एक मदत हवी आहे.

एक मदत हवी आहे.

वीर सावरकरांनी भारताबाहेर ध्वजारोहण केलेल्या घटनेस १०० वर्षे पूर्ण् झाल्याच्या निमित्ताने गिर्यारोहकांचा एक कार्यक्रम १८ ऑगस्ट रोजी आयोजित केला आहे. त्यात भाग घेण्यासाठी आमच्या गटाला एक आकर्षक मराठी नाव हवे आहे. आपण सुचवण्यास मदत करु शकता का?

धन्यवाद,
आजानुकर्ण

लेखनविषय: दुवे:

Comments

सह्याद्री

कसे वाटेल? गिर्यारोहण आणि अस्सल मराठी बाणा या दोन्हींचा मिलाफ वाटू शकेल.

ध्वजाभिमानी

ध्वजाभिमानी कसे वाटते? किंवा धरोहर?





मराठीत लिहा. वापरा.

धन्यवाद/धरोहर??

परीवश व चाणक्य,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

धरोहरचा अर्थ काय आहे.

धरोहर

हिंदीमध्ये धरोहर म्हणजे महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे वगैरे..राष्ट्रीय धरोहर वगैरे..उदा: गेट वे ऑफ इंडिया, लेणी, किल्ले, संग्रहालये.

मराठीत हा शब्द असलेला माझ्या ऐकिवात नाही.

अभिजित
अनुमतीची प्रतीक्षा चालू आहे. पण ही अनुमती कोण आणि तिच्या प्रतिक्षेला चालू का म्हणताय?

वीरध्वज वंदन

यशोध्वज स्मरण

झंझावात

झंझावात कसे वाटते?

झंझावात

अजून सुचले तर सांगतोच..

अभिजित...

अनुमतीची प्रतीक्षा चालू आहे. पण ही अनुमती कोण आणि तिच्या प्रतिक्षेला चालू का म्हणताय?

छान हाय!

नाव मराठमोळं वाटू द्या बा! ह्ये छान हाय.
एकाद्या कवींना इचारा, ते भारी सुचवतील.

- राजीव.

म्या खेडुताचा फ्यान हाय.

ध्वजेंद्र!

कसे वाटेल?
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

दिव्यपताका

दिव्यपताका कसे वाटेल?

घाईत

घाईत 'दिव्यकाका' वाचले!!

धन्यवाद / विनंती

शब्द सुचवणार्‍या सर्वांना धन्यवाद.

एक प्रेमळ विनंती करावीशी वाटते की, शब्द सुचवताना केवळ ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाचा संदर्भ लक्षात घेऊ नये. :)
मनोगतावर वैनतेय असा सुरेख शब्द सुचवला आहे मात्र तो आधीच एका गटाने घेतलेला आहे असे कळाले.
मला उच्चैश्रवा असा शब्द सुचला होता... पण तो उच्चार करण्यासाठी खूपच अवघड आहे.

सुबक ठेंगणा मराठमोळा शब्द सुचवावा ही विनंती...

माझा प्रयत्न

क्षितीजस्पर्शी
गगनभेदी(हे जरा वर्तमानपत्राचे नाव वाटत आहे. आहे बहुतेक या नावाचे पत्र.)

अनिल थत्ते

ठाण्याचे अनिल थत्ते हे पत्र (वृत्तपत्र की साप्ताहिक की मासिक माहीत नाही) चालवतात.

गगनभरारी

ही चालेल परंतु चार अक्षरी शोधायला हवे असे वाटते.

सहा अक्षरीही चालेल :)

अक्षरांच्या संख्येवर बंधन नाही

शिलंगण?

चालेल का? भारताबाहेर झेंडा लावला याअर्थी सीमोल्लंघन म्हणून हा डोक्यात आला. अटकेपार झेंडे लावले, तसे काहीसे - शिवाय सीमोल्लंघनापेक्षा शिलंगण अधिक मराठमोळा वाटतो.

गडगडी

गडगडी - गड चढणारे गडी :)
गडमित्र
गिरीमित्र
गिरीवीर





मराठीत लिहा. वापरा.

गडगडी... :)

चांगला आहे... ;) पण आमच्या गटात काही वीरांगनाही असल्यामुळे गड्यांचे म्हणणे स्वीकारले जाणार नाही. त्या भटकभवानी हा शब्द सुचवतील... ;)

गिरीमित्र आधीच घेतला आहे...

गिरीप्रवासी, गिरीप्रेरणा, गिरीभ्रमंती, शिवप्रेरणा (आलो शेवटी महाराजांपर्यंत) हे सुचत आहेत.

येऊद्या अजून.. :))

आम्हाला काय माहित?

पण आमच्या गटात काही वीरांगनाही असल्यामुळे गड्यांचे म्हणणे स्वीकारले जाणार नाही. आता आम्हाला काय माहित? आणि खरतर गडी म्हणले कि खेळातला गडी होतो. मग तो कोणत्याहि लिंगाचा असो.

गटात एकुण कितीजण/णी आहेत?





मराठीत लिहा. वापरा.

व्हेरिएबल

गटातील पटूंची संख्या नेहमीच सारखी नसते... तरी नियमित आठ ते दहा जणांचा गट आहे...

वाटचाल

वाटचाल
फूजिसान('पूर्वरंग' च्या संदर्भाप्रमाणे उंच नागाधिराज)!!
घोरपड(पहिल्यांदा घोरपडीच्या साहाय्याने तानाजीने ट्रेकिंग केले म्हणून)
उन्नती
मेघनगरी
उत्कर्ष

गगनभरारी

गगनभरारी
सह्यकडा
उधाणवारा
मर्दमराठा (अर्थात वीरांगना असल्याने..?)

(राष्ट्र)पताकाधारी

पताकाधर,ध्वजानुबाहू

प्रकाश घाटपांडे

ध्वजानुबाहू आवडले

सुंदर नाव आहे. :)

-ध्वजानुकर्ण

सावरझेंडा

सावरझेंडा

कसे आहे?

शिवानी

सावरझेंडा लै झकास!

वा
"सावरझेंडा" लैच झकास आहे बरं का!
आप्ल्याला तर आवडलं बॉ!

आपला
(मतांचे झेंडे लावणारा)
गुंडोपंत

गिरीजन

साधे आणि सोपे

आभारी

शब्द सुचवणार्‍या सर्वांचे आभार.

कोणता

कोण्ता घेतला मग्?
आमचा नाही आवडला वाटते...
सावरकर आणी झेंडा म्हणून सावरझेंडा असे केले.
असो. काही हरकत नाही.

शिवानी

आम्हाला वाटलं

झेंडा सावरायचा म्हणून सावरझेंडा.. ;-)

अभिजित

अनुमतीची प्रतीक्षा चालू आहे. पण ही अनुमती कोण आणि तिच्या प्रतिक्षेला चालू का म्हणताय?

गावलं का?

योगेशराव तुमासनी नाव गावलं की नक्की कळवा बरका.. म्हंजी आमासनी ह्ये मैदान टवाळक्या कराया मोकळं हुईल!!

चालू द्या...

टवाळक्या चालू द्या... नाव सापडेलच...
सध्या अश्वमेध आणि गिरीप्रेरणा ही दोन नावे शॉर्टलिष्ट केली आहेत... पण इतर नावेही लोभवून टाकणारी आहेत... त्या नावांवरही चर्चा सुरु आहेच...

मेघदूत

मेघदूत
आगेकूच
भटककंपू
समुद्रपक्षी
नभवासी
मुक्तप्रवासी

मेघदूत

छान!!!

मेघमल्हार..

अभिजित
अनुमतीची प्रतीक्षा चालू आहे. पण ही अनुमती कोण आणि तिच्या प्रतिक्षेला चालू का म्हणताय?

येऊ द्या...

भटककंपू हे नावही चांगले आहे... सावरझेंडाही चांगले आहे पण ते नाव ध्वजारोहणानंतर फारसे उपयुक्त राहणार नाही...

आपला,
(भटकझेंडा) आजानुकर्ण

आणखी दोन नामाभिधाने

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
उंच या अर्थी " उत्तुंग "
अग्र म्हणजे शिखर.त्यावरून : "अग्रगामी"

अग्रगामी - सुरेख

समर्पक शब्द आहे.

धन्यवाद.

ध्वजारोहिणी, वैनायक

ध्वजारोहिणी = ध्वज घेऊन चढणारी सेना या अर्थाने
वैनायक = विनायकांची (सावरकरांची) मुले अथवा त्यांच्या कुलातले लोक

- दिगम्भा

 
^ वर