तर्कक्रीडा:३४: अडेलतट्टू
......ही जुन्या काळची गोष्ट आहे.रामभट आणि शामभट हे दोघे शिवापुरचे रहिवासी.परस्परांचे मित्र. एकदा त्या दोघांना शिवापूर हून साठ(६०) किलोमिटर अंतरावरच्या दिवापूर या गावी जायचे होते.
......शामभटाची एक तट्टाणी होती.तिच्यावर एक स्वार बसला की ती दुडक्या चालीने ताशी बारा (१२) किमी. वेगाने जात असे.मात्र दोघेजण आरूढ झाले की ते तट्टू अडून राही. एकही पाऊल पुढे टाकत नसे.
......रामभटाकडे प्रवासाचे काहीच साधन नव्हते. तरी सुद्धा त्या दोघांनी शिवापूरहून एकाच वेळी निघायचे आणि दिवापूरला दोघांनी एकाच वेळी पोचायचे असे ठरविले.
......त्या दोघांचाही पायी चालण्याचा वेग ताशी पाच(५) किमी. असा नियमित होता.
......एके दिवशी पहाटे सहा वाजता ते प्रवासाला निघाले.दिवापूरचा रस्ता चांगला होता.रानारानातून जात होता. शामभट तट्टावर बसून निघाला.त्याच वेळी रामभट पायी निघाला.काही वेळाने शामभट तट्टावरून उतरला.तट्टाला रस्त्याच्या बाजूच्या एका झाडाला बांधले.आणि तो पायी पुढे निघाला. इकडे रामभट चालत चालत तट्टापर्यंत आला.दोरी सोडली आणि तट्टावर स्वार होऊन निघाला.वाटेत त्याला शामभट दिसला तरी न थांबता काही अंतर पुढे गेल्यावर तो तट्टावरून उतरला..तट्टाला झाडाला बांधून तो पायी पुढे निघाला. शामभट ताट्टापर्यंत पोचल्यावर त्यावर आरूढ होऊन पुढे निघाला. याप्रमाणे प्रवास करीत ते दोघे (तट्टासह) एकाच वेळी दिवापूरला पोचले.
तर त्यावेळी किती वाजले होते ?
या सर्व प्रवासात शामभटाच्या तट्टाणीला किती वेळ विश्रांती मिळाली?
....................................................................................................................................
**कृपया उत्तर व्यनि.ने पाठवावे.
(तट्टावरून उतरून त्याला बांधून ठ्व्णे;तसेच त्याला सोडून त्यावर आरूढ होणे या साठी लागणारा वेळ नगण्य मानावा.)
..इदं न मम (डिस्क्लेमर ): एका इंग्रजी कोड्यावर आधारित....
....य
Comments
खोगीरभरती
उत्तर व्य. नि. ने पाठवले आहे.
उत्तर
व्यनिने !
तर्क.३४ अडेलतट्टू
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
१ .श्रीं. नंदन यांनी बीजगणिती समीकरण वापरून कोडे सोडविले. दोन्ही उत्तरे बरोबर काढली. अभिनंदन!
२ .श्री. तो यांनी केवळ गणिती युक्तिवादाने कोडे सोडविले. दोन्ही उत्तरे अचूक शोधली. अभिनंदन!
तर्क.३४ अडेलतट्टू
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आवडाबाई यांनी हे कोडे जवळ जवळ तोंडीच सोडविले. दोन्ही उत्तरे बरोबर. अभिनंदन!
तर्कक्रीडा:३४: अडेलट्टू
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. नंदन, तो आणि आवडाबाई या तिघांनीच या कोड्याचे अचूक उत्तर पाठविले.
श्री. विसुनाना लिहितात "श्यामभट आणि रामभटांपैकी कोणीतरी एक जण सातत्याने चालत आहे" श्री.दिगम्भा यांनीही असेच विधान केले आहे. ते विधान खरेच आहे.त्याचाच धागा पकडून उत्तर देतो.
............
"श्यामभट आणि रामभटांपैकी कोणीतरी एक जण सातत्याने चालत आहे " त्यामुळे ६० किमी. चालण्यासाठी (६०/५) १२ तास लागले. हो. पण हा दोघे चालले त्याचा वेळ आहे. एकट्याचा नाही.
तट्टू सुद्धा ६० किमी. चालले. ते चालत असताना त्याच्या पाठीवर दोघांपैकी एकजण सातत्याने आहेच. या प्रवासाला (६०/१२) ५ तास लागले. हा सुद्धा दोघांना लागलेला वेळ.म्हणून दोघांना लागलेला एकूण वेळ (१२+५) १७ तास. पण दोघांना समान वेळ लागला.म्हणून प्रत्येकी (१७/२ ) साडे आठ तास लागले. म्हणून ते दुपारी अडीच वाचता दिवापूरला पोचले.
( बीजगणिती समीकरण लिहूनही कोडे सोडविता येईल)
तट्टू साडे आठ तासांतील पाच तास चालले. म्ह. त्याला साडे तीन तास विश्रांती मिळाली.