म्हणींचा संकर

"मराठी शब्दरत्नाकर " या शब्दकोशाचे रचनाकार वा.गो.आपटे यांनी म्हणीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे:
"परंपरेने लोकांच्या बोलण्यात येणारे एखादे नीतिपर , अनुभवसिद्ध अथवा दृष्टान्तपर वाक्य किंवा वाक्य समूह म्हणजे म्हण."
.....लघुता,व्यावहारिकता,चटकदारपणा आणि लोकमान्यता ही म्हणीची प्रमुख लक्षणे होत.म्हणीला लोकोक्ती असेही म्हणतात. "थोडक्या शब्दांत चटकदारपणे मांडलेला,लोकांच्या चटकन ध्यानात येणारा आणि त्यांना पटणारा विचार म्हणजे म्ह्णण. " अशीही व्याख्या करता येईल.जनमान्यता हा म्हणीचा आवश्यक गुण आहे. लोकांना पटल्या तरच म्हणी रूढ होतात.म्हणी मध्ये थोडी तालबद्ध ठसकेदार शब्दरचना असली तर ती चटकन लक्षात राहाते.
......माझे एके स्नेही एका प्रशालेत शिक्षक आहेत. ते मराठी विषय शिकवितात. त्यांनी एकदा इ.९ वीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत "पुढील म्हणी पूर्ण करा "असा प्रश्न घालून काही म्हणींचे पूर्वार्ध दिले. विद्यार्थ्यांनी त्या म्हणीचा उत्तरार्ध जोडून ती पूर्ण करावी अशी अपेक्षा होती.अर्थ न कळता केवळ पाठांतर करणार्-या काही विद्यार्थ्यांनी एका म्हणीच्या पूर्वार्धाला दुसर्-याच म्हणीचा उत्तरार्ध जोडला. त्यामुळे:
" ज्याची खावी पोळी, तो कान पिळी. "
" हातच्या काकणाला ,खळखळाट फार."
अशी संकरित वाक्ये निर्माण झाली.(ती सर्व मजजवळ आहेत. ).म्हणीतील अनुप्रास, काही शब्दांतील तसेच वाक्यरचनेतील साधर्म्य यांमुळे मुलांचा गोंधळ उडाला. अर्थात मुख्य कारण "अर्थेविण पाठान्तर "हेच खरे.
.......खाली कांही म्हणींचे पूर्वार्ध दिले आहेत. मुलांनी या पूर्वार्धांना कोणते उत्तरार्ध जोडले असतील याचा तर्क करून संकरित वाक्ये पूर्ण करावी.उत्तर अर्थतच एकमेव असणार नाही. म्हणून व्यनि न पाठविता प्रतिसादातच लिहावे. मात्र दिलेल्या पूर्वार्धाला एखाद्या म्हणीचा उत्तरार्धच जोडावा.संकरित वाक्य पूर्ण लिहावे. काही गंमत असावी.

संच(|)
(१) एक ना धड,.....
(२) अग अग म्हशी,....
(३) साखरेचे खाणार त्याला,.....
(४) शेळी जाते जीवानिशी,....
(५) असतील शिते तर,.....
(६) वासरांत लंगडी गाय,...
(७) म्हातारीने कोंबडे झाकले तरी,...
(८) बाप दाखव नाही तर,...

लेखनविषय: दुवे:

Comments

साखरेचे..

साखरेचे खाणार त्याला मधुमेह होणार!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

प्रयत्न

१. एक ना धड, आणि खाणारा म्हणतो वातड
२. शेळी जाते जीवानिशी, मला कुठे नेशी
३. असतील शिते तर श्राद्ध कर!

गमभन?

शुचि नाव शब्दसंपदा आहे ना? गमभन टंक सहाय्यक आहे असे वाटते.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

गमभन ????

गमभन काय प्रकार आहे?
अ आ इ ई ही बाराखडी, अ,ब,क,ड हे ए,बी,सी,डी..

मग 'ग,म,भ,न'.. काय आहे? याच्या पुढे काय आहे??

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

ग म भ न

माझ्या अल्प माहितीप्रमाणे मराठी मुळाक्षरे पाच वर्गात विभागलेली आहेत. त्यानुसार त्यांचा जो क्रम लावला जातो तो असा:
क ख ग घ ङ, च छ ज झ ञ .....

पण अक्षरांच्या दिसण्यातील साम्यानुसार त्यांची वर्गवारी
ग म भ न
अशी केली जाते. म्हणजे मुलांना अक्षरलेखन शिकताना ते सोपे जाते असा एक मतप्रवाह आहे. पुढील अ़क्षरे मला आता आठवत नाहीत. बहुतेक र आणि स होती.
जाणकारांनी कृपया अधिक माहिती द्यावी.

ग म भ न र स त ल

अंकलिपीतील मुळाक्षरांचा क्रम पुढीलप्रमाणे असतो. : --

ग म भ न ..
र स त ल ऌ ॡ ळ ..
ण प ष फ ..
व ब ख क ..
उ ऊ श अ अं अ: आ ओ औ ..
ट ठ द क्ष ढ ड ङ ह इ ई झ ज्ञ ..
च घ ध छ ..
ज ञ य थ ..
ए ऐ ..
ऋ ॠ...(.)

--वाचक्‍नवी

बाप दाखव नाही तर जमतील भुते

१.म्हातारीने कोंबडे झाकले तरी खाणारा म्हणतो वातड

२.वासरांत लंगडी गाय उपाशी

३.बाप दाखव नाही तर जमतील भुते.

४.अग अग म्हशी श्राद्ध कर

५.शेळी जाते जीवानिशी म्हणून सूर्य उगवायचा राहतो थोडीच.

६. साखरेचे खाणार त्याला, भाराभर चिंध्या

७. एक ना धड मला कुठे नेशी

म्हणी

संच(|)
(१) एक ना धड,.....द्राक्षे आंबट
(२) अग अग म्हशी,....तुझी पाठ मऊ
(३) साखरेचे खाणार त्याला,.....विद्या येई घमघम
(४) शेळी जाते जीवानिशी,....मला कुठे नेशी हे जबरी. सही अनु
(६) वासरांत लंगडी गाय,...अन् फाटक्यात पाय
(७) म्हातारीने कोंबडे झाकले तरी,...अंगण वाकडे
(८) बाप दाखव, नाही तर...सतराशे विघ्न

अभिजित...
उनके देखे से जो आ जाती है मुंहपर रौनक़ |
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है |

झकास

(३) साखरेचे खाणार त्याला नाही परवडणार
(४) शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा मागतो कोंबडी
(५) असतील शिते तर मिळतील मते
(६) वासरांत लंगडी गाय आणि तिचे पोटात पाय
(७) म्हातारीने कोंबडे झाकले तरी उकडलेली अंडी चांगली लागतात.
(८) बाप दाखव नाही तर पैसे उसने दे.

माझा प्रयत्न

(१) एक ना धड, अन फाटक्यात पाय.
(२) अग अग म्हशी, कालचा गोंधळ बरा होता.
(३) साखरेचे खाणार त्याला, गुळाची चव काय?
(४) शेळी जाते जीवानिशी, अन संन्याशाला फाशी. किंवा शेळी जाते जीवानिशी, अन मागचा शहाणा.
(५) असतील शिते तर, घराचे वासेही फिरतात.
(६) वासरांत लंगडी गाय, पाताळ धुंडी. किंवा वासरांत लंगडी गाय, सव्वा लाखांची.
(७) म्हातारीने कोंबडे झाकले तरी, गाय मरत नाही.
(८) बाप दाखव नाही तर, उलट्या बोंबा.

प्रयत्नांती

(१) एक ना धड,..... परमेश्वर
(२) अग अग म्हशी,.... हो गोरी!
(३) साखरेचे खाणार त्याला,..... गुळाची चव काय
(४) शेळी जाते जीवानिशी,.... कुत्रा आवर!
(५) असतील शिते तर,..... तीनच
(६) वासरांत लंगडी गाय,... अवलक्षण
(७) म्हातारीने कोंबडे झाकले तरी,... डर कशाला
(८) बाप दाखव नाही तर,... राव काय करेल?; माती; नसून खोळंबा!

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

हाहाहा!!!

(२) अग अग म्हशी,.... हो गोरी!

सही!!!! मस्तच!!! ह. ह. पु. वा.

आणखी

४. म्हातारीने कोंबडे झाकले तरी भट भटणीला मारी
५. बाप दाखव नाहीतर सोंगे फार
६. वासरात लंगडी गाय चांदण्याखाली कापूस वेची (मूळ म्हण दिवस गेला इटीपिटी चांदण्याखाली कापूस वेची)
७. म्हातारीने कोंबडे झाकले तरी हो गोरी
८. अगं अगं म्हशी, व्याह्याने धाडले घोडे
९. साखरेचे खाणार त्याला मिशा हातभर! (मूळ म्हण गडी वितभर मिशा हातभर)
१०. असतील शिते तर हाती कथलाचा वाळा
११. अगं अगं म्हशी, भीक माग! (मू. म्ह. आपलाच राग अन् भीक माग)
१२. शेळी जाते जीवानिशी, वाजवावी टाळी!
१३. साखरेचे खाणार त्याला आरसा कशाला
१४. बाप दाखव नाहीतर मनात चांदणं

प्रयत्न/आधार

घरोघरी .. उलट्या बोंबा
गाढवापुढे वाचली गीता ... अन् व्याह्यानं धाडलं घोडं
आयजीच्या ... बिळात नागोबा
क्रियेविण वाचाळता ... भलतेच! (करायला गेलो एक आणि झाले भलतेच)
कामापुरता मामा ... काकडीला राजी
भरवश्याच्या म्हशीला.... स्वर्ग दिसत नाही

कल्पनाशक्तीच्या वारूला तेवढाच आधारु, विकीकोट वरील म्हणींचा संग्रह

अर्रर्र...

खेळाचे स्वरूप आता लक्षात आले,

उत्तरे अशी,

(१) एक ना धड,..... मोती जड
(२) अग अग म्हशी,.... गाढवाचे पाय धरी
(३) साखरेचे खाणार त्याला,..... विठोबा
(४) शेळी जाते जीवानिशी,.... (अन्) कोल्हा काकडीला राजी
(५) असतील शिते तर,..... दात नाहीत (चणे आहेत तर दात नाहीत.)
(६) वासरांत लंगडी गाय,... उपाशी!
(७) म्हातारीने कोंबडे झाकले तरी,... बघायचं वाकून?
(८) बाप दाखव नाही तर,... मेल्याशिवाय जात नाही.

अशी ही जुळवाजुळवी

(१) एक ना धड,.....पगडी पचास.
(२) अग अग म्हशी,....घेतली शिंगावर / हो गोरी (सही).
(३) साखरेचे खाणार त्याला,.....द्राक्षे आंबट / मीठ अळणी / गुळाची चव काय?
(४) शेळी जाते जीवानिशी,....मला कुठे नेशी. (हेच!)
(५) असतील शिते तर,.....खळखळाट फार / मनात चांदणे
(६) वासरांत लंगडी गाय,...अन् फाटक्यात पाय.
(७) म्हातारीने कोंबडे झाकले तरी,...खाणारा म्हणतो वातड / हात पाय पसरी.
(८) बाप दाखव नाही तर,...गावाला वळसा

मस्त कल्पना.

एक प्रयत्न.

एक ना धड.......म्हणे माझीच लाल.
अग अग म्हशी......पाहू नको अशी .
शेळी जाते जीवानीशी .....खाणारा म्हणतो पीस कमी.
असतील शिते तर......होईल भात.
वासरात लंगडी गाय...हिरोईन.
म्हतारीने कोंबडे झाकले तरी...अंडी थोडी देणार.
बाप दाखव नाही,तर........माय तरी दाखव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:-))

शेळी जाते जीवानीशी .....खाणारा म्हणतो पीस कमी.
म्हतारीने कोंबडे झाकले तरी...अंडी थोडी देणार(?).

अफलातून

अभिजित...
उनके देखे से जो आ जाती है मुंहपर रौनक़ |
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है |

म्हणींचा संकर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
१/ जोडायचा उत्तरार्ध हा कोणत्यातरी म्हणीचा उत्तरार्धच असावा.ती म्हण अपरिचित असल्यास मूळ म्हण द्यावी.(अनु यानी तसे केले आहे.
२/ माझ्याकडच्या उत्तराशी दोन वाक्ये जुळतात : शेळी जाते जीवानिशी ,मला कुठे नेशी?
..........................................साखरेचे खाणार त्याला, गुळाची चव काय ?

म्हणींचा संकरः उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
माझ्याकडे असलेली उत्तरे अशी:
(१) एक ना धड, मोती जड.(२) अग अग म्हशी, शेपूट राहिले. (२)* अग अग म्हशी, लंगडी गाय शहाणी.
(३) साखरेचे खाणार, त्याला गुळाची चव काय?
(४)शेळी जाते जीवानिशी, मला कुठे नेशी?
(५) असतील शिते तर, भाताची परीक्षा.
(६) वासरांत लंगडी गाय, पडेल काय?.....(गर्जेल तो चा उत्तरार्ध)
(७) म्हातारीने कोंबडे झाकले तरी, कुत्रे पीठ खाते......(आंधळे दळते...)
(८) बाप दाखव नाहीतर, बुक्क्यांचा मार!...... (तोंड दाबून......)

 
^ वर