उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
तर्कक्रीडा २७:रत्नमूल्य
यनावाला
June 17, 2007 - 4:51 pm
रत्नमूल्य
शुंशुभा नामे नगर । तेथ वैश्य श्रेष्ठी चार ।
करिती रत्नांचा व्यापार । देशोदेशीं हिंडोनी॥१॥
देशाटन करिती एकत्र । तेणे कारणे जडले मैत्र ।
"ददाति प्रतिग्रह्णाति "सूत्र । उत्तम जाणिती प्रीतीचे ॥२॥
आईका एका शुभ दिनी । प्रस्थान ठेविले चौघांनी ।
निघाले ते आनंदुनी । निज उद्यमा कारणे ॥३॥

मार्ग आक्रमिता श्रमती । एका जागी विसावती ।
तेथ परस्परां दाविती । रत्नधने आपापली ॥४॥
एका पाशी आठ (८) माणके । आरक्त तयांचे तेज फ़ाके।
दुजा जवळी इंद्रनीळ निके । दश(१०) मात्र संख्येने ॥५॥
तेथ परस्परां दाविती । रत्नधने आपापली ॥४॥
एका पाशी आठ (८) माणके । आरक्त तयांचे तेज फ़ाके।
दुजा जवळी इंद्रनीळ निके । दश(१०) मात्र संख्येने ॥५॥
तिजयाची मोती शंभर(१००) । तेज झळाळे सुंदर ।
चतुर्थ आपुली नंतर । उधडी करी सद्वज्रे ॥६॥
ती असती संख्येने पाच(५) । सद्वज्र जाणिजे हिरा साच ।
तेथ तेजो किरणांचा नाच । भ्रमित करी नेत्रांते ॥७॥
रत्ने पाहोनी आनंदले । मित्रप्रेमा भरते आले ।
प्रत्येकाने आपापले । एकेक रत्न दिले अन्य तिघां॥८॥

ऐसे होता आदान प्रदान ।चौघे जाहले तुल्यधन ।
आश्चर्यानंदे मन । भरून आले तेधवां ॥९॥
शत रूप्यकी एक मोती । तरी प्रत्येक रत्नाचे मूल्य किती ।
या प्रश्नाचे उत्तर देती । गणिती जाणा पंडित ते ।।१०॥
सुगम आहे कुट्टक । उत्तर येई मौखिक ।
अल्प स्वल्प आंकिक-। मोड करिता दोष नये ॥११॥
असो जया जे भावे । तेणे तैसे सोडवावे ।
उत्तर व्यनिने धाडावे । ऐसे विनवी यनावाला ॥१२॥
मूळ स्रोत लीलावती । आचार्य भास्करांची कृती ।
'रत्नमूल्य' यथामती । मायबोलीं निरोपिली ॥१३॥

दुवे:
Comments
अतिशय सुरेख मायबोलीकरण! शब्द नाहीत!!
वालावलकरशेठ,
असो जया जे भावे । तेणे तैसे सोडवावे ।
उत्तर व्यनिने धाडावे । ऐसे विनवी यनावाला ॥१२॥
मूळ स्रोत लीलावती । आचार्य भास्करांची कृती ।
'रत्नमूल्य' यथामती । मायबोलीं निरोपिली ॥१३॥
क्या बात है! क्या बात है!....
मूळ लीलावतीतल्या श्लोकाचे आपण अतिशय सुरेख 'मायबोलीकरण' केले आहे याबद्दल सर्वप्रथम मला आपल्याला भरभरून दाद देऊ देत!
कोडं राहीलं दूर, मी तर त्या ओळी वाचूनच अक्षरशः सुखावून गेलो. अत्यंत सात्विक, आणि उच्च दर्जाच्या पंक्ति वाचल्याचे आज बर्याच दिवसांनी समाधान मिळाले!
'जियो..!'
एवढीच अगदी मनापासूनची दाद देऊ इच्छितो!
आपला,
(भारावलेला!) तात्या.
रत्नमूल्य
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. तात्या यांसी,
सप्रेम नमस्कार. तुमचे मन:पूर्वक आभार. तुम्ही दाद दिली यांत सर्व काही आले.कोड्याचा सन्मानच झाला.
लीलावतीतील मूळ कोडे असे आहे:
सद्वज्राणि च पंच रत्नवणिजामेषां चतुर्णां धनम् ।
संगस्नेहवशेन ते निजधनात् दत्वैकमेकमित:।
जातास्तुल्यधना पृथग्वद सखे तद्रत्नमूल्यानि मे।
याचे गद्य रूपांतरित कोडे मागे 'सकाळ' मधे छापून आले होते.तेच इथे द्यावे अशा विचारात होतो. त्याच वेळी श्री.युयुत्सु यांचा एक प्रतिसाद वाचला. त्यात अन्य मराठी संस्थळावर कोड्यांचे सदर चालू झाल्याचे लिहिले होते.तसेच माझ्या विषयी विश्वास व्यक्त केला होता. वाचून वाटले काहीतरी वेगळे लिहायला हवे. मूळ कोडे पद्यात आहे. आपण तसे लिहिले तर? असा विचार आला. संस्कृत रचना शार्दूलविक्रीडित वृत्तातली. अशी गणवृत्त रचना अवघडच.ओवी छंदात ऐसपैस लिहिता येईल .असा विचार करून बारा ओव्यांचा फापट पसारा लिहिला. पद्यात लिहिण्यास श्री.युयुत्सु यांचा प्रतिसाद प्रेरणाभूत ठरला एवढे निश्चित.
आपला,
........यनावाला
छान
तात्यांशी पूर्णपणे सहमत.
राधिका
अभिनंदन
उपक्रमावर सुंदर कविता (आणि सुंदर कोडे) प्रसिध्द केल्याबद्दल.
मस्तच.
वाह्!!!
क्या बात है!!!!
पल्लवी
पद्य
यनावालांची ही स्वरचित कविता देखिल ध्येय धोरणांना फाट्यावर बसवून मुखपपृष्ठावर 'इतर वाचनीय' सदरात झळकणार का?
वाखाणणी
आपली काळंबेरं शोधण्याची कला वाखाणण्याजोगी आहे :)
थक्क!!
यनावालांची प्रतिभा भव्य|रचिले ऐसे सुंदर काव्य||
नाही शब्दांचा सव्यापसव्य | थक्क आम्ही जाहलो||
शुद्धलेखनाचे सर्व नियम पाळूनही उत्कृष्ट लिहिणे कसे शक्य आहे याची अनुभूती यनावालासाहेब नेहमीच देत असतात.
(नतमस्तक) शुद्धलेखित लघुसर्किट
तर्क.२७: मुद्रणदोष
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या लेखनातील पुढील दोष नजरेला आले आहेत :
*ओवी २--ददाति प्रतिग्रह्णाति...ऐवजी.... ददाति प्रतिगृह्णाति हवे.
* ओवी ११--दोष नये....ऐवजी.... दोष न ये | असे हवे.
तर्क.२७: उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सर्वश्री.एकलव्य, युयुत्सु,अमित, तो आणि विसुनाना यांनी उत्तरे पाठविली आहेत ती सर्व बरोबर आहेतच.बहुतेकांनी रीतही लिहिली आहे. श्री.विसुनाना आणि श्री.एकलव्य यांवी उत्तरे ओवीबद्ध आहेत.
आवडाबाई आणि अदिति यांनी पठविलेली उत्तरेही अचूक आहेत. सर्वांनी पद्य रचना आवडल्याचे कळविले आहे.
श्री. गुंडोपंत आणि श्री. तात्या यांनी उत्तरे धाडली नाहीत. मात्र त्यांनी पद्यरचना आवडल्याचे आवर्जून कळविले आहे.
या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
........यनावाला.
शीघ्रकाव्य...(!?)
अर्थातच विसुनाना आणि एकलव्य ह्यांची परवानगी असेल तरच.
परवानगी कसली द्यायची आहे त्यात. काय करायचे ते खुशाल करा.
एकलव्याच्या स्वैर ओळी ओवीबद्ध या विशेषणाला पात्र नाहीत. ... ल ला ल आणि म ला म अशी जुळवाजुळव करून काही ओळी घाईघाईत खरडल्या आहेत. गुरू(यनावाला)प्रतिमा समोर ठेवून केलेला एक प्रयोग इतकेच.
परवानगी? हे आपलं...
परवानगी? हे आपलं काहीतरीच! युयुत्सु, त्यात कसली परवानगी आणि फिरवानगी?
यनावालांच्या अप्रतिम पद्य कोड्याला दिलेली मोडकीतोडकी दाद आहे ती.
ते 'ज्योतीने तेजाची'... वगैरे.. तसं!
उत्कृष्ट
श्रीमान यनावाला, आपले काव्यात्मक कोडे फारच आवडले. गणित, व्याकरण आणि काव्य अशी बहुमुखी आपली प्रतिभा आहे. इतरही पैलू निश्चितच असणार तेही आम्हाला पाहायला मिळोत.
आपला
(चाहता) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
तर्कक्रीडा २७:रत्नमूल्य :उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चौघे तुल्यधन झाल्यावर प्रत्येकाच्या रत्नांतून (१ माणिक,१ नील, १ मोती ,१ हिरा) एवढी रत्नॆ वजा केली तरी ते तुल्यधनच राहातील.यावरून:
४ माणके = ६ इंद्रनील = ९६ मोती = १ हिरा =९६०० रु.
.............................................................
श्री. विसुनाना यांचे ओवीबद्ध उत्तर पुढील प्रमाणे:
प्रेषक: विसुनाना
प्रति: यनावाला
विषय: रत्नमूल्य ऐसे असे
दिनांक: सोम, 06/18/2007 - 12:13
शहाण्णवशे (९६००) पडती हिर्यास| नीळ सोळाशेस (१६००) घ्यावा||
धन्यवाद यनावालांस| तर्कक्रीडा गमते मनास||
घ्यावा लागे थोडाच त्रास| रत्नमूल्य ऐसे असे ||
तर्क. २७:रत्नमूल्य
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.एकलव्य यांचे उत्तर :
धनिक अति प्रेमळ नि सरल
चौघांनी दिले एकैक रत्न "उपक्रमा"ला
तुल्यधन मित्रजन न सोडिती तरी बरोबरीला
माणिक राजा (८-४) चार माणकांचा
मोती मालक (१००-४) शहाण्णव कुळींचा
नील घेतसे आस्वाद (१०-४) षड्रसांचा
(५-४) एकमेवाद्वितीय हिरा असे तो लालचा
एकलव्याने सोडवाढविला कीका हो गुंता
चतुर उपक्रमीजन म्हणती पुरे पुरे आता
पुन्हा एकदा गंमत...
धन्यवाद यनावाला! आपल्याला पाठविलेले रंगीबेरंगी उत्तर तळटीपेसह पुन्हा देतो आहे.
माणिक, मोती, नील, हिरालाल
धनिक अति प्रेमळ नि सरल
चौघांनी दिले एकैक रत्न "उपक्रमा"ला
तुल्यधन मित्रजन न सोडिती तरी बरोबरीला
माणिक राजा (८-४) चार माणकांचा
मोती मालक (१००-४) शहाण्णव कुळींचा
नील घेतसे आस्वाद (१०-४) षड्रसांचा
(५-४) एकमेवाद्वितीय हिरा असे तो लालचा
एकलव्याने सोडवाढविला कीका हो गुंता
चतुर उपक्रमीजन म्हणती पुरे पुरे आता
यनावालार्पणमस्तु
कविता की कोडी !
यनावालासेठ आपली कविता वाचून गेलो,पण उपक्रमी म्हणतात हे कोडे आहे ! कविता ही कधी कोडे असते का ! याच विचारात फसलेला !
एक उपक्रमी.
कोडे
हे कोडेच आहे. कवितेच्या स्वरूपामध्ये आहे एवढेच. शिवाय् कवितचुत्तम केलेली आहे. नाहीतर बरेच वेळेला एखाद्या रचनेला कविता तरी का म्हणावे हेच कोडे पडते ;)