ध्यासपर्वः र.धों. कर्वे जीवनपट आणि आजची परिस्थिती

ध्यासपर्व - रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या लोकविलक्षण जीवनकार्यावर आधारीत एक उत्कृष्ट चित्रपट!
किशोर कदम उर्फ सौमित्र याचा सर्वांगसुंदर अभिनय- अमोल पालेकारांचे सशक्त दिग्दर्शन.
आणि सीमा विश्वासचा 'मराठी' अभिनय...सारेच कलाकार उत्कृष्ट, बरं का!

पण सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रधों कर्व्यांचे विचारप्रवर्तक आयुष्य!
कुटुंब नियोजन अथवा संतती नियमनाचा भारतातील आद्य प्रवर्तक - र. धों.!
१९२०-५० काळातील युगप्रवर्तक पण तात्कालीन राजकारणामुळे कुजलेल्या अनेक महानुभावांपैकी एक!

या चित्रपटात सनातनी - कर्मठ हिंदू समाज, गांधी - नेहरू अनुयायी राजकारणी यांमुळे लोकसंख्यावाढ, स्त्रियांचे लैगिक स्वातंत्र्य, लैगिक अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार करणार्‍या एक युगद्रष्ट्याची झालेली ससेहोलपट अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. नतद्रष्ट समाजाने गुणीजनांची किती आणि कशी अवहेलना केली त्याचे ज्वलंत उदाहरण...
आज १०० कोटींनंतर तर त्यावेळचा करंटेपणा आणि आजचा केवळ दैवदुर्विलास! (दैव!- र.धों.चा याला सक्त विरोध होता.)

ज्यांना र.धों. कर्वे (महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र) यांच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांसाठी केवळ अचौक्य! (न चुकवण्यासारखा)

मला तरी ------- एक मस्ट सी = ध्यासपर्व...

तुम्ही पाहिला आहे काय? कसा वाटला..?
भारतात आजही या विषयावर लोक प्रगल्भ झाले आहेत असे आपल्याला वाटते काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यावरच एक लेख लिहा

विसुनाना,

रघुनाथ धोंडो कर्वे आणी महर्षी कर्वे यांचे कार्य याच्यावरच एक लेख जमल्यास लिहा ना.

आपला
गुंडोपंत

माहीतीपट आणि प्रगल्भता

रं.धो.कर्वे यांच्यावरील एकदा माहीतीपट दूरदर्शनवर पाहीलेला आठवतोय आणि त्यांच्या वरचे पुस्तकही . हा चित्रपट नक्कीच बघण्यासारखा असेल पण त् भारताबाहेर मिळाला तरच आमच्या सारखे बघू शकणार...

भारतात आजही या विषयावर लोक प्रगल्भ झाले आहेत असे आपल्याला वाटते काय?

कदाचीत काही अपवाद असतील पण सर्वसाधारणपणे हिंदू धर्मीय अगदी पुढारीपण कुटूंबनियोजनाच्या विरोधात नाहीत निदान तसा ते धर्माचा दाखला तरी देत हिंडत नाहीत/देऊ शकणार नाहीत. आणिबाणीच्या वेळेस संजय गांधी आणि कंपूने कुटूंबनियोजनाची जबरदस्ती केल्याचा इतिहास आहे. त्याचा परीणाम म्हणून नंतरच्या जनता राज्यात त्याच्या उलट टोक गाठण्यात आल्याचे आणि त्यामुळे निदान काही काळ तरी घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यात आल्याचे तत्कालीन प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉ. भा. नी. पुरंदरे यांनी त्यांच्या शल्यकौशल्य या पुस्तकात उल्लेखलेले आहे.

१०० कोटींच्या भारताला अजून प्रगल्भ नाही असे हवेतर म्हणा.... पण या विकसीत अमेरिकेत जिथे विज्ञान आणि शिक्षण तळागाळापर्यंत पोचले आहे त्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बूश याने व्हॅटी़कन आणि ख्रिश्चन सनातन्यांना खूष करण्यासाठी म्हणून एडस् संसर्गाविरूद्ध त्या आजाराने हतबल झालेल्या अफ्रिकेस (आणि इतर विकसित देशांना ) मदत करताना ते पैसे कुटूंबनियोजनासाठी वापरायचे नाहीत अशी अट घातली . इतकेच नव्हे तर उठसूठ मालीकांमधे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष श्रूंगारीक दृश्ये दाखवणार्‍या फॉक्स आणि सिबिएस या चॅनल्सनी "ट्रोजन" या काँडम्स तयार करणार्‍या कंपनीस जाहीरात करण्यास परवानगी नाकरली...!

कंडोम गैरव्यवहार्

फॉक्स आणि सिबिएस या चॅनल्सनी "ट्रोजन" या काँडम्स तयार करणार्‍या कंपनीस जाहीरात करण्यास परवानगी नाकरली...!

भारतात कंडोम गैरव्यवहार प्रकरण उघडकीला आले होते. सरकारी इस्पितळातील कंडोम संगनमताने परत बाहेर आणायचे (न फोडलेले पॅक, वाटप झाल्याचे दाखवून) आणि पुन्हा फॅक्टरीतून तेच लेबल वा अन्य गोष्टी बदलून परत शासकिय खरेदी अशा इनफायनिट लूप मध्ये तो व्यवहार दीर्घ काळ चालू होता. अधिक तपशील मात्र आठवत नाही.

प्रकाश घाटपांडे

दुर्दैवाने आश्चर्य वाटले नाही...

भारतात कंडोम गैरव्यवहार प्रकरण उघडकीला आले होते.

दुर्दैवाने यात आश्चर्य वाटले नाही... सर्वत्रच गैरव्यवहार होत असताना ते क्षेत्र वेगळे राहीले असेल असे वाटणे अव्यवहार्य होईल. आता तेलगी वगैरे सारख्या प्रकरणात जाहीर होत असलेल्या शिक्षांमुळे तसेच राजकीय पुढार्‍यांना पण "अटकपूर्व जामीन" मिळवायला लागण्याच्या प्रक्रीयेमुळे कुठेतरी प्रकाशाची (आपली नाही! ह. घ्या.) तिरीप का होईना दिसायला लागली आहे (की हे नजीकच्या भविष्यात बदलू शकेल) .

विकास

अमेरिकन दुटप्पी...

आवांतर: अमेरिकन धोरणे दुटप्पी आहेत...
त्यात काय विशेष? ते तर तसे आहेतच.... ख्रिश्चन धर्म वाढवणे हा एक छुपा भाग असतोच असे अनेकदा जाणवतच राहते ध्येय धोरणात...
म्हणून तर कट्टर मुस्लिमांसमोर भांडणे करण्याशिवाय पर्याय राहिला नाही...
भरतातही जरा काही खुट्ट झाले की त्यांच्या पोटात दुखतेच. संघ तर केव्हढा डोळ्यात खुपतो त्यासाठी...

सुंदर चित्रपट..

तुम्ही पाहिला आहे काय? कसा वाटला..?

अमोल पालेकरांचा हा अतिशय सुरेख चित्रपट आहे. सगळ्यांचे अभिनय उत्तम. पटकथा,संवाद, चित्रिकरण उतम. याची सीडी (अट्टाहासाचे मराठीकरण = तबकडी!) माझ्या संग्रही आहे.

भारतात आजही या विषयावर लोक प्रगल्भ झाले आहेत असे आपल्याला वाटते काय?

नाही वाटत. प्रचंड लोकसंख्या हे एक दिवस आपल्या विनाशाचे प्रमुख कारण ठरणार आहे.

आपला,
(धोंडो केशवांचा भक्त) तात्या.
स्वयंसेवक, भाऊबीज फंड,
कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.

--
भाऊबीज फंडाचे काम सर्वांनी आपापल्या परिनुसार करावे असे वाटते!

कधीचा आहे?

याची सीडी (अट्टाहासाचे मराठीकरण = तबकडी!) माझ्या संग्रही आहे.

कधीचा चित्रपट आहे हा? "तबकडी" दुकानात मिळते का ती करून घेतली होती?

अलिकडचा..

कधीचा चित्रपट आहे हा? "तबकडी" दुकानात मिळते का ती करून घेतली होती?

अगदी अलिकडच्याच काळातला आहे. तबकडी दुकानात मिळते.

तात्या.

--
महर्षी कर्वे स्त्रीसिक्षण संस्था, पुणे यांच्या भाऊबीज फंडाला देणगी देण्यात आणि आपले नेहमीचे उद्योग सांभाळून, घरोघरी जाऊन, इतरांकडूनही तो निधी गोळा करण्याच्या कार्याला प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे असे वाटते!

आपला,
तात्या अभ्यंकर,
स्वयंसेवक, भाऊबीज फंड.

धन्यवाद आणि फंड..

माहीती बद्दल धन्यवाद.

महर्षी कर्वे स्त्रीसिक्षण संस्था, पुणे यांच्या भाऊबीज फंडाला देणगी देण्यात आणि आपले नेहमीचे उद्योग सांभाळून, घरोघरी जाऊन, इतरांकडूनही तो निधी गोळा करण्याच्या कार्याला प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे असे वाटते!

ठाण्यात राहात असताना (मी लहान होतो) पण आई-वडील या भाऊबीज फंडाला मदत करायचे ते आठवते.

तयार आहे! :)

भारतात सदर चित्रपटाची तबकडी मिळेल अशी आशा आहे.

इथे आल्यावर आपल्याकरता ती तबकडी 'सप्रेम भेट' म्हणून आपली वाट पाहात असेल! :)

तात्या.

:)

म्हणजे "इस हात से दो, उस हात से लो ";-) काय ?

वो तो हैईच! :)

आपला,
(सौदागर) तात्या.

माहितीबद्दल धन्यवाद!

विसुनाना - आपण अगदी मोजक्या शब्दांत करून दिलेला परिचय मनाला जाऊन भिडला. धन्यवाद!

तात्या - पुण्यातला/ठाण्यातला पत्ता कळवितो... एक तबकडी आमच्याही कडे सप्रेम भेट पाठवून द्यावीत ही विनंती!!

(भावाचा भुकेला) एकलव्य

अवश्य!

तात्या - पुण्यातला/ठाण्यातला पत्ता कळवितो... एक तबकडी आमच्याही कडे सप्रेम भेट पाठवून द्यावीत ही विनंती!!

..अवश्य!

आपला,
(मिसळीचा भुकेला) तात्या.

 
^ वर