तर्कक्रीडा:३८: कादंबिनी सहनिवास

.......आमच्या कादंबिनी सहनिवासात दोन इमारती असून एकूण चौवीस सदनिका (फ्लॅट्स) आहेत.त्यांत चौवीस कुटुंबे राहातात. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन हे राष्ट्रीय सण आम्ही मोठ्या उत्साहात साजरे करतो.
.......गतवर्षीच्या स्वातंत्र्यदिनी सहनिवासातील दहा वर्षांखालील बालकांचा एक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले होते.भाग घेणार्‍या बालकांची एकूण संख्या एकतीस (३१) होती.ही संख्या मोठी असल्याने मुलांचा (बॉईज) एक आणि मुलींचा एक असे दोन गट केले. प्रत्येक गटाने आपला स्वतंत्र कार्यक्रम सादर केला.मुलींच्या गटाचा कार्यक्रम फारच छान झाला.
.......या सर्व एकतीस (३१) बालकांना आमच्या सहकारी संस्थेने पारितोषिके दिली. प्रत्येक मुलीच्या पारितोषिकाची रक्कम समान आणि पूर्ण रुपयात होती.ती प्रत्येक मुलाच्या (बॉय) पारितोषिकाच्या रकमेपेक्षा सात(७) रुपयांनी अधिक होती.या एकतीस (३१) पारितोषिकांसाठी एकूण चारशे सत्तर रुपये (४७०रु) लागले.
तरः(१) कार्यक्रमात भाग घेणार्‍या मुलींची संख्या किती?
.....(२)प्रत्येक मुलीच्या पारितोषिकाची रक्कम किती?

*************************************************************************
हे कोडे बीजगणिती समीकरण लिहून सोडवावे लागेल. दोन अव्यक्ते (अन्नोन्स ) आणि एकच समीकरण मिळेल. अव्यक्ताची किंमत धन पूर्णांक संख्या (+ इंटीजर) असण्याचे बंधन आहे. अशा समीकरणांना डायोफंटी समीकरणे म्हणतात.ती सोडवण्याची विशिष्ठ रीत आहे. योग्य गणिती विचाराने अशी समीकरणे सोडविता येतात.
(उत्तर कृपया व्यनि. बे)

लेखनविषय: दुवे:

Comments

व्यनिने

उत्तर दिले आहे

उत्तर व्यनी ने

दिले आहे

तर्क.३८: कादंबिनी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

सर्वप्रथम आवडाबाई आणि नंतर श्री. वाचक्नवी , श्री. विसुनाना हे या कोड्याचे योग्य उत्तर शोधण्यात यशस्वी झाले आहेत्. अभिनंदन!

तर्क.३८:आणखी उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मीरा फाटक आणि अनु यांची उत्तरे आली. ती अचूक आहेत. त्यांनी प्रयत्न -प्रमाद पद्धती वापरली.डायोफंटी (डायोफंटाइन) समीकरणाच्या सोडवणुकी साठी अंततः प्रयत्न-प्रमाद रीतीचा अवलंब करावा लागतो. प्रमादांची संख्या कमी करता येते, इतकेच.

तर्क.३८: उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आणखी दोन उत्तरे आली आहेत. ती बरोबर आहेत. श्री.प्रणवसदाशिवकाळे आणि राधिका यांची.

तर्क.३८:कादंबिनी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मृदुला यांनी व्यनि ने उत्तर पाठविले.ते अचूक आहे.

 
^ वर