संकेतस्थळ विकास प्रस्ताव

मी मुंबईतील एका जाहिरात संस्थेच्या क्रिएटिव्ह विभागात काम करतो. आमच्या एजंसी मधील विविध विभागाच्या कामांमध्ये सुसुत्रता आणण्याची जेंव्हा गरज भासली तेंव्हा यासाठी सॉफ्टवेअर विकसित करावे अशी कल्पना पुढे आली. सॉफ्टवेअर डेवलपमेन्ट हा माझा प्रान्त नाही. परंतु सॉफ्टवेअर कंपन्यांनी दिलेले आराखडे जेंव्हा आम्हाला पसंत पडले नाहीत, तेंव्हा मीच याचे संकल्पन करायचे ठरवले. वेगवेगळ्या प्रणांलींची चाचणी घेऊन मी आंम्हाला हवा तसा आराखडा बनविला आहे. आता याचा प्रत्यक्ष विकास करायचा आहे.

थोडक्यात याचे स्वरुप सीएमएस (Content Management System) वर आधारित एक्स्ट्रानेट संकेतस्थळ असे आहे.

इथे याबद्दल लिहिण्याचे कारण म्हणजे उपक्रमाच्या माध्यमातून जर कुणा होतकरु मराठी तरुणास किंवा समुहास हा प्रकल्प विकसित करण्याची संधी देऊ शकलो तर निव्वळ चर्चेपेक्षा कृती केल्याचे समाधान लाभेल. इच्छुकांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे संपर्क साधावा.

ही जाहिरात नाही, परंतु उपक्रमाच्या माध्यमातून कुणास जर काम मिळाल्यास काही रक्कम उपक्रमास देणगी म्हणून देण्याची मात्र त्यांना नक्की विनंती करेन.

यानिमित्ताने उपक्रमवर उद्देश सुसंगत जाहिराती असाव्यात का अशी चर्चा होऊ शकते. आपले काय मत आहे ?

- जयेश
(सदर लेखन उपक्रमाच्या उद्देशाला पुरक नसल्यास संपादक मंडळाने काढून टाकावे)

Comments

जाहिराती

उपक्रमवर उद्देश सुसंगत जाहिराती असाव्यात का

जरूर असाव्यात. त्यामुळे मराठी संकेतस्थळ चालवणं हा ही एक commerically viable प्रकल्प बनू शकतो

प्रगती कळवा

आपल्या प्रकल्पाची प्रगती कळवा.
या शिवाय आपण म्हणाल्यप्रमाणे आपल्याला इतरांचे काय आवडले नाही आणी आपण नक्की काय सुचवले त्यात असावे हे वाचायला आवडेल.
आशा आहे यावर काही लिहु शकाल!

आपला
गुंडोपंत

 
^ वर