तर्कक्रीडा:३५: विस्मयकारक विक्री

.....एकदा सात बाया पेरूच्या बागेत गेल्या. त्यांनी पेरू तोडून आपापल्या टोपलीत भरून आणले.पहिल्या बाईच्या टोपलीत वीस (२०) पेरू होते. दुसरीच्या टोपलीत ४० पेरू होते. तिसरीच्या साठ (६०) होते. या प्रमाणे ८०, १००, १२०, आणि शेवटच्या सातव्या बाईच्या टोपलीत १४० पेरू होते.
.....त्या सात जणीं जवळ प्लॅस्टिकच्या पिशव्या होत्या. प्रत्येकीने पिशवीत सारखेच पेरू भरले.(समजा प्रत्येक पिशवीत क्ष पेरू).आता प्रत्येकीच्या टोपलीत पेरू भरून बंद केलेल्या पिशव्या आणि उरलेले सुटे पेरू होते.सुट्या पेरूंची संख्या 'क्ष' पेक्षा कमी होती.(नाहीतर आणखी एक पिशवी भरली असती). कोणत्याही टोपलीतील कोणत्याही पिशवीत समान पेरू होते.( क्ष ).
.....आता त्या सात जणी पेरू विकायला निघाल्या. त्यांनी ठरविले की सर्वांनी पेरूच्या बंद पिशव्या एकाच दराने(त्यातील पेरू बाहेर न काढता) विकायच्या.तसेच सुटे पेरू सुद्धा एकाच दराने विकायचे.(समजा एक पिशवी 'म' रु,एक सुटा पेरू 'न' रु.)
.....या प्रमाणे सर्व पेरूंची विक्री झाल्यावर प्रत्येकीला ४० रुपयेच (चाळीस रु.) मिळाले. म्हणजे पहिल्या बाईने वीस पेरू विकले. तिला ४० रु. मिळाले.दुसरीने चाळीस पेरू विकले तिलाही ४० रु.च मिळाले.तसेच सहाव्या बाईने १२० पेरू विकले. तिची कमाई ४० रु.च झाली. सातवीने सुद्धा १४० पेरू विकून चाळीस रुपयेच मिळवले.तरः

प्रत्येक बंद पिशवीत किती पेरू होते? (क्ष=?)
प्रत्येक पिशवीचा दर काय? (म=?)
प्रत्येक सुटा पेरू केवढ्याला विकला? (न=?)

...............................(कृपया उत्तर व्यनि. ने)

लेखनविषय: दुवे:

Comments

तर्क.३५ पेरू विक्री

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे सर्वप्रथम उत्तर प्रियाली यांचे आले. ते अर्थातच बरोबर आहे.हे कोडे सोडविण्याची निश्चित अशी काही रीत नसताना केवळ गणिती तर्काने उत्तर शोधण्यात त्यांना यश आले. अभिनंदन!

तर्क.३५:पेरू विक्री

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

श्री.आजानुकर्ण (योगेश) हे कोड्याचे उत्तर शोधण्यात यशस्वी ठरले आहेत.
मीरा फाटक यांनीही बरोबर उत्तर पाठविले आहे. त्या लिहितात "(असेच कोडे श्री.दिगम्भा यांनी मनोगतावर घातले होते म्हणून हे मला सुटले!)"
दोघांचेही अभिनंदन!

तर्क.३५: पेरू

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विसुनाना आणि श्री. टग्या यांनी या कोड्याची अचूक उत्तरे शोधली आहेत. श्री. टग्या यांनी दोन पर्यायी उत्तरे दिली आहेत. अभिनंदन!

तर्कक्रीडा ३५: विस्मयकारक विक्री.:उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हे कोडे सोडविण्यासाठी निश्चित अशी रीत नाही. योग्य दिशेने विचार केला तर कोडे त्वरित सुटते.याची दोन उत्तरे येतात. (|) प्रत्येक पिशवीत ७(सात) पेरू.(क्ष=७), पिशवी:२ रु.(म=२), सुटा पेरू: ६रु.(न=६)
........(||) क्ष=२१, म=२, न=२
( "उत्तरे व्यवहार्य नाहीत" असे म्हणणे इथे अप्रस्तुत आहे. कोडी आणि व्यवहार यांचा संबंध नाही. दिलेल्या अटी आणि निसर्ग नियम पाळले म्हणजे झाले.)

उशीर झाला !!

प्रत्येक पिशवीत १५ पेरू पासून सुरुवात करून १० पर्यंत आले होते, तेवढ्यात उत्तर आलेच !!
ह्यासाठी trial and error हीच पद्धत सर्वात योग्य होती ना की अजून कुठल्या पद्धतीने करता येते?

धन्यवाद

आपल्या विस्त्रुत (हे लिहायला चुकलंय बहुतेक) प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!

तर्काने टार्गेट संच लहान करता येतो

बरोबर आहे, त्याप्रमाणेच १५ पासून सुरुवात केली होती, परंतु एवढा व्यवस्थित विचार करता आला नव्हता त्यामुळे वेळ लागला (१५ आधीच बाद करायला हवा होता हे खरं तर लगेच समजायला हवं होतं) !!

अनेक धन्यवाद

 
^ वर