उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
परोक्ष-अपरोक्ष
अभियंता
July 3, 2007 - 10:12 am
संस्कृतात एखादी गोष्ट आपण उपस्थित नसताना घडून गेली असता त्या घटनेचे वर्णन करण्यासाठी परोक्ष भूतकाळ वापरला जातो.
आता मराठीत आपल्या अनुपस्थितीत घडलेली घटना कथन करताना आपण "अपरोक्ष" हा शब्द वापरतो. प्रत्यक्षात आपण "परोक्ष भूतकाळ" वापरत असताना "अपरोक्ष" हा शब्द का वापरावा? त्याचे प्रयोजन काय? तज्ञांनी याबाबत मार्गदर्शन करावे.
आपला,
(सर्वभाषाप्रेमी) अभियंता.
दुवे:
Comments
परोक्ष-अपरोक्ष
ही मराठीत फार वर्षांपूर्वी रूढ झालेली चूक आहे. ती आता दुरुस्त करणे शक्य नाही आणि तशी गरजपण नाही. मराठीत परोक्ष हा शब्द नाही; आहे तो अपरोक्ष . आणि त्याचा मराठीत अर्थ- गैरहजेरीत!
हिंदी मशहूरचा मराठीत महशूर होतो, अर्थ प्रसिद्ध कडून महाशूरकडे जाऊन विसावतो.
हिंदीत शिकस्त म्हणजे पराजय, मराठीत पराकाष्ठा.
इंग्रजीत बाय म्हणजे गुणिले किंवा भागिले.
थ्री अपॉन सेव्हन म्हणजे तिनावर सात नाही किंवा सातावर तीन नाही.
एका भाषेतून दुसर्या भाषेत शब्द येताना अर्थबदल संभवतो.
--वाचक्नवी
परोक्ष.
अपरोक्ष:- (क्रि.वि.) प्रत्यक्ष,समक्ष,डोळ्यादेखत;साक्षात. परंतु प्रचलित अर्थ-दृष्टीआड;पश्चात;अप्रत्यक्ष;गैरहरजेरीत.
परोक्ष:-(वि.)डोळ्याआड.