रिक्षासंदेश

मुंबईतल्या मराठी रिक्षांवरचे संदेश मनोरंजक असतात. पण मला आता अाठवेनासे झाले आहेत. "येता की जाऊ?" खेरीज काही आठवत नाही. तर ते इथे लिहावेत ही विनंती. मीटरवरचे "हात नको लाऊ" ह्या आशयाच्या संदेशांचा उपविषय होऊ शकेल.

ट्रकवाल्यांच्या विनोदबुद्धीत मराठीपणा नाही. त्यामुळे horn OK please, मेरा भारत महान, आणि "बुरी नजरवाले..." ह्यांपलिकडे दिसतो तो बहुधा उत्तर भारतीय विनोद. "मालिक की जिंदगी विस्की और केक, डायवर की जिंदगी स्टेरिंग और ब्रेक" ... वाः! शायरी नुसती ओसंडून वाहते आहे. एकदाच एक खराखुरा शेर बघितला, तो सुप्रसिद्ध. रफ़ीकोंसे रक़ीब अच्छे, जो जलकर नाम लेते हैं / गुलोंसे ख़ार हैं बेहतर, जो दामन थाम लेते हैं. आहा. लगेच खाली, बुरी नजरवाले तेरा मुँह काला!

बसवर कुणाला काही रंगवण्याचे स्वातंत्र्य नाही. "बेस्ट"ची कमाल म्हणजे:

कृ योग्य भाडे द्या
तिकीट मागून घ्या
या आपले तिकीट तपासून पहा

वा. काय बेस्ट कॉमेडी आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

सामानाची नोंद

१. आपल्या सामानाची जबाबदारी आपण स्वतः घ्यावी, चालक जबाबदार राहणार नाही.

२. रात्री १२ ते पहाटे ५.३० मीटर रिडींगच्या दिडपट भाडे पडेल.

घट्ट धरून

अजून एक संदेश आठवला..
कृपया घट्ट धरून बसावे.

मस्तच! :)

कृ योग्य भाडे द्या
प तिकीट मागून घ्या
या आपले तिकीट तपासून पहा

हे बाकी मस्तच! :)

मुंबईच्या बी ई एस टी च्या बशींमधून जगन्नाथा तू बराच हिंडलेला दिसतोस! :)

काही ट्रकांच्या मागे, विशेष करून रिक्षांच्या मागे

'आईबाबांचा आशीर्वाद'
'अण्णांचा/तात्यांचा आशीर्वाद'

असे लिहिलेले असते.

बहुदा अण्णा किंवा तात्या ही त्या रिक्षावाल्याच्या घरातील पितळी तांब्यामधली कोणीतरी बुजुर्ग मंडळी असावीत! :)

काही रिक्षांच्या मागे,

नितीन, सुरेश, सपना, रुपाली

या टाईपची नावे असतात. बहुदा ही त्या रिक्षावाल्याची मुले असावीत! :)

असो..

बाकी जगन्नाथा, तुझा चर्चाप्रस्ताव छानच आणि माहितीपूर्ण होईल असे वाटते! :)

तुझा,
(स्टेजवरचा पितळी तांब्या) तात्या.

'आईबाबांचा आशीर्वाद'

वा: . . . बघूनच मुंबईची आठवण आली . . .

पुण्याचे बोर्ड

आणि एक

बहुतेक रिक्षांच्या मागे 'मुलगी शिकली प्रगती झाली ' हे वाक्य लिहीलेले आढळते.
आपला
कॉ.विकि

पुणे स्पेशल

"अरे माणसा माणसा कधी होशील माणूस"

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

पुणे स्पेशल

हल्ली रिक्षाच्या 'आतमध्ये' नव्याने दिसायला लागलेले एक स्टिकर-
"ए रिक्षा म्हणू नका, ओ रिक्षावाले काका म्हणा"

रिक्शा सन्देश्

मुम्बइ तला अजुन एक रिक्शा सन्देश आहे

आइचा आशिर्वाद अनि बाबाचा प्रोविडड फण्ड

हा हा

हा सही आहे !!

हे रिक्षावाले चालवताना तिरके का बरे बसतात?

हे रिक्षावाले चालवताना तिरके का बरे बसतात?
हाच प्रश्न मी एकदा एका रिक्षावाल्याला विचारला तर म्हणतो 'सर्वच बसतात आता मी जर सरळ बसलो तर मला येडचाप समजून कोणी कट मारून जायचा...'

हेमंत

 
^ वर