तर्कक्रीडा: पत्रापत्री

यनावालामहोदयांनी आधीच हे कोडे उपक्रमावर घातले असेल, तर हा लेख उडवून टाकायला माझी हरकत नाही.

हे कोडे मी कालच ऐकले- शेजारीशेजारी २ गावे वसली आहेत. या गावांत चोरांचा फार सुळसुळाट आहे. अगदी टपालाद्वारे एखादे पत्र पाठवले तरी चोरले जाते. पण या चोरांचा सुद्धा एक उसूल आहे, बरं का! तेच पत्र जर एखाद्या डब्यात घालून त्याला टाळे लावून पाठवले तर मात्र ते टाळे फोडून आतले पत्र चोरले जात नाही. म्हणून गावांतले लोक एकमेकांना पत्र पाठवताना ते एका डब्यात घालून त्याला टाळे लावून पाठवतात. त्यांतल्या एका गावात एक प्रेमवीर आहे, त्याचे नाव- सोम्या गोम्या कापसे. त्याला आपल्या प्रेयसीला एक अंगठी टपालाद्वारे पाठवायची आहे. मग तो कशी काय पाठवेल?
दुसर्‍या पत्रातून चावी वगैरे पाठवेल, असे उत्तर आपल्याला लगेच सुचते. पण ते पत्र तरी 'ती' उघडणार कशी? एकाच टाळ्याच्या २ चाव्या किंवा एकच चावी दोन टाळ्यांना लागते अशी काही सोय नाही. एक टाळे-एकच चावी. पण एकच पत्र (डब्यातून) कितीहा वेळा एकमेकांना पाठवता येते. आता सांगा बरे, प्रेयसीने डब्यातली अंगठी कशी बाहेर काडावी?

उत्तरे कृपया व्य. नि.तून द्यावीत.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तर

व्य. नि. ने

;-)

अंगठी डब्याच्या तळाशी चिकटवून पाठवायची. ;-) चोरांना फसवायला उगाच डब्याला कुलुप लावायचं. (खरं उत्तर व्यनितून पाठवू.)

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

चावीशिवाय टाळं कसं उघडणार?

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

पीजेतील उत्तराप्रमाणे 'डबा उघडून' असे उत्तर देता येईल.
पण चावीचे काय?

डबा, टाळे फोडून?

डबा, टाळे फोडून? दोन्ही फोडू नये असा काही उल्लेख नाही. बहूतेक प्रेमवीराच्या डोक्यावर डबा फोडुन करेल. एक तर बाई, त्यात तिचा दागीना, सहजासहजी मिळू नये अशी तजवीज, ही प्रेमकहाणी सूरू व्हायच्या आधीच संपली म्हणायची..

तसेच गावात सगळ्यांकडे एक "मास्टरकी" असेल ना. कारण नवीन ईसम, नवीन पत्ता, नवीन पत्र हा किस्सा कसा सूरू करायचा?

BTW जास्तीत जास्त ३ दिवस , पण नंतर खरे उत्तर द्यायचे बॉ कोड्याचे.

मला सोडावता येत नाही पण उत्तर जाणून घ्यायची खूप उत्सूकता असते.

बरोबर उत्तर

विसूनाना आणि यनावाला यांनी पाठवले आहे.
सहज यांचा तर्क भन्नाट आहे. पण नाही, सोम्या गोम्या कापसेची तरुणी तापट नाही. शिवाय डबा आणि टाळे दोन्ही न फोडता अंगठी बाहेर काढण्याची 'कला' तिला अवगत आहे. 'मास्टरकी' अशी काही चावी अस्तित्त्वात नाही. कारण ती असती तर मग चोरांनी टाळीसुद्धा उघडून आतली पत्रे/अंगठ्या वगैरे चोरले असती. अभिजित म्हणतात, त्याप्रमाणे चोरांना फसवताही येणार नाही. ते तसे हुशार आहेत.
राधिका

आणखी एक

आवडाबाईंनीही बरोबर उत्तर दिले आहे.
राधिका

उत्तर

कोड्याचे उत्तर असे आहे- आधी आपला सोम्या गोम्या कापसे एक डबा घेऊन त्याच्यात अंगठी ठेवील आणि त्याला कुलुप लावून प्रेयसीच्या पत्त्यावर पाठवेल. मग प्रेयसी तो डबा मिळाल्यावर त्याला स्वतःचं एक कुलुप लावेल आणि त्याला परत पाठवेल. अशा प्रकारे त्या वेळी त्या डब्याला २ कुलुपे असतील. मग सोम्या आपलं कुलुप काढून घेईल आणि डबा परत तिल पाठवेल. आता प्रेयसीने स्वतःजवळच्या चावीने स्वतः लावलेलं कुलुप उघडलं की डबा उघडेल. :ड्

बाकी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले वेगवेगळे तर्क वाचून फारच करमणूक झाली. मला हे कोडं ज्या मैत्रिणीने घातलं होतं, तिची सुद्धा माझ्यामुळे अशीच करमणूक झाली, कारण मी 'Accio चावी', 'Accio कुलुप', 'Alohomora'* अशी उत्तरे तिला दिली. :ड्

*हॅरी पॉटर न वाचलेल्यांना ही ओळ कळणार नाही. :ड्
राधिका

हा हा

'Accio चावी', 'Accio कुलुप', 'Alohomora'*

हे सही !!

हॅरी पॉटरचा पण अभ्यास करता का?

 
^ वर