तर्कक्रीडा:३९: नातीगोती

नात्यांवर आधारित काही कोडी आपल्या परिचयाची असतील.
.....उदा.१:एक स्त्री एका पुरुषाकडे अंगुलिनिर्देश करून म्हणते:" याचा बाप ज्याचा सासरा, त्याचा बाप माझा सासरा."तर त्या दोघांचे नाते काय?
.....उदा.२: एक माणूस एका फोटोकडे बोट दाखवीत म्हणतो: "ब्रदर्स ऍण्ड सिस्टर्स आय हॅव नन् ,धिस मॅन्स् फादर इज माय फादर्स सन." तर ' धिस मॅन ' त्या माणसाचा कोण?
आता हे कोडे अधिक गुंतागुंतीचे आहे.

एका उद्यानातील बाकावर मी बसलो होतो.दोन स्त्रिया माझ्या समोरच्या बाकावर येऊन बसल्या.दोन लहान मुले मधल्या हिरवळीवर खेळू लागली. त्या दोघी अत्यंत सुस्वरूप होत्या.त्यांच्याकडे पाहून त्यांच्या वयाची कल्पना येत नव्हती.
मी त्या मुलांची आणि स्त्रियांची विचारपूस केली.तेव्हा त्यांतील एक स्त्री म्हणाली :
...."मी मेनका. ही तिलोत्तमा.तो रवी.तो शशी. हे दोघे आमचे मुलगे (पुत्र) आहेत.हे दोघे आमचे नातूही आहेत. तसेच हे दोघे आमचे दीरही (पतीचा बंधू) आहेत. अर्थात माझा एक,हिचा एक. सर्व नातेसंबंध सामाजिक नीतिनियमांना आणि प्रचलित रूढींना धरून आहेत. धर्मबाह्य असे काहीही नाही. रक्ताच्या नात्यातील विवाहसंबंध नाहीत.पुनर्जन्माची भाकडकथा नाहीं. नाती चुलत, मावस,मामे, अशी नाहीत.तसेच केवळ मानलेली नाहीत. खरी आहेत.
तर हे कसे शक्य आहे? याचे सुसंगत विवरण द्यावे.

(कृपया उत्तर व्यनि . ने )

लेखनविषय: दुवे:

Comments

नातीगोती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
१/ मीरा फाटक यांनी तीनही कोड्यांची उत्तरे पाठविली.ती सर्व बरोबर आहेत.त्यांचे विशेष अभिनंदन!
२/ श्री.वाचक्नवी यांनी पाठविलेली पहिल्या दोन कोड्यांची उत्तरे अगदी बरोबर आहेत.
३/ श्री.सहज यांनीही पहिल्या दोन कोड्यांची उत्तरे अचूक शोधली आहेत्.

नातीगोती

१/ मीरा फाटक यांनी तीनही कोड्यांची उत्तरे पाठविली.ती सर्व बरोबर आहेत.त्यांचे विशेष अभिनंदन!

ह्यांची भीती वाटते!

(कृ०ह०घे०)

उत्तर दिले.

व्य. नि. ने --

नातीगोती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विसुनाना यांची पहिल्या दोन कोड्यांची उत्तरे योग्य आहेत.

नातीगोती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
तीनही कोड्यांची योग्य उत्तरे शोधण्यात उमा या यशस्वी झाल्या आहेत. अभिनंदन!

नातीगोती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
यातील पहिल्या दोन कोड्यांची उत्तरे अनु यांनी बरोबर शोधली आहेत. तिसर्‍या कोड्याचे उत्तर अंशतः बरोबर अहे. पण परिपूर्ण नाही.

तर्कक्रीडा:३९:नातीगोती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
१/ ती स्त्री आपल्या सख्ख्या भावाकडे बोट दाखवून "याचा बाप ज्याचा सासरा, त्याचा बाप माझा सासरा " असे म्हणाली. आपल्या स्वतःच्या नातेवाईकाची कल्पना करून पहावी. म्हणजे उत्तर पटेल.
२/ फोटोतील 'धिस् मॅन ' हा त्या माणसाचा मुलगाच असला पाहिजे.
३/ गुंतागुंतीची नाती.:उत्तरासाठी रचलेली गोष्ट अशी:
....*मेनका आणि देवेन्द्र यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव धर्मेन्द्र.काही काळाने देवेन्द्राचे निधन झाले. मेनका विधवा झाली.
....* इकडे तिलोत्तमा आणि सुरेन्द्र यांचा विवाह झाला. त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव राजेन्द्र..काही काळाने सुरेन्द्राचे निधन झाले. तिलोत्तमा विधवा झाली.
....* कालांतराने मेनकेचा मुलगा धर्मेन्द्र मोठा झाला. त्याचा तिलोत्तमेशी प्रेमविवाह झाला.त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव शशी.
....*तद्वतच तिलोत्तमेचा मुलगा राजेन्द्र युवक झाला. त्याचे मेनकेशी प्रेमलग्न झाले. त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव रवी.
....* आता रवी हा मेनकेचा मुलगा.तसेच तो तिलोत्तमेच्या मुलाचा (राजेन्द्राचा) मुलगा. म्हणून तिलोत्तमेचा नातू.
.....*तद्वतच शशी हा तिलोत्तमेचा मुलगा तर मेनकेचा नातू.
.....*धर्मेन्द्र आणि रवी हे दोघेही मेनकापुत्र. म्हणून रवी हा धर्मेन्द्राचा भाऊ.म्हणून तिलोत्तमेचा दीर.
.....*तसेच शशी हा मेनकेचा दीर.
......................................................................................................................
प्रेमविवाहाच्या वेळी वधूचे वय वराच्या वयाहून अधिक आहे. पण हे धर्मबाह्य नाही. "त्या दोघी विलक्षण सुस्वरूप होत्या. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या वयाची कल्पना येत नव्हती."असे जे कोड्यात लिहिले आहे त्याचा उत्तराशी संबंध आहे. गोष्टीत अप्सरांची नावे हेतुतः घेतली आहेत. कारण अप्सरा चिरतरुण असतात ,असा संकेत आहे.

सही

असे होते काय !!

पहिल्या दोनच प्रश्नांची उत्तरे आली होती, त्यामुळे पाठवले नाही - पण तीस-याचे येत नव्हतेच आणि कधी आले असते असेही आता वाटत नाही !!

असा एक सिनेमा होता ना? त्यात कमल हसन (आणि बहुतेक हेमा मालिनी) होता असं अस्पष्ट आठवतंय

 
^ वर