ऐका हो ऐका, 'उपक्रम' आता 'विकि'वर! :)

राम राम मंडळी,

आम्ही उपक्रमाबद्दलचे 'उपक्रम' हे पान विकिवर चढवले आहे आणि विकिवरील 'मराठी संकेतस्थळांच्या' अंतर्गत वर्गीकृत केले आहे. सध्या हे पान प्राथमिक अवस्थेत असून सर्वांनी ते आपापल्या परिने माहितीपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती!

विकिवर उपक्रमाचा पायाभरणी समारंभ आमच्या हस्ते व्हावा हा एक विल़क्षण योगायोग म्हणावा लागेल! :)

विकिवर उपक्रमाचा पायाभरणी समारंभ!! आहाहा, काय शब्दरचना आहे! :)

आपला,
(विकिच्या बाबतीत 'त्या'चे शिष्यत्व घेतलेला!) : )
तात्या.

विकिवरील या पानावर संत तात्याबांचे बारीक लक्ष असते. तो त्यांच्या अस्मितेचा आणि निष्ठेचा प्रश्न आहे!

Comments

वाचा हो वाचा

असे म्हणायला हवे तात्या! वा वा!! चांगले केलेत!

(वाचवा हो वाचवा) एकलव्य

सवडीने..

परंतु त्या पृष्ठावर "सदर संकेतस्थळ सदर व्यक्तीच्या मालकीचे आहे", अशी माहिती नाही.

'त्या' संकेतस्थळाबद्दल माहिती नाही, पण 'उपक्रम' हे संकेतस्थळ कुणाच्या मालकीचे आहे ही माहिती मी शश्या जोशीला विचारून सवडीने लिहिनच!! :)

आपला,
(शेवटी कंटा़ळून 'त्या'च्या पुढे हार पत्करलेला!) :)
तात्या.

युनिकोड

त्यात मी एकेकाळी केलेल्या मनोगत - टॉप टेन ह्या आकडेवारीचा उल्लेख सापडला !
तसेच 'मनोगत' हे युनिकोड तंत्राचा वापर करते असाही उल्लेख आहे!
लोकांना कशात इण्टरेस्ट असेल काही सांगता येत नाही.
सहमत.

सन्जोप राव

उपक्रमाच्या विकिपानावर...

काय माहिती असावी अशी अपेक्षा आहे?
सदस्य कसे व्हावे? लेख कसे टंकावेत? प्रतिसाद कसे द्यावेत? सर्वात जास्त प्रतिसाद कुणाला आले? - असली वाह्यात माहिती नसावी असे वाटते.
या उलट येथील माहिती विषय, लेखनाचा दर्जा , उत्कृष्ट लेखांची उदाहरणे, विकि आणि उपक्रमाची देवाणघेवाण अशा स्वरूपाची माहिती असावी.
तात्या, तुमचे आण्णांचे पानही सुरेख! पण तिथे पुरंदरदास भजने आणि "भाग्यदा लक्ष्मी वारम्मा"चा उल्लेख नाही.
आभार...

अमृताचे डोही...

तात्या, तुमचे आण्णांचे पानही सुरेख! पण तिथे पुरंदरदास भजने आणि "भाग्यदा लक्ष्मी वारम्मा"चा उल्लेख नाही.

अण्णांनी गायलेल्या अजूनही बर्‍याच अभंगांचा उल्लेख तिथे करायचा बाकी आहे. सध्या तिथे अण्णांच्या संगीत प्रवासाबद्दल जी माहिती आहे त्यातही काही बदल करावयाचे आहेत. एच एम व्ही ने आणि इतर कंपन्यांनी अण्णांच्या अनेक ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती, व तबकड्या काढल्या आहेत त्याचीही माहिती लिहायची आहे. अण्णांवर काही पुस्तके लिहिली गेली आहेत त्याबद्दलही लिहायचे आहे. अण्णांनी गायलेल्या रागांबद्दलही विस्तृतपणे लिहायचे आहे.

भारतात आणि जगात अण्णांनी कुठे कुठे मैफली केल्या आहेत (जवळजवळ सर्व जगभर आणि तेसुद्धा अनेकदा!) त्याचीही यादीही टाकायची आहे. इतर दिग्गज मंडळींचं अण्णांबद्दल काय मत आहे हेही लिहायचे आहे.

भीमसेन जोशी नांवाचा दीपस्तंभ आणि त्या दीपस्तंभाच्या प्रकाशात गेली पन्नासहून अधिक वर्षे सुरू असलेला, जागतिक कीर्ती प्राप्त झालेला, भव्य दिव्य असा पुण्यातील सवाईगंधर्व महोत्सव म्हणजे अण्णांच्या आयुष्यातील एक सोनेरी पान! सवाईगंधर्व महोत्सव आणि त्यातील अण्णांचे एकमेवाद्वितिय स्थान, यावरही एक विस्तृत लेख लिहायचा आहे.

'मला गाण्यातले कळत नाही, त्यामुळे माझी जागा नेहमी श्रोत्यांच्या शेवटच्या रांगेत असते. पण भीमसेनांचे गाणे ऐकून मला दैवी समाधान मिळते आणि मन शांत होते. भीमसेनांचा जन्म रथसप्तमीचा. संगीताच्या रथातील सातही सुरांचे लगाम ज्याच्या हाती आहेत, आणि अखंड भारतवर्षावर तानसेनानंतर ज्यांचा आजवर एकछत्री अंमल आहे अशा भीमसेनांचा मी निस्सिम चाहता आहे'

हे कुसुमाग्रजांचे शब्द आहेत, तेही विकिवर टाकायचे आहेत!

अब क्या बोलू आपको विसुनाना!

असो!

आमचे अण्णा हा विकिवरील एक पानात मावणारा विषय नाही!

आपला,
(भीमसेनभक्त) तात्या.

"प्रिय भीमसेनजी,

अमृताचे डोही बुडविले तुम्ही
बुडताना आम्ही धन्य झालो
मीपण संपले झालो विश्वाकार
स्वरात ओंकार भेटला गा..!!

--विंदा करंदिकर.

संत तात्याबा महाराज

आम्ही उपक्रमाबद्दलचे 'उपक्रम' हे पान विकिवर चढवले आहे आणि विकिवरील 'मराठी संकेतस्थळांच्या' अंतर्गत वर्गीकृत केले आहे.
विकिच्या बाबतीत 'त्या'चे शिष्यत्व घेतलेला!

हे स्थित्यंतर नेमके का व्हावे याबद्दल आम्हाला थोडक्यात कळेल का?

वाल्याचा वाल्मिकि झाल्याचे वाचले होते परंतु संत महाराजांचे पुढे काय होते?? ;-)

असो.

येथे घाई घाईत का होईना परंतु आपल्या कार्याला थोडासा हातभार लावला आहे.

तात्याचा 'ताल्मिकी' होतो! :)

वाल्याचा वाल्मिकि झाल्याचे वाचले होते परंतु संत महाराजांचे पुढे काय होते?? ;-)

तात्याचा 'ताल्मिकी' होतो! :)

येथे घाई घाईत का होईना परंतु आपल्या कार्याला थोडासा हातभार लावला आहे.

धन्यवाद. अजूनही एकाने (मला वाटतं विसूनाना) उपक्रमाच्या विकीपानावर येथील समुदायांविषयी लिहून हातभार लावला आहे. असो, मंडळी हळू हळू उपक्रमाच्या विकीपानाला आपापल्या परीने हातभार लावत आहेत याचं संत ताल्मिकी महाराजांना समाधान आहे!

आपला,
(कट्टर विकीवादी आणि 'त्या'चा विकीशिष्य!) तात्या.

 
^ वर