होतो.
...एके दिवशी पंपुशेटला उपरती झाली.(त्याला कारणही तसेच घडले. पण विस्तारभयास्तव ते लिहित नाही.) त्याने सेवकाला हाक मारली.त्या तीन थैल्या घेऊन ते एका वसतिगृहात आले.तिथे अभ्यासिकेत काही विद्यार्थी वाचत बसले होते.पंपुशेट म्हणाला,

"विद्यार्थी मित्र हो,मी या तीन थैल्या आणल्या आहेत. एकीत १ रु.ची चारशे पन्नास (४५०) नाणी आहेत.दुसरीत २ रु.ची तीनशे अठ्ठेचाळीस (३४८) नाणी आहेत. तर तिसरीत ५ रु. ची दोनशे एकोणतीस (२२९) नाणी आहेत.प्रत्येक थैलीतील नाणी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांत समसमान वाटून घ्या.उरतील ती या माणसाला द्या. त्याने या जड थैल्या उचलून आणल्या आहेत."

.....एक विद्यार्थी पुढे आला. त्याने १ रु. ची नाणी समसमान वाटली. काही नाणी राहिली.(विद्यार्थिसंख्येपेक्षा कमी.) ती त्या माणसाला दिली. नंतर २ रु.ची नाणी वाटली. काही नाणी उरली. माणसाला दिली. शेवटी ५रु. च्या नाण्यांचे समान वाटप केले. काही नाणी उरली. माणसाला दिली.प्रत्येक वाटपा अखेर उरणार्‍या नाण्यांची संख्या समान होती. म्हणजे जितकी १ रु. ची उरली तितकीच २रु.ची आणि तितकीच ५ रु. ची. तरः
प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण किती रुपये मिळाले? थैलीवाहकाला किती रुपये मिळाले?

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तर

व्य नि ने पाठवले आहे

तर्क.४०:पंपुशेट

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मीरा फाटक आणि आवडाबाई या दोघांची उत्तरे आली. ती अचूक आहेत. मात्र अपेक्षित अशी रीत दिली नाही.वस्तुतः ट्रायल- एरर ची आवश्यकता नाही.

हं!

हल्ली काही टॅलेंटच राहीले नाही हो...
आधी कसे भरघोस प्रतिसाद असायचे या क्रिडेला... हल्ली काही येत नाहियेत...

असो...आपण काय करणार....
आपल्याला देवाने फक्त दंड, खांदा गुडघाच दिलाय बॉ! त्यामुळे हे काही जमत नाही... ;)

आपला
(गुडघ्यातला)
गुंडोपंत तालिमवाले

योग्य निरीक्षण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गुंडोपंत ,
" आधी कसे भरघोस प्रतिसाद असायचे या क्रीडेला... हल्ली काही येत नाहियेत " हे आपले निरीक्षण अगदी योग्य आहे.
मात्र " हल्ली काही टॅलेंटच राहीले नाही हो..." हा आपला निष्कर्ष पटण्यासारखा नाही. त्याच त्याच प्रकाराला लोक कंटाळतात.सतत काहीतरी नवीन हवे असते असे म्हणता येईल.

तर्क.४०: उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. प्रमोदकाका यांनी उत्तर पाठविले आहे. ते अगदी बरोबर आहे. त्यांचे अभिनंदन!

कोडी

कोड्याच्या काठिण्याप्रमाणे येणार्‍या प्रतिसादांची संख्या बदलत जाते. तसेच व्य् नि ने उत्तरे पाठवली जात असल्याने प्रतिसाद जास्त दिसत नाहीत. तसेच आधी ज्या क्रिडांना भाराभार प्रतिसाद होते त्यातले बरेच उपक्रमावरील काही विषयांतर महारथींच्या कृपेने होते असेही वाटते.
(तर्कक्रिडांचा कंटाळा येऊ शकतो या विधानाशी असहमत.)

सहमत

यनावालांची कोडी हा उपक्रमाचा यूएसपी आहे.

पंपुशेट

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.दिगम्भा यांनी कोड्याचे अचूक उत्तर पाठविले आहे. तसेच त्यांनी योग्य अशी रीतही लिहिली आहे.

तर्कक्रीडा ४०:पंपुशेटचे औदार्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या अंकगणितातील प्राथमिक क्रिया आहेत.यं संबंधी काही नियम आहेत. त्यांतील एक असा:

दोन संख्यांना जर तिसर्‍या एका संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्यांच्या बेरजेला तसेच वजाबाकीला त्या तिसर्‍या संख्येने पूर्ण भाग जातो.(इथे केवळ धनपूर्णांक संख्यांचाच विचार आहे )

....या कोड्यात :समान वाटपा नंतर उरलेल्या प्रत्येक प्रकारच्या नाण्यांची संख्या समजा 'स'.तर
(४५०-स), (३४८-स), (२२९-स) या संख्यांना विद्यार्थिसंख्येने नि:शेष भाग जाणार.समजा,
.....म= (४५०-स)
.... न = (३४८-स)
.....प =(२२९-स)......इथे म,न,प विद्यार्थिसंख्येने विभाज्य.
म्हणूनः (म-न)=४५०-३४८=१०२=१७*६
...........(म-प)=४५०-२२९=२२१=१७*१३
............(न-प)=३४८-२२९=११९=१७*७
समाईक विभाजक १७ ही विद्यार्थिसंख्या. तसेच स=८. आता उर्वरित उत्तरे काढणे सोपे आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाले १३१ रु., थैलीवाहकाला ६४रु.

 
^ वर