अश्लिलतेच्या संकल्पना

र.धों.कर्वे यांनी जेव्हा संतती नियमनाचा प्रचार केला तेव्हा अश्लिल अश्लिल् म्हणून ओरडणार्‍या सदाशिवपेठी संस्कृतीरक्षकांनी ओरड केली होती. या कर्व्याला म्हतारचळ लागला आहे.बायका शिकल्या तर त्या चावट पत्रे नवर्‍याला लिहितील अशी भीती संस्कृतीरक्षकांना होती. शृंगारिक व अश्लिल यात नेमका फरक् काय? यात सापेक्षता किती? या अश्लिलतेचा इतिहास काय? जगाला अनंगरंग रतिशास्त्र, कामशास्त्र असे ग्रंथ पुरवणार्‍या भारतात अश्लिलतेबद्द्ल ओरड व्हावी? पूर्वजांविषयी वृथा अभिमान बाळगणार्‍या तथाकथित संस्कृतीरक्षकांना इतिहासाचार्य वि.का.राजवाड्यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास व त्यातील् संदर्भ वाचायला दिले तर बोलतीच बंद होईल. अनुभव मासिकाच्या या अंकात निरंजन घाट्यांचा अश्लिलतेचे पूर्वसूर.. हा लेख इथे वाचा.

लेखनविषय: दुवे:

Comments

अधिक लिहा

पूर्वजांविषयी वृथा अभिमान बाळगणार्‍या तथाकथित संस्कृतीरक्षकांना इतिहासाचार्य वि.का.राजवाड्यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास व त्यातील् संदर्भ वाचायला दिले तर बोलतीच बंद होईल.

घाटपांडे काका, याबद्दल अधिक माहिती येथे लिहाल का? उत्सुकता वाटली.

मूळ लेख

याबद्दल अधिक माहिती येथे लिहाल का? उत्सुकता वाटली.

लिंकवरील मूळ लेखात राजवाड्यांच्या पुस्तकातील काही संदर्भ उधृत आहेत.

प्रकाश घाटपांडे

निरंजन घाटे

निरंजन घाटे यांचा लेख अतिशय आवडला. "पूर्व"जांनी गाठलेली सभ्यता लोप पावली आहे हा संस्कृतीरक्षकांचा दावा वेगळ्या अर्थाने मनोमन पटला.

श्री प्रकाश घाटपांडे - आपण हा लेख आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल आणि विषय मर्यादेमध्ये येथे मांडल्याबद्दल आपले आभार!

(पूर्वसूरींतील) एकलव्य

अभिनंदन..!

घाटपांडेसाहेब,

आपलं हार्दिक अभिनंदन! आपण फार चांगला विषय चर्चेला आणला आहे. निरंजन घाट्यांचा लेख वाचला. अतिशय सुरेख आणि अभ्यासपूर्ण लेख आहे!

'सभ्य'तेच्या आणि सोकॉल्ड 'सुसंस्कृत'पणाच्या बेगडी व्याख्यांना त्यांनी धडाध्धड सुरुंग लावलेले पाहून आनंद वाटला! खणखणीत शिवी देणार्‍या एका खेडूत स्त्रीला अत्रेसाहेबांनी १०० रुपयांची नोट बक्षिस दिली यातून अत्रेसाहेबांची भाषेबद्दलची खरी तळमळ मला जाणवली. अन्यथा, 'मराठी भाषेचं काय होणार?' असे फुकाचे गळे काढणारेच अनेकजण असतात! ;)

माझ्यापुरतं बोलायचं झालं तर 'केवळ कुठे चान्स(!) मिळत नाही' म्हणूनच सभ्यतेचे आणि सुसंकृतपणाचे बुरखे पांघरणारी आणि पर्यायाने 'शीलाश्लीलतेच्या फुकाच्या गोष्टी करणारी अनेक सभ्य(!) मंडळी माझ्या पाहण्यात आहेत!

अरे हम तो उन गलियोसे कई बार गुजरे है जहा असल 'अश्लीलता' बिना कोई नकाब पेहेने हुए भरेबाजार नंगी घुमती है! ;)

असो! हा विषय इथे मांडल्याबद्दल आपले आणि निरंजन घाटेसाहेबांचे शतरः आभार!

अवांतर -

मजकूर संपादित. इतर सदस्यांवर व्यक्तिगत स्वरूपाची टीकाटिप्पणी करू नये.

आपला,
(असभ्य!) तात्या.

निरंजन घाटे

निरंजन घाटे हे माझे शाळेतले (पेरूगेट भावेस्कूल) सहाध्यायी होते. त्यांचा ईमेल पत्ता कोणी देऊ शकेल का? म्हणजे ५० वर्षांनी पुन्हा भेट होईल.
कलोअ,
सुभाष

घाट्यांचा लेख आवडला

या लेखाचा दुवा येथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे.

संस्कृतीचे संदर्भ कालानुपरत्वे बदलत असतात असे वाटते. यांस ज्या अनेक बाबी कारणीभूत आहेत त्यात एक महत्त्वाचे कारण आहे सुबत्ता. जेथे खर्‍या अर्थाने कायम सुबत्ता नांदते तेथे अशा संस्कृती रक्षणाची गरज पडत नाही. भारतात ही सुबत्ता नष्ट होण्यास ज्या अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या त्यात मुसलमानी स्वार्‍या हे एक महत्त्वाचे कारण असावे. जेव्हा बायका राजरोस पळवून त्यांना बटीक करणे, बलात्कार करणे आणि ते करण्यात शत्रूचा सर्वोच्च अपमान आहे अशी धारणा रुजू झाल्यावर हळू हळू अशा संकल्पनांना खतपाणी मिळू लागले असावे.

घाट्यांचा लेख थोडा वरवर वाचला, सवडीने सावकाश वाचून याबाबत बोलता येईल. लोपामुद्रेचे उदाहरण वाचून म्हणावेसे वाटते की संस्कृतीच्या नावाने गळे काढणार्‍यांनी रामायणातील अहल्या आणि देवाधिदेव इंद्र (एक देव आणि एक परस्त्री - ऋषीपत्नी, शंकर-पार्वतीप्रमाणे नवराबायको नाहीत म्हणजे कोणी नवराबायकोच्याच शृंगाराची वर्णने काय ती असणारच असे म्हणायला नको.) वाचावीत. अशी अनेक उदाहरणे पुराणांत, वेदांत आणि महाकाव्यांत आहेत हे खरे आहे.

सुबत्ता आणि संस्कृती

सुबत्तेचा संस्कृतीवर परिणाम होतो हे खरेच पण त्याहीपेक्षा संस्कृतीचा सुबत्तेवर अधिक परिणाम होतो असे वाटते. बंदिस्त विचारसरणी ही विपन्नतेचा परिणाम कमी आणि कारण अधिक असावी.

सहमत

सुबत्तेचा संस्कृतीवर परिणाम होतो हे खरेच पण त्याहीपेक्षा संस्कृतीचा सुबत्तेवर अधिक परिणाम होतो असे वाटते.

हो. दोन्ही बाबी एकमेकांना पूरक आहेत. बरेचदा सुबत्ता आली की संस्कृतीच्या व्याख्या निर्माण केल्या जातात आणि संकटे आली की त्या लादल्या जातात.

सांगण्याचा उद्देश केवळ एवढाच होता की संस्कृती ही काळ्या दगडावरची रेघ नाही. ती अनेक कारणांस्तव बदलत असते. ७० च्या दशकात नीतू सिंग तोकडे स्कर्ट घालत असे किंवा डिंपलचा बॉबी आठवावा....परंतु त्या काळात आणि त्यानंतरच्या काळातही काही सोकॉल्ड उच्चभ्रू वस्ती सोडून असे कपडे राजरोस अंगावर घातलेले दिसत नव्हते/ नाहीत. म्हणजे संस्कृती ही दर २५ मैलांगणिक बदलत असते असे म्हणायलाही हरकत नसावी. ;-) (संख्याशास्त्राचे नगण्या ज्ञान प्रदर्शित केल्याबद्दल माफी मागते. :) )

येथे संस्कृतीचा संदर्भ काळाबरोबरच स्थळानुपरत्वे बदलतो.

अवांतर..

७० च्या दशकात नीतू सिंग तोकडे स्कर्ट घालत असे किंवा डिंपलचा बॉबी आठवावा....

वा! नितू सिंग बाकी त्या तोकड्या स्कर्टमध्ये लई भारीच दिसायची हो! आपण तर साला पाहूनच खल्लास झालो!

असो, विषयांरताबद्दल क्षमस्व!

नाहीतर उपक्रमाकडून, 'कृपया मूळ चर्चेच्या अनुषंगानेच प्रतिसाद द्यावेत आणि चर्चा भरकटवू नये!' असा सभ्य, सुसंकृत भाषेतला मेसेज यायचा! ;)

आपला,
(लेगाझब्ब्यातला!) तात्या.

गोंधळ! ;)

नुकतेच आम्ही आमचे 'धुरंधर भटावडेकर' हे नांव बदलून त्याऐवजी 'असभ्य आणि शिवराळ' हे नांव घ्यायचा प्रयत्न केला तर आम्हाला उपक्रमाकडून,

The username contains an illegal character.

हा निरोप वाचावयास मिळाला!

अनायसे चर्चेचा विषयदेखील 'अश्लीलतेच्या संकल्पना' हाच आहे त्याला अनुसरून माझ्या मनात खालील प्रश्न आला -

'असभ्य आणि शिवराळ' यापैकी कोणता शब्द उपक्रमाला इल्लिगल आणि पर्यायाने अश्लील वाटला असावा? ;))

मग आम्ही एक वेगळीच गंमत करायचे ठरवले. आम्ही 'असभ्य आणि शिवराळ' या नावापैकी नुसतेच 'असभ्य' हे नांव घेऊन पाहिले ते मात्र स्विकारले गेले! ;) आता बोला...

म्हणजे 'असभ्य' हे नांव चालते, पण 'शिवराळ' हे नांव चालत नाही! का बुवा? ;)

बहुधा 'शिवराळ' हे नांव 'सभ्यतेच्या', 'सुसंस्कृतपणाच्या', आणि 'श्लीलाश्लीलते'च्या सुसंस्कृत (!)वरवंट्याखाली आले असावे! ;)

असो, उपक्रमाचा 'श्लीलाश्लीलतेबद्दलचा' गोंधळ पाहून गंमत वाटली! ;))

आपला,
असभ्य आणि शिवराळ!

घाटपांडे साहेब, आता बोला! ;)

जगाला अनंगरंग रतिशास्त्र, कामशास्त्र असे ग्रंथ पुरवणार्‍या भारतात अश्लिलतेबद्द्ल ओरड व्हावी?

अहो भारताची बात सोडा! तो खूप दूर राहिला! अहो आपल्या उपक्रमाला 'तात्या' आणि 'नाडगौडा' या दोन नांवात काय बरे इल्लिगल आणि पर्यायाने अश्लील वाटले असेल हे सांगा पाहू! ;)

नुकतेच आम्ही आमचे 'असभ्य' हे टोपणनांव बदलण्याचे ठरवून 'तात्या नाडगौडा' हे नांव घ्यायचे ठरवले तर त्यालाही चक्क नकार आला! विश्वास नाही बसत? हा घ्या पुरावा! ;)

तात्या!!!!!

अहो तात्या - "!" नाकारले जात आहे. समजून घ्या!!

प.पू. तात्याबा महाराज

असे शब्द गाळले जावेत किंवा त्यावर् "आबजेसक्शण" यावं इतपत उपक्रमाची प्रगती अद्याप झाली नसावी. भविष्यात तशी ती करणे ही त्याच्या चालकांच्या मर्जीची बाब आहे.

आपल्या नावांत उद्गारवाचक चिन्ह (!) घोळ करून गेलं असं वाटतं. ओळख बनवताना संगणक प्रणाली काही चिन्हांना अव्हेरते तेव्हा पुन्हा प्रयत्न करा.

जमलं बरं का! ;)

हे नांव accept केल्याबद्दल आम्ही उपक्रमाचे आभार मानतो! ;)

कृपया चर्चा पुढे चालू द्यावी ही विनंती!

आपला,
तात्या नाडगौडा!

वा

घाटपांडे साहेब,
आपण फार चांगला दुवा दिला आहे आणि चांगला विषय चर्चेला घेतला आहे.

आज काय केल्याने त्याचा पुढे काय परिणाम होईल? आपण आज जे करुत आहोत ते त्याला पूरक आहे का? याची उत्तरे हाताच्या बोटावर मोजता येण्या इतकेच लोक देवू शकतात असे वाटते.

'समाज स्वास्थ्यासाठी हे प्रकार अनुचित आहेत असे अम्हास वाटते म्हणून आम्ही विरोध करतो' हे म्हणणेच बरे :)

--लिखाळ.

परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करावे असे मला वाटते.

तटबंद्या

सुरेख लेख आहे. आपणच उभारलेल्या तटबंद्यांचा हा परिणाम आहे. आपले तथाकथित संस्कृतीरक्षक खजुराहो आणि कामसूत्र यांचा विषय निघाला की चिडीचूप होतात. आपल्य शाळांमधून लैंगिक शिक्षण दिले जात नाही. पालक मुलांशी याबद्दल बोलणे टाळतात.
या विषयावर चर्चा झालीच तर ती पांचट विनोदांमार्फत होते कारण या विषयाकडे गंभीरपणे बघणे आपल्याला माहित नाही.
आणि मग एखाद्या शिल्पा शेट्टीसारखे काही झाले की लगेच आपले संस्कृतीरक्षक जागे होतात. आपली 'संस्कृती' भ्रष्ट होते.
कामभावना ही इतर भावनांसारखीच नैसर्गिक भावना आहे. तिलाही चांगले आणि वाईट पैलू आहेत. आपण तिच्याकडे दुटप्पीपणाने बघणे सोडले तरच काही प्रगती शक्य आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

लेख

निरंजन यांच्या लेखात संदर्भ पुष्कळ दिले आहेत. पण थेट शब्द, वाक्ये उद्धृत करण्याचे टाळले आहे असे वाटले. ज्यांना हे सारे अभ्यासावे वाटते, त्यांना पूर्वसूरींचे वागणे थोडे माहित असते, ते मुळातच पुरोगामी (!) विचाराचे असतात. खरे लोक जे जाळपोळ करायला पुढे असतात ते स्वतःहून संदर्भात दिलेली पुस्तके वाचतील का?
थेट शब्दात आपल्या पुराणात असे असे लिहिले आहे; या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा असा हे लिहायला हवे आहे. त्यातून काही प्रबोधन होईल. नुसते आमच्या पुराणात अश्लील उल्लेख आहेत, जागतिक प्राचीन वाङ्मयात खुलेपणाने लैंगिक विषयावर लिहिले जाते किंवा या विषयांवरची मान्यवरांची पुस्तके हातोहात खपली असे वरवरचे लिहून भागणार नाही असे वाटते.

मला वाटतं

ज्यांना हे सारे अभ्यासावे वाटते, त्यांना पूर्वसूरींचे वागणे थोडे माहित असते, ते मुळातच पुरोगामी (!) विचाराचे असतात. खरे लोक जे जाळपोळ करायला पुढे असतात ते स्वतःहून संदर्भात दिलेली पुस्तके वाचतील का?

नाही, ते लोक वाचणार नाहीत आणि वाचले तरी तसे संदर्भ काढून टाकून नवी सुधारीत प्रत प्रकाशित करतील. ;-) धर्माच्या, संस्कृतीच्या नावावर जाळपोळ करायला जे रस्त्यावर उतरतात त्यामागे त्यांची विचारसरणी आणि हेतू निराळेच असतात असे वाटते. काही सूत्रांचा बाऊ करून आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याची संधी असे संदर्भ वाचून ते घालवणार नाहीत.

थेट शब्दात आपल्या पुराणात असे असे लिहिले आहे; या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा असा हे लिहायला हवे आहे.

तसे करणे म्हणजे ज्या मासिक/ अंक/ साप्ताहिक वगैरेसाठी सदर लेखकाने लिहिले त्याची अश्लील लिखाण प्रसिद्ध करणारे मासिक/ साप्ताहिक म्हणून जाळपोळ होणे किंवा लेखकाच्या/ संपादकाच्या तोंडाला काळे फासणे. आपण पुरोगामी आहोत असे मुखवटे धारण करणार्‍या अनेकांचे मुखवटे गळून पडलेले दिसतात किंवा पुरोगामी आहोत असा बिल्ला बाळगणारे अनेकजण अशावेळी अज्ञातवासात गेलेले पाहायला मिळतात.

निदान, सुरूवात म्हणून अशा लेखांकडे पाहायला हरकत नाही. त्यातून कोणीतरी सविस्तर लिहिणारे उत्पन्न होतीलच.

जाळपोळ

जाळपोळ करणारे लोक (मग ती कुठल्याही विषयावरून असो), आपली मते तपासून बघायला कधीच तयार नसतात. तेवढी परिपक्वता त्यांच्यात असती तर जाळपोळीची वेळच आली नसती. मला वाटते मुख्य मुद्दा दुटप्पी धोरणाचा आहे. आपली संस्कृती म्हणजे नेमके काय, ती एका नटीच्या वागण्यामुळे बुडण्याइतकी तकलादू असू शकते का यासारख्या गोष्टींचा विचार व्हायला हवा.
अवांतर : श्लोकांचे अर्थ दिले असते तर अनुभव मासिकाने हा लेख छापला असता का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

जबाबदारी आपलीही

दुटप्पीपणावरून असे वाटले की या सर्व प्रकारांत थोडीफार जबाबदारी प्रत्येकाची आहे.

एका नटीच्या वागण्यामुळे बुडण्याइतकी तकलादू असू शकते का यासारख्या गोष्टींचा विचार व्हायला हवा.

तशी ती नसावी परंतु व्यासपीठावरील असे वर्तन एखाद्याला खटकण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याबाबत आवाज उठवणे गैरही नाही परंतु तो राग/ घृणा/ खेद कसा व्यक्त करावा हे शिकणे आणि शिकवणे गरजेचे आहे. जॅनेट जॅकसन आणि जस्टिन टिंबरलेक प्रकरणावेळी अमेरिकेतील आबालवृद्ध सुपरबोव्ल पाहण्यासाठी टिव्हीला चिकटून बसले होते. त्याप्रकारानंतर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या परंतु जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेला हानी पोहचवणे इ. प्रकार झाले नाहीत. (अमेरिकन संस्कृतीतही व्यासपीठावर केलेले असे प्रकार बसत नाहीत.) सीबीएस वाहिनीला (की एबीसी?) आपले प्रक्षेपण काही सेकंदांनी लांबवण्याचा उपक्रम करावा लागला कारण झाल्याप्रकाराची जबाबदारी त्यांचीही होती.

प्रतिक्रिया

एका नटीच्या वागण्यामुळे बुडण्याइतकी तकलादू असू शकते का यासारख्या गोष्टींचा विचार व्हायला हवा.

तशी ती नसावी परंतु व्यासपीठावरील असे वर्तन एखाद्याला खटकण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याबाबत आवाज उठवणे गैरही नाही परंतु तो राग/ घृणा/ खेद कसा व्यक्त करावा हे शिकणे आणि शिकवणे गरजेचे आहे.

अगदी खरे आहे. मी ही चित्रफित पाहिली. फार लक्ष द्यावे असे काहीही नाही, पण एकूण हालचाली किळसवाण्या वाटल्या. तश्या त्या वाटल्या म्हणजे लगेच "प्रतिगामी" असा बोल कोणी लावणार असेल तरीही त्याचे/तिचे तोंड धरायला जाण्याचा तडफडाट करावासा वाटत नाही.

तडजोड

अवांतर : श्लोकांचे अर्थ दिले असते तर अनुभव मासिकाने हा लेख छापला असता का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

कदाचित नसता छापला. समाजात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी काही मनाविरुद्ध् गोष्टी कराव्या लागतात. त्यालाच आपण तडजोड म्हण्तो. survival is truth. आपलं अस्तित्व राहिलं तर आपले विचार लोकांपर्यंत पोहोचणार् आहेत. तेव्हा तत्वचुती म्हणून हिणवणे, बरोबर ठरणार नाही. आजचा सुधारक या नागपुरहून प्रकाशित होणार्‍या व विवेकवादी विचाराला वाहून घेतलेल्या मासिकात नागरिकरण विशेषांकात एक आटपाट नगर या झोपडपट्टिवरिल लेखात (लेखिका-बहुतेक सुलक्षणा महाजन) बोली भाषेतील अश्लिल समजली जाणारि उपमा जशिच्या तशी वापरली आहे . बायको माहेरी गेल्यामुळे जी लैंगिक उपासमार होते त्या बद्द्लची ती उपमा आहे.(पण सुधारक माहित असणारे किती? त्यातून वाचणारे किती?
प्रकाश घाटपांडे

अश्लील कशाला म्हणावे?

अश्लीलतेची सर्वमान्य व्याख्या करणे कठीण आहे. तरीही सर्वसाधारण पणे असे म्हणता येईल की स्त्रीपुरुषांच्या मिश्र समुदायांत जे वाचतांना, बोलतांना व बघतांना स्त्रियांना संकोचल्यासारखे होते ते अश्लील.

पुरुषांना संकोच नसतो?

स्त्रीपुरुषांच्या मिश्र समुदायांत जे वाचतांना, बोलतांना व बघतांना स्त्रियांना संकोचल्यासारखे होते ते अश्लील.

का बरे? पुरुषांना संकोच नसतो की काय?

अगदी

पुरुषांना संकोच नसतो की काय?

संकोच

आमच्या पोलिस खात्यातील काही स्त्रिया पुरुषांशी बोलताना सुद्धा अशा काही लैंगिक शब्दांचा वापर करतात कि पुरुषांना सुद्धा संकोचल्यासारखे वाटते याचा अनुभव मी घेतला आहे.
प्रकाश घाटपांडे

पोलिस खात्यात का?

पोलिसी खात्यातील स्त्रियांचा समाजातील अनेक घटकांशी संबंध येत असेल त्यामुळे त्यांची शब्दसंपत्ती/ अनुभव वाढत असेल असे समजू परंतु,

अगदी चकचकीत कार्यालयात बसून, चकचकीत चेहर्‍याने आणि तेवढ्याच चकचकित भाषेत काही स्त्रिया अशा शब्दांचा असा काही वापर करतात की समोरचे बाई पुरूष दोघेही संकोचून गेले पाहिजेत, त्यामुळे जर कोणी आत्ताच्या काळात स्त्रिया संकोचतात आणि पुरूष संकोचत नाहीत असे म्हटले तर मला फारसे पटत नाहीत.

संकोच

मला तर इथे प्रतिसाद देतानाही संकोच वाटतो.

अभिजित

सहमत

सहमत आहे. इथे तिथली ही कविता आठवली. :)
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

पुरुषांचा संकोच

पुरुषांना संकोच नसतो की काय?

असतो. पण पुरुषांचा संकोच स्त्रियांच्या संकोचाइतका स्पष्टपणे दिसून येत नाही.
सर्वसाधारणपणे कोणत्याही सभ्य व सुसंस्कृत पुरुषाला आजूबाजूला स्त्रिया असतांना एकांतातल्या गोष्टींची चर्चा वा त्यासंबंधातील विनोद आवडत नाही. पण काही पुरुषांना तसे करण्यांत स्त्रियांना embarass केल्याचा विकृत आनंद मिळतो. म्हणून माझ्या व्याख्येत मी पुरुषांचा अंतर्भाव केला नाही.

अश्लीलतेची व्याख्या

अशी असावी असे मला वाटते, आणि स्त्री-पुरूष यांची त्यात सारखी जबाबदारी/ सहभाग असावा आणि ही व्याख्या समाजसापेक्ष असते असे वाटते.

जे शब्द, चित्रे, वर्तन किंवा असे संदर्भ ज्यांत लैंगिक आणि स्त्रीपुरूष संबंधांवर केलेली टीका-टिप्पणी इतरांना किंवा एखाद्या समाजाला घृणास्पद, खेदजनक किंवा अमंगळ वाटण्याची शक्यता आहे त्याला अश्लील असे म्हटले जावे.

ही व्याख्या बरोबर असेलच असे नाही, ज्यांना त्यात सुधारणा सुचते त्यांनी ती सुचवावी. निश्चित करता आली तर मी ती विकिपीडियावर टाकेन असे म्हणते. ;-)

रेटींग

अमेरिकेत चित्रपटांसाठी पीजी वगैरे रेटींग असते, त्यावरून काहीतरी संदर्भ मिळू शकेल असे वाटते.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

संदिग्धता

अश्लीलतची कायदेनुसार व्याख्या धूसर आहे.

सहमत. अशाच एका खटल्यात घरी आलेल्या केबल ऑपरेटरने आपल्याशी अश्लील भाष्य करून विनयभंग केल्याची तक्रार एका १३ वर्षाच्या मुलीने केल्याने त्या के.ऑ.ला तुरूंगाची हवा खावी लागली होती. बाहेर आल्यावर त्याने या मुलीवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. यावर जजचे म्हणणे असे की, "मला संभाषण अश्लील वाटले नाही, त्यामुळे के.ऑ.चा तसा हेतू नसावा असे मला वाटते परंतु १३ वर्षाच्या मुलीला ते अश्लील वाटले नसेल असे म्हणता येणार नाही. तिच्या श्लील/ अश्लीलतेच्या कल्पना प्रौढ मनुष्यापेक्षा वेगळ्या असणे शक्य आहे. " या कारणावर हा खटला काढून टाकला गेला.

तेव्हा, एखाद्याशी संभाषण करताना शब्द योजून वापरणे उत्तम.

खो खो खो

बघा धोंडोपंत, आता समोर दिसतायेत ना त्याच्यातली मुलगी कोणती आणि मुलगा कोणता कळत नाही ना.
मग काय करायचं, त्यांच्याजवळ जाऊन कोणतातरी घाणेरडा विनोद करायचा.
दोघांपैकी जो लाजेल ना तो मुलगा. - असा मी असामी

शॉर्ट सर्किट....

.... अगदी समयसूचक आहात बरं का! असामींचा दाखला अगदी चपखल आहे!!

दादा कोंडके

दादा कोंडके यांचे चित्रपट व गाणी हे द्वयर्थी असल्याने आरोप व अश्लिलतेच्या आरोपातून सुटका होई. ग्रामिण जनतेला आपलेसे वाटणारे दादांचे चित्रपट होते. एकट जीव सदाशिव,राम राम गंगाराम,पांडू हवालदार हे विषेश गाजले.
प्रकाश घाटपांडे

लेख आणि मत

लेख वाचला. स्पष्ट सांगायच तर ठिक होता. त्यात काही लाजवाब मते मांडली आहेत असे अजिबात वाटले नाही. पण इथले प्रतिसाद वाचुन अनेक प्रश्न मात्र डोक्यात आले.
काही मुद्दे:
१. लेख स्वतःची पुरोगामी मते मांडण्यासाठी लिहिला आहे असे वरकरणी वाटते. खास करून स्वतःला संस्कृती रक्षक म्हणवणार्‍यांवर टिका करण्यासाठी लिहिल्यासारखा वाटतो. मुळ मुद्दा कुठेच दिसत नाही.
२. लेखावर चित्रे आहेत ती खजुराहोची लेणी आणि वादग्रस्त चुंबन दृष्याची. तसे चुंबन सामन्य जोडप्याचे दिले असते तरी चालले असते. उगाचच प्रसिद्धीसाठी लिहिलेला लेख वाटतो.

चर्चा, मुद्दे आणि प्रश्न:
१. अश्लीलतेच्या संकल्पने पेक्षा सामाजिक सभ्यतेच्या मर्यादा हे जास्त योग्य वाटले असते. जे एका जोडप्यामध्ये आहे ते समाजात आले तर ते असभ्य ठरते कि, अश्लील कि असंस्कृत?
२. एकाने संस्कृती रक्षकाची पोकळ डरकाळी फोडली कि उरलेले ती डरकाळी कशी पोकळ आहे ते सांगायला पुढे येतात पण जाउन सर्वां समोर एका ओळखीच्या वा अनोळखी घोळल्यात आपल्या जोडीदाराचे चुंबन घ्यायला पुढे येत नाहीत. तिथे मात्र हे दोघे सुद्धा गप्प.
३. अश्लीलता तर दुरच, पण नवर्‍याने त्याच्या मैत्रिणीला वा बायकोने तिच्या मित्राला अनेक दिवसांनंतर भेटल्यावर कडकडून मरलेली मिठी पण आपल्याकडे एकमेकांना लिंगपिसाट ठरवणारी असते.
४. भारत एकवेळ मागास म्हणू, पण भरता बाहेर राहणारे खास करून चाळीशीकडे झुकणारे किती विवाहीत खुलेआम डेटिंग करू इच्छितात वा आपल्या भरता बाहेर जन्मलेल्या पाल्यांना त्या संस्कृतीची मोकळीक देतात? मी अनेक पालक असे पाहिले आहेत कि पाल्यांना तिथेल्या लैंगिक विचारांचा विचार करायची कुवत येण्याआधिच भारतात परत येतात. परत येण्याचे प्रत्येकाचे कारण मात्र एकदम गुळमुळीत असते.
५. संस्कृती रक्षक म्हणवून घेणारे तसेच त्यांच्या विरूद्ध बोंब मारणारे हे राजकिय स्टंट शिवाय दुसरे काय करतात?

हा विषय लोकांना चर्चा करायला नक्किच आवडतो कारण आज श्लील-अश्लील, सभ्य-असभ्य इत्यादी विषय निदान मोकळेपणाने बोलायची समाजाची मानसिकता तयार झाली आहे. आठवून पहा. आपले आजी आजोबा, त्यांच्या तारुण्यात एक मेकांचे हात सर्वांसमक्ष पकडायला पण लाजयचे. काळानुरूप गोष्टी बदलत जातात. प्रत्येकजण स्वार्थी विचार करूनच अर्थ काढतो.

पुरुषांचा संकोचः मला वाटत कि एड्स बद्दलच्या जाहिराती, काही चित्रपटातली कंडोम विकत घ्यायची दृष्ये बरेच काही बोलुन जातात.





मराठीत लिहा. वापरा.

नाही पण ...

मी सहमत नाही... पण ... लिहिण्यासारखे बरेच आहे. या अश्या चर्चांना अंत नाही...





मराठीत लिहा. वापरा.

मान्य!

या अश्या चर्चांना अंत नाही...

हा मुद्दा मागेच आम्ही मांडला आहे... ;)
आपला
गुंडोपंत

 
^ वर