आवाज

मोठ्या शहरांतून, रस्त्यावरुन जाणार्‍या वहानांचे फार मोठे आवाज कानांवर पडत असतात. आपल्या कानांवर पडणार्‍या आवाजामुळे कानाचा पडदा कंप पावतो, त्यामुळे त्याला जोडलेल्या हाडांच्या साखळीमध्ये हालचाल होऊन आपल्याला आवाज ऐकू येतो. याच पध्दतीने शहारांत निर्माण होणार्‍या या आवाजांपासून ऊर्जा निर्माण करणे शक्य आहे काय? ऊर्जा कधीहि नाश पावत नाही असे म्हणतात मग या ध्वनि ऊर्जेपासून गतिक् ऊर्जा व त्यापासुन विद्युत् ऊर्जा निर्माण करणे शक्य आहे कां?

कमलाकर १४६९

लेखनविषय: दुवे:

Comments

अर्थातच येते आणि आपण निर्माण करतोही

आपल्या नेहमीच्या परिचयाचे प्रेरण सूक्ष्मध्वनि (इंडक्टिव्ह मायक्रोफोन्स्) याच तत्त्वावर चालतात.

इंडक्टिव्ह मायक्रोफोन म्हणजे उलटा कर्णा (स्पीकर). त्याच्यावर ध्वनीलहरी आदळल्या असता होणार्‍या पडद्याच्या कंपनामुळे त्याला जोडलेली तारांचे वेटोळे (कॉइल) एका (विद्युत)चुंबकात (एलेक्ट्रो- किंवा नुसतेच मॅग्नेट) मागेपुढे होते. या हालचालीमुळे तिच्यात विद्युतचुंबकीय प्रेरीत विद्युतदाब (एलेक्ट्रो-मॅग्नेटिक इन्डक्षन व्होल्टेज) निर्माण होतो. या दाबामुळे त्या कॉइलला जोडलेल्या विद्युतमंडलामध्ये (सर्किट) विद्युतधारा (करंट)वाहू लागते.
परंतु हा विद्युतदाब आणि विद्युतधारा फारच क्षीण असल्याने त्याचे बाह्य ऊर्जा पुरवून वर्धन (ऍम्पलीफिकेशन) करावे लागते. हे काम करणार्‍या विद्युत उपकरणालच आपण ध्वनीवर्धक (साऊंड ऍम्प्लिफायर) म्हणतो.

संचयक सूक्ष्मध्वनि (कंडेन्सर मायक्रोफोन्स्) मात्र वेगळ्या तत्त्वावर चालतात.

तत्त्वतः आपली कल्पना योग्य असली तरी निर्माण होणारा विद्युतदाब अत्यंत कमी असल्याने या प्रयोगाचे व्यावसायिक स्वरूप सिद्ध होत नाही. कदाचित अतिवाहक (सुपर कंडक्टर) तारांच्या वेटोळ्यामध्ये (कॉइल) जास्त विद्युतदाब निर्माण होईल. पण आज तरी हे तंत्रज्ञान व्यावसायिकदृष्टया अविकसित आहे.

आपण जर अभियंता (इं....) अथवा शास्त्र पदवीधर (सा..ग्रा...) असाल तर हे सारे आपणास माहित आहेच.

हे मराठी जरा अतीच (टू मच) झाले आहे ना? ;)

२५० ते १२ व्होल्टस्

कोर्डे साहेब,
आता एक आवांतर शंका विचारतो.

आपल्याकडे विज वापरात २५० व्होल्टस् सगळीकडे वापरले जातात. घरातली बहुतेक सर्व उपकरणे त्यावर चालावीत अशीच बनवलेली असतात. विज गेल्यावरची उपाय योजना म्हणून इन्व्हर्टर बसवले असल्यास त्यातल्या विद्युत संचातून १२ व्होल्टस् चे २५० व्होल्टस् करून त्यासाठी वापरतो.

पण या शिवाय बरेचदा आपण फक्त १२ व्होल्टस वर चालणारे उपकरणेही पाहतो. मोटारींमध्ये असलेली उअपकरणे ही १२ व्होल्टस् वरच चालतात. टिव्ही, फ्रिज, इस्त्री, दिवे, पंखे ही नेहमीची उअकरणे तर १२ व्होल्टस् वरही चालणारी बनवलेली पाहतोच.

अशा वेळी जर
१. घरातले सर्व उपकरणे १२ व्होल्टस् ची बसवली आणी येणारा विद्युत दाब १२ व्होल्टस् ला नियंत्रीत केला, तर विज बचत होते काय?

२. जर सगळी उपकरणे १२ व्होल्टस् वर अशीही चालतातच तर २५० व्होल्टस् चे प्रयोजन काय आहे?

३. आपल्या कडे २५० व्होल्टस् तर इतर देशांत ११० व्होल्टस् कसे काय? नि का?

४. जगात इलेक्ट्रीकल पिन्स (सॉकेट) चा आकार कोण नियंत्रीत करते?

आपला
(शंकीत नि कंजुष)
गुंडोपंत

१२ व्हो. डी.सी. आणि २३० व्हो. ए.सी.

तुम्ही कोर्डेसाहेबांना उद्देशून विचारलेले प्रश्न मला विचारले आहेत असे समजून उत्तर देतो -

१२ व्हो. डी.सी. आणि २३० व्हो. ए.सी. यांमध्ये मूलभूत फरक म्हणजे डायरेक्ट करंट आणि अल्टर्नेटिंग करंट. ज्या विद्युत प्रवाहाची ध्रुविता (???पोलॅरिटी) कालानुरूप बदलते त्याला अल्टर्नेटिंग करंट तर ज्याची बदलत नाही त्याला डायरेक्ट करंट असे म्हणतात. याचे स्पष्टीकरण थोडक्यात देणे मला जमत नाही.
१. घरातले सर्व उपकरणे १२ व्होल्टस् ची बसवली आणी येणारा विद्युत दाब १२ व्होल्टस् ला नियंत्रीत केला, तर विज बचत होते काय?
-उलट जास्त वीज खर्च होते. कारण २३० व्हो. ए.सी. चे रूपांतर १२ व्हो. डी.सी. मध्ये करण्यात एक विद्युत प्रणाली लागते. जगातील कोणत्याही प्रणालीची कार्यक्षमता १००% नसते (१००% पेक्षा कमी असते) हे आपण जाणताच. कारण कोणत्याही कार्यात ऊर्जेचा अपव्यय होतो.
२. जर सगळी उपकरणे १२ व्होल्टस् वर अशीही चालतातच तर २५० व्होल्टस् चे प्रयोजन काय आहे?
- एडिसनने विद्युत निर्मिती प्रकल्पात डी.सी. जनरेटर बसवले. निकोला टेस्लाने ए.सी. विजेचा प्रचार केला. दोघांचा बराच वाद झाला. परंतु ए.सी. विद्युतप्रणाली दोन महत्वाच्या कारणांसाठी मान्यता पावली. -
अ. सोपी निर्मिती. ब. सोपा विद्युतदाबातील बदल (जेणेकरून विद्युत वहनातील I^2*R ऊर्जातोटा टाळता येतो. त्यांमुळे आपण पायलन्स् आणि खांबांवर स्वस्त आणि मजबूत स्टीलच्या तारा वापरू शकतो. यावर आपण अन्य संस्थळांवर वाचू शकता.)
३. आपल्या कडे २५० व्होल्टस् तर इतर देशांत ११० व्होल्टस् कसे काय? नि का?
-ज्या त्या देशातील विद्युतनिर्मिती उपकरणांच्या रचना आणि फिरण्याची गती यांवर विद्युत दाब आणि वारंवारता अवलंबून असते. त्यामुळे भारतात २३० व्हो. ५० हर्टज् ए.सी. तर अमेरिकेत् ११०व्हो. ६० हर्टज् ए.सी. विद्युतप्रवाह उपलब्ध आहे.
४. जगात इलेक्ट्रीकल पिन्स (सॉकेट) चा आकार कोण नियंत्रीत करते?
-जगातील प्रत्येक वस्तूप्रमाणेच याचेही मानक (स्टँडर्ड्) ठरलेले आहेत. वेगवेगळ्या संस्था हे मानक प्रस्थापित करतात. उत्तर अमेरिका खंडात बहुतेक ठिकाणी "नेमा६-१५ / ५-१५" (NEMA) या मानकाचे तर भारतात बी एस्५४६ (British Standard 546) या मानकाचे सॉकेट चालतात. (थोडक्यात येथे.)

विद्युतनिर्मिती उपकरणांच्या रचना

विद्युतनिर्मिती उपकरणांच्या रचना आपल्याला सारख्या नाही का करता येणार?

कमी विद्युतदाबावर (व्होल्टेज)चालणारी उपकरणे उच्चतंत्रज्ञानाचा वापर करून बनवली जातात. मग आपल्या देशात तसे तंत्रज्ञान नाही काय?

अभिजित

ब्येश्ट

तुमीबी आमच्यावानीच दिसतायसा!
येखाद्याला 'ग्यास' झाला तर त्यापासून् उर्जा कशी निर्मान करावी ? असलं इचार आमच्याबी मनात येत्यात .. तुमीतर आमच्याबी फुडं दिसताय!!

 
^ वर