अतर्क्य घटना - काही अनुभव?

अतर्क्य घटना - काही अनुभव?

काहीवेळा असे अनुभव येतात की त्यांची काही संगती लागत नाही. तार्किक दृष्ट्याही काही उत्तर मिळत नाही. अशा अनुभवांना अंधश्रद्धाही म्हणवत नाही. माझ्या आठवणी प्रमाणे विणा गवाणकर किंवा मीना प्रभू (बहुदा गवाणकरच) यांनी एक पुस्तकात थायलंडमध्ये प्रवास करताना एका बुद्धविहारात आलेला चमत्कारिक अनुभव दिला आहे. यात कधीही न पाहिलेली एक बौद्ध साध्वी लेखिकेला हाताला धरून घेऊन गेली अशा स्वरूपाचा. सहजतेने फारसा न पटण्यासारखा. चमत्कारिक!

असे अनेकदा अनुभव सांगोवांगी पण ऐकलेले असतात. असाच एक अनुभव माझ्या एका रिचर्ड नावाच्या मित्राने सांगितला. हा मित्र जिओलॉजीमध्ये डॉक्टरेट केलेला आहे. आणि सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये सरकारच्या खनिज खात्याचा एक डायरेक्टर आहे.

खाणीच्या कामामुळे त्याला अनेकदा देशभर फिरावे लागते. कामाचा भाग म्हणून काहीवेळा स्थानिक आदिवासीबरोबर (ऍबोरिजिनल) चर्चा करावी लागते. कंपन्यांना जमिनींतून खनिजे काढू द्यावीत यासाठी त्यांना पटवावे लागते. यात 'पटवावे लागते' कारण हे आदिवासी जमिनीला आई/देव मानतात. आणि त्यांचा याला सक्त विरोध असतो. खाणकाम मुख्यत: पश्चिम ऑस्ट्रेलिया मध्ये चालते. अशाच एक खाणकाम विषयक दौऱ्यावर असताना एक अगदी लहानशा आदिवासी खेड्यात, आदिवासी, कंपनीचे प्रतिनिधी आणि सरकार तर्फे रिचर्ड आणि त्याचे ऑफिसर्स अशी मीटिंग होती. येथे होऊ घातलेल्या खोदकामाला आणि मीटिंगलाही जुने म्हातारे आदिवासी विरोध करत होते. ही मीटिंग सुरू असताना, एक अगदी जख्खड अशी म्हातारी बाई ओरडा आरडा करत तेथे आले आणि मोडक्या तोडक्या इंग्रजीत म्हणाली की, तुम्ही हे ठीक करत नाहीये. याची फळे तुम्हाला भोगावीच लागतील. मी माझ्या पूर्वजानं आवाहन करते आहे.

पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी तिला बाहेर काढले. पण मग तिने त्या 'शापासाठी'(?) लागणारे सर्व विधी त्या दाराबाहेरच बसून मंत्रोच्चार करत केले.

रिचर्डच्या म्हणण्यानुसार त्याला त्यांनंतर लगेचच एक प्रकारचे दडपण मानेजवळ जाणवायला लागले. आणि ते काहीकेल्या जाईना.

त्याच्या म्हणण्यानुसार तो अशा ढिगाने मीटिंग्ज अटेंड करतो. आणि अनेकदा तर मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्र्यांसोबत असतो. आदिवासींची अनेक निदर्शनेही त्याने पाहिली आहेत, पचवली आहेत. त्यामुळे यात मीटिंग चा ताण हा भागच नव्हता. यावेळी हे एक वेगळीच 'असणे' त्याच्या सोबतच होते. त्याला ते कुणाला समजावूनही सांगता येत नव्हते. त्याच्या म्हणण्यानुसार एक काळे अस्तित्व त्याच्या समवेत सारखे होते. या नंतर त्याचे मीटिंग मधले बोलणेही अगदीच मामुली झाले.

जसजसा काळ जात होता तसतसे 'ते असणे' जड होत होते. गुरफटल्यासारखे!

असा एक महिना गेला. त्याची पत्नीपण काळजीत पडली. सायकॉलोजीस्ट च्या म्हणण्यानुसार त्याची मानसिकता अतिशय चांगली होती. (तो सायकॉलोजीस्ट कडे जाऊन आला होता.) शेवटी तिने उपाय म्हणून किनेसिएलॉजीवाल्या एका बाईची भेट घ्यायचे ठरवले.

त्या बाईने तिचे उपचार सुरू करण्या आधी खूप वेळ बसवून ठेवले आणि ध्यान लावले. आणि अचानक विचारले की तू आदिवासींच्या कोणत्या भानगडीत अडकला आहेस का? शिवाय त्या गावाचे नाव घेऊन तू त्या गावात गेला होतास का असेही विचारले. तो प्रथम चकीत झाला. पण त्याला वाटले की त्याच्या पत्नीने सांगितले असेल. पण तिने सांगितले नव्हते मग त्या बाईने जेथे त्याला जड काळे अस्तित्व जाणवत होते तेथे हात दाखवून विचारले की, या भागात तुला काय होते आहे?

शिवाय त्याची आताची सर्व मानसिकता कथन केली. रिचर्ड गारच झाला! पण नंतर त्या बाईने 'तिचे उपाय योजून' ते अस्तित्व पळवून लावले!!! आणि त्यालाही ते 'मोकळेपण' जाणवले. त्याच्या म्हणण्यानुसार 'अगदी कुठल्यातरी अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून सुटल्यासारखे वाटले' पण त्याची अवस्था चमत्कारिक झाली. त्याला हे सुटणेही कुणाला सांगताही येत नव्हते. कारण त्याच्या मते तो कशात अडकला हेच नीट समजावण्यासारखे नव्हते.

बोलत बोलता विषय निघून (की काढून?) 'माझा अंदाज घेत घेत' त्याने मला सांगितले आणि विचारले की असे काही असते का? त्याने भारतात असे शाप आणि मुक्तीचे किस्से घडल्याचे ऐकले होते.

पण मला काहीच उत्तर देता आले नाही. माझी तर्कशक्ती 'हे शक्य नाही' असे म्हणतेय तर त्याचा बोलण्यातला खरे पणाही जाणवतोय.

हे मला अतर्क्य वाटते आहे. पण जगातले आपल्याला 'सगळे माहिती आहे' असे नाही असेही मी मानतो. या धर्तीवर अजून कुणाचे असे काही अनुभव?

लेखनविषय: दुवे:

Comments

इंगित

व्हायचा पण नशीब बरे असावे.... वाचलो (नि इथे तुमच्या राशीला आलो! ;) )

ज्योतिषी मुलाच्या आईला किंवा आपल्याला 'लहानपनी तुम्ही मरता मरता बचावलात" तुम्ही 'नाही ' म्हणालात तर घरालल्या मोठ्या माणसांना विचारा म्हणतो. मग आई ,वडिल ' काका,मामा यांपैकी कुणाला आजारपण आठवत, कुणाला अपघात आठवतो. "तुला काय माहित तू लहान होतास तेव्हा?" बहुसंख्यांच्या बाबत हे कमी अधिक तीव्रतेने घडलेले असते.
(अपूर्व ज्योतिषी)
प्रकाश घाटपांडे

असेल ना पण

असेल ना तुमच्या ज्योतिष्यांचे तसे हो.

पण मी त्याच क्षणी तिथे असणं, त्या विटा मी चालत असतांनाही, माझ्या डोक्यात न पडता पायाशी पडणं हे अतर्क्य वाटते मला (आता!)
ही शक्यता हजारात काय लाखात पण किती कमी आहे?
मी का वाचलो? याचे तसे काहे उत्तरच नाहीये 'नशीब' या एका शब्दाशिवाय नाही का?

आपला
(२ विटांच्या मधला)
गुंडोपंत

मृत्युचे भाकीत

टायपिंगचा कंटाळा आला आहे. खालील

right
पान

वाचा.

(आळशी)
प्रकाश घाटपांडे

प्रतिसाद

बर्‍याच वेळा सक्काळी सक्काळी उठल्यावर चेपून काढल्यासारखे प्रचंड अंग दुखते.
रात्री स्वर्गातुन लवकर खाली या.

 
^ वर