हे गाणं ओळखा ...

ह्या मराठी गाण्याची मला फक्त चाल पुसट आटवते आहे ... ओळखता आलं तर सांगा आणि माझी सुटका करा. चाल ठुमरीसारखी आणि एकदम "गरम" आहे. ती नक्कीच एखाद्या लखनवी ठुमरीवरून घेतली असणार. विषय मात्र अगदीच सोज्वळ, चालीला न शोभणारा असा अाहे. म्हणजे कौटुंबिक गंगा-यमुना धर्तीचा. बाकी मला काही आठवत नाही. चाल मिश्र तिलककामोद किंवा तिलकबिहारी म्हणता येईल अशी, ज्वालेसारखी आहे.

तर एवढ्या तुटपुंज्या माहितीवर हे कोणाला ओळखता येतंय का ... ?

लेखनविषय: दुवे:

Comments

वद जाऊ कुणाला शरण!

हे हिराबाई बडोदेकर ह्यांनी गायलेले नाट्यगीत तर नव्हे? सौभद्र(की स्वयंवर) मधले?

नाट्यगीत बहुधा नाही

नाट्यगीत असावं असं वाटत नाही. भाऊ-बहीण किंवा सासू-सून असं काहीतरी अाहे त्या गाण्यात. म्हणजे भावगीत नाहीतर "चित्रगीत" असण्याची शक्यता जास्त. आपल्या सूचनेमागचा विचार मात्र मला समजला, आणि तो अगदी बरोबर अाहे.

वद जाऊ कुणाला शरण ही जोगिया/कालिंगडा प्रकाराची चाल अाहे ना? तशी ही नाही. हीत गमरेसा, ऩीरेसा, प़साऩीरे असे थोडेफार सूर आले आहेत, अाणि ते अतिशय सुंदर आहेत. म्हणून ती तिलककामोद सारखी वाटते. पण शास्त्रशुद्ध रागातली बहुतेक नसावी. अाणखी थोडंतरी अाठवावं असं खूप वाटतं, पण काहीच आठवत नाही. शोभा गुर्टू ह्यांनी गायली असणं शक्य आहे. म्हणजे चालीवरून शक्य वाटतं. शब्दांवरून मात्र अजिबात शक्य वाटत नाही ...

हा हा हा

जन गण मन अधिनायक जय हे ?

वंदेमातरम...?

हा हा हा
सही

हा हा हा

जन गण मन अधिनायक जय हे ?

वंदेमातरम...?

हा हा हा
सही

काय "संतप्त तरूण" वगैरे आहेस की काय? मातृभूमीला सासू म्हणतोयस ते

मला राग कळत नाहीत पण 'राग'येतो.

जगन्नाथजी गाणं कोणत्या रागातले आहे वगैरे तांत्रिक गोष्टी मला समजत नाहीत. ते खातं तात्या सांभाळतात आणि तेच ह्या बाबतीत जास्त प्रकाश टाकू शकतील.
बहीण-भाऊ संबंधांतील गाणी.... १)तुझ्या गळा माझ्या गळा २) वेड्या बहिणीची वेडी ही माया(ओवाळीते भाऊराया)
सासू सुनेवरची गाणी काही आठवत नाहीत.
शोभा गुर्टू ह्यांनी गायलेली काही गीते.... १) बोल कन्हैया का रुसला राधेवरी २) उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या ३)पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ..... अशी अजून बरीच आहेत.
गाण्यातले एक दोन शब्द जरी आठवत असतील तर सांगा. त्यावरून गाणं ओळखण्याचा प्रयत्न करता येईल पण ते रागावरून ओळखायचं म्हणजे पीडाच की हो!

शोभा गुर्टू इत्यादि

बहीण-भाऊ संबंधांतील गाणी.... १)तुझ्या गळा माझ्या गळा २) वेड्या बहिणीची वेडी ही माया(ओवाळीते भाऊराया)
सासू सुनेवरची गाणी काही आठवत नाहीत.
शोभा गुर्टू ह्यांनी गायलेली काही गीते.... १) बोल कन्हैया का रुसला राधेवरी २) उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या ३)पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ..... अशी अजून बरीच आहेत.

अरे ही किती वर्षांनी आठवली! शोभा गुर्टूंच्या मराठी गीतांची एखादी सलग CD निघाली आहे का?

गाण्यातले एक दोन शब्द जरी आठवत असतील तर सांगा. त्यावरून गाणं ओळखण्याचा प्रयत्न करता येईल पण ते रागावरून ओळखायचं म्हणजे पीडाच की हो!

तुमची "पीडा" आम्ही "जाणत" नाही ... काय आहे मला चार-पाच बर्षं हे गाणं सतावतं आहे. चालच फक्त आठवतेय आणि ती सुद्धा धडपणे नाही.

जाऊदे. "विहिणबाई" असं काहीतरी असलेलं आठवतंय का? मला वाटतं तो शब्द होता. लग्नाचंच होतं बहुतेक. माझ्या पोरीची काळजी घ्या, असला काहीतरी बावळटपणा होता, मराठी लोकांना आवडणारा. म्हटलं ना, चालीला शोभणारा आशय नव्हता ... म्हणून तो लक्षात राहिला नाही!

प्रति: एक उपाय

चाल गुणगुणून रेकॉर्ड करून त्याची एम पी ३ करून इथे टाका. चार पाच वर्ष सतावणारं गाणं दहा मिनिटात सापडेल.

हे कसं करायचं ह्याची कल्पना नाही. पण जरूर प्रयत्न करीन ...

ओटीत घातली मुलगी विहीणबाई!

हे आशा भोसले ह्यांनी गायलेले गीत आपल्याला अभिप्रेत आहे का?
ओटीत घातली मुलगी विहीण बाई
सांभाळ करावा हीच विनंती पाई(की बाई)
की
विहीणबाई विहिणबाई उठा आता उठा
भातुकलीच्या सार्‍या तुमच्या झाला चट्टामट्टा
..... हे सुषमा श्रेष्ठ हीने गायिलेले बालगीत आपल्या मनात आहे?

वा!

केवळ 'विहिणबाई' ह्या एकमेव क्लु वरुन आपण दिलेली दोन गाणी पाहून आपला मराठी गाणी ह्या विषयातला व्यासंग समजला!

प्रमोदकाका तुमचे "लाख लाख शुक्रिया"!

हे आशा भोसले ह्यांनी गायलेले गीत आपल्याला अभिप्रेत आहे का?
ओटीत घातली मुलगी विहीण बाई
सांभाळ करावा हीच विनंती पाई(की बाई)

हेच! हेच!

आता हे कुठे मिळेल. एखाद्या नवीन CD वर असेल का?

तुमचे मोठेच उपकार आहेत!

हे कडवे बरोबर आहे का?

लाडकी लेक ही माझी पहिली वहिली
भाग्येच तियेच्या सून आपुली झाली
मी पदर पसरते जन्म दायीनी आई
सांभाळ करावा हीच विनवणी पाई

ओटीत घातली मुलगी विहीणबाई....

आभार : गुगल

नाही..

तर एवढ्या तुटपुंज्या माहितीवर हे कोणाला ओळखता येतंय का ... ?

मला तरी नाही येत बुवा!

तात्या.

नाही..

तर एवढ्या तुटपुंज्या माहितीवर हे कोणाला ओळखता येतंय का ... ?

मला तरी नाही येत बुवा!

तात्या.

बरं पण आता गाणं नक्की झालं ... "ओटीत घातली मुलगी विहिणबाई" ... तर चाल ठुमरीसारखी वाटतेय का? "ओरिजिनल" ठुमरी काय असेल?

'ठुमरी जब चलती है..!'

बरं पण आता गाणं नक्की झालं ... "ओटीत घातली मुलगी विहिणबाई" ... तर चाल ठुमरीसारखी वाटतेय का? "ओरिजिनल" ठुमरी काय असेल?

जगन्नाथबुवा,

चाल ठुमरीसारखी वाटते का, यापेक्षा बाज ठुमरीसारखा वाटतो का, हे विचारणं माझ्या मते अधिक योग्य. कारण कोणतीही 'चाल' ही सुरावटीवरून ठरते. 'ओटीत घातली मुलगी विहीणबाई, सांभाळ करावा..' यात या ओळीत मंद्र पंचमापासून मध्यातल्या मध्यमापर्यंतचे सर्व शुद्ध स्वर आहेत. याच सुरवटीमध्ये एखादी ठुमरीही बसू शकते. (कदाचित आपण म्हणता त्याप्रमाणे या सुरावटीमध्ये एखादी ठुमरी असेलही.)

'ओटीत घातली मुलगी विहीणबाई, सांभाळ करावा.. ' या ओळीत शुद्ध मध्यमाचे प्राबल्य बरेच आहे त्यामुळे मूर्च्छना पद्धतीनुसार 'सांभाळ करावा हीच विनवणी..' ही ओळ मध्यमातील वाटू शकते. आणि बर्‍याचश्या ठुमर्‍याही मध्यमात गायल्या जातात त्यामुळेच कदाचित आपल्याला हे गाणं ठुमरीवजा वाटू शकतं/वाटलं असेल.

मला विचाराल तर हे गाणं मला ठुमरीसारखं वाटत नाही. माझ्यामते हे एक प्रवाही भावगीतच आहे. आपण कृपया या गाण्याची लय लक्षात घ्यावी. ही लय प्रवाही आहे. सर्वसाधारणपणे ठुमरी ही ठाय लयीतली असते. त्यामुळे लयीचा विचार करताही मला हे गाणं ठुमरीवजा, ठुमरीसदृश वाटत नाही. (चूभूद्याघ्या)

जाता जाता अवांतर -

ठुमरी-दादर्‍याबद्दल बुजुर्ग मंडळींचा नजरीया किती सुंदर आहे पहा..

ठुमरी म्हणजे बुजुर्गांच्या मते 'नदीकिनारी ओल्या वस्रानिशी नुकतीच स्नान करून उभी असलेली स्त्री' आणि दादरा म्हणजे दर्द!

सो जगन्नाथ भैय्या, 'ठुमरी जब चलती है, तो उसका दादरा बन जाता है!' ऐसे हमारे बुजुर्ग केहेते है!;)

आपला,
(गाण्याखाण्यातला, आणि बनारसी ठुमरीतला!) तात्या.

--
संत तात्याबा मिसळपाव डॉट कॉम सुरू करण्याच्या संदर्भात येत्या सोमवारी पुण्याला जाऊन काही महत्वाच्या मंडळींची भेट घेणार आहेत! ;)

'ठुमरी जब चलती है..!'

जाता जाता अवांतर -

ठुमरी-दादर्‍याबद्दल बुजुर्ग मंडळींचा नजरीया किती सुंदर आहे पहा..

ठुमरी म्हणजे बुजुर्गांच्या मते 'नदीकिनारी ओल्या वस्रानिशी नुकतीच स्नान करून उभी असलेली स्त्री' आणि दादरा म्हणजे दर्द!

सो जगन्नाथ भैय्या, 'ठुमरी जब चलती है, तो उसका दादरा बन जाता है!' ऐसे हमारे बुजुर्ग केहेते है!;)

वा, सही आहे!

ठुमरीवजा वाटत नाही तर नसेलही. माझं काही म्हणणं नाही. माझा प्राबलेम तुम्ही लक्षात घ्या. मला चालसुद्धा नीट आठवत नाही. (पण आता मुंबईत आल्यावर कुठलं गाणं मिळवून ऐकायचं हे निश्चित झालं.) मला हे एवढं तरी का आठवलं हे सांगतो. तुम्ही ही
बंदिश-की-ठुमरी
ऐका. ती ऐकत असताना एकदम डोक्यात प्रकाश पडल्यासारखं झालं. काहीतरी जुनं आठवलं. मग बाकी काहीच आठवत नसलं की अस्वस्थ व्हायला होतं. म्हणून विचारलं.

नुसता बाज नाही तर चालच "चोरली" असं का वाटलं? त्याचं कारण लहानपणी दूरदर्शनवर बघितलेली वसंतराव देशपांड्यांची सुप्रसिद्ध मुलाखत. दुसरं काही नाही. त्याच्यात त्यांनी "माझी मातुलकन्यका" का असंच नाट्यगीत कुठल्या ठुमरीवरून घेतलं ते गाऊन दाखवलं होतं . . .

बाबू! काय ऐकवलंत!

तिलकबिहारी ठूमरी - राजन पर्रीकर ??? रमश्रेय झा.
जगन्नाथबाबू, चेष्टा नाही.

बाबू! काय ऐकवलंत!

सुंदर आहे ना? त्या काळी लोक कायकाय ऐकत असतील!

काय जबरदस्त माहितीची देवाणघेवाण आहे!

एक पुसटसे आठवणारे गाणे, त्याचा अस्पष्ट आठवणारा विषय, किंचित रागबोध, त्यावरुन जाणकारांचे तर्क- वा! काय प्रचंड माहितीचा खजिना उघडला आहे! संकेतस्थळ स्थापनेचा उद्देश सफल झाला असे वाटते!
अवांतरः 'सख्या रे घायाळ मी हरिणी' किंवा 'बाई गं केळेवाली मी' तर नाही?
ऐहिक

कशाला खडूसपणा?

ऐहिकराव्,
कशाला खडूसपणा करताय?
तिकडे च च्या भाषेवर....
इकडे गाण्यावर...
काय झालंय?

खडूसपणा

गुंडोपंत,
हा जर खडूसपणा असेल तर इथले अर्ध्याहून अधिक सभासद अधुन मधुन हा खडूसपणा करतच असतात. ह्या सगळ्या खडूसपणाच्या मुळाशी उपक्रम रावांची अस्पष्ट धोरणे आणि त्याची लहरी अंमलबजावणी आहे. आम्ही आता ह्यावर भाष्य करणे टाळायाचे ठरवले आहे परंतु राहवले गेले नाही म्हणून टग्या रावांची खालील वाक्ये देत आहे. हे संकेत स्थळ सुरू झाल्यावर काही दिवसातच मांडलेला टग्या दादांचा अंदाज किती खरा ठरला पहा.

नियमांची / धोरणांची अंमलबजावणी सुसूत्रपणे व्हावी ही अपेक्षा आहेच - नाहीतर "असे लेख चालतात मग कवितांनी/चारोळ्यांनी/विडंबनांनीच काय घोडे मारले आहे?" छापाचे वाद सनातन राहतील.

हे संकेतस्थळ काही उद्दिष्टांनी बनवलेले आहे, ज्यासाठी काही धोरणे ठरवलेली आहेत [जे ठीकच आहे!], असे असताना, अशी धोरणे अर्धवट विचारांतून बनणे हे हितावह नाही. नाहीतर असे वाद उफाळतच राहतील, चालकांना अशा वादांना सदैव तोंड देतच बसावे लागेल, आणि इतर काही करायला त्यांना वेळ उरणार नाही. [उलटपक्षी, अशा वादांना तोंड न देण्याचे धोरण स्वीकारल्यास जी चूक इतरत्र करण्यात आली होती - या स्थळाची पारदर्शकता नाहीशी होऊन त्याची लोकप्रियता कमी व्हायला वेळ लागणार नाही - याचाही अनुभव आपण इतरत्र घेतला आहेच!]
- टग्या

कशाला खडूसपणा?

ऐहिकराव्,
कशाला खडूसपणा करताय?

खडूसपणा असू देत की. मराठी साईटच आहे ना? पण त्याच्यात सदर "खडूस"ची अक्कल चमकली पाहिजे. मग तो दारू खाऊन बडबडला तरी चालेल. पण ही असली ऐहिकसारखी नको तिथे फाल्तुगिरी पचकायची कामं नकोत. कंसें?

गाणं कोणी लिहिलं आहे?

आणखी काही माहिती देता येईल का तुम्हाला?

------------------------------------------
तुम्ही सध्या हे वाचत आहात.

गाणं कोणी लिहिलं आहे?

आणखी काही माहिती देता येईल का तुम्हाला?

आता तुम्हीच द्या. संगीत दिग्दर्शक कोण हे तर कळलंच पाहिजे.

गाणे

यावर शिरिष कणेकर यांच्या एका पुस्तकातील एक प्रसंग आठवला. त्यांच्या एका मित्राचे कॅसेटचे दुकान होते, त्याला एका प्रसिद्ध व्यक्तीचा फोन आला.
"मला एका गाण्याची तबकडी हवी होती. पण गाणे आठवत नाही."
"ठीक आहे, कुणी गायले आहे ते सांगाल का?"
"खूप प्रसिद्ध गायिका आहेत. काय बरं त्यांच नाव... हां आठवलं, लता मंगेशकर"

कृपया ह. घ्या.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

भरपूरच माहिती...

... पुरविलेली दिसते आहे.

"खूप प्रसिद्ध गायिका आहेत. काय बरं त्यांच नाव... हां आठवलं, लता मंगेशकर"
नुसते मंगेशकर म्हणता तर नेमक्या कोण? असा गहन प्रश्न उरला असता.

ह घ्या

खूप प्रसिद्ध गायिका आहेत

"खूप प्रसिद्ध गायिका आहेत. काय बरं त्यांच नाव... हां आठवलं, लता मंगेशकर"
नुसते मंगेशकर म्हणता तर नेमक्या कोण? असा गहन प्रश्न उरला असता.

लता मंगेशकर म्हणजे कोण रे भाऊ?

हा हा हा... कोण बरे!!

"खूप प्रसिद्ध गायिका आहेत. काय बरं त्यांच नाव... हां आठवलं, लता मंगेशकर"
नुसते मंगेशकर म्हणता तर नेमक्या कोण? असा गहन प्रश्न उरला असता.

लता मंगेशकर म्हणजे कोण रे भाऊ?

ह्म्म्म्... कोण बरे असाव्यात? प्रतिसाद पाहता बहुदा जगन्नाथ मंगेशकरांच्या कोणी असाव्यात की काय असे वाटायला लागले आहे.

आगंतुक सल्ला : बुवा - तुम्ही नवीन चर्चा टाका

एकलव्य (मंगेशकर)

लता मंगेशकर म्हणजे कोण रे भाऊ?

अाता "मंगेशकर" हा कसला पावरफुल "ब्रॅंड" आहे, ह्याचा रीसर्च कोणीतरी केला पाहिजे. कोणाचंच नसलेलं आडनाव एका कुटुंबाने लावायला सुरुवात केली आणि त्याचा पसारा इतका बेफाट वाढला असं जगात कुठेच नसेल.

 
^ वर