शनीचा सिंह राशीत प्रवेश

लोकहो !!

शनी दिनांक १५ जुलै २००७ रोजी कर्केतून सिंह राशीत प्रवेश करतो आहे. मिथुन राशीच्या लोकांची साडेसाती खंडीत होत असून कन्या राशीला १५ जुलै पासून साडेसाती सुरू होत आहे.

कर्क राशीची शेवटची अडीच वर्षे आणि सिंह राशीची पाच वर्षे शिल्लक आहेत.

आश्लेषा नक्षत्रातील शनीचे सध्याचे गोचर भ्रमण कर्क राशीच्या व्यक्तिंना तापदायक ठरेल.(ज्यांचा जन्म कर्क राशीत आश्लेषा नक्षत्रावर झाला आहे त्यांना.)

मिथुन राशीच्या लोकांनी पार्टीची तयारी करावी. गेल्या साडेसात आठ वर्षात जे भोग भोगले त्याची सांगता होऊन जीवनातील चांगला कालखंड सुरू होत आहे.

विवाहेच्छुक मिथुन लोकांचे ज्यांना गुरूबळ आहे त्यांचे विवाह १५ जुलै नंतर ठरतील. धंदा व्यवसायाच्या ज्या योजना आखल्या होत्या त्या कृतीत आणाव्या.

आपला,
(शास्त्रीबुवा) धोंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

बरं वाटलं!

वा धोंड्या, बर्‍याच दिवसांनी तुझा लेख पाहून बरं वाटलं!

मिथुन राशीच्या लोकांची साडेसाती खंडीत होत असून कन्या राशीला १५ जुलै पासून साडेसाती सुरू होत आहे.

चला! सुटलो बुवा एकदाचा!

मिथुन राशीच्या लोकांनी पार्टीची तयारी करावी. गेल्या साडेसात आठ वर्षात जे भोग भोगले त्याची सांगता होऊन जीवनातील चांगला कालखंड सुरू होत आहे.

पार्टी करू.

विवाहेच्छुक मिथुन लोकांचे ज्यांना गुरूबळ आहे त्यांचे विवाह १५ जुलै नंतर ठरतील.

सांगतोस काय? ब्राह्मण वधुवरसूचक मंडळात नांव नोंदवू की काय? ;)

असो, लेख बाकी छान लिहिला आहेस हो. तुझ्याकडून उत्तरोत्तर असेच माहितीपूर्ण लेख यावेत ही इच्छा!

आपला,
(चित्तपावन याहू ग्रुप वरील बदनाम 'तात्या-धोंड्या' जोडीपैकी!) तात्या.

मजकूर संपादित. व्यक्तिगत गप्पागोष्टींसाठी खरडवही किंवा व्य. नि. चा वापर करावा. -- उपसंपादक.

धन्यवाद तात्या

तात्या,

उत्तराबद्दल धन्यवाद. पार्टी जरूर करू. पण आम्ही अजून साडेसातीतून सुटलेलो नाही. तू सुटला आहेस. पार्टी तूच दे.

आपला,
(फुकटपिऊ) धोंडोपंत

तुला विवाहसंस्थेत नाव नोंदवण्याची गरज काय? तुझी आजपर्यंतची या क्षेत्रातली 'पुण्याई' खूप आहे. ती उपयोगी पडेल.

आपला,
(जाणकार) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मीन रास.


धोंडोपंतसेठ,

आरे कुठे आहात ! आपला लेख वाचून आनंद होतो,अन तशी जराशी करमणूकही होते,दुस-यांच्या राशीफळाचा विचार ऐकतांना.असो,या या लोकांच्या साड्यासात्या संपल्या, येथेच पूर्णविराम द्यायला हवा होता.आता ज्यांची कन्या,आणि कर्क रास आहे.आज ते झोपू शकतील का शांतपणे ;)

अवांतर ;) सध्या,मीन राशीची काय कंडीशन आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांस

नमस्कार प्राध्यापक साहेब,

आपला प्रतिसाद पाहून आम्हांदिकांस आनंद झाला. बर्‍याच दिवसांनी येथे येणे झाले. आपण कसे आहात? सर्व क्षेमकुशल आहे ना?

मीन रास सध्या जोरात आहे. राहू कुंभेत गेलाय तेव्हापासून तर झकास. आणि नववा गुरू. अजून काय पाहिजे?

कन्या राशीच्या लोकांची झोप हळूहळू उडायला लागेल म्हणून सावधतेचा इशारा दिलाय. आमची म्हणजे कर्क राशीवाल्यांची झोप गेली पाच वर्षे उडलेली आहेच. आम्ही गेल्या पाच वर्षात कित्येक रात्री जागून तळमळत काढल्या आहेत.

आपला,
(निशाचर) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धनु

धनु राशीच्या लोकांना ह्या पावसाळ्यात काय काळजी घेणे आवश्यक आहे? ट्रेक वगैरे करण्यात काही धोका आहे का?

(धनुर्धारी) योगेश

अष्टमात नेपच्यून

ज्या लोकांच्या कुंडलीत अष्टम स्थानात नेपच्यून आहे त्यांना पाण्यापासून धोका असतो.

अष्टमात नेपच्यून असणार्‍यांनी , मग तो कोणत्याही राशीचा असेना, पाणी आणि पावसाळा यात फार काळजी घ्यावी.

धनूराशीसाठीच हा नियम आहे असे नव्हे. सर्व राशीच्या लोकांसाठी ही माहिती देत आहोत.

अशा लोकांचा मृत्यू पाण्यापासून अपघाताने होतो. हा मृत्यू गूढ स्वरूपाचा असतो, ज्याची समाजात चर्चा होते.

आपला,
(सावध) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

रास्

ज्या राशीला शनीच्या साडेसातीचा त्रास् होत् नाही अशी रास नाही का?नवीन् कशी तयार् होइल्?

राग येतो?- जोगिया असू दे

जरा मोठे व्हा

जरा मोठे व्हा म्ह्णजे कळेल. जोगिया ही तुमची कामे नाहीत. जाऊ दे.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आमचे ज्योतिषविषयक लेखन हे आम्ही केलेल्या व्यासंगातून, अभ्यासातून,वाचनातून, अध्ययनातून केलेले आहे. आम्ही कोणतेही नवीन शोध लावल्याचा दावा करीत नाही.

अवांतर/जोगिया!

जोगिया जर जमला तर असा जमून जातो की क्या बात है! हा खास आमच्या किराणा घराण्याचा राग.

धोंडोपंत, केव्हातरी सवडीने घरी या, 'पिया मिलन की आस' किंवा 'हरी का भेद ना जाने' हा किराण्याचा जोगिया आपल्याला ऐकवायचा प्रयत्न करीन. पण जमेलंच असं नाही. बघुया जमला तर जमला! पण आपण म्हणता ते खरं आहे. जोगिया हा साधा प्रकार नव्हे. त्यात आयुष्याचा दर्द मिसळता आला पाहिजे! असो..

इथे ऐका आमच्या अण्णांचा जोगिया!

क्या बात है!

आपला,
(गाण्यातला) तात्या.

कोण लहान् आहे ते समजलेच् आहे

सिंह राशीला इतर् राशींहून् कमी त्रास् असतो. तपासा बुक्.
ज्यांचा भविष्यावर् विश्वास् नाही ती हवी ती विधाने करतील्, तुम्ही शोध् लावल्याचा दावा करत् नाही, मग तुम्ही काय् सांगणार्. नवी रास् शोधायला मदत् केली की जिला साडेसातीचा त्रास् नाही.. लोक् दुवा देतील्.

राग येतो?- जोगिया असू दे

वा वा

अरे वा! धोंडोपंत महाराज!
क्या बात है आपण अवतीर्ण झालात! खुप आनंद झाला बरं का पाहून.
(मी तुमची वाट पाहून) अगदी लिहिणारच होतो शनीच्य भ्रमणावर जुलै च्या सुरुवातीला, तोवरच आपला लेख आला.
तेंव्हा आता परत लेख (माला) येणे असू देत!
शनी राशी अंती फले देतो. आणी जे देतो ते दीर्घकाला साठी देतो! आता कुणाला काय काय मिळाले ते पहा बुवा तपासून...

बाकी
आमची म्हणजे कर्क राशीवाल्यांची झोप गेली पाच वर्षे उडलेली आहेच. आम्ही गेल्या पाच वर्षात कित्येक रात्री जागून तळमळत काढल्या आहेत.

हे अगदी शब्दशः खरंय रे बाबा! कर्क राशीवाल्यांनाच कळेल ते.

आपला
गुंडोपंत

माझी रास कन्या

धोंडोपंत,

सकाळी अनायसे लवकर उठलो आणि हे काय नजरेस पडलं? माझी रास कन्या, नक्षत्र हस्त.

काय करावं या काळात, काही चांगलं सांगा, घाबरवून नका टाकू.

(टरकलेला) राजीव.

फार घाबरण्यासरखं पण नाही

राजीवशेट,
फार घाबरण्यासरखं पण नाही जो शनि ह्या फेर्‍यातून नेतो, तोच हे सगळं सहन करण्याची ताकद पण देत असतो. हा आयुष्याच्या शिक्षणाचा काळ आहे. इतकेच की मास्तर जरा कडक आहेत ;) मात्र कष्टानी काम केले तर पाठीवर हात पण फिरवणार.
आपला
(कुडमुड्या)
गुंडोपंत

खरं आहे रे बाबा!

जो शनि ह्या फेर्‍यातून नेतो, तोच हे सगळं सहन करण्याची ताकद पण देत असतो. हा आयुष्याच्या शिक्षणाचा काळ आहे. इतकेच की मास्तर जरा कडक आहेत ;) मात्र कष्टानी काम केले तर पाठीवर हात पण फिरवणार.

खरं आहे रे बाबा! आम्हाला गेली साडेसात वर्ष या शनिमास्तरांनी अगदी भरपूर खस्ता खायला लावल्या! पण साला लाईफमंदी खूप काही शिकलो. सामर्थ्यही शनिदेवानीच दिले. हवेत गेलो होतो ते दाणकन जमिनीवर आपटले खरे, पण जमिनिवरच पाय घट्ट रोवायला शनीनेच शिकवले!

अहो फार कशाला गुंड्याभाऊ, आमचं मनोगत सुटलं तेही साडेसातीच्याच काळात! आता १६ जुलै नंतर वेलणकरशेठला एखादं पत्र लिहून पाहू की काय असा विचार करतोय! ;)

आपला,
(शनीप्रेमी!) तात्या.

एकाच बोटीत

तात्याबा,
आपण एकाच बोटीत आहोत... फक्तचा अम्ही अडीच वर्ष मागच्या कॅबीन मध्ये बसलोय!
तुम्ही जवळ जवळ सुटला आहात! आम्ही आहोत अजून फेर्‍यात!
बोटीतून उतरायची फार घाई करू नका बरं.
एकदा दशा - अंतरदशा पण पाहून घ्या येवढेच म्हणेन!
आपला
गुंड्या

धनु/मीन

धोंडोपंत,

१५ जुलै नंतर शनिचा सिंह राशीत प्रवेश केल्यावर धनु व मीन राशीवर होणारे परिणाम सांगा ना! उत्तराची आतुतेने वाट पहात आहे.

रोहिणी

हो हो जरूर

रोहिणीताई,

आपला निरोप पाहून आम्हादिकांस खूप आनंद वाटला. धनू आणि मीनेबद्दल जरूर लिहू.

गेली काही वर्षे आम्ही "तिकडून" बाहेर पडल्यानंतर आमच्या लेखनाशी आपला संबंध राहीला नव्हता. तो या उपक्रममुळे पुन्हा जुळून आला.

"तिकडे" पिंगा घालणारी बरीच चिमणी पाखरे आता "इकडच्या" झाडांवर किलबिल करतांना दिसतात.

आपला,
(प्रेक्षक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आमचे ज्योतिषविषयक लेखन हे आम्ही केलेल्या व्यासंगातून, अभ्यासातून,वाचनातून, अध्ययनातून केलेले आहे. आम्ही कोणतेही नवीन शोध लावल्याचा दावा करीत नाही.

धोंडोपंत

आम्हालाही उत्तर द्या की. आम्हालाही प्रश्नांची उत्तरे आवडतात.

रा़जीवराव

राजीवराव ,

प्रश्न विचारा की. मग् उत्तरे देऊ. कन्येबद्दल तुमच्या प्रश्नाला गुंडोपंतांनी योग्य् उत्तर् दिले आहेच.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आमचे ज्योतिषविषयक लेखन हे आम्ही केलेल्या व्यासंगातून, अभ्यासातून,वाचनातून, अध्ययनातून केलेले आहे. आम्ही कोणतेही नवीन शोध लावल्याचा दावा करीत नाही.

कुंभ राशीच काय?

क्रुपया सान्गावे?

धन्यवाद

कर्के विषयी थोडी अधिक माहीती मिळेल का?

उपक्रमातील साद आणि प्रतिसाद वाचुन सभासद होण्यावाचून राहावले नाही. त्यात ज्योतिषविषयक वाचनाची आवड भारी.
कर्केतून शनि गेला तरीही साडेसाती ही संपत नाही का ?
कर्क राशीची शेवटची अडीच वर्ष बाकी आहेत असे धोंडोपंत म्हणतात.
माझी रास कर्क आहे हे वेगळे सांगायला नको.
गेली पाच वर्षे काय चाललय् ते पाहता हा शनी कर्केत आलातरी कधी होता कोणी सांगेल का?

आपला
हेमंत

 
^ वर