आय-फोन: थोडी माहिती
कदाचित आपणा सर्वांना आठवत असेल की, जानेवारी २००७ मध्ये ऍपल कंपनीच्या स्टीव्ह जॉब्स यांनी मॅकवर्ल्ड काँफरन्स व प्रदर्शनात कंपनीच्या आय-फोनची ओळख् करुन् दिली होती. तेंव्हापासून लोक अत्यंत् आतुरतेने त्याची वाट पाहत होते. प्रथमदर्शनी स्टीव्हच्या हातात होती नुसती काळी आयताकृती डबी. जसा स्टीव्हने फक्त हात फिरवून् फोन चालू केला, त्यानंतर मात्र तो काळा डबीचे रुपांतर एका इंटरॅक्टीव्ह पृष्ठभागात झाले. त्या छोट्या डबीतून् अनेक क्रांतीकारी सुविधा(फिचर्स्) बाहेर् आल्या. पाहू तर या आय-फोनमध्ये काय काय सुविधा आहेत् ते!
१] स्वतंत्र कळफलक नाही: ही सुविधा आता बरेच मोबाइल मॉडेल्स देतात. त्यात फारसे आश्चर्य नाही, पण अजून तरी सर्व मोबाइल्स असे नसल्याने ही एक् सुविधा म्हणता येईल.तरी बोटाबरोबर एक कर्सर सुरुवातीस् स्क्रीनवर दिसतो. ही सुविधा अद्याप एकाही फोनवर नाही. कळफलक सक्रीय अथवा निष्क्रीय होण्याचे कार्य तो करतो.
२] नेट ऍक्सेस: या फोनवरुन तुम्ही इ-पत्रे धाडू अथवा वाचू शकता. कदाचित हा लेख तुम्ही त्यावरुनच वाचत असाल! स्टॉक मार्केटबद्दलसुद्धा यावर थेट माहिती मिळू शकते.(तात्या, तुमचं काम सोपं होईल पहा.)
३] कॅमेरा: ही आता एक सर्वसामान्य बाब आहे. आजकाल अनेक हँडसेट्सना ही सुविधा उपलब्ध आहे. ऍपल आय-फोनही त्याला अपवाद नाही.
४] आयपॉड: आत्तापर्यंत बर्याच लोकांनी आयपॉड वापरला असेल. पण फोन आणि आयपॉड एकत्र करण्याचे काम या कंपनीने केले आहे व तरुणांना भुरळ घातली आहे. थोडक्यात त्यांनी "सर्वेत्र सुखिन: सन्तु " असे धोरण ठेवलेले दिसते.
५] जीपीएस: ही सुविधा अमेरिकेत बर्याच कार्समध्ये असते हे आपल्याला माहित असेलच.(यावरील लेख उपक्रमावर उपलब्ध आहे.) ही सुविधा आपल्याला गुगल मॅप देऊ करते.(अजून भारतातील गाड्यांना ही सोय् नाही, फोनमध्ये कुठुन येणार? त्याला अजून किती वर्षे जातील कुणास ठावूक्? ज्यांना अंदाज आहे, अशा लोकांनी आपले अंदाज सांगावेत ही विनंती.)
आता आपण या फोनची टेक्निकल माहिती पाहू.
१] स्क्रीन:३.५ इंची स्क्रीन १६० पीपीआय(पिक्सेल्स् प्रती इंचवर्ग )
२] बॅटरी कपॅसिटी: (एकदा चार्ज केल्यावर) ६ तास इंटरनेट वापराकरिता, ७ तास चलचित्र पाहण्यासाठी, २४ तास गाणी ऐकण्यासाठी व २५० तास स्टँड बाय वेळ.
३] ऑपरेटींग सिस्टीम: मॅकिन्तोश एक्स.
४] रेडिओ ट्रांसमीटर्सची सोय: ब्ल्यूटूथ,वायफाय व सेल्युलर(जीएसएम व इडिजीई अथवा एज)
Comments
आशा आहे
आशा आहे याची बॅटरी आय पॉड पेक्षा बरी असेल... इतकेच!
गुंडो.
असे ऐकतो की -
बॅटरी बदलण्यासाठी आयफोन परत ऍपल कम्पनीकडे पाठवावा लागतो....?
बॅटरी
प्रसिद्ध झालेल्या आकड्यांप्रमाणे या फोनची बॅटरी सध्या उपलब्ध असणार्या जवळजवळ सार्या फोन्सपेक्षा उत्तम आहे. उदा. एम्.पी.थ्री स्वरुपातील गाणे आपल्याला ऐकायचे असल्यास आपण ते सलग २४ तास ऐकू शकता (बॅटरी चार्ज न करता). सामान्य फोन्स सहसा याच्या जेमतेम निम्म्यापर्यंत पोचतात. तसेच ८ तासांपर्यंतचा टॉ़क टाईम (सलग किती वेळ बोलत राहिल्यास बॅटरी पूर्ण डिस्चार्ज होईल.), ६ तासांपर्यंतचा महाजाल-हाताळणी कालावधी आणि ७ तासांपर्यंतचा व्हिडिओ-पाहू-शकण्याचा कालावधी ही काही इतर ठळक वैशिष्ट्ये आहेत.
(अवांतर - आयफोनचे केलेले विच्छेदन येथे पहा.)
चक्क सुट्टी काढून खरेदी????????
चक्क सुट्टी काढून खरेदी (!)करणारे महाभागही आहेत तर! मला वाटलं कि फक्त बिले भरण्यासाठी एखाद् दिवस सुट्टी काढावी लागत असेल.
आणि राहता राहिला रांगेचा प्रश्न! आत्तापर्यंत तिकिटे काढण्यासाठी, वडापाव खाण्यासाठी, रॉकेलसाठी, बससाठी रांगेत उभे रहावे लागते अशी माझी समजूत् होती.
अनिरुद्ध दातार
बरोबर आहे
अविवाहित माणसाचे लाईन धरणे समजू शकतो.
पण कुणासाठी??????
तसंही लाईन धरणे वगैरे मला नवीन नाही, पण "कुणासाठी" हे महत्त्वाचे! फोन काय, आज ना उद्या मिळेलच की(असा माझा विचार!)
आपला(सरळ लाइनीत चालणारा)
अनिरुद्ध दातार
उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्राचे लवकरच ओपनिंग होऊदे लमाण् तळीराम साहेब!!!!!!!!!!!!!!!!!