उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
तर्कक्रीडा २९: चिमणरावाची छत्री.
यनावाला
June 25, 2007 - 5:03 pm
.......... चिमणरावांनी एक घोडा छाप छत्री तीन रुपयांना खरेदी केली.(त्या काळी हा छाप प्रसिद्ध होता.) दुसर्या दिवशी कचेरीत जाताना ते नवी छत्री घेऊन निघाले. वाटेत एका हाटेलात शिरले. तिथे एक आण्याची भजी खाल्ली. बाहेर पडताना छत्री तिथेच विसरले. कचेरीत गेल्यावर लक्षात आले. त्यानी एका शिपायाला छत्री शोधायला त्या हाटेलात पाठविले. त्याला भजी खाण्यासाठी एक आणा दिला. शिपायाने एक आणा खर्च केला. पण छत्री सापडली नाही. सायंकाळी कचेरी सुटल्यावर चिमणराव थेट त्या दुकानात आले.
"मालक, एक वडा..आपलं घोडा छाप छत्री द्या."
"ही घ्या.मजबूत आणि टिकाऊ.किंमत फक्त चार रुपये."
"चार रुपये? अहो कालच मी असली छत्री तीन रुपयांस घेतली."
"तीन रुपयांस? मग ती असली नसेल नकली असेल.हॅ हॅ!"
"शेटजी,माझी नवी छत्री हरवली,आणि तुम्हाला विनोद आठवतो! अहो ,काल इथेच तुमचा तो नवा विक्रेता होता. त्याच्या कडून मी अगदी थेट अशीच छत्री तीन रुपयांस घेतली"
"तसे असेल तर त्याची चूक झाली. किंमत चार रुपयेच आहे. हवा तर क्याटलाग दाखिवतो."
"ही घ्या.मजबूत आणि टिकाऊ.किंमत फक्त चार रुपये."
"चार रुपये? अहो कालच मी असली छत्री तीन रुपयांस घेतली."
"तीन रुपयांस? मग ती असली नसेल नकली असेल.हॅ हॅ!"
"शेटजी,माझी नवी छत्री हरवली,आणि तुम्हाला विनोद आठवतो! अहो ,काल इथेच तुमचा तो नवा विक्रेता होता. त्याच्या कडून मी अगदी थेट अशीच छत्री तीन रुपयांस घेतली"
"तसे असेल तर त्याची चूक झाली. किंमत चार रुपयेच आहे. हवा तर क्याटलाग दाखिवतो."
आणखी काही न बोलता चिमणरावांनी चार रुपये दिले. ते घरी आले. तिथे गुंड्याभाऊ आला होता.
"काय चिमण, आज उशीर? "
चिमणरावांनी सगळे इत्यंभूत सांगितले.
बघा भावजी! काल घेतलेली तीन रुपयांची छत्री आज हरवली.ते तीन रुपये गेले. आज परत चार रुपयांची छत्री घेतली. म्हणजे सात रुपये नुकसान झाले." काऊ बोलली.
"सात रुपये कसे होईल? तीन रुपयांस घेतलेली छत्री हरवली. म्हणजे तीन रुपयेच नुकसान झाले." चिमणराव आपल्या वरच्या टिपेत म्हणाले.
"तीन रुपये? अरे, सात रुपये दोन आणे नुकसान झाले! भजी विसरलास? ती खायला गेलास म्हणूनच छत्री हरवली ना? काय मावशी तुझे काय मत?" गुंड्याभाऊ गरजला.
"माझे कसले मत्त? पहिली छत्री हरवली म्हणून हा भूर्दंड पडला. पुन्हा हरवू नकोस म्हणावे."
चिमणरावांनी सगळे इत्यंभूत सांगितले.
बघा भावजी! काल घेतलेली तीन रुपयांची छत्री आज हरवली.ते तीन रुपये गेले. आज परत चार रुपयांची छत्री घेतली. म्हणजे सात रुपये नुकसान झाले." काऊ बोलली.
"सात रुपये कसे होईल? तीन रुपयांस घेतलेली छत्री हरवली. म्हणजे तीन रुपयेच नुकसान झाले." चिमणराव आपल्या वरच्या टिपेत म्हणाले.
"तीन रुपये? अरे, सात रुपये दोन आणे नुकसान झाले! भजी विसरलास? ती खायला गेलास म्हणूनच छत्री हरवली ना? काय मावशी तुझे काय मत?" गुंड्याभाऊ गरजला.
"माझे कसले मत्त? पहिली छत्री हरवली म्हणून हा भूर्दंड पडला. पुन्हा हरवू नकोस म्हणावे."
...तर छत्री हरवल्या मुळे चिमणरावांचे नेमके किती नुकसान झाले?
( हे तसे गणिती कोडे नव्हेच. उत्तर प्रतिसादात लिहावे. व्यनि. ने नको.)
दुवे:
Comments
नुकसान
छत्री हरवल्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेतल्यास नेमके नुकसान चार रुपये एक आणा असे झाले.
- सूर्य
अवांतर - क्रुपया (व्यवस्थित टाइप न करता आल्याबद्दल क्षमस्व) ज्या कोड्यांची उत्तरे व्य.नि. ने पाठवायची असतील त्यांची उत्तरे नंतर् जाहीर केल्यास सगळ्यांना समजतील. उदा. मोक आणि तोक या कोड्याचे उत्तर मला अजुन माहीत नाही. त्यामुळे नंतर उत्तरे जाहीर करण्याची विनंती मी आपणास करतो.
चार रुपय्या एक आणा$$$
$$$ मारेगा भैय्या ना ना ना
असे गाणे गुणगुणावेसे वाटते आहे. चुकले तर चुकू दे हो... पण गाना तो होना चाहिए!!
(छत्रधारी) एकलव्य
जाता जाता - तिकडे कृत्रिम सूर्य आणि कृत्रिम छत्रीच्या चर्चा झडताहेत. इकडे बिचारा खरा सूर्य चोरीला गेलेल्या छत्रीचा हिशेब करित बसला आहे. (ह घ्या हे सां न ल)
३ रु. १ आणा
छत्रीची खरी किंमत ४रु. असेल तर चिमणरावांना पहिल्या खरेदीत १ रु. चा फायदा झाला होता.
तो जमेस धरता एकूण नुकसान ३रु. १ आण्याचे झाले.
दुकानदाराने दुसर्या खरेदीच्या वेळी चिमणरावांना फसवले असल्यास मात्र ४रु. १ आणा नुकसान झाले.
------------------------------------------
तुम्ही सध्या हे वाचत आहात.
फायदा कसा काय?
चिमणरावांनी क्ष रुपयाला घेतलेली छत्री क्ष + य रुपयाला विकली तर त्यांना य रुपये फायदा झाला असे म्हणता येईल.
जर चिमणरावांनी छत्री विकलीच नाही तर त्यांना फायदा कुठला?
चिमणरावांना ७ रुपये १ आणा नुकसान झाले आहे
कारण जगात दोन प्रकारची माणसे असतात.
१. ज्यांच्याकडे छत्री नसते.
२. जे छत्री असून भिजतात.
आजकालच्या पावसात छत्री असून नसल्यासारखेच आहे.
त्यामुळे आधी घेतलेली व हरवलेली छत्री व नंतर घेतलेली छत्री या दोन्ही गोष्टी निरुपयोगी आहेत. चिमणरावांनी टिळकरोडवर रेनकोट किंवा कर्जत रेल्वे स्थानकावर इरले घ्यावे असा आगाऊ सल्ला देत आहोत.
नुकसान
एकूण खर्च ७ रु. २ आणे झाला आहे, पण त्याच वेळी चिमणरावांच्या खाती ४रु. (की ३?) किंमतीची छत्री आणि १ आण्याची भजी ह्या 'जमा' ही आहेतच. म्हणून
असा हिशेब केला आहे.
------------------------------------------
तुम्ही सध्या हे वाचत आहात.
पहिली छत्री हरवली म्हणून हा भूर्दंड पडला
पहिली छत्री हरवली नाही असं गृहीत धरलं तर् हरवल्यानंतर झालेला सगळा खर्च म्हणजे ४ रुपये १ आणा नुकसान आहे...
नुकताच माझा मोबाईल हरवला...मग दुसरा ५ हजाराचा मोबाईल घेतला. आता हा नवीन खर्च हा निव्वळ् नुकसानीत जमा आहे..
(एका छत्रीत भिजणार्या दोघांतला एक) अभिजित
नुकसान कसे काय?
जर चार रुपयाची वस्तू माझ्याजवळ तशीच असेल तर ते नुकसान कसे काय?
बरोबर
नवीन् छत्री घेतली नसती तर नुकसान ३ रुपये झाले असते....
आणि शिपायाला ती शोधायला धाडले(पाठवले म्हणायला काय् धाड भरली होती?) म्हणून १ आणा भज्याचा..
त्यामुळे चिमणरावांचे ३ रुपये छत्रीवर आणि १ आणा भज्यावर नुकसान झाले हे बरोबर..
अभिजित
तळटीपः
अर्थात भज्याचा १ आणा हे नुकसान मानायला मार्क्सवादी तयार नाहीत. शिपाई दुकानावर/हाटीलात गेला आणि त्याने छत्री शोधली..आता सापडली नाही यात त्याचा काय दोष. दिलेल्या १ आण्याच्या मोबदल्यात चिमणरावाचे काम त्याने केलेच की. १ आण्याचा मोबदला चिमणरावांना मिळालाच होता..
भजीचे पैसे धरू नयेत.
खायचे पैसे लावू नयेत. बाकी छत्रीचे आमच्या हिशोबाने ३ रुपये दोन आने, हे आमचे उत्तर. यनावालासेठ बाकी तुमचे कवतुकच करायला पाहिजे,हे सुचते कुठून तुम्हाला ;)
उत्तर
आधीची छत्री जरी ३ रू ची असली तरी तिला "रिप्लेस" करायला लागलेली किंमत ४ रू
तसेच जी भजी चिमणरावांनीच खल्ली (की खाल्ली?) त्याचा १ आणा सोडून देऊ
त्यामुळे नुकसान ४ रू १ आणा
कशे काय?
छत्रीसाठीचा एकूण खर्चः
३ रु. + ४ रु. + १ आणा
सध्या जवळ काय आहे?
४ रुपयाची छत्री.
(आदर्श परिस्थितीमध्ये डेप्रिसिएशन कन्सिडर न करता छत्री विकली तर ४ रुपये परत मिळतील.)
तेव्हा एकूण नुस्कानी = ३ रु १ आणा
अवांतरः जर ३ रुपयांची छत्री हरवल्यानंतर छत्री पुन्हा हरवू नये म्हणूनशान मी गुरु व शनीचे खडे मुठीवर असलेली २४०० रुपयांची छत्री घेतली तर माझी नुसकानी २४०० धरणार का?
शनीचा खडा
नील खडा शनीचा असतो. शनीच्या बाबतीत 'कमी उपद्रव 'हे 'उपयुक्तता मूल्य 'मानले जाते. त्यामुळे शनीचा खडा असलेली छत्री वापरून नुकसान झाले तरी तो जीव वाचला म्हणजे फायदाच झाला ना?
प्रकाश घाटपांडे
फिफोलिफोचा...
... वाद अनंत काळापासून चाललेला आहे. हे असेच चालायचे!
सरकारने पेट्रोलची किंमत वाढवल्यानंतर रातोरात पेट्रोलपंपांवर जास्त पैसे मोजावे लागतात. योग्य का अयोग्य? करा विचार!!
(बिनहिशेबी) एकलव्य
खासगी
एकलव्य शेट
खासगीकरण झाल्यावर तर पेट्रोलच्या किमतींवर कसलेच नियंत्रण नसणार आहे. पंप मालक जो म्हणेल तो भाव! स्पर्धेच्या नावाखाली यात भयानक नफेखोरी होणार आहे. आणी बहुतेक कंपन्या याकडे अधाशी डोळे लावून बसल्या आहेत!
सरकारी भाव 'खुप म्हणजे खुपच चांगले आहेत' इतकेच मी म्हणेन!
तेल क्षेत्रावर आंतरराष्ट्रिय भावांशी सुसंगत असणारे सरकारी (च) नियंत्रण असले पाहिजे, या मताचा
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)
उत्तर
याचे उत्तर कधी कळणार आहे?
३
छत्री हरवली नसती तर त्याला पाठवलाच नसता, हे म्हणायला ठीक आहे. पण त्यानंतर झालेल्या कुठल्याही खर्चाचा छत्री हरवण्याशी संबंध लावता येईल ("फुलपाखरू-वावटळ" न्यायाने). त्याला नुकसान म्हणणं बरोबर नाही. म्हणून उत्तर ३ रु.
तर्क.२९ :उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
छत्री हरवल्यामुळे चिमणरावांचे नेमके किती नुकसान झाले ? असा प्रश्न आहे. आपण दोन चिमणरावांची कल्पना करू.
चि.२ छत्री न हरवणारे चिमणराव.
प्रथम प्रत्येकाकडे ३ रु.वाली छत्री आहे.ती घेऊन दोघे कचेरीला निघाले.समजा त्यावेळी प्रत्येकाच्या खिशात केवळ ४रु.२ आणे एवढीच रक्कम आहे. दोघे हाटेलात गेले.एक एक आण्याची भजी खाल्ली.
बाहेर पडताना :
चि.२ छत्री घेऊन निघाले.
संध्याकाळी घरी आल्यावर चि.१ कडे छ्त्री आहे. आणि किती रक्कम आहे? .. शून्य. त्यांचे सर्व ४रु.२आणे खर्च झाले.
चि.२ कडे सुद्धा तशीच छत्री आणि आणि किती पैसे आहेत? ..४ रु.१ आणा.कारण त्यांचा केवळ १ आणाच खर्च झाला.
दोघांच्या शिलकीत हा फरक का पडला?
यावरून छत्री हरवल्यामुळे झालेले नुकसान ४रु.१ आणा. हे उत्तर.
अनेकांनी हे उत्तर दिले आहे.''पहिली छत्री हरवली म्हणून हा भूर्दंड पडला. "या मावशीच्या वाक्यात उत्तर आहे हे नेमके हेरून श्री. अभिजित यांनी ते उद्धृत केले आहे.
या सर्व उत्तरांत श्री. योगेश यांचे ७रु.१आणा हे चुकीचे (जाणून बुजून) उत्तर सर्वोत्तम आहे असे मला वटते.
श्री यनावाला. धन्यवाद/शंका
मी खोडसाळपणे दिलेल्या प्रतिसादाला सर्वोत्तम उत्तर म्हटल्याबद्दल धन्यवाद!
पण तुम्ही दिलेल्या उत्तरात एक शंका आहे.
समजा चिमणरावांनी दुसरी छत्री विकत घेतलीच नसती तर त्यांचे किती नुकसान झाले असते? -
(माझ्या मते ३ रु. १ आणा. )
मग नवीन छत्रीची किंमत नुकसानीत धरणे योग्य आहे का? कारण नवीन छत्री त्यांच्याजवळ आहेच. ती विकून चार रुपये परत मिळतील ना!
बरोबर
समजा चिमणरावांनी दुसरी छत्री विकत घेतलीच नसती तर त्यांचे किती नुकसान झाले असते? -
(माझ्या मते ३ रु. १ आणा. )
आधीची छत्री गेल्यामुळेच त्यांना नविन छत्री घ्यावी लागली. जुनी छत्री हरवली नसती तर चिमणरावांनी खिशातले चार रुपये सेविंग अकाऊंट मध्ये टाकले असते किंवा त्याची भजी खाल्ली असती.
त्याच पैशाची पुन्हा तीच वस्तू घ्यावी लागली म्हणून नुकसान.
बाकी १ आण्याचा शिपायावर केलेला भज्याचा खर्च नुकसान मानणं हे चिमणरावांच्या भांडवलशाही विचारसरणीचं प्रतीक आहे. :-)))
अभिजित.
युयुत्सु
म्हणजे उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्राच्या दूरक्षेत्रीय उपमहाप्रबंधकाच्या जागेसाठी आम्ही पात्र आहोत तर.
सुंदर उत्तर
अगदी पटणेबल उत्तर आहे..
अभिजित
चौथे चिमणराव
चि.२ चे पुढे काय झाले? समजा छत्री हरवली नसल्याने ते पावसात फिरायला गेले, पाय घसरून पडले, डॉक्टरचा खर्च (मुंबईपेक्षा दसकडीने कमी असला तरी) बराच आला . . . असे काहीही च-हाट वळता येईल. कारण प्रत्यक्षात छत्री हरवली होती. म्हणून विचार करण्याची ही दिशा बरोबर वाटत नाही. नुकसानीचा निश्चित आकडा ठरवायचा असेल तर प्रत्यक्ष काय झाले हेच प्रमाण. झाले काय, तर खर्च केलेल्या ७।२।। पैकी ४।२।। च्या वस्तु पदरात पडल्या. ३ रू. च्या बदल्यात काहीच मिळाले नाही. ते नुकसान.
हे "नुकसान" ह्या शब्दाच्या व्याख्येबद्दलचे वैयक्तिक मत, हे सांगणे नलगे. जर-तर ची भाषा काढल्यावर निश्चित काहीही सांगता येत नाही ही त्यामागची भूमिका आहे . . .
दोन चिमणराव
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आपले एक सदस्य श्री. अभिजित हे काल्पनिक संवाद लिहिण्यात निपुण आहेत. बुद्धिमान गंधर्व कन्या आणि सुस्वरूप तरुण यांचे उपवनातील संवाद त्यांनी छान लिहिले आहेत.त्याचा दुवा माझ्या खरडवहीत आहे.त्यांचे अनुकरण करून पुढील संवाद लिहिला आहे.
छत्री न हरवणारे चि.२ घरी आल्यावर चहा पिता पिता :
"
"आज कचेरीत जाताना एका हाटेलात भजी खाल्ली. त्यांची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे."
"भजी? अरे काय आहे काय? न जेवताच हपिसात निघाला होतास?"
"भावजी, केळ्यांच्या रसायना बरोबर चांगल्या पाच पोळ्या चापून गेले होते." काऊ.
"आई, रसायन नाही, शिक्रण म्हणायचं." मैना.
"तेच ते." काऊ.
"त्या गोड गोड शिक्रणीमुळे मळमळल्या सारखे वाटले. म्हणून तर भजी खायला गेलो
."
........
हाहा
चिमणराव शिकरण खातात म्हणजे त्यांना पुणे महानगरपालिकेचा गौरवपुरस्कार मिळाला होता काय?
पुणेरी चंगळ
शिकरण खा लेको मुगाची उसळ खा..ही पुणेकरांची चंगळीची परमावधी..इती पुल..
धन्यवाद यना..
निपुण वगैरे नाही..सुचेल तसं लिहीतो एवढंच.
कुठल्यातरी नाटकात अविनाश खर्शिकर म्हणतात, "मराठी माणूस एक वेळ नोकरी सोडेल पण जोक मारायची संधी सोडणार नाही."
अभिजित...
मुगाची नाही हो... मटार उसळ
मटार उसळ हो.
मूग पुण्यात पण
मूग पुण्यात पण आहे हो. पण ती चंगळ नाही. मटार म्हणजे चंगळ.
मटार ... मटार
नीट आठवलं नाही...
अभिजित
मूग
मुगाची उसळ पुणेकरांसाठी नाही. एकंदरी मूग ही डाळ औरंगाबादेच्या पूर्वेला.
"सिंधुदुर्ग" आणि गोव्यात तरी मूग सगळीकडे आहे बुवा.
मटार आणि मूग, एक द्वैत, अशा नावाच्या लेखाची उबळ आली होती, पण आवरली.
म्हणजे गिळायला काय आवडतं ते समजलं . . .
(कृ. ह. घ्या.)
चि.२ चे पुढे काय झाले?
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.जगन्नाथ यांसी,
१/ 'फुलपाखरू-वावटळ 'न्याय माझ्या वाचनात अथवा अथवा ऐकिवात नाही. जाणून घेण्यास उत्सुक आहे. कृपया समजवावा.
२/ दुसरा चिमणराव चि.२ केवळ काल्पनिक आहे.त्याला अस्तित्व नाही.कोड्याचे उत्तर समजले की चि.२ अंतर्धान पावतो.
(इंजीनियरिंग मेकॅनिक्स--डायनॅमिक्स मधे डी'अलेम्बर्ट फोर्स अशी एक संकल्पना आहे. हा फोर्स फिक्टिशिअस-काल्पनिक-असतो.त्याच्या वापरामुळे समस्या सुलभ होते.एकदा प्रॉब्लेम सुटला की डि'अलेंबर्ट फोर्स अदृश्य होतो. तसे या चि.२चे आहे.)
३/" चि.२ चे पुढे काय झाले? समजा छत्री हरवली नसल्याने ते पावसात फिरायला गेले, पाय घसरून पडले,....." इत्यादि.
कोडे हे दिलेल्या माहितीच्या चौकटीतच सोडवावे असे मला वाटते. तुम्ही दिल्या प्रमाणे तर्क केले तर ते नवीन कोडे होऊ शकेल.परंतु दिलेल्या कोड्याचे उत्तर (४ रु.१ आणा) मिळाले की ते कोडे तिथेच संपले.
.....समजा दुस-या दिवशी त्या दुकानात झालेल्या विक्रीच्या बिलांवर लकी ड्रॉ होता. त्यात चिमणरावांना २००रु बक्षिस लागले.आता हे वेगळे कोडे झाले.
चि.२ चे पुढे काय झाले?
हा एक विनोद. फुलपाखराने पंख फडफडवल्यामुळे हवेत जी हालचाल होते तिचे हळूहळू वादळात रूपांतर होणे शक्य आहे, असा दृष्टांत दिला जातो. आणि खरोखरच त्यात शास्त्रदृष्ट्या अशक्य असे काही नाही. असे झाले तर फुलपाखरू हे वादळाचे "कारण" अाहे का, हा वादाचा मुद्दा. म्हणजे खिळा गेला म्हणून राज्य गेले, हे म्हणणे सयुक्तिक आहे का, हा वाद उपस्थित करण्यासाठी "भृंग-चक्रवात" न्यायाचा उल्लेख करतात.
ह्यापुढील सर्व अवांतर आहे : कुठल्याही घटनेला इतर असंख्य घटना कारणीभूत असतात हे प्राचीन काळापासून भारतात अाणि आता इतरत्र मान्य झाले आहे. त्यांतील एक-दोन घटनांना आपण सोय म्हणून "कारण" म्हणतो (उदा. छत्री विसरलास म्हणून भूर्दंड पडला) पण एकच एक कारण वेगळे काढता येत नाही. तो भाषेचा खेळ आहे. अमेरिकेत तरी नुकसानभरपाईच्या वकीलाला प्रचंड मागणी असते, कारण तो असले खेळ करू शकतो.
(ह्या असंख्य घटनांना भारतात "कर्म" म्हणतात, हे आपल्याला माहीत आहे. घडणारी प्रत्येक गोष्ट ही त्या कर्माचा परिपाक असते.)
बाबारे! कर्मविपाक सिद्धांत एकदम!
'फुलपाखरू-वावटळ 'न्याय-"भृंग-चक्रवात" न्याय - कर्मविपाक सिद्धांत!
बाबारे बाबा! एका कोड्यावरून इतके म्हणजे सुतावरून स्वर्गच!
जगन्नाथ किंवा यनावाला - यावर एक सुंदर लेख हवाच बरं का!
आता हे काय?
खिळा गेला म्हणून राज्य गेले
हेही समजवा बुवा, आम्हाला तर हेही माहित नाही
अवांतर...
दोन्ही उत्तरे बरोबर...असे आमचे मत आहे. तसेच ही उत्तरे व्यवहारातही दिसतात, अगदी लाखांच्या उलाढालीसही कारणीभूत होतात.
चित्र एक आणि चित्र दोन यांचा यनावालांचा युक्तिवाद योग्य आहे. तसेच जगन्नाथांचा चित्र दोनचे पुढे काय? हा प्रश्न आणि तर्कही योग्यच आहे.
(१) फिफो - First In First Out - गेलेली वस्तू किती रुपयांना घेतली होती यालाच महत्व. जर ती वस्तू परत मिळवायची असेल तर किती खर्च येईल हा नवा गडी नवे राज्य असा प्रकार. या न्यायाने ३ रुपये हे चिमणरावांना झालेले नुकसान.
(२) लिफो - Last In First Out - गेलेली वस्तू किती रुपयांना घेतली होती याला महत्व नाही. तर ती वस्तू परत मिळवायची असेल तर किती खर्च येईल त्याला महत्व. या न्यायाने ४ रुपये १ आणा हे चिमणरावांना झालेले नुकसान.
पेट्रोलच्या किंमती रातोरात वाढल्या की पेट्रोलपंपाचे मालक आज विकले गेलेला माल पुन्हा भरायला अधिक खर्च येईल हे कारण कायद्याने सांगून लगेच ग्राहकांनाही अधिक दर लावतो. येथे लिफोचे तत्व पणास लावले जाते. किंमती वाढत्या असल्या की लिफोच्या सूत्राने फायदा कमी दाखविला जाईल तर फिफोच्या मार्गाने गेल्यास त्याच व्यवहारात फायदा अधिक दिसेल. रोखेधारकांना खूष करायचे आहे कर वाचवायचा आहे यावर ठरविले फिफो की लिफो यांच्या नाणेफेक केली जाते!span>
(फिलि) एकलव्य