तर्कक्रीडा २८: मोक आणि तोक
........ अमरद्वीपावर गंधर्व आणि यक्ष राहातात.गंधर्व नेहमी सत्य तर यक्ष असत्य बोलतात हे आपल्याला ठाऊक आहेच. येथील सर्व रहिवाशांना मराठी भाषा समजते. परंतु बेटाच्या पूर्वेकडील भागात 'होय' आणि 'नाही' हे शब्द वापरले जात नाहीत. त्या ऐवजी स्थानिक बोलीतील 'मोक' आणि 'तोक' हे शब्दच वापरले जातात.(अनुक्रमेच असे नव्हे)
.........एकदा एक तर्कशास्त्री या पूर्व भागात गेले. त्यांना 'मोक' 'तोक' बोलण्याची रूढी ठाऊक होती.मात्र 'मोक' म्हणजे होय की 'तोक' म्हणजे होय हे माहीत नव्हते. आता,
........(|) तर्कशास्त्रींना तिथला एक रहिवासी 'अ' भेटला.तर त्यानी 'अ' ला कोणता एकच प्रश्न विचारावा म्हणजे त्याच्या 'मोक' किंवा 'तोक' उत्तरावरून तो गंधर्व आहे की यक्ष हे त्यांना निश्चित करता येईल? ( 'अ' ला होय नाही या शब्दांचे अर्थ कळतात.तो ते शब्द वापरत नाही एवढेच.)
........(||) तर्कशास्त्रींना तिथला दुसरा रहिवासी 'ब' भेटला.तर त्यांनी 'ब' ला कोणता एकच प्रश्न विचारावा म्हणजे त्याच्या 'मोक' अथवा 'तोक' उत्तरावरून त्यांना या दोन शब्दांचे अर्थ ( होय ,नाही ) निश्चित करता येतील? ('ब' ला वरील 'अ' प्रमाणेच होय नाही चे अर्थ समजतात. तो ते शब्द वापरत नाही एवढेच.
.......प्रश्न थेट सरळ असावा.आडवळणाचा उत्तरासंबंधीचा प्रश्न नसावा.उत्तरे कृपया व्यनि.ने
(प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित)
Comments
तर्क.२८ उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
एकलव्य,जोगिया आणि अनु या तिघांनी उत्तरे पाठविली आहेत.एकलव्य यांनी (|) आणी (||) या दोन्ही प्रसंगांसाठी अगदी अचूक प्रश्न शोधले. जोगिया आणि अनु यांनी प्रसंग(||) साठी गोग्य प्रश्न दिला आहे. (|) चे उत्तर दिलेले नाही.
.................................................
कोड्यातील (|) आणि(||) हे दोन भिन्न प्रसंग आहेत. ते वेगवेगळ्या वेळी घडले आहेत.
तर्क.२८:उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
अनु या आता प्रसंग (|) साठीही योग्य प्रश्न शोधण्यात यशस्वी ठरल्या आहेत.अभिनंदन!
प्रियाली क्र.(||) चे उत्तर बरोबर दिले आहे. क्र्.(|) साठी योग्य प्रश्न त्यांना सापडला नाही.
म्हणून
केवळ व्यनिने उत्तर दिले तर नंतर ट्रॅक ठेवायला कठीण जाते असे लक्षात आले म्हणून..
व्यनिने (अर्धे) उत्तर दिले आहेच्
तर्क.२८ उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. अमित कुलकर्णी यांनी प्रसंग (|) आणि (||) साठी अचूक प्रश्न शोधून काढले आहेत. अभिनंदन!
......यनावाला.
तर्कक्रीडा २८: उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
यात दोन प्रसंग आहेत. प्र.(||) चे उत्तर(खरे तर प्रश्नच) पुढील प्रमाणे:
(||) 'ब' (गंधर्व अथवा यक्ष) ला एकच प्रश्न विचारून 'तोक','मोक' चे अर्थ निश्चित करायचे आहेत.
तू गंधर्व आहेस का?
या प्रश्नाचे उत्तर गंधर्व खरे म्हणजे 'हो' असे देणार ;तर यक्ष खोटे म्हणजे 'हो' असेच देणार. म्हणून 'ब' जे उत्तर देईल (तोक, किंवा मोक) त्याचा अर्थ हो.( 'ब' चे उत्तर तोक असल्यास 'तोक' = हो, मोक =नाही. इ.)
(|)'अ' ला एकच प्रश्न विचारून तो गंधर्व की यक्ष ते निश्चित करायचे आहे.प्रश्न असा विचारावा:
" तुमच्या बोली भाषेतील 'तोक' शब्दाचा अर्थ 'होय' असा आहे काय?"
समजा 'अ' गंधर्व आणि तोक = 'होय' . तर 'अ' ' होय' म्ह.'तोक' असे उत्तर देईल.
समजा 'अ' गंधर्व आणि तोक = ' नाही' . तर प्र.चे उत्तर 'नाही'. म्ह.'अ' 'तोक' असेच उत्तर देईल.
यावरून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर 'तोक' असे आले तर 'अ' गंधर्व.
......
आता 'अ' यक्ष,तोक=होय , तर 'अ' 'नाही' असे म्ह.'मोक' असे उत्तर देईल.
तसेच 'अ' यक्ष,तोक=नाही, तर 'अ' 'होय 'असे' म्ह.'मोक' असेच उत्तर देईल.
या वरून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर 'मोक' असे आले तर 'अ' यक्ष.
धन्यवाद्
विनंतीनुसार आपण येथे उत्तर जाहीर केल्याबद्दल धन्यवाद.
- सूर्य