हे वाक्य वाचू नये.

मी शाळेत असताना आमच्या वर्गात श्रीधर महाजन नावाचा एक बुद्धिमान विद्यार्थी होता. फळ्यावर लिहिण्याची त्याला फार आवड होती. खडू सापडला की वर्गात शिक्षक येण्यापूर्वी तो फळ्यावर काहीतरी लिहून ठेवित असे. एकदा त्याने फळ्यावर "हे वाक्य वाचू नये" असे लिहिले. शिक्षक आले. त्यानी फळ्याकडे पाहिले. ते वाक्य पुसून टाकले. पण त्या वाक्यात काहीतरी गंमत आहे;असे वाटल्यामुळे ते माझ्या कायमचे स्म्ररणात राहिले.
......अशा प्रकारच्या विधानाला " स्वनिर्देशक वाक्य" (सेल्फ रेफरंशिअल सेन्टेंन्स) म्हणतात हे मला नंतर खूप वर्षांनी समजले.
....."सूर्य फुलाचा रंग पिवळा असतो "हे विधान सूर्सफुलासंबंधी माहिती देते. आपल्या वाचनात येतात ती बहुतेक विधाने कुठल्यातरी गोष्टीविषयी अथवा कल्पनेविषयी माहिती देतात.
.....ज्या विधानात त्या विधानाविषयीच माहिती असते अशा अर्थपूर्ण आणि सत्य विधानाला "स्वनिर्देशक वाक्य " म्हणता येईल. "हे वाक्य वाचू नये" या वाक्यात जो संदेश आहे तो त्या वाक्यासंबंधीच आहे. वाक्य वाचल्याशिवाय तो समजणार नाही. गंमत अशी की ते वाक्य वाचल्यावर त्यातील संदेश अपरिहार्यपणे धुडकावला जातो.अशा प्रकारची काही स्वनिर्देशक वाक्ये खाली दिली आहेत. सदस्यांना अशी वाक्ये सुचली तर त्यानीही लिहावी असी अपेक्षा आहे.
....१." या वाक्यात एकूण नऊ शब्द तसेच तेवीस अक्षरे आहेत. "
इथे हे वाक्य म्हणून जो निर्देश आहे तो त्या वाक्याचाच आहे. पडताळून पाहिल्यास हे विधान सत्य असल्याचे दिसते. म्हणून हे स्वनिर्देशक वाक्य आहे.
....२." वाईट वाटते की या वाक्याचा प्रारंभ चांगल्या शब्दाने झालेला नाही. "
प्रारंभी वाईट शब्द आहे.
.....३." हे वाक्य वाचल्यावर " हिमालयाची सावली " या नाटकाची आठवण होते."
होणारच. कारण नटकाचे नावच या वाक्यात लिहिले आहे.
.....४."या वाक्यात शेवटचे तीन शब्द लिहायचे राहिले आहेत."
वाक्य पूर्ण आहे आणि सत्यही आहे.
.....५. "य वक्यत सात अक्षरनं कने दिलेले नहीत."
सात अक्षरांना काने नाहीत याचा निर्देश वाक्यातच कसा करायचा? त्यासाठी सात अक्षरे कान्याशिवाय लिहिणे अपरिहार्य आहे.
.....६, या श्रणिडर्नहिळ्ळ वाक्यात एकच अक्षरसमूह सार्थ शब्द नाही.
......७. हे वाक्य मराठी भाषेत असून अन्य कोणत्याही भाषेत त्याचे सत्य भाषांतर करणे शक्य नाही.
..सत्यता पडताळून पहावी.
.....८.या वाक्यात दोन चुक्या आहेत.
इथे चुका हा शब्द 'चुक्या' असा लिहिला ही एक चूक दिसते.दुसरी कोणती? वाक्यात एकच चूक असताना दोन आहेत असे म्हणणे ही दुसरी चूक. म्हणजे दोन चुका आहेत तर ! मग दोन चुका असताना दोन आहेत असे म्हणण्यात काय चूक? म्हणजे खरी एकच चूक की ! ठीक आहे. पण एकच चूक असताना दोन आहेत असे म्हणणे ही चूक नव्हे काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

मजेशीर

हे चालेल का?

आणि (किंवा कारण) या शब्दाने वाक्याची सुरूवात करू नये.

अस्स होय?

मला वाटते भाषेचे (लँग्वेज) नियम भाषेबद्दलच्या भाषेला (मेटालँग्वेज) लागू पडत नसावेत. (डिस्क्लेमरे: चूभूद्याघ्या / तज्ज्ञांनी खुलासा करावा.)

हम्म्! यांत कसलाही "वाद" असण्याचे कारण नाही. (आता हे वाक्य चालेल का? कारण वाक्यात वाद हा शब्द आहेच. ;-) )

खोटे

खोटे बोलले की ङोक्यावर गाढवासारखे लांब कान उगवतात म्हणे. (आता हे वाक्यच खोटे आहे ;-))

बरं तर!

आता हे वाक्यच खोटे आहे - हे वाक्य विचारात घेऊ नये. ;-)

--
सध्या डोके बंद आहे. आता प्रयत्न पुरे झाले.

शब्दाची सुरवात

"ळ या अक्षराने मराठी भाषेतले वाक्य सुरू होऊ शकत नाही."

"ळ" शब्दच चालू होऊ शकत नाही. तीच कथा "ण" ची पण आहे.

हे वाक्य

हे वाक्य तुम्ही आत्ताच वाचले. ;)

हे कसे वाटते?

ह्या वेबपेज वर हेच वाक्य श्रेष्ठ आहे कारण यात सर्वोत्तम, सर्वप्रिय, सदाचारी ब्रम्हर्षी यनावालांचे गुणगान आहे.

उत्तम दर्जा असलेले हे लिखाण आहे.

मेरा भारत महान? हा प्रश्ण आहे.

जरा मुद्दा सोडून!

हे वाक्य वाचू नये!
आता हेच वाक्य 'हे वाक्य वाचून ये!' असे लिहिल्यावर कसे वाटते?
कृपया आहेर आणू नये!.... चे ... कृपया आहेर आणून ये! असेही वाचता येते.

एखादे वाक्य अथवा शब्द कसे वाचावे हे बर्‍याच वेळा माहित नसल्यामुळे होणार्‍या गंमती खालीलप्रमाणे..
झारापकर हा शब्द असा वाचतात...... 'झाराप कर'. पण काही जण 'झारा पकर' असाही वाचतात. ह्याचा उगम सांगताना असेही म्हटले जाते की झारापकर म्हणजे आचारी..... म्हणजे झारा पकर(ड) अशा अर्थी!
काटकसर... काट कसर...... काटक सर?
भडकमकर..... भडकम कर...... भडक मकर?

पाऊस ही मर्ढेकरांची(नक्की आठवत नाही) कविता शिकवताना बाईंनी असे वाक्य उच्चारले होते..... इथे ह्या कवितेत बा.सी.मर्ढेकरांनी 'पाऊस' पाडलेला आहे(?).

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

यावरुन

Woman without her man is nothing.
हे वाक्य खालील प्रकारे म्हणता येते.

Woman! without her, man is nothing!
आणि
Woman, without her man, is nothing!

९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद...
९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद...
९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद...
९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद... ९०% मराठी झिंदाबाद...

असेच आणखी काही

आमच्या मनात सुद्धा हेच आले होते प्रमोदकाका... पण जास्त विषयांतर नको म्हणून लिहिले नव्हते... जसे

१.या चर्चेचे शीर्षक - हे वाक्य वाचू नये. - हे वाक्य वाचून ये.
२. शांतता राखा - शांत तारा खा.
३. प्रकाश जावडेकर - प्रकाश जा वडेकर.





मराठीत लिहा. वापरा.

शंकरास पुजीले...

शाळेत असताना ऐकल्याचे आठवले:

शंकरास पुजीले सुमनाने - (फुलाने)
शंकरास पुजीले सु-मनाने (चांगल्या मनाने)
शंकरास पुजीले सुमनाने (सुमन नावाच्या व्यक्तीने)

हे काय आहे ते ठरवा.

१) बहुमत गाढव असते असे लोक बहुमताने म्हणतात.

२) एक गोष्ट (थोडे विषयांतर).
एका सभागृहांत एका वक्त्याने चिडून जाऊन असे विधान केले की "या सभागृहांतील अर्धे लोक मूर्ख आहेत"
त्यावर सभेंत हलकल्लोळ माजला. आणि वक्त्याने आपले विधान मागे घ्यावे म्हणून सभासद ओरडू लागले.
शेवटी दबावामुळे वक्ता उभा राहिला आणि म्हणाला, "मी माझे विधान मागे घेतो आणि कबूल करतो की या सभागृहांतील अर्धे लोक मूर्ख नाहीत.

वाचायला शिका.

कोल्हापुर ते रत्नागिरी रस्त्यावरच्या मलकापुर गावात एका कुडाच्या सारवलेल्या झोपडीवर "वाचायला शिका" असा चुन्याने रंगवलेला राष्ट्रीय साक्षरता अभियानाचा दिव्य संदेश वाचून हतबुद्ध झालो ते आठवले. हे वाक्य माझ्या नित्य स्मरणात राहील.;)

हा संदेश 'वाचायला शिकवा' असता तर ठीक होते. पण 'वाचायला शिका'?
निरक्षर मनुष्य तो कसा वाचू शकेल?

तसेच

वाचाल तर वाचाल हे एक असेच वाक्य.





मराठीत लिहा. वापरा.

अजून एक

लिनक्स प्रणाली वापरणार्‍यांना त्यातील फॉर्च्युन्स नक्कीच आवडतात. त्यातलेच एक.

एनी जनरलायझेशन इज डेंजरस, इन्क्लूडिंग धिस वन.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हा हा हा

धमाल आहे.
२,४,८ ही वाक्ये सर्वाधिक आवडली.
राधिका

स्वनिर्देशक वाक्ये

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
स्वनिर्देश वाक्यात त्या वाक्यासंबंधीची माहिती असणे आवश्यक असते. अनेकांनी गंमतीदार वाक्ये लिहिली आहेत. पण त्यांतील बहुतेक वाक्ये स्वनिर्देशक नाहीत. श्री. आजानुकर्ण यांचे वाक्य हे स्वनिर्देशक वाक्याचा उत्तम नमुना आहे. किंबहुना या लेखाला आधारभूत असलेल्या मूळ लेखातील एक वा़क्य आहे: "द सेंटेन्स आय ऍम नाऊ रायटिंग , इज द सेंटेन्स यु आर नाऊ रीडिंग. " यातील दोन 'नाऊ' मधे कालान्तर पडले तरी हे स्वनिर्देशक वाक्य सत्य आहे.
....त्या लेखातील आणखी काही वाक्ये :२: "धिस सेंटेंस, नो व्हर्ब " ३: "धिस सेंटेंस इज फॉल्स " (श्री. टग्या यांचे वाक्य " )
....४: "धिस सेंटेंस ,दो नॉट इंटरॉगेटिव्ह, एण्डस् इन क्वश्चन मार्क ? "
....५: "धिस सेंटेंस ,दो स्टार्स विथ बिकॉज, इट इज फॉल्स " ( प्रियाली यांच्या वाक्याचे याच्याशी काही से साधर्म्य आहे. परंतु योग्य परिवर्तन करून ते स्वनिर्देशक करायला हवे.)
वर दिलेली इंग्रजी वाक्ये डग्लस हॉफ्स्टॅडटर यांच्या "मेटॅमॅजिकल थीमाज :क्वेश्चन फॉर द एसेन्स ऑफ माइंड ऍण्ड पॅटर्न " या पुस्तकातील आहेत. त्या विषयी पुढच्या प्रतिसादात.
........................
श्री. आजानुकर्ण आणि श्री. ट ग्या यांची वाक्ये स्वनिर्देशक आणि नि:संदेह स्वनिर्मित आहेत. त्यांना याचे मर्म उमगले आहे.

चुक्या

या वाक्यात दोन चुक्या आहेत.

शाळेत असताना कवी केशवसूत यांनी उदयोन्मुख कवी आनंदीरमण यांना लिहिलेले पत्र मराठीत धडा म्हणून होते. त्यात चुक्या या शब्दाचा प्रयोग चूक चे अनेकवचन या अर्थी केला होता असे आठवते.

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

आता व्यवस्थित समजले

ही वाक्ये चालतील?

१. ह्या वाक्याचा काळ (tense) ओळखा
२. ह्या वाक्यातील गाळलेल्या __ भरा. (पण मुळात हे 'वाक्य' आहे का?)

अपवाद

प्रत्येक नियमाला अपवाद असतोच. (;))
हे वाक्य अपूर्ण..
नकारात्मक लिखाण पूर्णपणे निषिद्ध!
तुम्हाला मराठी वाचता येते.
इथे लिहू नये. (शूध्दीचिकीत्सक वापरा :) )
हे वाक्य संकृतप्रचुर आहे.
भली मोठी, पण फारसा अर्थ नसलेली, जाणूनबुजून लिहीलेली वाक्ये लिहीण्याचा प्रयत्न करून, ती कुणीतरी वाचेल किंवा किमान वाचून संपवू शकेल अशी आशा गैर नाही.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

मी हे वाचलं च नाही

यावरुन सरदारजींचा विनोद आठवला.
संता बंताला घरी जेवायला बोलावतो आणि स्वतः दारावर लिहून बाहेर निघून जातो, 'एप्रिल फूल!! कसं बनवलं!' बंता दारावर लिहून जातो, 'एप्रिल फूल! मी इथे आलोच नव्हतो!'

स्वनिर्देशक वाक्य (सेल्फ रेफरेंशिअल सेन्टेन्स )

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ही संकल्पना पुरेशी स्पष्ट करणे मला जमले नाही असे दिसते. असो . आपण यावर पडदा टाकूया.

छान

यनावाला,
सुंदर चर्चा प्रस्ताव. २,४ क्रमांकाची वाक्ये आवडली.
--लिखाळ

हे स्वनिर्देशक वाक्य आहे.

स्वनिर्देशक वाक्य कसे लिहावे? : एक उदाहरण

स्वनिर्देशक वाक्य कसे लिहावे त्याचे उदाहरण म्हणून हेच वाक्य घेता येईल. ;)

पडदा कशाला टाकता? चालू दे.

हे वाक्य

यनावालांना हे वाक्य अपेक्षित असावे.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

हे वाक्य

पण 'हे' तर तो अजुन वाचतच आहे. :-)

माफी मागून

यनावालांची माफी मागून .... त्यांनी तर पडदा पाडलाय ना !!

१. ह्या वाक्यात दहा शब्द आहेत हे सांगायला पंडित कशाला पाहिजे?
२. ह्या वाक्यामुळे यनावालांची आठवण आली की नाही ?
३. अशा प्रकारची वाक्ये न आल्यामुळे यनावालाना चर्चेवर पडदा पाडावा लागला .

योग्य वाक्ये

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
तो यांचे वाक्य तसेच आवडाबाई यांची पहिली दोन वाक्ये स्वनिर्देशक आहेत.

अजून काही

ह्या वाक्यातून अर्थ शब्द गाळला तर या वाक्याला अर्थ नाही.

हे वाक्य निळे आहे.

अरे ह्या प्रश्नाला काही क्रियापद?

ह्या वाक्यात दोन हिंदी शब्द आहेत.

ह्या वाक्यात तीन हिंदी शब्द आहेत.

ह्या वाक्यात चार ... नाही तीनच हिंदी शब्द आहेत.

ह्या वाक्यात पाच ... सॉरी, चार हिंदी आणि एक इंग्रजी असे शब्द आहेत.

ह्या वाक्यात दारूचा तांब्या कशासाठी आहे?

ह्या वाक्यात दोनतीन हिंदी शब्द आहेत.

अत्र्यांचा विनोद?

स्वल्पविरामाच्या जागा.
अत्र्यांना एका मित्राची बायको भेटते. अत्रे म्हणतात
" तू माझी बायको मी तुझा नवरा आपण सिनेमाला जाउ."

प्रकाश घाटपांडे

अजून अत्रे

संयूक्त महाराष्ट्राच्या चलवळीची घोषणा होती "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहीजे"

यशवंतराव म्हणाले झाला पाहीजे ते ठीक आहे पण त्याला "" लावायची (झालाच) काय गरज?

अत्रे म्हणाले चव्हाणातला "च" काढला तर फक्त वहाणच ("व्हाण" - वहाण) राहते म्हणून "च" चे महत्व!

 
^ वर