ब्लॉग वरील अक्षरे

ब्लॉग वरील अक्षरे उपक्रम अथवा मनोगत इत्यादी स्थळांप्रमाणे सुबक दिसण्यासाठी काय करावे? मागे एकदा शनिपार का कोणतासा टंक मनोगतावर वापरतात असे ऐकले होते. हा अथवा जो कोणता फाँट मनोगत/उपक्रम वापरतात तो ब्लॉगवर कसा आणायचा? मी पाहिलेल्या कोणाच्याही ब्लॉगवर हा फाँट वापरलेला दिसला नाही. ह्याचे कारण काय असावे? मनोगत/उपक्रमावरील हा देवनागरी फाँट (जो मला सर्वात जास्त आवडतो ) ब्लॉग, याहू मेसेंजर इ. ठिकाणी कसा वापरावा ह्याचे मार्गदर्शन ह्या चर्चेतून करावे. त्याचबरोबर माझ्या संगणकावर इथून कॉपी करुन वर्ड मध्ये चिकटवल्यास फक्त चौकोन दिसतात पण माझ्या घडीच्या संगणकावर मात्र तेच केल्यास अक्षरे उमटतात (अर्थातच 'मंगल 'नावाच्या फाँट मध्ये जो मला इथल्या इतका आकर्षक वाटत नाही) माझ्या दोन्ही संगणकांवरील विंडोज आणि ऑफिसच्या आवृत्तीत फरक नाही तरीही असे का होत असावे?

लेखनविषय: दुवे:

Comments

कॉपिराईट

(टंक) फॉन्टचे पण कॉपिराईट असते. या संदर्भात फाँट पोलिस कार्यरत असतात असे ऐकुन आहे.
त्यामुळे मालकी हक्क असणारे टंक न वापरणेयोग्य राहील. पण 'ब्लॉगवर टंक वापरणे' याविषयी माहिती नाही.
शनीपार तसा डेव्हएडिटच्या मालकीचा आहे का?
कोणी माहिती पुरवू शकेल काय?

आपला
गुंडोपंत

सीडॅक योगेश

१. मनोगतावरचा व उपक्रमावरचा टंक यांच्या जवळपास जाणारा सीडॅक योगेश हा टंक उतरवून घ्या.
२. तो विंडोजच्या > फॉन्ट या धारणीत ठेवा. / फाईल मेनु मधून इन्स्टॉल करा.
३. एक्स्प्लोरर किंवा फायरफॉक्स च्या टंकासंबंधीच्या मांडणीत बदल करून देवनागरीसाठा मंगल ऐवजी हा टंक निवडा.

(अधिक सविस्तर माहिती/किंवा टंक हवी/हवे असल्यास तसे कळवा.)

असे केल्याने तुमचा काय पण सारे देवनागरी युनिकोड लिखाण तुम्हाला तुमच्या आवडत्या टंकात दिसू लागेल.

तुमची अनुदिनी सर्वांनाच अशा टंकात दिसावी असे वाटत असेल, तर मात्र तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागेल :)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

आभारी आहे

तो.,
माहिती बद्दल धन्यवाद. लगेचच हा प्रयोग करुन पाहतो.
आपल्या मार्गदर्शनावरून असे लक्षात आले की आमच्या एक्स्प्लोरर मध्ये 'मंगल' फाँट असल्याने आम्हाला सगळे त्यामध्ये दिसत आहे.. पण तसे असेल तर मनोगत/उपक्रम मात्र वेगळ्या फाँट मध्ये कसे काय दिसते?.. त्याचबरोबर एक्स्प्लोरर/फायरफॉक्स मध्ये बदल केल्यास त्याचा परिणाम मेसेंजर/वर्ड् ह्यामध्ये दिसणार नाही.. त्यासाठी काय करावे?

टंक चरित्र आणि माहात्म्य

एचटीएमएल भाषेत असणारा font हा टॅग वापरून मजकूर कोणत्या टंकात दाखवायचा आहे हे ठरवण्याची सोय आहे. पूर्वअट एकच आपण सांगितलेला टंक पाहणार्‍याचा संगणकावर उपलब्ध असायला हवा.

शक्यता १ - इंग्रजी ब्लॉग/पान/संस्थळ
भारतातील बहुसंख्य संगणकांवर नियंत्रण प्रणाली (ओएस) इंग्रजी असते, त्यामुळे एरियल, टाइम्स न्यू रोमन, कुरियर, सॅन्स इ. फॉंट्स प्रामुख्याने प्रत्येक संगणकावर असतात. तुमचा ब्लॉग/पान/संस्थळ इंग्रजीत असेल तर काही भाग एरियल मध्ये, काही कुरियर मध्ये असे जर तुम्ही लिहिले असेल तर पाहणार्‍याला तसे दिसेल. पण जर तुम्ही एखादा टंक पाहिला आणि तुम्हाला वाटले की माझे ब्लॉग/पान/संस्थळ या टंकामध्ये असावे आणि पाहणार्‍याच्या संगणकावर तो टंक असो किंवा नसो त्याला ते ब्लॉग/पान/संस्थळ त्याच टंकात दिसावे तर मासॉ ने इंए वापरणार्‍यांसाठी डायनॅमिक फाँट्स ही सोय दिली आहे जिचा वापर करून आपला टंक एका विशिष्ट स्वरूपात सेवादात्यावर चढवायचा आणि प्रत्येक पाहणार्‍या व्यक्तीचा न्याहाळक हा टंक दरवेळी उतरवून घेऊन ब्लॉग/पान/संस्थळ त्या टंकात दाखवेल. (हा प्रकार मोझिला, फायरफॉक्स न्याहाळकांवर काही करू शकत नाही.)

शक्यता २ - देवनागरी (किंवा इंग्लिशेतर भाषेतील) ब्लॉग/पान/संस्थळ
विंडोज नि.प्र. मध्ये देवनागरीसाठी मंगल हा टंक उपलब्ध आहे. त्यामुळे देवनागरीतील कोणतेही पान 'मंगलमय' दिसते. समजा असे गृहीत धरू की तुमच्या ब्लॉग/पान/संस्थळावर तुम्ही विशिष्ट मजकूर योगेशमध्ये दिसावा असा बदल केला आहे आणि एका पाहणार्‍याच्या संगणकावर मंगल आणि योगेश हे दोन्ही टंक उपलब्ध आहेत आणि दुसर्‍याच्या संगणकावर फक्त मंगल आहे तर पहिल्या व्यक्तीला तो विशिष्ट मजकूर योगेश मध्ये दिसेल आणि दुसर्‍याला सर्वकाही मंगलमय दिसेल. देवनागरीलाही डायनॅमिक फाँट्स वापरून आपल्याला हवे तसे रूप देता येते. त्यासाठी सेवादात्यावर ह्या टंकाला साठवण्याची सोय मात्र हवी.

हे सर्व माझ्या जुजबी माहितीच्या आधारावर, तांत्रिक चुका असू शकतील. चूभूद्याघ्या.

हम्मम्म्म..

शशांकराव,
बर्‍याच शंकांचे निरसन केलेत, धन्यवाद!
ह्याचा अर्थ मनोगत/उपक्रम ह्यांनी आपापले टंक सेवादात्यावर चढवले आहेत त्यामुळे त्यांची अक्षरे सुबक दिसतात परंतु ब्लॉग वाल्यांनी असे न केल्याने तिथेमात्र सगळे मंगलमय आहे तर! ब्लॉग वाल्यांचे सेवादाते (उदा. ब्लॉगस्पॉट, वर्डप्रेस) टंक साठवण्याची परवानगी देतात का? ह्या विषयी कुणाला काही माहिती आहे का?

जाता जाता - अधुन मधुन माझ्या संगणकावर उपक्रम देखिल मंगलमय दिसते पण पान ताजेतवाने केले की पुन्हा व्यवस्थित होते.. हे असे का ह्याचे उत्तर पण आपल्या प्रतिसादातून समजले.

तेवढे माझ्या चौकोनाच्या समस्येवर देखिल कोणाला उपाय सापडल्यास कळवावे. अनेक आभार!

-वरूण

चौकोनाबद्दल

आपल्या विंडोज कॉप्म्लेक्स स्क्रिप्टस् वाचत नसावे. त्याला कसे वाचते करायचे याची सविस्तर माहिती इथे पाहा.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

चौकोन

त्याचबरोबर माझ्या संगणकावर इथून कॉपी करुन वर्ड मध्ये चिकटवल्यास फक्त चौकोन दिसतात

या संगणकावर डा॰फाँ॰ न वापरणारी, उदा. मराठी विकीपीडिया, संकेतस्थळे व्यवस्थित दिसतात का? वर्डमध्ये मजकूर चिकटवल्यानंतर सर्व मजकूर निवडून (सिलेक्ट ऑल करून) मंगल (किंवा इंस्टॉल असलेला इतर कोणताही देवनागरी) फाँट निवडून पाहा.

ऑफिस

यात मा. सॉ. ऑफिसचा कितपत हातभार आहे चौकोन न दिसण्यासाठी?





मराठीत लिहा. वापरा.

चौकोन

विकिपीडिया व्यवस्थित दिसते. वर्ड मध्ये सिलेक्ट ऑल करून पाहिले तर 'मंगल फाँट' आधीपासूनच असतो तो पुन्हा सिलेक्ट केला तरी चौकोनच दिसतात. तसेच माझ्या एक्स्प्लोरर मध्ये मराठी व्यवस्थित दिसत असले तरी त्याच्या सगळ्यात वरच्या पट्टीवर चौकोनच दिसतात. (मराठी पाऊल पडते पुढे लिहिले आहे तिथे. )

इंडिक

तुमची विंडोज प्रणाली भारतीय भाषा ओळखत नाही असे दिसते. यासाठी तुम्हाला कन्ट्रोल पॅनल > रीजनल सेटींग्ज > कॉम्प्लेक्स स्क्रीप्ट्स असा प्रवास करावा लागेल. यात इंडीक भाषांचे टंक निवडावे लागतील. (यासाठी मूळ विंडोजच्या सेट-अप मधील काही धारण्या मागितल्या जाणे शक्य आहे.)

अधिक माहिती वरील विकीदुव्यावर..

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

जमले

'त्या'च्या सुचना अवलंबल्यावर आमच्या संगणकावरील चौकोन नाहिसे झाले. 'त्या'चे अनेक आभार!

 
^ वर