ग्रंथ- उपलब्ध / अनुपलब्ध
नमस्कार मंडळी,
उपक्रम व त्यासारख्या संकेतस्थळांना भेट दिल्यावर असे लक्षात आले, की संस्कृतचे अभ्यासक/ तज्ज्ञ येथे बरेच आहेत. प्रत्येकाकडे व्याकरणावर का होईना, पण थोडीफार ग्रंथसंपदा असतेच. काही जणांकडे तर वाडवडिलांपासून चालत आलेले, पण स्वतःला त्यात रस नसल्याने नुसतेच अडगळीच्या खोलीत पडून राहिलेले ग्रंथ असतील, किंवा स्वतःला रस असल्याने हौसेने कुठूनकुठून जमवलेल्या दुर्मिळ प्रती असतील.
याऊलट बरेच उपक्रमी भारताबाहेर राहत असल्याने त्यांना असे ग्रंथ उपलब्ध नसतात. आम्हा मुंबईकरांनाही अनेक ग्रंथांची तोंडेदेखील पहायला मिळत नाहीत. संस्कृतच्या अभ्यासकांना अशा ग्रंथांचे नेमके महत्त्व व मूल्य काय, हे वेगळे सांगायला नकोच! तेव्हा उपलब्ध असलेल्या ग्रंथांचा सर्वांना लाभ व्हावा यादृष्टीने आपल्याला काही करता येईल का?
माझा प्रस्ताव असा आहे, की या चर्चेवर प्रत्येकाने येऊन आपल्याजवळ असलेल्या संस्कृतविषयक ग्रंथांची एक यादी द्यावी. त्याचप्रमाणे विश्वजालावर इ-पुस्तक स्वरुपात एखादा ग्रंथ उपलब्ध असल्यास त्याचा पत्ता द्यावा. जेणेकरून त्या ग्रंथांच्या शोधात असलेली व्यक्ती आपल्याला संपर्क साधू शकेल व शक्य त्या मार्गाने (स्वतः भेटून, व्य नि. तून माहिती विचारून, फोनवर बोलून. इ.)ते पुस्तक मिळवून त्याचा अभ्यास करू शकेल. त्याचबरोबर एखादी व्यक्ती एखाद्या ग्रंथाच्या शोधात असेल, तर ती येथे 'सदर ग्रंथ संदर्भासाठी हवा आहे' असा एक प्रतिसाद टाकू शकते.
ज्यांना आपल्याकडील उपलब्ध ग्रंथांची नावे द्यायची असतील, त्यांनी प्रतिसादाच्या विषयात 'उपलब्ध ग्रंथ' असे लिहावे. तसेच ज्यांना एखाद्या ग्रंथाबद्दल चौकशी करायची असेल त्यांनी प्रतिसादाच्या विषयात 'हवे आहे' असे लिहावे. एखाद्या विषयावर वाचन करायचे असेल, पण त्यासाठी कोणते ग्रंथ वाचावेत, हे माहिती नसेल, तर 'माहिती हवी आहे' असा विषय लिहून प्रतिसाद पाठवावा.
हा चर्चाविषय म्हटले तर माहितीप्रद आहे, म्हटले तर नाही. पण उपयुक्त नक्कीच आहे.
राधिका
Comments
उपलब्ध ग्रंथ
इ-पुस्तके हवी असतील तर sanskritdocuments.org वर चक्कर टाका. खरोखरच चांगला संग्रह आहे.
क्ले संस्कृत माला हा सुद्धा उत्तम उपक्रम आहे. मात्र ह्या पुस्तकांत देवनागरीचा अंशही नाही, हा एक मोठा दोष आहे.
बाकी माझ्याकडे तशी विशेष उल्लेख करण्यासारखी पुस्तके नाहीत. आईने किंवा आजोबांनी बीए-एम्ए साठी घेतलेली पुस्तके नंतर कोणीतरी रद्दीत काढली, ती फुटपाथवर दीडदोन रुपये देऊन उचलली, अशाच प्रकारची आहेत. ५०-७५ वर्षांपूर्वी मुद्रणाचा दर्जा चांगला होता एवढे तरी त्यांच्यावरून समजते. तेव्हा लोक खूप परिश्रम करत असत ...
वा वाआ
अहो, अशाच पुस्तकांत काही दुर्मिळ पुस्तके मिळून जातात. या दीड-दोन रुपयांना घेतलेल्या पुस्तकांची यादी देऊ शकाल का? मलाही अशीच १०-२० रु. ना वेणीसंहार, योगशास्त्र वगैरे पुस्तके सापडली आहेत.
राधिका
उपलब्ध ग्रंथ
आहे? अाता बघायला गेलो तर सापडेनाशी झाली. म्हणजे मी घामाघूम ... सापडली की नक्की यादी करतो. शाकुन्तल जुन्या मोनियर-विल्यम्स् छापातलं अाहे. एक जुनं उत्तररामचरित अाहे. कादंबरी आहे असं वाटतं. किरातार्जुनीय आणि शिशुपालवध आहेत. मालतीमाधव जुन्या पद्धतीने छापलेलं आहे. एक जुनं नीतीशतक आहे. आठवताहेत तेवढी सांगतो. नवीनपैकी गीतगोविंदाची एक इंग्रजी आवृत्ती आहे, समग्र कालिदास (पण नाटकं सोडून, बहुतेक) अशी फक्त संहिता असलेली आवृत्ती कुठे तरी आहे.
हो आणि "रामकृष्णविलोमकाव्य" ह्या मजेदार काव्याची श्री. भि. वेलणकरांनी संपादित केलेली अर्थासहित आवृत्ती आहे (आहे म्हणजे मी वडलांकडून चोरली). तिच्या प्रती अजूनही दुकानांत शिल्लक असतील. हे पुस्तक फारच मनोरंजक आहे. मिळाले तर वाचलेच पाहिजे.
विलोम काव्य
असली जांभई अाली अाहे!
उपल्ब्ध ग्रंथ -दुवा
फार उपयोगी चर्चा.
http://www.sanskritweb.org/
येथे तीन वेद आणि अजून बरेच काही आहे.
--लिखाळ.
परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करावे असे मला वाटते.
उपल्ब्ध ग्रंथ -दुवा
फार उपयोगी चर्चा.
http://www.sanskritweb.org/
येथे तीन वेद आणि अजून बरेच काही आहे.
--लिखाळ.
परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करावे असे मला वाटते.
उपलब्ध ग्रंथ
नाटके-
राधिका
उपलब्ध ग्रंथ
नाटके-
राधिका
अशी पुस्तके
स्कॅन करता आली तर सहज वाचता येतील आणि उपलब्धही होतील. परदेशातील अनेकांना वाचता येतील. त्यांच्यावर प्रताधिकार असावा असे वाटत नाही. विशेषतः दिड-दोन (किंवा १०-२०) रूपयांत मिळत असतील तर.
अशी म्हणजे उपरोल्लेखितच असे नाही. त्यांचे प्रकाशक दिले आहेत म्हणजे कदाचित प्रताधिकार लागू होईल.
असाच एक उपक्रम
असाच एक उपक्रम इथेही पहाता येईल
हवे आहे
१)- यमुनापर्यटन - साधारण १८५७ च्य सुमारास प्रसिद्ध झालेली ही पहिली कादंबरी आहे. ही कादंबरी एका राष्ट्रीय स्तरावरच्या उपक्रमासाठी विकत हवी आहे. (हे पुस्तक मराठीत असल्याने मी ही विनंती इथे लिहायला नको, परंतू हे तेवढेच महत्त्वाचे व तातडीचे असल्याने येथे लिहिते आहे.)
२) वाक्यपदीय- भर्तृहरीच्या या ग्रंथाची संहिता, भाषांतर (इंग्रजीत असल्यास उत्तम) व टीका /टीपा असलेले कोणतेही पुस्तक हवे आहे.
राधिका
थोडी माहिती...
... आपल्या पुस्तकांसाठी चौकशी केल्यावर जुनी संग्राह्य पुस्तके मिळू शकतील अशा दोन ठिकाणांची माहिती मिळाली. एक म्हणजे मुंबईमध्ये गिरगांव भागात मेट्रो थिएटर जवळच्या गल्यांमध्ये २ / ३ दुकाने आहेत. तर दुसरे एक मुख्य दुकान बंगळुरूच्या (बंगलोर) मुख्य रस्त्यावर आहे.
राधिकाताई - आपण पुण्यात असल्याने आणि अन्यही कारणाने कदाचित या ठिकाणांचा आपल्याला उपयोग होणार नाही. मी स्वतःही कधी येथे गेलो नाही. तरीही कोणी त्या भागात असल्यास खातरजमा केल्यास बरे!
यमुना पर्यटन
यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी मानली जाते. ह्या कादंबरीचे लेखक बाबा पद्मनजी हे आहेत.
नीलकांत