उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
कशाचं काय अन् कशाचं काय!
अभिजित
March 28, 2007 - 1:07 pm
कसंच काय अन् कसंच काय
खेळाचा खंडोबा झालेला हाय
एक नाय अन् दोन नाय
समद्यांचीच् वाट लागलेली हाय
कशाचं काय अन् कशाचं काय
हे काय रडं आजचं नाय
हारणं पाचवीला पुजलेलं हाय
कशाचं काय अन् कशाचं काय
कागदी वाघांचे मातीचे पाय
रँपावर चालती ते मैदानावर नाय
कशाचं काय अन् कशाचं काय
बघणार्या लोकांना अक्कल नाय
आज वर चढवतील उद्या हाय हाय
कशाचं काय अन् कशाचं काय
अजूनसुदा सुधरायला चानस हाय
बांगला बरोबर सिरिज मे मधी हाय
कशाचं काय अन् कशाचं काय
अभिजित
दुवे:
Comments
वा!
सही हाय :)
लय् भारी
हय
मस्त!
कविता बाकी मस्तच हाय! ;)
आपला,
तात्या किरमाणी!
कवितांविषयी
स्वरचित कवितांचा वेगळा विभाग असावा का आणि असल्यास त्याचे स्वरूप कसे असावे यावर विचार करत आहोत. सध्या तरी समुदाय, लेख आणि चर्चा इतकेच स्वरूप राहील. याबाबत निर्णय होईपर्यंत कृपया लेख किंवा चर्चा या विभागात कविता किंवा इतर कोणतेही पद्य लेखन प्रकाशित करू नये.
का?
याबाबत निर्णय होईपर्यंत कृपया लेख किंवा चर्चा या विभागात कविता किंवा इतर कोणतेही पद्य लेखन प्रकाशित करू नये.
का करू नये?
जर अद्याप कविता/गझल सारख्या महत्वाच्या साहित्यप्रकारावर उपक्रम चा निर्यय झाला नसेल, तर तोपर्यंत या विभागात पद्य प्रकाशित करायला आपला नकार का आहे? एखाद्याला उत्स्फूर्तपणे चार ओळी सुचल्या तर त्याने गप्प बसायचं की काय? त्याची अभिव्यक्ती कुठेतरी व्हायला नको का?
कविता/गझल सारख्या महत्वाच्या साहित्यप्रकारावर उपक्रमचा अद्याप निर्णय झाला नाही याचे देखील आश्चर्य वाटते. उद्या समजा मंगेश पाडगावकरांना येथे त्यांची एखादी कविता लिहाविशी वाटली तर त्यांनाही उपक्रमचे हेच उत्तर असेल काय??
आपला,
तात्या अभ्यंकर.
च्यामारी!
च्यामारी अभिजित यांनी एवढी छान कविता लिहिली , या गोष्टीचं कौतुक तर सोडाच, पण वर पुन्हा अशी मुस्कटदाबी??
कविता/गझल काव्यप्रकाराबाबतीत उपक्रमचा निर्णय लागायचा असेल तेव्हा लागू दे, पण तोपर्यंत एखाद्याने उत्स्फूर्तपणे एखादी चांगली कविता लिहिली तर असं काय मोठं बिघडणार आहे हो?
तात्या.
कविता
कवितेसाठी अजून एक विभाग सुरू करावा..
सदर विषयावर मी प्रथम लेख लिहायला सुरुवात केली पण मग ही कविता सुचत गेली...लिहीली... प्रकाशित केली. कवितेसाठी वेगळी जागा असती तर तिथे टाकली असती..
अभिजित....