पाऊस आणि मुंबई
मी २६ जुलै २००५ आणि २७ जुलै २००७ या दोन्ही वेळेस पावसात अडकलो आहे. २६ जुलै २००५ च्या पावसानंतर चार दिवसानंतर लोक कामाला जायला निघतात. इकडे ट्रेन सुरळीत चालू होत नाही तरी प्रचंड गर्दीत ही, १-१ तास ट्रेन उशिरा ने ही धावत असतील तरी हि लोक लटकत लोंबकळत आपल्या ऑफिस पर्यंत गेली होती. मी विचार करतो कशासाठी हे सगळं. मी २६ जुलैला कुलाबा ते विक्रोळी पायी प्रवास केला आहे या प्रवासात लोक किती थकली होती हे दिसत होते तरीही चार पाच दिवसा नंतर पुन्हा कामाला. कालच्या पावसात भांडूप ते मुलुंड पायी प्रवास केला सगळी कडे पाणीच पाणी झाले होते आज सकाळी हि पाऊस पडतच होता अश्या परिस्थितीत हि आज भरपूर लोक कामाला जाताना दिसले.
बंद झालेल्या ट्रेन कुठे सुरळीत रुळावर चालू होत नाही तरी हि काही लोक कामावर जाण्यास उत्सुक. या वेळी काही वाटत नाही पण २६ जुलैच्या पावसानंतर काही जणांनी ट्रेनमध्ये चढायला देत नाही म्हणून ट्रेन काय थांबवलेली आणि लोकांच्या पायावर काठ्या काय मारल्या होत्या.अश्या परिस्थिती नंतर हि लोकांना कामावर जायचं आहे याला काय म्हणायचं मुंबईच स्पिरिट ? की लोकांनी पोटासाठी त्यांनी केलेली धडपड ? काही दिवस सगळं सुरळीत होई पर्यंत शांत घरी बसले तर काय बिघडेल. एका संकटातून बाहेर यायचं आणि दुसऱ्या संकटात स्वतःला झोकून द्यायचं या मागे लोकांची मानसिकता काय असेल ?
Comments
पावसाची सुट्टी
>>मी २६ जुलैला कुलाबा ते विक्रोळी पायी प्रवास केला आहे या प्रवासात लोक किती थकली होती हे दिसत होते तरीही चार पाच दिवसा नंतर पुन्हा कामाला.
सरकारने सुट्टी जाहीर केली होती का की पुढचे दहा दिवस येऊ नका हापिसात. नसेल तर लोक जाणारच दुसर्या दिवशी ऑफिसात. त्यांना कामं असतात... तिथून उपक्रम न्याहाळायचं असतं.. ह्. घ्या. पण काही मंडळी आपला कार्यालयीन वेळ इथेच काढतात हे दिसतं, मला काय करायचयं म्हणा... ते देशाचं नाव उज्वल करतात.
२६ जुलैच्या पावसानंतर मुंबई ठप्प होती ना, मग एवढी गर्दी कुठून यायला की पायावर काठ्या मारल्या? तुमचा अनुभव असा असेलही, वेस्टर्न रेल्वेला मला नाही आला असा अनुभव. काठ्या कुठल्या स्थानकात मारल्या ते सांगा राव!
- राजीव.
मुंब्रा
ट्रेन ठाण्याला थांबवलेली आणि लोकांच्या पायावर काठ्या मुंब्राला मारल्या होत्या त्यावेळी गाड्या मुंब्रा स्टेशनवर थांबत नव्हत्या माझा मित्र ज्या गाडीमध्ये होता तेव्हा ट्रेनमध्ये प्रचंड गर्दीमुळे
चढायला देत नव्हते म्हणून हा प्रकार केला मुंब्रावाल्यांनी. त्यावेळी सर्व धिम्या गाड्यांचे ट्रेक कल्याण ते ठाणे दरम्यान खराब झाले होते आणि जलद गाड्यांच्या ट्रेकवरुन गाड्या सोडण्यात येत होत्या.