तर्कक्रीडा;२६:दोन कोडी(कृ. उत्तर व्यनिने)
(|) आंतरजातीय विवाह
भारतातील एका राज्यात गतवर्षी झालेल्या नोंदणींवरून असे दिसते की त्या राज्यातील स्त्रियांच्या संख्येतील १.८७ %स्त्रियांनी आंतरजातीय विवाह केले तर १.५३% पुरुषांनी आंतरजातीय विवाह केले. प्रत्येक विवाह 'एक वर एक वधू' असाच झाला. विवाह आंतरजातीय असले तरी आंतर राज्यीय नव्हते.प्रत्येक आंतरजातीय विवाहांची नोंद झालीच.
तर त्या राज्यात दर हजारी लोकसंख्येत स्त्रियांची संख्या किती?
...............................................................................
(||)पाच अंकी संख्या
'स' ही एक पाच अंकी संख्या आहे. (पॉझिटिव्ह इंटीजर)'स' च्या आरंभी (दशसहस्रकांकाच्या डाव्या बाजूला) १ हा अंक घालून 'म' ही सहा अंकी संख्या लिहिली.
तसेच 'स' च्या शेवटी(एककांकाच्या उजव्या बाजूला) १ हा अंक घालून 'न' ही सहा अंकी संख्या लिहिली.
'न' ही संख्या 'म' च्या तिप्पट आहे.
तर 'स' ही पाच अंकी संख्या कोणती?
Comments
तर्क.२६:उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सर्वश्री. क्लिन्टन,सूर्य,युयुत्सु,आणि एकलव्य यांची उत्तरे त्वरित आली.सर्व उत्तरे बरोबर आहेत हे सांगणे नलगे.मात्र रीत कोणी लिहिली नाही. एक हजार लोकसंख्येत स्त्रिया किती? असे विचारले आहे. श्री.क्लिंटन यांनी एक हजार पुरुषांशी स्त्रियांचे प्रमाण दिले आहे. ते जवळ जवळ बरोबर आहे.
धन्यवाद
यनावाला - ही आणि अशी कोडी येथे मांडल्याबद्दल धन्यवाद!
मात्र रीत कोणी लिहिली नाही.
मी उत्तरे कशी आली त्याचाही भेद व्यनितून केला होता असे वाटते. त्यापलिकडे जाऊन अगदी पायरीपायरीने रीत लिहिण्याची आवश्यकता राहू नये.
(मर्मभेदी) एकलव्य
वालावलकरशेठ,
पहिल्या कोड्याचं उत्तर व्य नि ने पाठवलं आहे. दुसरे कोडे मला येत नाही! ;)
तात्या.
तर्क.२६.उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
वरदा यांनी पाच अंकी संख्या अचूक शोधली. त्यांची रीतही अगदी योग्य आहे. संख्या आणि अंकांच्या स्थनिक किंमती या विषयींच्या संकल्पना स्पष्ट असल्यास असे सोपे समीकरण मांडता येते.
श्री.तात्या यांनी दर हजारी स्त्रियांची संख्या बरोबर काढली आहे. त्यासाठी बीजगणिती रीत वापरून योग्य मांडणी केली आहे.त्यावरून त्यांचे गणित विषयक ज्ञान चांगलेच आहे हे प्रत्ययास येते.
........यनावाला
तर्क.२६:....आणखी उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवू वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विसुनाना आणि श्री.अमित कुलकर्णी यांनी दोन्ही कोड्यांची उत्तरे पाठविली आहेत. ती अगदी बरोबर आहेत.
श्री.अमित कुलकर्णी यांनी दोन्ही कोड्यांची उत्तरे रीतीसह दिली आहेत
तर्क.२६ उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आवडाबाई यांनी दोन्ही कोड्यांची उत्तरे रीतीसह पाठविली. ती बरोबर आहेत.
.....यनावाला.
म्रुदुला यांनी वरील प्रमाणेच दोन्ही उत्तरे रीती सह पाठविली आहेत.
.......यनावाला.
तर्कक्रीडा २६:उत्तर्
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
(|) जेवढ्या स्त्रियांचे आंतरजातीय विवाह झाले तेवढ्याच पुरुषांचे आंतरजातीय विवाह झाले असणार. मग स्त्रियांचे % पुरुषांच्या % पेक्षा अधिक कसे? कारण स्त्रियांची एकूण संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कमी. म्हणून संख्यांचे प्रमाण दिलेल्या % च्या व्यस्त प्रमाणात.
म्ह. स्त्रिया : पुरुष =१.५३ : १.८७ (१७ ने भागून) ;
........ ९ : ११ ...बेरीज=२० म्ह........२० लोकसंख्येत ९ स्त्रिया म्ह. १००० लोकसंख्येत ४५० स्त्रिया
(||) लक्ष स्थानी १ हा अंक घातल्यावर त्याची स्थानिक किंमत १०००००.
म्ह. म=(१०००००+स)
तसेच १ एकक स्थानी लिहिल्यावर 'स' ची किंमत १०पट होईल.
म्ह. न=१०(स) +१ आता न ही म च्या तिप्पट.
म्ह. न=३* म .... समीकरण सोडवून;
{४२८५७१=३ गुणिले १४२८५७}.....१४२८५७ ही 'चक्रीय संख्या' म्हणून ओळखली जाते. तिला १ ते ६ या संख्यांनी गुणून पहा म्हणजे चक्रीय का ते समजेल.