उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
नवी पुस्तके सुचवा
चित्रा
July 17, 2007 - 5:00 pm
नमस्कार उपक्रमींनो,
मला भारतातून काही निवडक मराठी पुस्तके विकत घ्यायची आहेत. कृपया आपण नुकतीच वाचलेली चांगली नवीन मराठी पुस्तके सुचवाल का? विषयाचे बंधन विशेष नाही. पण नवे काही (नव्या लेखकांचे) वाचायला नक्कीच जास्त आवडेल.
पुस्तके सुचवणार्यांचे आधीच आभार मानते.
चित्रा
दुवे:
Comments
पुस्तके
ऑर्कुट वर इथे मराठी पुस्तकांची कम्युनिटी आहे.
प्रकाश घाटपांडे
मी ऐकलेली
मी वाचली नसली तरी खालील सामाजीक/राजकीय विषयांवरील खालील दोन पुस्तके चांगली असावीतः
चरित्रं अशी घडतात - प्रा. मिलिंद जोशी, अनुबंध प्रकाशन, किंमत - ११०
आणीबाणी आणि आम्ही, संपादन - उषा मेहता, भास्कर सावंत, ग्रंथाली, दादर, मुंबई, पाने - ४०७, किंमत - ५०० रुपये
तसेच खालील व्यक्तिचित्रांचे पुस्तकः
साथसोबत - सिंधू वसंत कानेटकर, पॉप्युलर प्रकाशन, किंमत - १२५ रुपये.
शुभेच्छा!
मला नवी असलेली!
ही पुस्तके (कदाचित) जूनीच आहेत पण मला नवीच.
शाळा - मिलिंद बोकील.
निशाणी डावा अंगठा - इंगळे
नेगल १/२ - प्रकाश आमटे (?) (ही निश्चितपणे जुनी आहेत!)
चिनिमाती, दक्षिणरंग, इजिप्तायन, ग्रीस - मीना प्रभू
ब्र - महाजन
याशिवाय मायबोलीवर पण पहा ना... :)
आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र)
२००६ मधील पुस्तके
गेल्या वर्षी सर्वाधिक खपलेल्या मराठी पुस्तकांची यादी येथे आहे.
अनिल अवचट
अनिल अवचट: दिसले ते, कार्यरत, स्वतःविषयी
अभिजित
अनुमतीची प्रतीक्षा चालू आहे. पण ही अनुमती कोण आणि तिच्या प्रतिक्षेला चालू का म्हणताय?
या वर्षात मला आवडलेली
०.जीएंची पत्रे खंड ३ व ४.
१. वनवासः गणेश देवी
२. झेन गार्डनः मिलिंद बोकील
३. उदकाचिया आर्ती: मिलिंद बोकील
४. बाकी शून्य: कमलेश वालावलकर
५. पारधी: गिरीश प्रभुणे
ईडा टळो नावाचा आत्माराम लोमटे यांचा कथासंग्रहही बरा वाटला. (चू.भू.दे.घे.)
सहजच..
.. यादीची सुरूवात शुन्याने करण्याचे काही खास प्रयोजन?
प्रयोजन नाही
उगाच उपलब्ध असलेला एक आकडा वाया कशाला घालवायचा? :)
शिवाय शून्य म्हणजे पूज्य वगैरे आणि आर्यभट्ट पण.... असाही अर्थ काढता येईल ;)
वरच्या यादीत मिलिंद बोकील यांचेच कातकरी: विकास की विस्थापन हे पुस्तक टाकण्याचे राहिले.
कालच हाती आले
मराठेशाहीतील मनस्विनी: सु. र. देशपांडे
बरंच माहीतीपूर्ण पुस्तक आहे. जिजाऊ, येसुबाई, मस्तानी, राणी लक्ष्मीबाई,राणी ताराबाई आदींबद्दल भरपूर माहीती आहे.
अभिजित...
उनके देखे से जो आ जाती है मुंहपर रौनक़ |
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है |
परत
पुस्तके सुचवणार्या सर्वांचेच खूप आभार.
चित्रा
पुस्तक
माझ्याकडे इथे जास्त मराठी पुस्तके नाहीत. इतक्यात वाचलेले म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णींचे विषादयोग.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.