मिलिंद गुणाजी यांची नवीन पुस्तके कोणी वाचली आहेत का?

नमस्कार,
अलिकडेच मिलिंद गुणाजी यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांविषयी बातमी वाचली.
त्यापैकी एक पुस्तक महाराष्ट्रातील 'गूढ' वाटणार्‍या काही ठिकाणांवर आधारित आहे. (पुस्तकाचं नाव आठवत नाही)
आणि दुसरं पुस्तक 'चंदेरी भटकंती' हे त्यांना शूटिंगनिमित्त जावं लागलेल्या ठिकाणांवर आधारित आहे.
दोन्ही पुस्तकं वाचायची इच्छा होते आहेच पण तत्पूर्वी कोणी ही पुस्तके वाचली असतील तर ती कशी वाटली ते ऐकायला आवडेल..

धन्यवाद.
(मी इथली नियमित वाचक आहे, लिहीत फार नाही, त्यामुळे हे लिहिण्याचा सेक्शन चुकला असल्यास सांगावे)

लेखनविषय: दुवे:

Comments

चाळल्याचं आठवतंय..

त्यापैकी एक पुस्तक महाराष्ट्रातील 'गूढ' वाटणार्‍या काही ठिकाणांवर आधारित आहे.

या पुस्तकाबद्दल माहिती नाही.

आणि दुसरं पुस्तक 'चंदेरी भटकंती' हे त्यांना शूटिंगनिमित्त जावं लागलेल्या ठिकाणांवर आधारित आहे.

हे पुस्तक मात्र चाळल्याचं आठवतंय. चांगलं पुस्तक आहे. एकंदरीतच मिलिंद गुणाजी हा माणूस अतिशय गुणी आहे.

तात्या.

चंदेरी भटकंती

चंदेरी भटकंतीचा परिचय इथे वाचा

प्रकाश घाटपांडे

गुणी गुणाजी

एकंदरीतच मिलिंद गुणाजी हा माणूस अतिशय गुणी आहे.

ह्या गुणाजीच्या बाकिच्या गुणांचे आपल्याला काही माहित नाही पण 'अभिनय' ह्या गुणात मात्र हा गुणाजी ठोकळा आहे असे आमचे मत आहे. संवाद बोलताना आवाजात कुठेही चढउतार न करणे ह्याची चांगली काळजी घेतो.

फोटोग्राफी आणि चित्रकला

'अभिनय' ह्या गुणात मात्र हा गुणाजी ठोकळा आहे असे आमचे मत आहे.

मिलिंदकडे अभिनयगुण नाही. परंतु उत्तम फोटोग्राफी आणि चित्रकला हे गूण त्याच्याकडे आहेत. लिहितोही छान.

तात्या.

नीरस निवेदन

त्याच्या एकसुरी आणि पुस्तकातील धडा वाचल्याप्रमाणे केलेल्या निवेदनामुळे भटकंती हा कार्यक्रम पुरेसा कंटाळवाणा झाला आहे.


येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

मला तरी आवडतं..

अत्यंत साधेपणाने, साध्या शब्दात, आणि कुठलिही आरडाओरड, आविर्भाव न आणता केलेलं निवेदन मला तरी आवडतं बुवा!

--
इथे तात्याबा लक्ष ठेवून असणार आहेत आणि वेळ मिळेल तसा यात सुधारणा करणार आहेत आणि अधिक माहिती लिहिणार आहेत.

तात्या

आणि विकीपीडिया?

हे म्हणजे नरेंद्र दाभोळकरांनी सत्यनारायणाच्या पूजेचे निमंत्रण छापण्यासाठी प्रेसमध्ये जाण्यासारखे झाले. ;)येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

सहीच!

योगेश,
हे म्हणजे नरेंद्र दाभोळकरांनी सत्यनारायणाच्या पूजेचे निमंत्रण छापण्यासाठी प्रेसमध्ये जाण्यासारखे
हा हा हा!
हसून् हसून खुर्चीवरून पडलोच!

तात्यांच्या भाषेत 'और ये लगा सिक्सर'

आपले
(सर्वत्र संचार असणारे)
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

खुर्चीवर

होपफुली नंतर परत खुर्चीवर बसून प्रतिसाद लिहिला असेल.
;)येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

अरे बाबा,

आणि विकीपीडिया?

अरे बाबा, आम्ही विकिला कितीही नांवे ठेवली तरी अधनंमधनं तिथे जातो. आणि मुख्य म्हणजे आमच्या गुरुजींची माहिती तिथे असल्यामुळे तिथे ल़क्ष ठेवावं लागतं!

हे म्हणजे नरेंद्र दाभोळकरांनी सत्यनारायणाच्या पूजेचे निमंत्रण छापण्यासाठी प्रेसमध्ये जाण्यासारखे झाले. ;)

मस्त! ;)

आपला,
तात्या दाभोळकर.

संत तात्याबा सध्या ही माहिती वाचत आहेत!

हैराण

आजची ताजी बातमी -
संत तात्याबांना
'त्या'चा व्हायरस त्रास देतो आहे. अचानक पणे त्यांनी भरमसाठ दुवे देऊन उपक्रमाला हैराण करून सोडले आहे!
सुत्रांच्या म्हणण्यानुसार तात्याबांना लवकरच डॉ. युयुत्सुंच्या 'खास चिवड्याचा मसाला' नावाचे औषध हुंगवण्यात येणार आहे असे कळते.

आपला
(वासकाढ्या)
गुंडो.
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

धन्यवाद

तात्या, प्रकाश देशपांडे,
प्रतिसादासाठी धन्यवाद.

आम्ही घाटावरले

तात्या, प्रकाश देशपांडे,

अहो आम्ही घाटावरली मान्स. पुणे नाशिक रोड वर पेठ घाट लागतो. थित्ले पुर्वज आम्चे.कोनी खेड् तालुक्यात् कोनी आंबेगाव कोनि जुन्नर तालुक्यात उतारले.
(आपला घाटी)

प्रकाश घाटपांडे

घाटपांडे काका

पेठ घाट उतरुन पुढे अवसरी फाट्याच्या पुढलं मंचर गाव आमचं...

(गाववाला) योगेश मंचरकर!मंचर डॉट कॉम ला भेट द्या.

व्ही .जे.


मिलिंद गूणाजी,यांचे आम्ही कोणतेही साहित्य वाचलेले नाही.पण चित्रपट आणि वास्तव जीवन यासंबधीचे त्यांचे साहित्य लेखन असेल तर ते वाचलेच पाहिजे,असे वाटते.

अवांतर :) व्ही.जे. चा लाँग फॉर्म काय हो ! एकदा का आमच्या उपक्रमींना आपले नाव कळले, की मग पहा कसे अभ्यासू प्रतिसाद येतात ते.तसे नावात काय असते म्हणा ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भेटीत

योगेशराव,
का तडकलात गुणाजीवर?

एका कार्यक्रमात शर्वरी जमेनीस सोबत भेट झाली होती मागे. (आता तब्येत 'सुधारलीय' तीची!)

(तेंव्हा भेटीत तरी बरा होत बॉ! हां! आता मी कशाला तिथे गेलो होतो? सोप्पंय! उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्राचा चिवडा विकायला! ;) )

खरं तर फिल्मी दुनियेत राहूनही अगदी जमीनीवर असलेला माणूस असं म्हणायला हरकत नाही!
आणी भटकंती मध्येही त्याचे विचार चांगलेच आहेत. मांडले रटाळपणे असतील... कदाचित! तो स्वतः ट्रेकर/हायकर आहे, सगळे गड दुर्ग भटकून आलाय! पर्यावरणावर पण अतिशय जागरूक आणी पटावीत अशी मते आहेत त्याची.
असो,
कुणाल कोण बरं वाटावं हे मी कोण ठरवणार! मी आपलं मला आलेला अनुभव लिहिलाय बुवा! तुमचा अनुभव वेगळा असु शकतो! तुमचे काही खास कन्सर्न असेल तर हवं तर विचारीन मी त्याला पुढच्या वेळी भेटल्यावर!

आपला
गुंड्या.
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

शर्वरी

मिलिंद गुणाजी हे उमदे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे यात शंकाच नाही. भटकंतीमधले विचारही सुंदर आहेत. महाराष्ट्राचे वैभव असणारे गडकिल्ले लोकांनी बघावेत त्यांच्या रक्षणासाठी प्रयत्न करावेत हे विचारही अगदी पटणारे आहेत.

माझं मत फक्त त्याच्या निवेदनावर होतं. कदाचित शर्वरी जमेनीस आणि मिलिंद यांना एकत्र निवेदन करताना पाहिल्यापासून त्याच्या निवेदनातला नीरसपणा अधिक जाणवला असावा.
शर्वरीही कुठेही आक्रस्ताळेपणा न करता सुंदर निवेदन करायची. तिच्या बोलण्यातून तिचा उत्साह जाणवायचा. मिलिंद बोलायला लागला की थोडा दगडोबॉ वाटतो ;)

शर्वरी जमेनीस ची तब्येत फारच सुधारलीये हो... पूर्वीची शर्वरी आठवून उसासे टाकायचे झालं... पुण्याचं हवामानच तस्स लोकांना फार मानवतं त्याला ती तरी बिचारी काय करणार. आमच्या बेल्टची पण ३ छिद्रं आता वापरता येत नाहीत... तरी लोक पुण्यात पूर्वीसारखी हवा राहिली नाही असं म्हणतात.येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

हो रे बाबा!

पडल्यावर मग परत बसलो खुर्चीवर आणी मगच लिहिलं!

बाकी
पूर्वीची शर्वरी आठवून उसासे टाकायचे झालं... पुण्याचं हवामानच तस्स लोकांना फार मानवतं त्याला ती तरी बिचारी काय करणार. आमच्या बेल्टची पण ३ छिद्रं आता वापरता येत नाहीत... तरी लोक पुण्यात पूर्वीसारखी हवा राहिली नाही असं म्हणतात.

हा हा हा!
चालायचंच! दिवस जातात... सॉरी बदलतात म्हणायचंय मला! ;)

(यार! आपण पार वाट लावतो चर्चेची!
कुठे ती पुस्तक विषयाची चर्चा आणी कुठे 'विषयाची' ;)
असो, घ्या योगेशराव , चिवडा खा!
म्हमद्या..... सायबांना चिवडा देरे एक प्लेट... आणी हात धून पाणी!)

आपला
गुंडो.
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

जमेनीस की जेमनीस की जेमेनीस

नक्की आडनाव काय है भौ?

बम वाट लावून रायले ना तुमी. आमाले खरे आडनाव सांगून दे ना बे.येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

मला काकांपासून वाचवा

अहो काकांच्या नावाशी आम्हाला काही घेणं देणं नाहिये...

शर्वरी जमेनीस असं तिचं नाव आहे..आणि तीही तसंच वापरते.

आता तिच्या कडोन दहावीची गुणपत्रिका मागून उपक्रमवर् टाकता येईल काय याचा विचार करतोय..

(नावात सगळं आहे) अभिजित

हे बाकी खरंय...

(यार! आपण पार वाट लावतो चर्चेची!
कुठे ती पुस्तक विषयाची चर्चा आणी कुठे 'विषयाची' ;)
असो, घ्या योगेशराव , चिवडा खा!
म्हमद्या..... सायबांना चिवडा देरे एक प्लेट... आणी हात धून पाणी!)

हे खरं आहे. पण योगेश आणि गुंडोपंतांची जुगलबंदी आवडली.

नीलकांत

सहमत आहे

दाभोळकर-सत्यनारायण-प्रेस उदाहरण मस्तच :)

तरी नशीब

चर्चा गुणाजीचे गुण आणि जमेनिसच्या वजनाच्या जमाखर्चापुरती मर्यादीत राहीली...अजून भरकटली(भटकली) नाही.

मिलिंद गुणाजीची पुस्तके माहितीपूर्ण आहेत. तसाच भटकंती कार्यक्रमसुद्धा. आता कुठलीही माहितीपूर्ण गोष्ट मधात घोळून नाही सांगितली की कडू लागणारंच.

अजूनही त्या गूढ ठिकाणाबद्दलच्या पुस्तकाचे नाव समजले नाही. विचित्रगड नक्की असणार तिथे.

अभिजित

सवडीने..

चर्चा गुणाजीचे गुण आणि जमेनिसच्या वजनाच्या जमाखर्चापुरती मर्यादीत राहीली...अजून भरकटली(भटकली) नाही.

शर्वरी जमेनीस या अभिनेत्रीबद्दल आम्ही सवडीने भाष्य करू!

तात्या.

आज सकाळी इंग्रजी विकीचे मुखपृष्ठ उघडले असता संत तात्याबांच्या नजरेस नेमका हा लेख पडला आणि त्यांनी 'शिवं शिवं' असे म्हटले! ;)

गूढरम्य महाराष्ट्र

अजूनही त्या गूढ ठिकाणाबद्दलच्या पुस्तकाचे नाव समजले नाही.

उपक्रमावरील गूगल शोध वापरल्यावर मटा मधील बातमी सापडली. मजकूर असा

भटकंतीतून उकलणार 'गूढरम्य महाराष्ट्र'

[ Wednesday, June 06, 2007 05:57:14 pm]
मनीषा नित्सुरे

महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत की जिथे दैवी चमत्काराचा प्रत्यय येतो, अशी श्रद्धा आहे. भाविक पर्यटक अशा ठिकाणी प्रचंड गदीर् करतात आणि बाकीचे अंधश्रद्धेला घाबरून या ठिकाणी अजिबातच फिरकत नाहीत. अशा गूढरम्य माहिती देण्यासाठी 'भटकंती'कार मिलिंद गुणाजी पुढे सरसावले आहेत. 'गूढरम्य महाराष्ट्र' हे त्यांचं सहावं पुस्तक याच उद्देशाने बाजारात दाखल झालंय.

लोकांच्या मनातील शंकांना वाट करून देत तथाकथित गूढतेचा उहापोह करायचा आणि वाचकांना या ठिकाणांची भौगोलिक माहिती पुरवायची हा या पुस्तकाचा गाभा आहे. ते म्हणाले, 'महाराष्ट्रभर भटकताना दैवी आणि नैसगिर्क चमत्कारांचा मेळ असलेली अनेक ठिकाणं माझ्या पाहण्यात आली. पण त्यातील बरीचशी पर्यटकांच्या प्रतीक्षेत होती. ती प्रकाशात आणायला हवी, या विचाराने पुस्तकाची कल्पना सुचली. अज्ञात किल्ले, पुरातन गढ्या, प्राचीन मंदिरांचा अभ्यास करून पुस्तक लिहिलंय.'

सांगली, कोल्हापूर, कोकण, उत्तर कोकण, लोणावळा, खंडाळा, कर्जत, मुरबाड, नाशिक, धुळे, अमरावती, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यातील गूढतेचं वलय लाभलेल्या ४६ ठिकाणांचा राजहंस प्रकाशनाच्या या पुस्तकात समावेश आहे.

बाकी प्रतिसादातून विषयांतरामुळे आणि खासगी गप्पाटप्पांमुळे बर्‍याच वाचकांचा आणि चर्चाविषयात खरेच रस असणार्‍यांचा रसभंग होतो याची सतत जाणीव ठेवल्यास असे प्रकार आपोआप कमी होतील असे वाटते. याबाबतीत अमराठी संकेतस्थळांचा आदर्श ठेवता येईल. असो.

विषयांतर

बाकी प्रतिसादातून विषयांतरामुळे आणि खासगी गप्पाटप्पांमुळे बर्‍याच वाचकांचा आणि चर्चाविषयात खरेच रस असणार्‍यांचा रसभंग होतो..

..त्यापेक्षा जास्त लोकांची करमणूक होते असे वाटते..(नविन माहितीही मिळते बरका!)
विकि, दाभोळकर, सत्यनारायण, शर्वरी, चिवडा, पुणे, बेल्ट .. ह्यामुळे विसेक प्रतिसाद तरी गोळा झाले.. आणि २ प्रतिसादांवर खिळलेली चर्चा पुढे गेली तेही नसे थोडके.

सुचवणी : हे विषयांतरवाले प्रतिसाद वेगळी खूण (फ्लॅग) लावुन ठेवणे शक्य आहे का? अश्याने चर्चा विषयातच रस असणारे हे प्रतिसाद गाळून टाकून आपला रसभंग होऊ देणार नाहीत.

- कोलबेर
--
माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन (!) थोडेसे विषयांतर ह्यांचे कोलबेर समर्थन करतो.

योग्य सुचवण

सुचवणी : हे विषयांतरवाले प्रतिसाद वेगळी खूण (फ्लॅग) लावुन ठेवणे शक्य आहे का? अश्याने चर्चा विषयातच रस असणारे हे प्रतिसाद गाळून टाकून आपला रसभंग होऊ देणार नाहीत.

वा क्या आयडिया है!
आवडली आवडली... आपण तर हे फ्लॅग वालेच लिखाण आधी वाचणार बॉ!
नक्की लावा बर का हे झेंडे!

आपला
गुंडोपंत झेंडेवाले
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)
आणी हो नेहमी प्रमाणेच! माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन (!) थोडेसे विषयांतर या कोलबेरच्या समर्थनाचे मी समर्थन करतो! ;)

सत्यनारायण आणि हिंदू धर्म

सत्यनारायणाच्या कथेतील साधुवाणि आणि बुडालेले जहाज यावर गाडगे बाबा म्हणायचे कि त्यावेळी तुकाराम बोट मुंबई बंदराजवळ बुडाली होती ती आख्या किनार्‍यावर सत्यनारायण घालून परत वर आणली तर् गोरगरींबांना धान्य मिळेल. मूळात सत्यनारायण ही संकल्पना हिंदू धर्मातील नाही. ती सच्चा पीर या मुस्लिम पीर संप्रदाय कलकत्ता बंगाल येथून हिंदू धर्मात आली. दाभोळकर आमचे चळवळीचे ज्येष्ठ बरं का? आता शाम मानव व त्यांची फाटाफूट झाली (१९८९ मध्ये) मानवांची अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व दाभोळकरांची महाराष्ट्र अंनिस असा प्रवास आहे.
( अंनिस आजीव स व हिं)
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

बापरे, एव्हढे प्रतिसाद?!
असो, प्रतिसाद वाचून अवांतर माहिती आणि करमणूकही झाली :) धन्यवाद.
शशांक: धन्यवाद लिंकसाठी.

 
^ वर