तात्यांच्या या आवाहनावर संपादक मंडळाने...

तात्यांच्या या आवाहनावर संपादक मंडळाने काय करायला हवे होते असे आपल्याला वाटते?
उपक्रमराव,

बारबाला, त्यांचे जीवन, त्यांचे राहणीमान, या मुली कुठून येतात, यांना कोण आणतं, त्यांची दर दिवशी होणारी प्रचंड कमाई या सर्व गोष्टी माझ्या कामधंद्याच्या निमित्ताने मी खूप जवळून पाहिल्या आहेत, पाहतो आहे!

या सर्व सामाजिक गोष्टींवर प्रकाश टाकणारा एखादा लेख लिहीन म्हणतो. तो लेख उपक्रमावर टाकलेला चालेल का? असे आपल्याला जाहीरपणे विचारतो आहे.

उत्तराच्या अपेक्षेत,

तात्या.

या स्थळावर काय लेखन यावे आणी काय येवू नये हे कोणी ठरवावे? आपल्याला काय वाटते?

आपला
व्यथीत
गुंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

हे लेखन माहितीपूर्ण नाही का?

तात्यांचे हे लेखन माहितीपूर्ण नाही का?
नसेल तर का?

कोणते लेखन माहितीपूर्ण असते? आणी का असते?

आपला
गुंडोपंत

माझे मत

>>भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान , गणित, कला, इतिहास या व यासारख्या इतर विषयांवर मराठीतून लेखन आणि चर्चा व्हावी, या विषयांशी निगडीत समुदाय बनावेत, उपक्रम चालावेत या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर प्राधान्याने माहितीप्रधान लेखन आणि चर्चा व्हावी हा उद्देश आहे.

असे परवा चर्चा टाकताना उपक्रमाच्या पानावर आढळले. जर ललित लेखन करू नये असे उपक्रमांचे म्हणणे असेल आणि तात्यांचा लेख ललित लेखन नसेल तर तो लेख टाकू की नको असे उगीच प्रश्न विचारणे, त्यांच्या उत्तरांची अपेक्षा करणे, ती दिली नाहीत म्हणून रागावणे, इतर सदस्यांनीही त्यामागचे वास्तव न पाहता अश्या चर्चा टाकणे हे काय दाखवते हे जरा मला कळू दे आणि हे चर्चालेखक किंवा तात्या तसेच चर्चेत सातत्याने भाग घेणारी इतर मंडळी यांच्याकडून न कळता उपक्रमावर जी मंडळी चूपचाप धोरणांत बसतील असे लेख टाकतात आणि वादावादीत भाग घेत नाहीत त्यांच्याकडून कळलेले बरे. ही मंडळीही उपक्रमाचे सदस्य आहेत आणि त्यांना या अश्या चर्चांचा त्रास होत असेल किंवा त्यामागे काही वेगळेच प्रकार असावेत असे वाटते का?

जर लेखकाला आपण लेख लिहितो आहोत की गोष्ट हेच कळत नसेल तर त्याने आपल्या कोणा मित्राला/ आप्ताला दाखवून विचारावे की. तात्यांना ते कळते असे त्यांची गोष्ट वाचून मला वाटले. आता प्रत्येक सदस्याने मी असे करू का? मी असे लिहू का? मी असा लेख टाकू का? मी कविता टाकू का? विडंबन लिहू का? असे विचारत राहिले तर कोणाकोणाच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची त्यासाठी हे पान दिसते ना ते वाचून ठरवा की काय लिहायचे आणि काय नाही ते.

http://mr.upakram.org/node/159

-(वकिली चर्चांना कंटाळलेला) राजीव.

---
म.संस्थमुळे ऑफिसला यायला उशीर झाला हे कारण दिलेले चालेल काय?

मग?

उपक्रमावर जी मंडळी चूपचाप धोरणांत बसतील असे लेख टाकतात आणि वादावादीत भाग घेत नाहीत
म्हणजे 'पाळीव नि गाळीव वाले' असंच ना?

कोणते लेखन ललीत असते?
ललीत लेखन याची व्याख्या काय?
माहितीपूर्ण लेखन याची व्याख्या काय?
हे कोण ठरवते?

(यावर युयुत्सुंनी मागे एक सुंदर विडंबन टाकल्याचे आठवले.)

ते पाळीव

तर तुम्ही जंगली का हो? उपक्रमावरील इतर सदस्यही येथलेच आहेत ना... ते धोरणांत वागतात म्हणून त्यांना अशी जाहिर नावे ठेवणे हे बरे नाही. मला तरी आवडले नाही.

लोकांना नावे ठेवणे सोपे असते, या चर्चेत तुम्हाला वाटणार्‍या पाळीव आणि गाळीव लोकांची नावे जाहिर करा असे तुम्हाला आवाहन आहे, जर ते करू शकत नसाल तर तुमच्या मनाप्रमाणे न वागणार्‍या लोकांना नावे ठेवणे बंद करा.

- राजीव.

---
चलतो. राहिलेले संध्याकाळी बोलू. उशीर होतोय.

पाळीव नि गाळीव

राजीवशेठ
(इतकी स्वतःवर घेऊ नका हो चर्चा!)
पाळीव नि गाळीव हे वर्गीकरण आहे. त्यामुळे नावे देण्याचा संदर्भ येथे आणू नये. कधी कधी मी पण पाळीव नि गाळीव असतो आणी कधी कधी नसतो. हे
त्या त्या चर्चेवर अवलंबून असते. इतर मुद्यांशी मात्र काही प्रमाणात सहमत.
(मात्र नियमाच्या गोष्टी सुस्प्ष्ट व्हायला हव्या आहेत हेच तर या सगळ्या मागचे म्हणणे आहे...)

असो, माझ्या प्रश्नाला आपण भलतीकडेच नेत आहात असे वाटते. ते ललीत नि माहितीपूर्ण लेखनाचे काय झाले पूढे? :)

आपला
गूंडोपंत

पाळीव गाळीव

कोणी कोणाला पाळीव गाळीव वा जंगली म्हणावे हा एक चर्चेचा विषय होउ शकेल. फक्त संदर्भ बदला मग धमाल येइल. संपादक मंडळाचे पाळीव गाळीव. काही ठराविक सदस्यांचे पाळीव गाळीव. हे चालतच राहणार. एक मात्र मानायला हवे. तात्यांनी त्यांचा इतिहास गिरवला आहे. तर आपण अशा चर्चा थांबवू. तात्यांना कोणी जावा म्हणलेले नाही. कदाचित या असे सुद्धा संपादक मंडळाने सांगितले नसेल असा अंदाज आहे.
लेखन प्रकाशितच करायचे आहे तर त्याचे अनेक मार्ग आहेत. मला वाटत कि जर पुस्तक स्वरूपात लेखन प्रकाशित करायचा विचार केला तर अनेक नवे लेखक अनेक प्रकाशकांच्या पायर्‍या झिजवतात. त्यातलाच हा प्रकार. असो, हे अस चालतच राहणार....

मराठीत लिहा. वापरा.

सही!

"फक्त संदर्भ बदला मग धमाल येइल"
सही!

इतर मुद्दे - सहमत होण्याशिवाय पर्याय नाही! ;)
काय तरी लोच्या आहे.
तात्याबांची मिसळ पकलेली दिसते आहे... उगाच इतका तडकाफडकी आत्महत्येचा निर्णय?
(कुटं ग्येला रे माजा तात्याआआआआ!
ग्येला रं तरी म्या लय येळा गळ घातली नगं जावू... पन् ग्येला वं!
तात्याआआआआ!! आन् जर का कधी मिस्सलपाव येकट्यान् खाल्ला, त म म्या हाय आन् तुजी मिस्सल हाय
आपला
गुंडोपंत

प्रकाशकाच्या पायर्‍या

लेखक अनेक प्रकाशकांच्या पायर्‍या झिजवतात. त्यातलाच हा प्रकार. असो, हे अस चालतच राहणार....

चानक्यराव,
म्हंजी आमचा तात्या उपक्रम रावाची पायरी झिझवत होता म्हंता का?
तसं असंल तर तात्यावरचा तुमचा राग अजून ग्येलेला दिसत न्हाई राव!
लै वाईट डुख धरताय किवं तुमी .. तुमच्या वाटेला अजाबात जानार न्हाई बगा!

आवाहन

तात्यांच्या या आवाहनावर संपादक मंडळाने काय करायला हवे होते असे आपल्याला वाटते

"सदर लेख वाचल्यावर आम्ही तो लेख ठेवायचा का नाही हे ठरवू शकू" .. असे एका ओळीत इथल्या संपादक मंडळाने तात्यांना कळवायला हरकत नव्हती...(पुन्हा या संदर्भात कृपया विचारणा करू नये दर वेळेस संपादन मंडळ दखल् घेऊ शकेलच असे नाही - अशी पुस्ती जोडली असली तरी चालले असते.)
-वरूण

हे वाचतील अशी आशा

संपादक वरुण चा प्रतिसाद वाचतील
अशी आशा आहे!
;)

गूंडो.

येरे माझ्या मागल्या

प्रकारची ही चर्चा मनोरंजक, वातपित्तहारक,रेचक, कंडशमक व अर्थातच माहितीपूर्ण आहे हे आवर्जून नमूद करु इच्छितो.

जाउ वाटेवर पुढल्या

प्रकारची ही चर्चा मनोरंजक, वातपित्तहारक,रेचक, कंडशमक व अर्थातच माहितीपूर्ण आहे हे आवर्जून नमूद करु इच्छितो

.
सहमत आहे, पाचक,वाचक,रेचक,रोचक,खोचक,भोचक,चकचक असे प्रतिसाद रंजकताही वाढवतात तसेच माहीती देखिल.

प्रकाश घाटपांडे

लेखनविषयक शंका

लेखनविषयक मार्गदर्शन वाचल्यानंतरही लेखनविषयक काही विशिष्ट शंका असतील तर निरोपातून कळवाव्यात. शक्य तितक्या लवकर उत्तर पाठवण्याचा प्रयत्न नेहमीच असतो. तरीही वेळेच्या उपलब्धतेनुसार हा वेळ कमी-अधिक होऊ शकतो. बर्‍याच सदस्यांनी अश्या शंका निरोपातून कळवून योग्य मार्गाने त्यांचे निरसन करून घेतले आहे हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.

शंका!

सदर चर्चाविषय आणि बारबाला चर्चेतील सदर विषयासंदर्भातील प्रतिसाद यांचा संदर्भ आता कालबाह्य झाला आहे असे वाटते. उपक्रम संकेतस्थळाच्या अपेक्षित स्वरूपाशी सुसंगत नसलेले लेखन या सदरात या सगळ्याची रवानगी करून अजून उडविले का गेलेले नाही याचे आश्चर्य वाटते.

हा प्रतिसाद भांडणे ओढवून घेण्याची हौस म्हणून लिहिलेला नाही. प्रामाणिक शंका आहे.

आत्महत्या

हितली मरगळ घालवन्यासाटी दर आटवड्याला येक आत्महत्या होने गरजेचे हाय का?
वरचेवर होनार्‍या ह्या आत्महत्यांवर संपादकराव् इचार करत्यात का? का आपलं रोज मरं त्याला कोन रडं?
ह्यावर संपादक म्हाराज आपल मत नोंदविनार का?

चला मंडळी येक माहितीपूर्न चर्चा पाडा बगु आता!

आत्महत्या?

जगणं नकोसं झालं म्हणून नव्हे तर जगणं पुरेसं झालं म्हणून इच्छामरण. इच्छामरण आणि आत्महत्या या गोष्टी व्यावहारिक दृष्ट्या जरी सारख्या असल्या तरी तात्विक दृष्ट्या त्यात फरक आहे. आत्महत्येला धार्मिकदृष्ट्या गौण व भ्याड मानले आहे. पण समाधीला मात्र प्रतिष्ठा आहे. त्यामुळेच ज्ञानेश्वरांच्या समाधिला प्रतिष्ठा आहे. आत्मह्त्या केलेल्या मोठ्या व्यक्तिंच्या मृत्यूचा उल्लेख अनुयायी जाणिवपुर्वक टाळतात.उदा. साने गुरुजी. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या जीवावर राजकीय पक्षांचे जीवन अवलंबून असते.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर