काही शाब्दिक खेळ

१) असे तीन शब्द जे एकाच व्यंजनापासून (वा त्याच्या बाराखडीपासून) तयार होतात, पण ते चार अक्षरी आहेत. (ध्वनिवाचक नकोत. उदा. पिपपिप.)
२) असे तीन शब्द जे तीन अक्षरी आहेत आणि त्यांतील तीनही अक्षरे ही जोडाक्षरे आहेत. (शब्द अर्थपूर्ण असले पाहिजेत.)
३) असा अर्थपूर्ण एकाक्षरी शब्द, ज्यातील अक्षर हे जोडाक्षर असेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

एक "ढ" प्रयत्न

भाषेचे ज्ञान अगदीच तोकडे असल्याने तीन तीन शब्द शोधणे शक्य होईल असे वाटत नाही पण प्रश्नांची मजा वाटली म्हणून निदान एक उत्तर प्रत्येक प्रश्नाचे देते.

१) असे तीन शब्द जे एकाच व्यंजनापासून (वा त्याच्या बाराखडीपासून) तयार होतात, पण ते चार अक्षरी आहेत. - लालेलाल
२) असे तीन शब्द जे तीन अक्षरी आहेत आणि त्यांतील तीनही अक्षरे ही जोडाक्षरे आहेत. (शब्द अर्थपूर्ण असले पाहिजेत.) - वृद्धत्व, ब्रह्मज्ञ, ब्राह्मण्य

३) असा अर्थपूर्ण एकाक्षरी शब्द, ज्यातील अक्षर हे जोडाक्षर असेल. - ब्र !!

ब्र!!

असा अर्थपूर्ण एकाक्षरी शब्द, ज्यातील अक्षर हे जोडाक्षर असेल. - ब्र !!

अशा जोडाक्षरांना काना दिला तरी तो अर्थपूर्ण जोडाक्षरच होतो.
प्रकाश घाटपांडे

आहे खरा

परंतु तो इंग्रजी असल्याने मराठी संकेतस्थळावर या खेळात अनावश्यक आहे असे वाटते. :))

हा हा हा!!

हा हा हा!!!
सही घाटपांडे साहेब!!!

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर नि त्यातले 'आमच्याशी असणारे साम्य' पाहुन गुंडोपंत चकित आहेत!!!!)

गुंड्या ही व्यक्ती नाही वृत्ती आहे. निंदकाला फक्त शेजारीच नाही तर अगदी आग्रहाने पेइंग गेस्ट बनवण्याचा बाणा म्हणजे गुंड्या.

आणखी दोन

तंतोतंत, बोंबाबोंब

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

अरे हो की

सदैव बोंबाबोंब करणार्‍यांना तरी तो आठवायला हवा होता. ;-)

वावावावा

तो ने कमाल केली आहे. अभिनंदन्.

वा!!

प्रियाली आणि तो यांची कमाल आहे. मला चार् अक्षरी व एकाच व्यंजनापासून् बनलेला एकही शब्द आठवला नव्हता.

तीन अक्षरी - जोडाक्षरी - प्रद्युम्न, श्रीकृष्ण

एकाक्षरी जोडाक्षरी - श्री

प्रच्छन्न

२) असे तीन शब्द जे तीन अक्षरी आहेत आणि त्यांतील तीनही अक्षरे ही जोडाक्षरे आहेत. असे आणखी काही

प्रच्छन्न, प्रत्यक्ष, प्रकृष्ट,

व्यक्तिश: ही चालेल ना?

चटकन

राग येतो?- जोगिया असू दे
प्रियालीताई, शब्दखेळ् मस्त सुरु आहे.

काहीबाही

राग येतो?- जोगिया असू दे

तूर्तातूर- लवकर् , सत्वर्
लललल, चचचच (उद्गारवाचक् आहेत ..)हे दोन्ही शब्द् निराशाजन उद्गार् दर्शवतात्.
त्रिपुंड्र्, प्रित्यर्थ, मृदंग्या

त्रि, श्री, ब्र,

बोंबाबोंब बाबत

केवळ ब च्या वापरानेच बाब, बाबा, बोंब, बिब्बा, बांबू, बाबू, बिंब (बिंबा, बेबी) असे अर्थपूर्ण शद्ब बनतात,

तात, ताता, तुती, (तात्या) त्यातलेच;)

'तो'

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

शब्दखेळ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
तीन आणि चार अक्षरी शब्द अनेकांनी सुचवले आहेत. एकाक्षरी राहिले. 'ब्र' हा शब्द नव्हे. ते केवळ अक्षर आहे. त्याविषयी नंतर .

एकाक्षरी :
त्वां (त्वां काय कर्म करिजे लघुलेकराने| बोलोनिया मग धनू धरिले कराने |)
म्या (काय म्या पामरे| बोलावी उत्तरे|
भ्रू (भिवई..उच्चभ्रू )
श्री ( लक्ष्मी)
द्यु (स्वर्ग,आकाश)

एकाक्षरी जोडाक्षरी शब्द

त्या येथे येत होत्या.

ह्या बाईंना सांगावे.

ब्र हा शब्द का नाही बरे?

धृष्टद्यु म्न

धृष्टद्युम्न (म्+न) हा नीट दिसत नाही म्हणून फोड

अवांतर- हा शब्द न अडखळता चार वेळा सुस्पष्ट उच्चारता आला तर ब्रेथ अनालायझर ची गरज नाही.

प्रकाश घाटपांडे

अरे वा !!

आता लेडी यनावाला? छान, छान !!

एकाक्षरी

'स्त्री' कुणालाच कशी आठवली नाही बरे?

जोडाक्षर्?

यात जोडाक्षर् आहे. गोपिकाबाई जोडाक्षर् नको ना?
ऩक्की काय् हव् आहे...

स्त्री - ह.ह.मु.व.

"स्त्री" हा शब्द उपक्रमाचा सध्या एक्का आहे हो. विसरले कसे म्हणतो मी?

-राजीव.

नाही

हा प्रतिसाद लिहिताना, माझा रोख त्या चर्चेकडे नव्हता.
राधिका

जबरदस्त!

तंतोतंत, लालेलाल आणि बोंबाबोंब! एकदम तंतोतंत!

’ब्र’ मराठी का नाही बुवा?

तूर्तातूर आणि लललल म्हणजे काय?

संन्यस्त आणि शास्त्रार्थ यांच्यात अनुक्रमे ’सं’ आणि ’शा’ जोडाक्षरं कुठे आहेत?

आता एकाक्षरी शब्द, ज्यात जोडाक्षर नाही, पण तो अर्थपूर्ण आहे... असे बरेच आहेत म्हणा. बघू आपल्याला किती आठवतात.

श्रीमंत गोपिकाबाई पेशवे

असंख्य..

एकाक्षरी जोडाक्षरविहीन शब्द भरपूर आहेत, तूर्त फक्त स्वरच देण्याचा प्रयत्‍न केला आहे:
अं, आ, आं, ई, उं,ऊ, ऊं, ए, ओ, अं आणि ॐ. यातली आं, उं, ऊं आणि अं ही प्रश्नार्थक अव्यये आहेत, आणि ई उद्गारवाचक..--वाचक्‍नवी

ब्र

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ब्रु (२उ.प) बोलणे हा संस्कृत धातु आहे. तो ब्रवीमि ब्रूवः ब्रूमः | असा ( परस्मैपदी) चालतो. त्यातील "ब्रवीमि "(वर्त.प्र.पु.ए.व.) चा अर्थ "मी बोलतो/बोलते " असा होतो.
एखाद्या विषयावर चर्चा चालू असता जर कोणला काही मतप्रदर्शन करायचे असेल तर हात वर करून त्याने "ब्रवीमि" असे म्हणायचे.' ब्रूहि'(तू बोल) अशी संमती मिळाल्यावर बोलायचे. पुनःपुन्हा बोलून चर्चेत प्रत्यवाय आणणार्‍याला " "ब्र (ब्रवीमि चे पहिले अक्षर) अपि मा ब्रूहि " असे सांगितले जात असावे. त्याचे मराठीकरण "ब्र सुद्धा उच्चारू नकोस "असे झाले. ब्र हे केवळ अक्षर आहे असे मी म्हणतो ते या अर्थी.
अर्थात ब्र चा अर्थ अवाक्षर, चकारशब्द असा होऊ शकेल आणि तो एकाक्षरी शब्द मानता येईल हे मान्य आहे.

या वरून आठवले

शाळेत ५० मार्कांच्या संस्कृत मधे एकदा "ब्र" हा धातू वापरायला होता आणि खालील विधान होते:

सत्यम् बृयात्
प्रियम् बृयात्
न बृयात् सत्यं अप्रियम्

म्हणजे, खरे बोला, प्रिय वाटेल असे बोला पण अप्रिय वाटेल (ऐकणार्‍याला!) असे सत्य बोलू नये!

मला वाटते या वचनाच्या अंमलबजावणीची उपक्रमावर तातडीने गरज आहे!

ब्रूयात्

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
विचार योग्य आहे. लेखनात किंचित् सुधारणा अशी:

सत्यं ब्रूयात्
प्रियम् ब्रूयात्
न ब्रूयात् सत्यमप्रियम्

धन्यवाद

दुरूस्तीबद्दल धन्यवाद!

मला एकदा तसे आहे असे वाटले पण ब्रु आणि बृ यातला फरक समजला नाही.

विकास

अरे हो

वाचताना खटकले, पण काय् ते आत्ता कळले

ब्रु आणि बृ यातला फरक
काय?

 
^ वर