अमेरिकन काँग्रेसमधील ठराव
H. Con. Res. 139: Expressing the sense of the Congress that the United States should address the ongoing problem of...
काल वाचनात आले की अमेरिकन काँग्रेसने भारताने अस्पृश्यता निवारणासाठी सक्रीय होण्यावरून आणि त्या विषयाची अमेरिकन् काँग्रेसला काळजी वाटते अशा आशयाचा ठराव संमत केला. संपूर्ण ठराव आपण आधीच्या वाक्यातील दूव्यावर टिचकी मारून वाचू शकता.
अस्पृश्यता ही मनापासून सर्वत्र भारतातून आणि भारतीयांतून जायला हवी हे जितके मान्य आहे तितकाच एका राष्ट्राने दुसर्या राष्ट्राने त्यांच्या अंतर्गत बाबी कशा हातळाव्या ह्या विषयी असा ठराव आणणे हे खोडसाळपणाचे वाटले. असा ठराव ते ना धड सौदी अरेबियाबद्दल (स्त्रीया आणि इतर धर्मीयांना मिळनारी वागणूक) या विषयी करू शकतात ना चीन बद्दल. स्वतः अमेरिकेत काय अजूनही चालू आहे यावर गोष्टी लिहीता येऊ शकतात. अर्थात कायद्याने सर्व उत्तमच आहे, पण तसे काय आपल्याकडेपण घटनेने अस्पृश्यतेवर स्वातंत्र्यापासून बंदी आणली आहे आणि अनेक जण त्यावर काम करत आहेत.
मला वाटले की आत्ता अणूकरार होत असताना काही लोकांना जर पोटशूळ होत असेल तर तो थांबवण्या करता म्हणून हा ठराव आणला असावा. आपल्या सरकारने पण "तुम्ही ढवळाढवळ करायचा प्रश्न नाही" या अर्थी काही प्रतिक्रीया देल्याचे वाचण्यात तरी (कालपासून) आले नाही.
Comments
जाने दो
ढवळाढवळ अशी नाही ती. सगळ्या देशाची रया गेलेली आहे. आपल्याला नैतिक भूमिका घेता येते ह्यावर स्वतःचाच विश्वास उडालेला आहे. म्हणून मधूनमधून असलं काहीतरी करतात. गेली चाळीसपन्नास वर्षं आपण जगभर aidची खिरापत वाटतो असा उगाचाच भ्रम झाला होता, तोही गेला. हे ख्रिश्चन धर्माचं असं झालेलं आहे. पापांचा घडा भरतो आहेसं वाटल्यावर लगेच स्वतःला दिलासा देणारी भंकस दिखाऊ गोष्ट करणं, हे जिकडेतिकडे चालतं. श्याट्पण होणार नाही. झालंच तर थोडे पैसे पाठवतील, आपल्या आधुनिक जागतिकीकृत कार्पोरेशन्सना खायला. ह्याला खोडसाळ म्हणण्याइतके ढ राजकारणी भारतात असतील असं वाटत नाही.
(ज्यांना राजकारणातलं ओ का ठो कळत नाही ते अभियंते होऊन श्यालोआल्टोला राहायला गेले असं ऐकतो ... )
राधासुताचा धर्म
"तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?" हा प्रश्नच मुळात संदर्भाला सोडून आहे.
किंबहुना मूळ महाभारतातच कर्णावर केलेले आरोप प्रक्षिप्त असावेत असे मला वाटते.
केवळ अर्जुन या नायकाची भलावण करण्यासाठी हे प्रसंग त्यात घुसडले असावेत असे वाटते.
आणि त्याच कर्णाला , "... अशी कोमलांगी द्रौपदी तुझी भार्या होईल" ही लाच देऊन पांडवांकडे
वळवण्यासाठी हाच भगवान श्रीकृष्ण गेला होता हाही भाग प्रक्षिप्त आहे असेच मला वाटते.
असो. विषयांतर पुरे.
इतर कोणताही देश जेंव्हा परक्या देशाबद्दल निषेधाचा ठराव करतो तेंव्हा तो केवळ आपले मत
व्यक्त करतो.
अमेरिकेचे तसे नाही. केवळ मत प्रदर्शन करून ती थांबत नाही. अशा ठरावावर कारवाई करणे
हे तिचे जणू कर्तव्यच आहे असे ती (म्हणजे तिचे सरकार) मानते.
अमेरिकेच्या मदतीने अनेक ख्रिस्ती मिशनरी भारतात "अस्पृश्यांचे संरक्षण" करतच आहेत.
तेंव्हा आता अमेरिकेचे सी.आय्.ए. आणि जरूरच पडली तर सैन्यही भारतातील अस्पृश्यांचे संरक्षण
करायला भारतात उतरणार काय? - अशी शंका मनाला येते. कारण आपण दिलेल्या प्रत्येक
उदाहरणात आणि इतरही अनेक वेळी अमेरिकेने तसेच केले आहे.
(मन चिंती ते वैरी न चिंती)
भारतातील अस्पृश्यता सर्वस्वी निंदनीय आहे हे पूर्णपणे मान्य. पण त्यात अमेरिकेचा हस्तक्षेप कशाला?
त्यांना इतकाच जर अस्पृश्यांचा पुळका आला असेल तर भारतातील सार्या अस्पृश्यांना ते घेऊन का जात नाहीत त्यांच्या देशात?
(किंवा इथल्याच एका चर्चेप्रमाणे-) अस्पृश्यांवर अन्याय करणार्या समस्त स्पृश्य समाजाला अमेरिकेने अमेरिकेत घेऊन जावे म्हणजे
साप मरे और लाठी भी न टूटे.
ह. घ्या.
विपर्यास
लमाण जी:
विपर्यास करत बोलायच्या आधी काही गोष्टी ध्यानात ठेवा: भारतीय जनमानासातून सर्वत्र (अपवाद वगळल्यास) जरी अस्पृश्यता नाहीशी झाली नसली तरी कायद्याने अस्पृश्यता वगैरे पाळणे याला बेकायदेशीरच आहे. अर्थात सरकारी पातळीवर, राजकीय पातळीवर आणि सामाजीक चळवळींच्या पातळीवर अस्पृश्यता अमान्य केली गेली आहे. अनेक शतकांचा हा रोग संपूर्ण बरा होण्यासाठी स्वातंत्र्यानंतर एक शतकभर वेळ लागला तरी आश्चर्य वाटायला नको. (म्हणून तेंव्हा पासून सावरकर आंतर्जातीय विवाहांना प्रोत्साहन द्या म्हणून उच्च वर्णीयांसमोर ओरडत होते).
थोडक्यात जो काही प्रश्न आहे तो "स्टेट स्पॉन्सर्ड" नाही आहे. दोन देशांचे संबंध हे राजनैतीक पातळीवरचे असतात. उद्या अमेरिकन काँग्रेसने ठराव केला की स्वतःच्या लोकांना वीज पुरवता येत नाही, कर्जाचे डोंगर उभे केलेत आणि तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाला ५०लाख डॉलर्स कसे देतात. ह्याचा आम्ही निषेध करतो. तर हे राजनैतीक पातळीत बसणारे आहे का? तर अर्थातच नाही. तो देणे हा त्या मुख्यमंत्र्यांचा आणि घेणे हा बृहनमहाराष्ट्र मंडळाचा प्रश्न आणि नैतिकता आहे. त्या मधे अमेरिकन काँग्रेसच काय तत्वतः पंतप्रधान् मनमोहनसिंगपण काही करू शकणार नाही! अथवा कट्रीना नंतर भारतीय संसदेने अमेरिकेतील कृष्णवर्णियांची काळजी वाटणारा आणि बुश सरकार काही करत नाही म्हणणारा ठराव केला असता तर यांना चालेल का? तेंव्हा या अमेरिकन राधासुताच्या धर्माची काळजी वाटली का आपल्याला?
राहता राहीला आपण उपस्थित केलेल्या उदाहरणांचा प्रश्न: त्याला सरसकट उत्तर असे आहे की ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा/सार्वभौमत्व अथवा आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि स्थैर्य धोक्यात येईल अशा संदर्भात एखाद्या देशा विरुद्ध एखाद्या देशाला अणि जगाला ओरडण्याचा हक्क आहे.आणि गंमत म्हणजे आपण उल्लेखलेल्या बर्याच उदाहरणात अगदी (सुरवातीस) हिटलरच्यापण, अमेरिका गप्प बसली (इतकी की पळून आलेल्या ज्यूंचे जहाज परत जर्मनीस पाठवले).
अमेरिकन काँग्रेसचा ठराव जर नीट वाचला तर लक्षात येईल की ख्रिस्ती मिशनर्यांना USAID funding मिळवण्यासाठी पळवाटा तयार होत आहेत. आपल्याला माहीत असेलच की जगभरात सर्वात जास्त ख्रिस्ती मिशनरी हे अमेरिकेतून जातात आणि त्यांना पैसे पण सर्वात जास्त अमेरिकेतून जातात. ते जेंव्हा भारतात येतात तेंव्हा नुसता रिलीजन घेऊन येत नाहीत तर त्याबरोबर फुटीरता पण आणतात आणि म्हणून हा राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून हा ठराव अयोग्य आहे.
तर अशा या अमेरिकन काँग्रेसच्या वागण्याला नाक खुपसणे म्हणतात. आपल्याला हे माहीत आहे पण उगाच वाद काढत आहात झाले!
अंतर्गत बाबी
१. पाकिस्तानाने मदरशांमध्ये कसे शिक्षण द्यावे, मुल्ला मौलवींच्या जहाल इस्लामला खतपाणी द्यावे की नाही, ही पाकिस्तानची अंतर्गत बाब.
२. सुदान ने डारफर भागात जंजावीदांना तेथे अत्याचार करण्यास पाठबळ पुरवणे ही सुदानची अंतर्गत बाब.
३. ब्रह्मदेशाने नोबेल पुरस्कार विजेत्या लोकशाहीवादी आँगसँगसूकी ह्यांना कैदेत ठेवणे, ही ब्रह्मदेशाची अंतर्गत बाब.
४. तमीळ जनतेला सर्वसामान्य अधिकार नाकारणे ही श्रीलंकेची अंतर्गत बाब.
. . .
अाजकाल असल्या फॉर्म्युल्याची वक्रोक्ती असलेले "टॉक शोज" अमेरिकतले बेवडे सुद्धा ऐकत नाहीत.
स्टेट-स्पॉन्सर्ड
भारतातील अस्पृश्यता स्टेट-स्पॉन्सर्ड आहे की नाही ? आपल्याला काय वाटते ?
उत्तरः नाही.
प्रतिक्रीया: आपण म्हणता तसा ह्या चर्चेचा हा मूळ विषय नाही(भारतातील अस्पृश्यता स्टेट-स्पॉन्सर्ड आहे की नाही ?). आपण दिलेल्या "अंतर्गत बाबी" या प्रतिसादातील उदाहरणांमुळे की ज्यांना "स्टेट स्पॉन्सर्ड" म्हणता येईल आणि जेथे अमेरिकेने दुर्लक्ष केले त्यामुळे हा उप-विषय या चर्चेत चालू झाला. आपण दिलेल्ल्या उदाहरणांचा आणि या चर्चेचा संबंध आहे असे अजून वाटते का? जरा समजावून सांगीतले तर बरे होईल की नक्की यात राधासुताचा धर्म कोणता ते..
धन्यवाद
बादरायण्...
स्टेट स्पॉन्सर्ड टेररीझमची अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटची व्याख्या बघा ज्यात आपण दिलेली उदाहरणे बसतात. पण ज्या मधे अमेरिकन धोरणे ही थोडा-फार वेळ निष्क्रीय राहीली कारण तसे राहणे त्यांच्या त्या त्यावेळच्या फयद्याचे होते म्हणून
१. पाकिस्तानाने मदरशांमध्ये कसे शिक्षण द्यावे, मुल्ला मौलवींच्या जहाल इस्लामला खतपाणी द्यावे की नाही, ही पाकिस्तानची अंतर्गत बाब. - स्वतःची लोकं मरत असून अमेरिकेने बिलीयन्स डॉलर्स दिले, शस्त्रास्त्रे दिली.
२. सुदान ने डारफर भागात जंजावीदांना तेथे अत्याचार करण्यास पाठबळ पुरवणे ही सुदानची अंतर्गत बाब.- फिडेलीटी सारख्या कंपन्यांनी पैसे गुंतवले म्हणून आर्थिक स्वार्थाकडे बघून कदाच्।ईत हीटलरपेक्षाही निर्घृण हत्याकांड चालू असून अमेरिकेने दुर्लक्ष केले. आता ब्रिटीश पंतप्रधानाला थोडे का होईना इराकच्या (स्वतः करत असलेल्या चुकांच्या) बाजूने ठेवताना थोडेसे काहीतरी करणे मान्य केले.
३. ब्रह्मदेशाने नोबेल पुरस्कार विजेत्या लोकशाहीवादी आँगसँगसूकी ह्यांना कैदेत ठेवणे, ही ब्रह्मदेशाची अंतर्गत बाब.- पुन्हा तेच दुर्लक्ष - नाही म्हणायला या देशाबरोबर (जर बरोबर आठवत असेल तर) व्यवहार करत नाहीत.
४. तमीळ जनतेला सर्वसामान्य अधिकार नाकारणे ही श्रीलंकेची अंतर्गत बाब.- अमेरिकेने काय केले माहीत तरी नाही. कॅनडाने निदान विस्थापितांना घेतले.
५. पुटीन चे अनेक शत्रू पत्रकार विषप्रयोगाने अचानक मेले, ही रशियाची अंतर्गत बाब - हि अंतर्गत बाब म्हणणे चुकीचे आहे कारण दुसर्या स्वायत्त राष्ट्रात जाऊन हा "राडा" केला गेला होता.
६. तिएन्मन् चौकात अनेक आंदोलनकारी विद्यार्थ्यांची हत्या, ही चीनची अंतर्गत बाब.- परत अमेरिकेने (मोठ्या बूशच्या काळात) त्यावेळी जे कोणी चीनी आले त्यांना सरसकट विस्थापीत मानून लगेच ग्रीन कार्ड दिले पण बाकी दुर्लक्ष कारण कंपन्यांचे हितसंबंध.
७. वर्णभेद ही दक्षिण आफ्रिकेची अंतर्गत बाब.- अमेरिकेने कधीच "ऍपर्थाईड" जाण्यासाठी दबाव आणला नाही की मंडेलाला सोडण्यासाठी प्रयत्न केले नाहीत - कारण यांच्या धंद्याच्या मधे येत होते.
८. बोस्निया-हर्जगोव्हिना येथील मुस्लिमांचा सर्बियाने केलेला छळ, ही बोस्नियाची अंतर्गत बाब. - उशीरा का होईना पण क्लिंटन असताना या बाबत शहाणपण सुचून लाखो निरपराध मेल्यावर लष्करी मदत पाठवली.
९. हीटलरने केलेला ज्यूजचा नरसंहार, ही जर्मनीची अंतर्गत बाब.- आधी म्हणल्याप्रमाणे यातही अमेरिकेने सुरवातीस मदत केली नाही.
जरा डोळे तिरके करून बघितले, तर अण्वस्त्र निर्मिती हीदेखील (जोवर ती अस्त्रे देशाची सीमा पार करत नाहीत तोवर) देशाची अंतर्गत बाबच म्हणाल का ? अंतर्गत बाब नक्कीच नाही. म्हणूनच तर भारताची आजही भुमीका अशीच आहे की अण्वस्त्रांवर जागतीक बंदीच हवी, त्यात आहेरे नाहीरे प्रकार असता कामा नये. आहे का मान्य तुम्हाला? तत्कालीन पंतप्रधान नरसिंहवरावांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेपुढे भाषणात यावरून चांगले सुनावले होते.
अस्पृश्यताविरोधी कायदे करूनही त्यांची सरकारने कठोर अंमलबजावणी केली नाही, तर अस्पृश्यता ही स्टेट स्पॉन्सर्ड आहे, असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. या पद्धतीने रॉडने किंग्ज ते कट्रीना असलेल्या अमेरिकेत पण आजही स्टेत स्पॉन््सर्ड वंशवाद आहे असे आपण म्हणणार असाल तर हा युक्तीवाद मान्य करतो. नाहीतर आपले शब्द बापूडे केवळ वारा असे समजून थांबतो.
जगन्नाथराव
असले प्रतिवाद आजकाल भारतातल्या सुद्न्यासमोर टीकत नाहित.लमानरावान्चे सर्व मुद्दे योग्य आहेत् .इथलि चर्चा बेवड्यान्समोर चालत नाही याचे भान असु द्यावे.
राहवत नाही
म्हणून लिहीते आहे. सध्या भारतवारीवर असल्याने इथे येणे तसे कमीच होते.
भारतातील अस्पृश्यता ही स्टेट स्पाँन्सर्ड असल्यास अश्या भारताशी राजनैतिक संबंध ठेवायची गरज अमेरिकेला आहे असे वाटत नाही किंवा जर असे एखादा (कोणताही) देश किंवा राज्य करीत असेल तर अश्या राज्यांत किंवा देशांत अमेरिकेने गुंतवणूक करायची गरजही नाही.
अजून एक म्हणजे अमेरिकन ठरावात अमेरिकेचे हित कशात आहे ते सुचवले आहे. भारताने (पर्यायाने भारतीयांनी) आपले हित कशात आहे हे बघावे म्हणजे झाले. भारताचे हित आज अनेक गोष्टींत आहे - दलितांना त्यांच्या सध्याच्या अवस्थेतून बाहेर काढण्यात ते आहे, आपली कार्यक्षमता वाढवण्यात आहे आणि इतर देखील बर्याच गोष्टींत आहे. ते बघावे आणि त्या दृष्टीने जे जमतील ते प्रयत्न करावे हा सर्वांना न मागता दिलेला सल्ला.
चित्रा
नरसिंहराव
आत्ता "१२३ करार" चर्चेत सावरकरांचा संदर्भ देत असताना मला तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावांनी अमेरिकेच्या संयुक्त सभेपुढे (सिनेट-काँग्रेस) जे उत्तर दिले ते परत आठवले. आधी लिहीले नसल्याने ते खाली लिहीत आहे. त्या उत्तराचे तात्पर्य येथे पण लागू होते:
एकदा एक माणूस गांधीजींकडे आला आणि म्हणाला की माझ्या मुलाला काहीतरी सांगा, तो फार साखर खातो. णंधीजी म्हणाले की महीन्याने ये. तो मुलाला घेऊन परत महीन्याभराने आश्रमात गेला, तेंव्हा गांधीजी त्या मुलाला म्हणाले "बाळ जास्त साखर खात जाऊ नकोस". त्यावर त्या माणसाला आश्चर्य वाटले आणि त्याने विचारले की "एव्हढेच बोलणार होता तर ते महीन्यापूर्वीच का नाही सांगीतलेत?" गांधीजी त्याला म्हणाले की, "महीन्याभरापुर्वी मी पण खूप साखर खात होतो. आधी मी स्वतः कमी केले आणि स्वाचरण केल्यावर त्याला सांगीतले."
अमेरिकन लोकप्रतिनिधी गप्प बसले...
तळटीपः ही गोष्ट वास्तवीक रामकृष्ण परमहंसांची असून त्यात मुलगा गूळ खायचा आणि त्यामुळे त्याल त्रास होयचा तरी पण आवडीने अ़ऊन खायचा. कदाचीत इथल्या लोकांना समजणार नाही म्हणून रावांनी त्यात रामकृष्णांच्या ऐवजी गांधीजींचे नाव घेतले असावे.