युती तुटायला हवी का?

२० वर्षाहून अधिक काळ असणाऱ्या शिवसेना-भाजप युतीत तेढ निर्माण होऊन युती तुटायची वेळ आली आहे कारण प्रतिभाताई पाटील यांना सेनेने दिलेला पाठींबा(अजुनही काही कारणे असु शकतात).केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या दोन पक्षांत युती झाली. काही दिवसापुर्वीच शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त बाळासाहेबांनी सांगितले की पुढील निवडणुक स्वबळावर(कोणाशिही युती न करता) जिंकायची त्यासाठी त्यांनी उ.प्रदेशच्या मायावतींचा दाखला दिला. मुळात शिवसेनेची स्थापना झाली मराठीच्या मुधावर. १९८९ नंतर शिवसेनेने हिंदुत्व घेतले.आणि सेना हिंदुत्ववादी झाली. त्यामुळे सेनेची नेमकी भुमिका काय ते कळत नाही.

जर येणाऱ्या निवडणुका जिंकायच्या झाल्यास(मायावतींप्रमाणे) शिवसेनेला हिंदुत्व सोडून धावे लागेल. केवळ मराठीच्या मुधावर सेना पुढील निवडणुका जिंकु शकते का? आपणास काय वाटते.

माझे मत युती तुटायला हवी.

आपला

कॉ.विकि

एखादा प्रतिसाद उघडण्या

लेखनविषय: दुवे:

Comments

नाही तुटत हो

युती तुटण्यासारख्या अनेक प्रसंगांतून युती गेलेली आहे. पण आता प्रमोद महाजन नाहीत. गडकरी आणि मुंडे आधीच एकमेकांत स्पर्धा करतात. असो.

पण एकंदरीत परिस्थिती पाहता...चारही राजकीय पक्षांनी हे दाखवून दिले आहे की शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी-राष्ट्रीय अशीच युती दरवेळी व्हावी असं काही नाही. उदा: पुणे आणि अशी बरीच उदाहरणे शरद पवारांनी पेपरमध्ये दिली होती.

४ पक्षांची सर्व प्रकारे परम्युठेसन-काम्बीनेसन होत राहतील. युती तुटली तर भाजपच एकटे पडेल.

जनतेने चमत्कारांना समोरे जाण्यासाठी तयार रहावे.

मराठी माणूस तया मुद्द्यावर शिवसेनेने प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तेव्हा या मुद्द्यावरून भाजप युती तोडत असेल तर तुटूदे.

अभिजित

राजकारण

युतीचे राजकारण हे नेहमीच गरजेसाठी होते. मग ते कोणत्याही पक्षांचे असुदेत. शिवसेना - भाजपा युती हि कदाचित अशी एक युती आहे कि ती अनेकदा तुटता तुटता राहिली आहे. महाराष्ट्रातले महत्वाचे ४ राजकिय पक्ष जे म्हणवून घेतात त्यातल्या दोन (शिवसेना आणि राष्ट्रवादी) पक्षांना देशव्यापी पाठिंबा नाही. हे खरतर प्रादेशिक पक्षच म्हणायला हवेत. या दोन्ही पक्षांना सत्तेची चटक जास्त आहे. इतरांना नाही असे नाही. पण हे दोन पक्ष स्वबळावर राष्ट्रीय पातळीवर यश मिळवू शकत नाही. पण स्वतःच्या प्रादेशिक ताकतीने इतर २ राष्ट्रीय पक्षांना जेरीस आणू शकतात आणि तेच ते करत आहेत. आम्हा सामान्य मराठी लोकांना याचे आता काहीच वाटत नाही. सांगकाम्या व्यक्ती जर राष्ट्रपती झाली तर ती मराठी असल्याची लाज मात्र नक्कि वाटेल.

अलिकडचे राजकिय पडसाद पाहिले तर काहीसे असे वाटते,
१. भाजपा: चाचपडणारा राष्ट्रीय पक्ष
२. काँग्रेसः आत्ता सत्ता आहे तो पर्यंत सोनियाचे दिवस जगा. उद्या कोणी पाहिलाय? मग सत्तेसाठी वाट्टेल ते करावी लागले तरी चालेल.
३. शिवसेना: थोडी मराठी अस्मिता, थोडी कात टाकायचा प्रयत्न, स्वतःला वाघ म्हणत कळपासोबतच राहणारे, एका बाजून काँग्रेसचा चेहरा घेण्याचा प्रयत्न करणारे.
४. राष्ट्रवादी: काँग्रेस मधून फुटलेली शिवसेना, यांच्यात सगळे गुण काँग्रेसचेच पण आवेश आणि प्रादेशिकता शिवसेनेची. स्वतःला शिवसेना वाटून घ्यायला लाज वाटते. यांना काँग्रेसचे, सोनियाचे दिवस पाहवत नाहित. शरद पवार जीवंत असे पर्यंत यांचा पक्ष म्हणून प्रभाव. नंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील. जर पवारांना पंतप्रधान होण्याची खात्री दिली तर इतिहासा नुसार पवार लगेचच काँग्रेसमध्ये विलीन होतील.
५. मनसे: गरजेल तो बरसेल काय? स्वतःला स्वाभिमानी म्हणवत पुण्यात मात्र कलमाडींच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न केला. तो फसला. महाराष्ट्र नवनिर्माणाच्या घोषणा दिल्या खर्‍या पण एका गल्लीचे नवनिर्माण केले असले तर शप्पथ. नावात सेना पण एकूण राजकिय धर्म काँग्रेसचाच वाटतो.

एकुण काय? कोणा एकामध्ये ताकत नाही. युती तुटली काय आणि नाही तुटली काय? स्वबळावर लढायची आणि जिंकायची ताकत कोणाच्यातच नाही.

क्षणभर हे मानु कि शिवसेनेने मराठी म्हणून प्रतिभा पाटील-शेखावत यांना पाठिंबा दिला आहे. कलामांना विरोध करताना सेनेने सांगितलेले कारण म्हणजे त्यांनी अफजलच्या फाशीसाठी केलेला विलंब वा निर्णय न घेणे यासाठी ते हिंदुत्वाचे कार्ड वापरत आहेत आणि आत्ता मराठीपणाचे. पण प्रतिभा पाटील-शेखावत जर राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या तर त्यांनी अफजलला फाशी देण्याची हमी शिवसेनेला दिली आहे का एक मराठी पक्ष पाठिंबा देतो आहे म्हणून? हिंतुत्व आणि मराठी बाणा यामध्ये शिवसेना गोंधळलेली आहे. इकडे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्‍या या यु. पी. ए. ला शिवसेनेचा पाठिंबा कसा चालतो? तेंव्हा गप्प का? आणि तेंव्हा कुठे जाते शिवसेनेचे हिंदुत्व?

सत्तेच्या मोहापायी भारतात काहिहि होउ शकते यावर आमचा गाढ विश्वास आहे. त्यामुळे युती टिकावी का टिकु नये यावर भाष्य करणे हे हास्यास्पद आहे.

माझ्यामते आपण द्विपक्षीय राजकारण्याच्या दिशेने चाललो आहोत. त्याची हि कुठे तरी सुरूवात आहे. बराच काळ जाइल. पण द्विपक्षीय लोकशाही भारतीय स्वीकारतील. मग कसली युती अन कसल काय? आजच्या या अवस्थेला भारतीयच जबाबदार आहेत आणि भारतीय स्वतःच त्यावर तोडगा काढतील.

उद्या कम्युनिस्टांचे स्टंट वाढल्यास काँग्रेस - भाजपा युती होईल. भारताला राजकिय स्थैर्य मिळाण्यासाठी ती एक गरज बनणार आहे हे आमचे भाकित आहे.





मराठीत लिहा. वापरा.

सुंदर प्रतिसाद..

देशाच्या आणि खास करून महाराष्ट्राच्या राजकारणाचा नेमका आढावा घेणारा एक अतिशय सुंदर प्रतिसाद!

सत्तेच्या मोहापायी भारतात काहिहि होउ शकते यावर आमचा गाढ विश्वास आहे. त्यामुळे युती टिकावी का टिकु नये यावर भाष्य करणे हे हास्यास्पद आहे.

सहमत!

माझ्यामते आपण द्विपक्षीय राजकारण्याच्या दिशेने चाललो आहोत. त्याची हि कुठे तरी सुरूवात आहे. बराच काळ जाइल. पण द्विपक्षीय लोकशाही भारतीय स्वीकारतील.

भारताला राजकिय स्थैर्य मिळाण्यासाठी ती एक गरज बनणार आहे हे आमचे भाकित आहे.

ही विधाने द्रष्टेपणाची ठरतील किंवा कसे, याबाबत उत्सुकता आहे!

आजच्या या अवस्थेला भारतीयच जबाबदार आहेत आणि भारतीय स्वतःच त्यावर तोडगा काढतील.

सहमत.

उद्या कम्युनिस्टांचे स्टंट वाढल्यास काँग्रेस - भाजपा युती होईल.

:)

प्रतिसाद आवडला..

आपला,
(राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक लहानसा स्वयंसेवक) तात्या.

आमच्या संघाने मात्र या कशातच पडू नये आणि आपली सामाजिक राष्ट्रीय बांधिलकीच कायम जपावी असे वाटते!

--
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...'

सहमत

सत्तेच्या मोहापायी भारतात काहिहि होउ शकते यावर आमचा गाढ विश्वास आहे

चाणक्य यांच्याशी संपूर्ण सहमत आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

खरे आहे.

मराठी माणसाचे प्रश्न, शिवाजी महाराज अशा गोष्टींचा बाजार करुन त्यांना हास्यास्पद स्वरुप आणणारी शिवसेना आणि कसलाही शेंडाबुडखा आणि विधिनिषेध नसलेला बारतीय जंता पक्ष यांची युती ही महाराष्ट्राच्या राजकारणातील राहूकेतूची युती आहे.

ही युती तुटून शिवसेना, राकाँपा, मनसे इ. महाराष्ट्रीय पक्षांनी मराठी माणसांचे प्रश्न जाणून त्याप्रमाणे राजकारण करावे हे श्रेयस्कर.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

चाणक्यसाहेब

आपल्याशी मी थोडक्यात सहमत.
माझ्यामते आपण द्विपक्षीय राजकारण्याच्या दिशेने चाललो आहोत.याची गरज नाही असे वाटते.यावर उपक्रम चर्चाही झाली आहे.महाराष्ट्रात शिवसेना हवी पण तीने कट्टर मराठीपण स्वीकारावे .
याबाबत शिवसेनेची गोची-दै.लोकसत्ता अग्रलेख वाचा.
आपला
कॉ.विकि

हिंदुत्व

जर येणाऱ्या निवडणुका जिंकायच्या झाल्यास(मायावतींप्रमाणे) शिवसेनेला हिंदुत्व सोडून धावे लागेल.

हे काय नवीन ऐकतो आहे? माझ्या मते हिंदुत्वासारखे महत्वपूर्ण विषय या पक्षांनी उच्च तत्वनिष्ठ भूमिकेतून स्वीकारले आहेत. त्यामागे निवडणुकीत जिंकण्यासारखे तुच्छ हेतू असतील असे मला वाटत नाही.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

राजेंद्रसाहेब

माझ्या मते हिंदुत्वासारखे महत्वपूर्ण विषय या पक्षांनी उच्च तत्वनिष्ठ भूमिकेतून स्वीकारले आहेत. त्यामागे निवडणुकीत जिंकण्यासारखे तुच्छ हेतू असतील असे मला वाटत नाही.
आपण आजवरचे भाजपाचे किंवा इतरांचे(विहिंप,बजरंग दल) राजकारण बघावे आपणास काय तो बोध होईल.जरा विचार करा.
आपला
कॉ.विकि

तुटायला हवी...

तोडता येत नाही म्हणून जोडलेली राहण्यापेक्षा एकदा तुटलेलीच बरी!

(आनंदी आनंद गडे)

 
^ वर