सुखसोयींचे बळी?

दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रलयात् मुंबईत अनेक जण वाहनात बंदिस्त अवस्थेत आतल्या आंत् घुसमटुन् मृत्युमुखी पडल्याचे सर्वांना माहित आहे. गेल्या वर्षी दिल्ली येथे एका मोटातरीला वेगात असताना आग लागली, आगीमुळे विद्युत् संस्थेस नुकसान् झाले व परिणामतः स्वयंचलित मध्यवर्ति कुलुप यंत्रणा बंद अवस्थेत निष्क्रिय् झाली व सर्व प्रवासी आत जळून् खाक झाले. खरेतर मध्यवर्ती सुरक्षा प्रणाली आपल्या सुरक्षेसाठी असते. वाहन् चालु करून गतीरोध नियंत्रक मुक्त करताच सर्व दरवाजांचे आपोआप कुलुपबंद होतात. जर एखादा दरवाजा वा यंत्रकक्षाचे वा सामानकक्षाचे झाकण नीट लागले नसेल तर यंत्रणा कार्यान्वयीत् होत नाही, गाडीच्या आतला दिवा पेटलेला राहतो व दरवाजे वा झाकण न लागल्याची सुचना मिळते व ते व्यवस्थित् लावून् घेता येतात. मात्र गाडीत पाणी भरतच ही यंत्रणा निष्प्रभ होते व भयंकर प्रकार म्हणजे ती सर्वकाही 'बंद' या अवस्थेत निष्प्रभ होते. यामुळे बंद दरवाजे बंदच राहतात्, ते हाती खटका ओढुनही उघडता येत नाहीत, यांत्रीक सरकत्या काचादेखील जागीच खिळून् राहतात. पर्यायाने आतल्या माणसाला बाहेर पडता येत नाही वा बाहेरून् मदतही मागता येत नाही. सुदैवाने आत लोखंडी ह्त्यार वगैरे असेल तर काचा फोडता तरी येतीन्, अन्यथा बाहेरच्या जगाला गाडीतला माणूस संकटात आहे याची कल्पनाही येत नाही व मदती वाचुन आतली माणसे तडफडून् मरू शकतात.

आश्चर्याची व खेदाची गोष्ट म्हणजे ही बाब अजुनही गंभीरपणे विचारात घेतली गेलेली दिसत नाही. मी अनेकांना विचारून पाहिले परंतु सर्वंकडून असेच उत्तर मिळाले की काहीतरी करणे आवश्यक आहे खरे, पण काही केले नाही हेही खरे. दुर्दैवाने वाहन उत्पादकांनी देखिल यावर फारसा विचार केलेला दिसत नाही. माझ्या मोटारीची पुढच्या भागातील डाव्या दरवाज्याची काच स्वयंचलीत यंत्रणेतुन मुक्त करुन ती हाताने चढवण्याची व्यवस्था करता यावी अशी विनंती केली असता फोर्ड च्या सेवाकेंद्रातुन मला असे उत्तर मिळाले की सुचना उत्तम आहे, पण् अजुन् तरी आम्ही असे पूर्वी कधीच केलेले नाही, मुख्यालयाशी सम्पर्क साधुन मग उत्तर देऊ.

मुळात प्रश्न असा की अश्या प्रकारच्या असुरक्षित् यंत्रणा वाहनाला बसबवण्याला वाहन कंपन्या परवानगी का देतात्?

किमान जी यंत्रणा बसवायची तीच्या विषयी किमान सुरक्षा माहिती का दिली जात नाही?

मध्यवर्ती सुरक्षा प्रणाली निष्प्रभ होताना 'खुल्या' अवस्थेत जाईल् असे काही करता येईल का? म्हणजे समजा गाडीत पाणी शिरल्याने वा आग लागल्याने जर यंत्रणा कोलमडणार असेल तर तसे होताना दरवाजे बंधमुक्त होण्याची योजना करता येईल का?

शासनाने केवळ सुरक्षित यंत्रणा उत्पादकांनाच मान्यता देउन अशा उत्पादनांची माहिती ग्राहकाला का देउ नये?

उत्पादकाने आपल्या वाहनाला बसवण्याजोग्या व संपूर्ण सुरक्षित अशा यंत्रणांची यादी ग्राहकाला वाहन खरेदी करतानाच देणे बंधनकारक का असू नये?

उत्पादकाने स्वतःच संपूर्ण सुरक्षित यंत्रणा देणे बंधनकारक का नाही?

तद्न्य व माहितगार उपक्रमी यावर काही माहिती देउ शकतील् का? कुणाला सुरक्षा यंत्रणे विषयी काही विषेश माहिती देता येईल का?

लेखनविषय: दुवे:

Comments

माहिती करून घेणे !

मुळात हल्लीच्या मोटार गाड्यांमधली यंत्रणा नेमकी काम कशी करते हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. गाडीत बसवलेल्या इलेक्टॉनिक्स यंत्रणांच्या कामकाजाबद्दलची आणि त्याच्या विद्यूतमंडलाची (सर्किट) माहिती करून घ्यायला हवीय. गाडीचे दार उघडताना आणि बंद करताना नेमकी कोणती क्रिया होते आणि कोणते मंडल काम करते हे माहित करून घ्यायला हवे आहे.
ह्या व्यतिरिक्त गाडीला स्वयंचलित यंत्रणेबरोबरीनेच ऐच्छिक(मॅन्युएल) यंत्रणेचा पर्याय असणे जरूरीचे आहे. साधारण पणाने कोणत्याही यंत्रांमधे हे दोन्ही पर्याय उपलब्ध असतातच. जर असा प्रर्याय हल्लीच्या मोटार गाड्यांमधे दिला नसेल तर ती एक फार मोठी त्रुटी आहे असे माझे मत आहे. त्यासंबंधी सार्वजनिक आवाज उठवायलाच हवा.
सर्वसाक्षी आपण इथे हा प्रश्न मांडल्याबद्दल अभिनंदन. ह्यामुळे लोकांना ह्या त्रुटींची जाण होईलच आणि त्यावर जनमत जागृत होऊन संबंधित कंपन्यांवर दबाव आणता येईल.

=======================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे
=======================

साक्षीदेवा,

महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेस.

मध्यवर्ती सुरक्षा प्रणाली निष्प्रभ होताना 'खुल्या' अवस्थेत जाईल् असे काही करता येईल का? म्हणजे समजा गाडीत पाणी शिरल्याने वा आग लागल्याने जर यंत्रणा कोलमडणार असेल तर तसे होताना दरवाजे बंधमुक्त होण्याची योजना करता येईल का?

या प्रश्नाचे खात्रीलायक व समाधानकारक उत्तर मिळाल्यावरच नवीन गाडी घ्यायचा विचार करेन! :)

तात्या.

--
संत तात्याबा सध्या हे पान जसा वेळ मिळेल तसे संपादित करत असतात आणि त्यात भर घालत असतात. हे पान म्हणजे त्यांच्या निष्ठेचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे!

आश्चर्य~!

माझ्या मोटारीची पुढच्या भागातील डाव्या दरवाज्याची काच स्वयंचलीत यंत्रणेतुन मुक्त करुन ती हाताने चढवण्याची व्यवस्था करता यावी अशी विनंती केली असता फोर्ड च्या सेवाकेंद्रातुन मला असे उत्तर मिळाले की सुचना उत्तम आहे, पण् अजुन् तरी आम्ही असे पूर्वी कधीच केलेले नाही, मुख्यालयाशी सम्पर्क साधुन मग उत्तर देऊ.

पण अजुन् तरी आम्ही असे पूर्वी कधीच केलेले नाही, हे धडधडीत खोटे आहे!!!
काही काळापूर्वी असेच काहीसे किस्से पाश्चात्य देशात घडल्या नंतर फोर्ड ने तर मागच्या दारांच्या काचा हातानेच बंद होतील अशी सोय केली होती असे आठवते. मग भारतात वेगळे कसे काय?

असो, या पावसाळ्यात गाडीत समोरच्या ग्लोवबॉक्स मध्ये एक हातोडी आठवणीने ठेवा आणी दर वेळी ती तेथे आहे हे पहा!

येव्हढेच मी म्हणेन!

आपला
फोर्ड ची गाडी कधीच ना वापरलेला होंडाप्रेमी!
गुंडोपंत

पॉवर विंडोज

विषय चांगला आहे.
खर सांगायचं तर वाहनांच्या सुविधा, त्यांचा योग्य तो वापर आणि त्रुटी या बद्दल भारतीय थोडे मागास आहेत असे म्हणायला मला काही वाटत नाही. सेंट्रल लॉकिंग आणि पॉवर विंडोज या बद्दल आम्ही भारतीय नेहमीच तक्रार करतो. एखादी गोष्ट शास्त्रीयरित्या समजावून घेउन मग वापरायची मानसिकता आपल्यातल्या किती भारतीयांची आहे?
सेंट्रल लॉकिंग:
ही सुविधा बरेचदा ऐच्छिक असते. पण आपल्या येथे बडेजाव मिरवायची इच्छा सगळ्यांना असते. हि सुविधा असुन सुद्धा, मानवीय वापराची सुविधा असते. यासाठी दाराला खटके असतात. तसेच जर अपघात झाला तर खरतर गाड्यांना एअर बॅग असणे गरजेचे आहे. पण किंमतीमुळे भारतीय गाड्यांमध्ये त्या नसतात.

पॉवर विंडोज:
जिथे पॉवर विंडोज असतात तिथे HVAC असतो. त्यामुळे खिडक्या कशा करता उघडायच्या? बाहेर पडायचे असेल तर दरवाजे आहेतच. त्या बद्दल वर लिहिले आहेच. कधी जमले तर सविस्तर लिहिनच.





मराठीत लिहा. वापरा.

हम्म

साक्षी यांच्याशी सहमत. नक्की काय होऊन दारांची मॅन्युअल अनलॉकिंग सेवा बिघडली याची संशोधन पुरानंतर केले गेले होते काय? तसेच, ही आतून पूर्ण बंद झालेली दारे त्यावेळी काचा फोडून बाहेरुन तरी उघडता येत होती का? तशी उघडून कोणी वाचले का? अन्यथा काचा फोडूनही उपयोग नाही. मागे एकदा मेबॅक गाडीबद्दल अशीच घटना ऐकल्याचे आठवते. दारे आपोआप बंद, आणि गाडीला आग लागल्यावरही ती उघडता आली नाहीत. असे झालेल्या गाड्यांत जास्त गाड्या कोणत्या कंपनीच्या होत्या याचा शोध घेतला गेला का?
हे बळी पूर्णपणे सुखसोयींचे नाहीत, भारतापेक्षा पूर्ण वेगळी परिस्थिती असलेल्या,रोजचे जीवन जगणे हेच युद्ध नसलेल्या(जे मुंबईत आहे) समृद्ध युरोप अमेरिका जपानात या गाड्या जन्मतात आणि चांगल्या म्हणून आपण त्या हौसेने भारतात विकत घेतो. भारतातल्या अडचणींना त्या समर्थपणे तोंड देतात का?
अवांतरः मानवी सुरक्षेचे कायदे अत्यंत काटेकोर असलेल्या श्रीमंत देशांत असे संशोधन झालेच नसेल असे वाटत नाही. किमतीच्या कारणामुळे या सुरक्षा भारतात गिर्‍हाइकांकडून 'मला नको बुवा ही सोय. त्याऐवजी पैसे कमी करा' म्हणून सुरुवातीला नाकारल्या गेल्या आणि नंतर त्यांना भारतीय बाजारपेठेत मागणी नाही म्हणून त्या सोयी भारतात विकल्या जाणार्‍या गाड्यात ठेवणे गौण झाले असे तर नाही ना?
या प्रकाराबद्दल नीटशी माहिती नाही, तज्ज्ञ्नांनी(हा शब्द कसा लिहायचा विसरले आहे.) द्यावी.

तज्ञांनी..

तज्ज्ञ्नांनी(हा शब्द कसा लिहायचा विसरले आहे

tajnaaMnee = तज्ञांनी

किंवा,

tajjnaaMnee = तज्ज्ञांनी

यातलं काय हवं असेल ते घ्या! :)

आपला,
(तज्ञ!) तात्या.

 
^ वर