उगीचच चर्चा

बरेच दिवसांत वायफळ चर्चेवर वेळ घालवला नसल्याची जाणीव झाल्यामुळे ही चर्चा -

मध्यंतरी माझ्या एका चर्चेत प्राचीन ग्रीक राजाला अलक्षेंद्र म्हणून संबोधलं होतं. तेंव्हा युयुत्सुंनी हे चूक असून आपण मूळ नावाचा अपभ्रंष केला नाही पाहिजे आणि त्याला अलेक्झँडर म्हणलं पाहिजे असा मुद्दा मांडला होता.

मग परवा सहज विचार आला, कि मग आपल्या "जनं गणं मनं" च्या रविंद्रनाथांना टागोर म्हणायचं, टगोर म्हणायचं, की ठाकुर् म्हणायचं सर्वमते बरोबर राहिल? अर्थातच मला सहजता सर्वात महत्वाची वाटते तेंव्हा मराठीत व्यवहार करताना मला ठाकुर म्हणलेलं जास्त बरोबर वाटतं.

खिरे

लेखनविषय: दुवे:

Comments

टागोर.

रविंद्रनाथ टागोर ,असे सर्व म्हणतात.आणि मी पूढेही 'टागोर' असेच म्हणेन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मूडप्रमाणे! ;)

मी माझ्या मूडप्रमाणे कधी 'ठाकूर' तर कधी 'टागोर' म्हणेन! ;)

आपला,
तात्यानाथ टागोर!

शोले

तसा मी टागोरच म्हणेन, उद्या ठाकूर हे नाव सर्वसंमत झाले तर ठाकूर ही म्हणेन, शोले नुकताच पाहून आलो असेन तरीही ठाकूरच म्हणेन.

ये हाथ मुझे दे दे ठाकूर!!!

(गब्बर)राजीव.

 
^ वर